१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
पुदिन्याची मी चटणी करून फ्रिज
पुदिन्याची मी चटणी करून फ्रिज करून ठेवते. नुसती पुदिन्याची पानं अन लिंबू (रंग टिकवण्यासाठी) मिक्सरमधून काढून आईस ट्रे मधे क्यूब्स करून ठेऊ शकतेस.
पुदिन्याची जुडी आणली की
पुदिन्याची जुडी आणली की त्यातली एक काडी कुंडित लावावी. मस्त मुळं धरतात. लागेल तसा वापरावा
गुड आयडीया पन्ना.. आज आता
गुड आयडीया पन्ना.. आज आता मिशन कडिलिंब आणि पुदिना...
सिंडीची पण आयडीया चांगली आहे. मी देशात असते तेव्हा हेच करते. इथे इनडोअर जगतो का पुदिना?
हो. मी लावलाय. बाहेर पण
हो. मी लावलाय. बाहेर पण गेल्या आठवड्यापर्यंत होता. मग जरा सुकायला लागला म्हणुन आत आणला. भरपूर सुर्यप्रकाश मिळेल असं बघ.
कढीलिंब १ मिनिट Microwave
कढीलिंब १ मिनिट Microwave High वर ठेवावा. पानं कोरडी होतात आणि रंग, चव न बदलता भरपुर दिवस टिकतात. हे कोथिंबीर, पुदीन्याला लागु नाही पण.
हे जास्त सोप वाटतय नाही?? बर
हे जास्त सोप वाटतय नाही?? बर झाल आधीच पाहिल
गोकुळ दुधाचे पनिर करायचे आहे
गोकुळ दुधाचे पनिर करायचे आहे लिंबु वापरुन कसे करु ? कुणी सांगा का?
मी भरपूर असा पाढरा वाटाणा
मी भरपूर असा पाढरा वाटाणा भिजत घातलाय्,आज सन्ध्याकाळच्या पॉट्लक साठी(रगडा पाटीस करनार होते)पण आज पॉट्लक च्या प्लान वर स्नो पडलाय !!! सो प्लान रद्द झालाय.
आता इतक्या पाढर्या वाटाण्या च काय करू? सम्पवायचा कसा कळत नाहीये.लागोपाठ ३/४ दिवस खाउन पोटाची वाट लागेल ...... तो फ्रिझ मधे राहील का?
तोषवी पाणी निथळल्यावर वाटाणे
तोषवी
पाणी निथळल्यावर वाटाणे छोट्या छोट्या झीपलॉक मध्ये हवाबंद करून ती पाकीटे फ्रीजर मध्ये ठेवा (अंदाजाने एका वेळी स्वयंपाकात लागेल एवढे वाटाणे एका पाकीटात भरावेत), जेव्हा लागेल तेव्हा एक एक पाकीट काढायचे आणि तेवढेच थॉ करून वापरायचे.
हो राहील. आज रगडा कर. कटलेट,
हो राहील.
आज रगडा कर. कटलेट, वडे, सूप. राहिलेले काही बाहेर ठेवून मोड आण त्याचा रस्सा, खिचडी, उसळ असे करुन संपवता येतील. आजूबाजूला जाता येईल अश्या अंतरावर कोणी असतील तर त्यांना देता येतील.
धन्स! झीपलॉक पाकिटान्ची
धन्स! झीपलॉक पाकिटान्ची आयडीया आवडली तस केल तर मग या विकान्ताला रगडा पटीस आणि पुढल्या विकान्ताला उसळ ! आणि मधे थोडे पार्सल करते मैत्रीणी कडे!
हि कढीलिंबाची पुड ४
हि कढीलिंबाची पुड ४ माणसांच्या पदार्थात अर्धा ते एक टिस्पून पुरेल.
पुदिना टिकवण्यासाठी. एका मोठ्या बोलमधे बर्फाचे पाणी तयार ठेवा. पुदिन्याची पाने धुवून एका मोठ्या गाळण्यात घ्या. पाणी उकळा. त्यात ती गाळणी फक्त ४० सेकंद बुडवा. बाहेर काढा, पाणी निथळून पाने बर्फाच्या पाण्यात टाका.
दोन मिनिटाने पाणी ओतून टाका व पाने सावलीत फडक्यावर पसरुन सुकवा. दोन तीन दिवसात सुकतील.
हि पूड आखाती प्रदेशात तयार मिळते. खुप टिकते. स्वाद पण टिकतो.
माझ्या स्वयंपाकघरात खुप चिलटं
माझ्या स्वयंपाकघरात खुप चिलटं होत असतात. अगदी साधी ताटली पण ओट्यावर ठेवली तरी चिलटं लागतात त्याला. काही उपाय आहे का?
आणि कोथिंबिर कशी टिकवता येईल? माझ्याकडे फ्रिज नाहिए..:(
ह्म्म.. मलापण जरा तुमची मदत
ह्म्म..

मलापण जरा तुमची मदत हवी...
मी काल सकाळी मेदुवडा साठी डाळ भिजत घातली होती.. त्यानंतर ती वाटताना माझ्याकडुने जरा सैलर वाटली गेली.. त्यामुळे वड्याचा वडा झाला
तर ते वाटण आता बरेच उरले आहे.. त्याचे काय करु समजत नाहिये.. त्यात जर तांदळाची पीठी घातली तर डोसे/इडली काही होउ शकेल का? आता जरा आंबलपण आहे वाटण
इड्ली रवा घातला तर इड्ल्या
इड्ली रवा घातला तर इड्ल्या होतील.
लगेचच प्रतिसादासाठी धन्यवाद
लगेचच प्रतिसादासाठी धन्यवाद मामी..
हो का..वाटलच होतं..
प्रमान किती घेउ.. मी ४ वाट्या घेतली होती डाळ. त्यातल थोडसच संपल आहे पीठ..
किंवा त्यात डाळीचे पीठ +
किंवा त्यात डाळीचे पीठ + तांदळाचे पीठ + कांदा + मिरची + आलं घालून वडेही करता येतील.
एक वाटी उडीद डाळ दोन वाटी
एक वाटी उडीद डाळ दोन वाटी इड्ली रवा. चार वाटी डाल असेल तर खूप रवा लागेल व खपणार नाहीत इड्ल्या. इड्ली वडा सांबार केल्यास जमेल. वर वडयाची रेसीपी आहेच. इथे वेग्ळेच बटाटे वडे नावाची रेसीपी आहे त्यात छोट्या बटाट्यास उड्दाचे कवर आहे. ते करून पाहता येइल.
मुग्धा, किचनमधे काहितरी
मुग्धा, किचनमधे काहितरी कोपर्यात पडलेले आहे, त्याने चिलटे होतात. एकदा फिनाईल ने काना कोपरा स्वच्छ केला तर फरक पडेल. वाटलेल्या उडदाच्या डाळित मैदा वा रवा घालून जिलेबी करता येईल.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
मुग्धा ,कोथीम्बीर एखाद्या वास
मुग्धा ,कोथीम्बीर एखाद्या वास /ग्लास /बाट्ली त पाणी घालून त्यात ठेव.चान्गला राहाते काही दिवस.
तोषवी "कोथिंबीरीची मुळं न
तोषवी
"कोथिंबीरीची मुळं न कापता" म्हणायचय ना तुला वरच्या पोस्ट मध्ये.
हो... हो.. फ्लॉवर पॉट मधे फुल
हो... हो..
फ्लॉवर पॉट मधे फुल ठेवतो तशी......
धन्स तोषवी..करुन पाहीलेय
धन्स तोषवी..करुन पाहीलेय मी...२ दिवस राहतो...त्यानंतर नाही..पण आहे छान आयडिया. नायजेला कुक्स मध्ये ही पध्दत पाहीली होती...:)
दिनेश्दा ओटा रोजच साफ करते...तरिही फिनाईल ने करुन बघेन...
तांदळाच्या घावन्याचे पीठ घरी
तांदळाच्या घावन्याचे पीठ घरी कसे तयार करतात??
प्रत्येकी एक वाटी चणाडाळ,
प्रत्येकी एक वाटी चणाडाळ, उडीदडाळ, तूरडाळ, मूगडाळ. त्याच वाटीच्या मापाने १० वाट्या तांदूळ, एक वाटी (किंवा थोडी कमी) मेथीदाणे व धणे एकत्र मिळून. ह्या प्रमाणात एकत्र केलेलं धान्य दळून आणून ठेवले की कधीही झटपट आंबोळ्या करता येतात >>>>>>>>
जुन्या माबो वर हे प्रमाण सागितलेले आहे आंबोळ्यांसाठी, तर माझा एक बालीश प्रश्न असा की हेच सगळे घटक थोड्याफार प्रमाणात चकलीच्या भाजणीत असतात तर ही भाज्णी आंबवली तर त्याच्या आंबोळ्या होतील काय? तशी भाजणी बारीक दळलेली असते तरी पण कोणी हा प्रयत्न केला आहे का मीच पहीली?:)
मला वाटते भाजणी मधे धान्ये
मला वाटते भाजणी मधे धान्ये भाजलेली असतात त्यामुळे पीठ आम्बणार नाही.
भाजणी मिळते का इथल्या देसी स्टोअर्स मधे,मला नाही दिसली कधी.जर्सीत मिळते का?असेल तर १ फेरी मारायला हवी.
तोषवी, केप्रची भाजणी बे
तोषवी, केप्रची भाजणी बे एरियामधे बर्याच दुकानात मिळते.
मेपल सिरपच काय करायचं असतं
मेपल सिरपच काय करायचं असतं म्हणे?
नेटवर जुजबी माहीती मिळालीये रेसिपी नाही
मेपल सिरप पॅन केक वर ओतुन
मेपल सिरप पॅन केक वर ओतुन (चांगला शब्द?) खाल्ले जाते.
Pages