सहकारनगर, पुणे गटग

Submitted by अतुल. on 30 January, 2024 - 11:19
ठिकाण/पत्ता: 
तळजाई मंदिर.

नमस्कार,

येत्या रविवारी सकाळी पुणे माबोकरांचे ब्रेकफास्ट गटग करायचा प्लान करत आहोत.

वेळ: ४ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजता
ठिकाण: तळजाई मंदिर
लोकेशन: https://maps.app.goo.gl/fvbWhunfDrJwwpge7
माहिती:
रविवारी सकाळी तळजाईवर गर्दी असते पण मंदीराच्या बाहेरच भरपूर पार्किंग व्यवस्था असल्याने फारशी चिंता नको. आणि मंदिराचे प्रवेशद्वार रस्त्याला लागूनच आहे. तिथे आत मंदिरात बसण्यासाठी बाक आहेत, भरपूर प्रशस्त जागा आहे. सर्वजण येईपर्यंत तिथे आपण बसू शकतो.

PXL_20240201_120638638.jpg

जे माबोकर येऊ इच्छीतात त्यांनी कृपया या धाग्यावर हजेरी लावा. मंदिरात सर्वजण भेटून गप्पाटप्पा, तळजाई पार्क मध्ये फिरायला जाऊ, मग तिथेच बाहेर ब्रेकफास्ट करता येईल. दररोज सकाळी तिथे बाहेर ब्रेकफास्टचे बरेच स्टॉल्स असतात. तिथे गव्हाच्या चिकापासून ते कारल्याचा/दुधीचा रस आणि इतर सर्व प्रकारचे ब्रेकफास्ट मिळतात. किंवा ब्रेकफास्ट साठी इतरत्र जायचे असेल तर तसे भेटल्यावर ठरवता येईल.

चला तर! भेटू मग रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता तळजाई मंदिरात Happy

अपडेट (४ फेब्रुवारी २०२४)
गटग ला उपस्थित सभासद:
१. हर्पेन
२. अतुल.
३. कुमार१
४. अश्विनी११
५. अतरंगी
६. पशुपत
७. अश्विनी डोंगरे
८. तेजो
९. पियू
१०. दक्षिणा
११. बिपिनसांगळे

Photo 1:

Screenshot_20240204-110232.png
पुढील रांगेत डावीकडून उजवीकडे:
बिपिन सांगळे, डॉक्टर कुमार , अतरंगी , हर्पेन , अतुल. आणि पशुपत

मागील रांग डावीकडून उजवीकडे:
तेजो, पियू , अश्विनी११, अश्विनी डोंगरे आणि सौ पशुपत

Photo 2
Screenshot_20240204-105253.png
पियू, दक्षिणा, तेजो, हर्पेन, अतरंगी, बिपिनसांगळे, कुमार१, अतुल.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 3, 2024 - 21:00 to 23:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Srd - मला वाटले तुम्ही पुण्यातल्या गटगला येत आहात.
मुंबईतल्या गटग करता तुम्ही च घ्या फुडाकार(पुढाकार).

काळा घोडा फेस्टीवल संपला का?

मुंबईत भायखळा फुले प्रदर्शन २-३-४ फेब्रुवारीला राणी बागेत सकाळी आठ ते आठ संध्याकाळी आहे.
https://www.facebook.com/bycullazoo/ इथे पाहा.
रविवारी(४ फेब्रुवारीला)नऊ वाजता लाड म्युझियम पाशी भेटता येईल. गटग अधिक प्रदर्शन अशी दोन कामे होतील. मी येईन. रविवारी उशिरा मात्र खूप गर्दी होते हा अनुभव आहे. खादाडीचं एकच हॉटेल समोरच्या रस्त्यावर आहे पण तिथे फार गर्दी असते. पदार्थ चांगले असतात. पण हॉटेल लहान आहे.

काला घोडा उत्सव संपला . मागच्या वर्षी जहांगीर पाशी थांबलो होतो, पण कुणी आले नाही. दुसरे दोन मिपाकर येऊन गेले. लेख आहे.

फेब्रुवारीत ठिकठिकाणी मायबोली वसंत गटग कल्पना रुजली की पुढे झाड वाढेल. मुख्य म्हणजे कमीतकमी आयोजन आणि गटग तुमच्या दारी हे वाढत्या गर्दीच्या काळात आवडू लागेल. चुरसही वाढेल. अचानक न ठरवता येणारे किंवा ठरवूनही न येणारे सर्वांसाठी जमेल.

मुंबईवाल्यांनी वेगळीकडे जाऊन बोला बघू.
हो मी येणारे तळजाई गटगला.

मी इथे विचारले खरे पण खूप कफ आणि उल्ट्यांमुळे माझ्याच लेकाचे कन्फर्म नाहीये.

अंटार्क्टिका वरून आचार्यांनी यावे असं खूप वाटत होतं पण ते सध्या वेगळ्याच अवतारात बागडताहेत Wink
काय माहीत येतीलही

आतापर्यंत ज्यांनी नावे दिली आहेत त्यांची यादी धाग्यात अपडेट केली आहेत. अजूनही कोणी इच्छुक असेल तर नाव द्या किंवा उद्या थेट येऊ शकता Happy
फिबां, आलाच सेलेब्रिटी तर साधासुधा येत नाही तळजाईवर सकाळी. थेट राजाच येतो. आमच्या नशिबात असेल तर उद्या भेटतील हे राजे Happy

मस्त आहे मोर हा. थोडा मोठा टाका फोटो.
जोधपूरला एका राजवाडा कम हॉटेल मधे खूप मोर होते. रात्री मांजरासारखे ओरडायचे.

@हर्पेन , कराळे मास्तर (आचार्य) आहेत सेलेब्रिटी.

नाही असा ग्रुप वगैरे काही केलेला नाही. त्याची आवश्यकता वाटली नाही. आपण सर्व उद्या सकाळी तिथे भेटूच. साडेसात वेळ दिली आहे. आठ पर्यंत मंदिरातच असू. तोवर सर्वजण येतीलच.

तळजाई मंदिराच्या रम्य परिसरात 11 मायबोलीकरांचा ( + नील, जो भावी मायबोलीकर असेल !) सुंदर कट्टा संपन्न झाला आहे !
संयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद !!
खूप म्हणजे खूप छान वाटले !!!
प्रकाशचित्रकार मंडळी जरा वेळाने फोटो वगैरे चढवतीलच........

Happy Happy

मायबोलीचे शुद्धवाचक, लेखक, कवी, धावपटू अर्थात लोहपुरुष, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक, पाककलातज्ञ आणि एक बालमित्र अशा मित्र-मैत्रिणींचे हे छोटेखानी संमेलन मस्त झाले..

प्रत्येकाच्या मनोगतातून त्याचे/ तिचे मनमोकळे अंतरंग देखील प्रकट झाले..

असेच कट्टे नियमित व्हावेत हीच सर्वांची आंतरिक इच्छा दिसून आली.

अत्यंत मस्त मस्त गटग Happy धमाल आली आणि विशेष म्हणजे गप्पा खूप रंगल्या.

फोटो अपलोड केले आहेत. इतरांनी सुद्धा कृपया आपल्याकडील फोटो इथे अपलोड करायला हरकत नाही.

वृतांत जरा निवांत लिहितो. आता गडबडीत आहे थोडा.

छान. हर्पेन, अतुल यांचे फोटो आधी पाहिले असल्याने ओळखले.
पहिल्या फोटोत उजवी कडुन पहिले डॉ. कुमार का?

मानव
मी डाव्या हाताकडून दुसरा. अंगावर निळे जर्किन आणि डोक्यावर टोपी

तळजाई मंदिर परिसरात,गर्दीत पण Hello मायबोलीकर का अशा प्रश्नाने एकमेकांना नेमकं ओळखण्यापासून गटग ची सुरवात झाली.
नंतर हळूहळू एक एक जण येत गेले आणि गप्पा हसणे यात एकमेकांची खूप जुनी ओळख असल्यासारखी वाटली.
त्याच वेळी मॅरेथॉन उपक्रम असल्याने काही जणांना वाहतूक कोंडी मुळे पोहोचण्यासाठी उशीर झाला तरी सर्वजण वेळात वेळ काढून आले आणि आधी आलेले त्यांच्या साठी थांबून राहिले.
भरपूर अनौपचारिक गप्पा, गरमा-गरम चहा-पोहे , बिपीन सांगळे यांचे कविता वाचन,कुमार सर ,अतरंगी यांचे छोटे मनोगत, हर्पेन यांनी सगळ्यांसाठी आणलेली बहुउपयोगी भेटवस्तू वाटप, बिपीन यांनी आणलेला खाऊ,मायबोलीकर दक्षिणा यांची योगायोगाने हजेरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भेटीची आठवण (गटग चा वृत्तांत आणि फोटो येउद्या वाल्यांसाठी) म्हणून फोटो!
अशा रीतीने सहकारनगर माबो गटग एक सुंदर अनुभव होता.
सर्वांचे आभार.

Pages