लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
आंबट ढोण ऑरेंज जुस >>>>
आंबट ढोण ऑरेंज जुस >>>> लहानपणी ते आंबट लागत असेल असे वाटले नव्हते. आई कडून भरपूर साखर घालून रसना घ्यायचो त्यासारखे गोड असेल असे वाटायचे. इकडे येऊन ते किती आंबट असते आणि सकाळ सकाळी कसे काय पितात असे वाटले.
Gappa martana, kahi lokana
Gappa martana, kahi lokana nakaat , tondaat bot ghalNyachi savay aste. tar kahi dheri, baglaa, hath, tond khajwat bastat, Kaahi faar javal yewoon boltat, kahi thunkichi favarNi karat boltat.
marathi typech hot nahi :/
आता वाचनालयांतली पुस्तकं
आता वाचनालयांतली पुस्तकं वाचणारे कमी झाले आहेत पण पूर्वी पुस्तकांत विविध मजकुरांवर शेरे, अधोरेखित केलेलं सापडायचे. वाचकांचे प्रतिसाद.
खाजवणारे/नाकात बोटे घालणारे
खाजवणारे/नाकात बोटे घालणारे तर नाही भेटले पण खूप जवळ येऊन बोलणारे लोक ऑफिस्/जनरल डोक्यात जातात, मीच बाजूस सरकते. यक्क्क. विशेष करून स्मोक करून नंतर जवळ येऊन बोलणारे.. फार मळमळ होते
विशेष करून स्मोक करून नंतर
विशेष करून स्मोक करून नंतर जवळ येऊन बोलणारे.. फार मळमळ होते
>>>>>
+786
स्मोक दारू दोन्ही
अश्याच वासासोबत कोणी झोपत असेल तर त्याच्या शेजारी कोणी कसे झोपतो प्रश्न पडतो...
लहान मुलांवर अशी वेळ आली तर वाईट वाटते. कारण असे प्रकार आमच्या घरात पाहिले आहेत.. पिऊन यायचे आणि पोरांना कुशीत घेऊन झोपायचे.
Gappa martana, kahi lokana
Gappa martana, kahi lokana nakaat , tondaat bot ghalNyachi savay aste. tar kahi dheri, baglaa, hath, tond khajwat bastat,
>> आणि नंतर निघताना आपल्याशी शेकहॅण्ड करण्याची जुर्रत करतात
फिस्ट बम्प चा शोध लागला आहे याबद्दल अशा वेळेस आपल्याला फार छान वाटते.
aashu29 थँक्स
इतरांकरता - आंबट ढाण ज्यूसची रिक्षा 
https://www.maayboli.com/node/3047
फा हे पान उघडत नाहीये,
फा हे पान उघडत नाहीये, कोणत्या ग्रुप मध्ये आहे?
हे चित्रपट गॄप मधे आहे. आता
हे चित्रपट गॄप मधे आहे. आता मला ते सर्व वाचकांना खुले करता येत नाहीये पण तू जर चित्रपट विभागाचे सदस्यत्व घेतलेस तर दिसेल.
व्हाट्सएप ग्रुप मधले हे लोक
व्हाट्सएप ग्रुप मधले हे लोक
* फार समाजसुधारक आहोत असा आव आणून "चमकोगिरी" च्या हेतूने सोसायटीच्या ग्रुपवर मेसेजेस टाकणारे लोक
* अत्यंत सुमार दर्जाचे फॉरवर्ड, विनोद इत्यादी असंबद्ध मेसेज वारंवार सांगूनही ग्रुपवर टाकणारे लोक
* अरेरावी करून ग्रुपचे आणि इन जनरलच नियम न पाळणारे लोक
उपदेश देणारे फॉरवर्ड्स
उपदेश देणारे फॉरवर्ड्स पाठवणारे नातेवाईक
आणि ते अमलात आणा म्हणून आग्रह करतात
पादचाऱ्यांना तुच्छ समजणारे
पादचाऱ्यांना तुच्छ समजणारे लोक.
उदा: छोट्या रस्त्यावर आपल्या कारने डावीकडे वळायचे आहे आणि त्याचवेळी काही पादचारी तिथुन सरळ जात आहेत तर हॉर्न वाजवत त्यांनी अदृश्य व्हावे किंवा पळुन वाट करून द्यावी अशी अपेक्षा करणारे.
हे लोक स्वतः कधीच कुठेच पायी चालत नाहीत की काय असा प्रश्न पडतो.
सोसायटीचा वाटसप ग्रूप काढणे.
सोसायटीचा वाटसप ग्रूप काढणे. कशाला?
सोसायटीचा वाटसप ग्रूप काढणे.
सोसायटीचा वाटसप ग्रूप काढणे. कशाला?>>> असतो कि..
अतुल, मी तर आत्ताच उपदेश दिला त्या ग्रुपवर लिफ्टमध्ये घाण करू नका म्हणून, हायजीन मेन्टेन करा वगैरे वगैरे
मला दोन पेट पीव्हज सापडले
मला दोन पेट पीव्हज सापडले इतक्यात..
आपल्या गाडीच्या मागे स्वतः ची गाडी वेडीवाकडी पार्क करणारे लोक्स..
जीममधे न मागता वर्काउट ला मदत करणारे दयाळू लोक्स..
Last moment changes केलेले
Last moment changes केलेले cancel करणारे लोकं
कुठले चेंजेस आणि काय कॅंसल
कुठले चेंजेस आणि काय कॅंसल केले हे न सांगणारे लोक्स!
हवा तर 
मृणाली, तसे मेसेजेस नव्हे नी
मृणाली, तसे मेसेजेस नव्हे
नी दुरुस्ती केली प्रतिसादात.
Srd आहेत आजकाल बऱ्याच सोसायट्यांचे ग्रुप्स. लॉकडाऊनपासून प्रमाण वाढले असावे. सभासदांचे काही तक्रारी किंवा प्रश्न असतील तर गृपवर चर्चा होते.
आमच्या सोसायटीचा आहे एक ग्रुप
आमच्या सोसायटीचा आहे एक ग्रुप. एक ६० वर्षांचा आमचा फॅमिली फ्रेन्ड आहे. तो अन्य कोणाला तरी आंटी म्हणुन संबोधत असतो म्हणजे सिन्सिअरली.
अजून एक अगदी मायनर पीव्ह.
अजून एक अगदी मायनर पीव्ह. रिमोट वेळेवर न सापडणे हा प्रॉब्लेम जागतिक प्रॉब्लेम्सच्या रँक मधे जितका खाली असेल तितका
शेअर केलेला स्प्रेडशीट एकदम कोणत्यातरी अनोळखी सेल वर उघडतो. कॉलम BD व रो २२७ असे काहीतरी. जेथे काहीही नसते किंवा हा शीट कशाबद्दल आहे याचा थांगपत्ता लागत नाही. मग आपणच स्क्रोल करून मजकूर शोधायचा. तो ही पाठवणार्याने किंवा इतरच कोणीतरी त्यांच्या आवडीप्रमाणे फिल्टर केलेला असतो. सगळी साफसफाई करून जे आपण बघायला त्या पाठवणार्याला/रीला हवे ते आपण शोधून काढायचे. या लोकांना आठवडाभर १२-१६ तास झूम कॉलवर व्हिडीओ ऑन करून म्यूट बटन डिसेबल करून मीटिंग मधे उपस्थित राहायची शिक्षा दिली पाहिजे.
कन्सल्टंट्स असतील तर जितकी भारी कंपनी तितके हे पुढचे जास्त - मायक्रोसॉफ्टने तीन वेगळी टूल्स दिली आहेत ती अक्कल गहाण ठेवून दिलेली नाहीत. पण हे महान लोक ज्या कामाकरता ते टूल नाही त्याच कामाकरता ते वापरून आपल्याला पकवतात. म्हणजे स्लाइडस असतील तर त्या वर्ड किंवा एक्सेल मधे. टेबल्स असतील तर ती वर्ड मधे. आणि पॉवरपॉईण्टमधे मधे इतका मजकूर की ४०० टक्के झूम केल्यावर काही संगती लागेल.
तेच काही लोक एकच गोष्ट मेल,
तेच काही लोक एकच गोष्ट मेल, जीरा अपडेट... म्हणजे परत एक मेलच, टीम्सवर पीएम, टीम्सवर हुषार लोकांनी तयार केलेल्या गृप्स ज्याला ते परत टीम्सच म्हणतात त्यावर @ साईन न लिहिता पोस्ट करतात, जणू त्या १०० टीम्स वरचे मेसेजेस सगळे हॉक सारखे वाचतात, झूम चॅट जगात कोणी वापरत नाही तरी तिथे..
अरे बाबा जीरा अपडेट केलंस... अगदी तुला बोंबच ठोकायची असेल तर जीराला क्रिटिकल कर ब्लॉकर कर की माझ्या बुडाखाली जाळ काढायला बरेच लोक येतील... आताच्या काळात चुटुर पुटुर कामांसाठी कोणी मेल करतं का!
अर्थात यातलं पीव्ह काही नाही.
फारएण्ड फारच रिलेट झाले.
फारएण्ड फारच रिलेट झाले.
यात भर: साध्या एक्सेल शीट मध्ये ( काही इनपुट्स मागितले असता आणि सेलवर फोकस येताच "ही डेट फिल्ड आहे तारीख अशी लिहा" अशी कॉमेंट डिस्प्ले होऊनही त्यात ) तारखेत डॉट हा सेपरेटर वापरणारे आणि डेटा वॅलिडेशन वापरून अशा एंट्रीज नाकारून एरर प्रॉम्प्ट दिला तरी 'why I am getting error message' असे विचारणारे.
(काही भलत्याच डेटा साठी वरून आदेश येतो आणि आपण पटकन एक sheet बनवून शेअर करतो तेव्हा)
आणि असा validation मध्ये fail
आणि असा validation मध्ये fail झालेला डेटा pbi मध्ये येतो. मग date hierarchy का दिसत नाही असं म्हणून पीडणारे
Execel sheet रोजच्या वापरात
Execel sheet रोजच्या वापरात असतांना सुद्धा नीट नं वापरता येणाऱ्या दरवर्षी result बनवतांना percentage कसं काढायचं हे विचारणाऱ्या टीचर्स (male female दोन्ही )आमच्यकडे होत्या.
कमिटीने काही निर्णय घेतला
कमिटीने काही निर्णय घेतला किंवा मिटींगची नोटीस खाली बोर्डावर लावली की ती सर्वांना कळवली असे धरण्याचा नियम आहे. संपलं.
बाकी वाटसप हा पोरखेळ आहे. कामं होत नाहीत पण चर्चाच फार.
___________________
Execel sheet कशा वापरायच्या यांचे चांगले विडिओ यूट्यूबवर आहेत ना ते पाहा सांगायचे
Execel sheet कशा वापरायच्या >
Execel sheet कशा वापरायच्या >> सांगून झालं. ट्रैनिंग सेशनस झालीत. पण वापरता येत नाही म्हणणं सोपं जातं.... त्यामुळे ते काम आपोआपच दुसरं कुणी तरी करतं...
हायला डेव्हलपरला एक्सेलशीट
हायला डेव्हलपरला एक्सेलशीट बनवायला सांगितलं की तो/ती हेच करणार.
आमच्या पेस्केलच्या बाहेरचंच काम आहे ते. म्यानेजरांना कशाला ठेवलंय मग! ऑ!
माझा पीव्ह इथे माबो वर टाईप
माझा पीव्ह इथे माबो वर टाईप करतानाच होतो! चुकून लिहिताना गडबड झाली, की डिलिट करायची सोय नाही. सगळं आहे नाही ते डिलीट होत राहतं.
अजून एक पीव्ह.
अजून एक पीव्ह.
सोमवारी सकाळची फ्लाईट आपल्याला पकडायची आहे. गर्दी होते आणि सिक्युरिटीला मोठ्या रांगा लागतात म्हणून आपण लवकर उठून रांगेत जाऊन उभे राहतो. पण काही दीड-शहाणे खूप घाई घाई करत येतात आणि एक्स्क्यूज मी-एक्स्क्यूज मी करत पुढे निघून जायला बघतात. काही थोडे बिचारे चेहरे करून तरी जातात, पण काही तर अगदी हक्क असल्यासारखे सगळ्यांनी रस्ता दिलाच पाहिजे अश्या आविर्भावात असतात. आपण पहाटे उठून लाईन ला लागणारे येडे की काय? माझा खूप सात्विक संताप होतो!!!
सिनेमाबद्दल वाचुन
सिनेमाबद्दल वाचुन
अमितव, मामी,
अज्ञानाबद्दल माफ करुन “ डोंबिवली सिंड्रोम” म्हणजे काय ते सांगा.
डोंबिवली सिंड्रोम म्हणजे नाव
डोंबिवली सिंड्रोम म्हणजे नाव खराब झालेलं शहर. त्यात पुणेही येतं. साहित्यिकांची कृपा.
'डोंबिवली फास्ट' या सिनेमातली काही दृष्ये असावीत.
_______________________
Execel sheet कशा वापरायच्या - Teacher's Tech channel.
Pages