..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे झिलमील, तुम्ही वेगळ्या गाण्यावर पोचलात असे वाटते.
माझ्या मनात जे गाणे आहे त्यात दुनिया शब्द नाही, अन्यथा त्याला फळ विक्रेता म्हणता येणार नाही हा त्या मागील तर्क.
१९९०-१९९५ चा चित्रपट आहे, त्याचे नाव, त्यातील कलाकार, हे गाणे काहीच माहीत नव्हते काल पर्यंत.
काहीतरी शोधताना हे गाणे चुकून लावले गेले.
(आणि ते ऐकून आलेला वैताग माबोकरांना देऊन शेअर करतोय Wink )

फीबां, आता शोधता येईल बहुतेक.

माधव श्रद्धा यांनी अंदाज नव्हे तर हिंट दिली आहे, 'चीज' बनवली असं लिहिलंय म्हणजे त्यांना सापडलेय गाणे.

'हर चीज़ बनानेवाला वह एक ही अल्ला है' असे एक गाणे युट्युबवर सापडलं. पण हे नसावं कारण हे लहान मुलांचं ऍनिमेशन सॉन्ग आहे.

१९९०-१९९५ या काळातलं ते पण वैताग देणारं गाणं शोधायची हिम्मत श्रद्धाच करू जाणे. तिला कायमच दंडवत असतो.

चीजची बरीच गाणी असतील.

तुमसा कोई प्यारा कोई मासूम नही है
काया चीज हो तुम खुद तुम्हे मालूम नही है

हे आठवलं.

कम seen

८/७८
भविष्यात कंगना रनौतच्या मुलीचे २ टपोरी बॉयफ्रेंड्स असतात. जेंव्हा कंगनाला ते कळते तेंव्हा ती मुलीची चांगलीच खरडपट्टी काढते - "कसले मवाली बॉयफ्रेंड्स आहेत तुझे! ते पण एक सोडून दोन. कुठे भेटली तुला ही रत्न?" मुलगी त्याचे उत्तर गाण्यातून देते.

हिंट १ - खूप सुंदर आणि प्रसिद्ध गाणं आहे.

मेरे दो अनमोल रतन, राम लखन
हे आठवले. प्रसिद्ध तर आहे. पण तुम्ही या गाण्याला खुप सुंदर म्हणाल असे वाटत नाही.
तेव्हा हे नसावे.

प्रेम रतन धन पायो? हे काय ग्रेट नाही...
पन्ना की तमन्ना है के हीरा मुझे मिल जाये? पण यात दोघे बॉय फ्रेंड असल्याचा उल्लेख नाही
कंगन रूबी वाला पहना दूँगा ओ हीरिये? हे मला आत्ताच समजले. त्यामुळे फेमस म्हणता येणार नाही.
चूड़ी (कंगना), नहीं ये मेरा दिल है -

'नदिया किनारे' हेराई 'आई कंगना'

कंगना रनौतची मुलगी असा स्पेसिफिक उल्लेख आहे, शिवाय 'कुठे सापडली?' अशी पृच्छा आहे. ज्याचं उत्तर 'नदिया किनारे' असं येईल. गाणं सुंदर आहे. बाकी इन्फो रेड हेरिंग असावी.

श्रद्धा, बरोबर.

नदिया किनारे हे राये (रायाचं अनेकवचन), आई कंगना

८/७९

सलमा मांडवकरीण धर्माला म्हणाली, "आपल्या म्हयशी फार इकडे तिकडे उंडारत आहेत. एस्टीवाले धडक मारून जातात नि आपण बसतो रडत. ते काही नाही, आपण आणखी एक कुत्रा घेऊया म्हशींची राखण करायला."

धर्मा म्हणाला "हो चालेल. आणतो."

बरेच दिवस झाले तरी त्याने काही कुत्रा आणला नाही. सलमाने पुन्हा आठवण केली आणि हा पुन्हा म्हणाला, हो आणतो. पण परिस्थिती पुन्हा जैसे थे!

एकदा धर्माने अश्याच म्हशी मोकळ्या सोडल्या होत्या चरायला. चांदी म्हस रस्ता क्रॉस करत होती. लांबून एक एस्टी येताना दिसली. आता धर्मा सावध होता. तो रस्त्याच्या कडेला उभा राहिला व चांदीला हाका मारून कुत्र्याला बोलवावं तसं यू यू करून बोलवू लागला. तेव्हा चांदी चिडली नि म्हणाली, "तू मला कुत्र्यासारख्या हाका मारतो आहेस, पण तुला एक खरोखरचा कुत्रा आणायला जमत नाही का?" तर हे सांगायला ती कुठलं गाणं म्हणेल?

मानव भारीच
यू आठवल पण भू आठवल नाही

Pages