१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
बेकरीमध्ये जाताना पातेलंभर
बेकरीमध्ये जाताना पातेलंभर पाणी घेऊन जायचं लक्षात ठेवायला हवं यापुढे!

चकलीच्या भाजणीचे
चकलीच्या भाजणीचे थालीपीठाव्यतिरीक्त आणी काय करता येईल? कृपया कुणी चकली अस सांगु नये.......
वांग्याचे काप करताना त्यावर
वांग्याचे काप करताना त्यावर बेसनाऐवजी चकलीची भाजणी लावायची.
कुठलीही पीठ पेरून पालेभाजी करताना- जसे की कांदापात, मेथी- त्यात डाळीच्या पीठाऐवजी च.भा पेरायची.
चकल्या नकोच असतील, तर छोटे चपटे वडे करून तळ (यात कष्ट कमी. शिवाय, पटापट संपते भाजणी)
thnaks punam for quick
thnaks punam for quick reply......
छान आहेत आयडीयाज, चपटे वडे- थोडक्यात जरा कृती सांग ना प्लीज....... (म्हण्जे आणखी काय काय घालु त्यात)
शिल्पा, भाजणीत कांदा,
शिल्पा, भाजणीत कांदा, कोथिम्बीर, मीठ, घालुन गरजेपुरत पाणी घालुन त्याचे मुटके बनव. शॅलोफ्राय करुन भाताबरोबर मस्त लागतात.. नुस्ते खायला तर छानच... सोबत लोणी किंवा दही
अंड फोडल्यावर जर बलक पसरला तर
अंड फोडल्यावर जर बलक पसरला तर ते अंड वापरू नये.
पूनम, इथे डझनात अंडी घेतली जातात आणि जर वेळेत वापरली गेली नाहित तर ती फ्रिजमध्ये ठेवूनपण चांगली राहिली आहेत की नाही ते पहायला ही बलकाची किंवा पाण्यात अंड टाकून पहायची पध्द्त खरच उपयोगी पडते.
अंड फोडल्यावर जर बलक पसरला तर
अंड फोडल्यावर जर बलक पसरला तर ते अंड वापरू नये. << अंडं फोडलं की ते तसंही उकडता येणार नाहीच
मिलिंदा, उकडलेलं अंड शीळं कस
मिलिंदा, उकडलेलं अंड शीळं कस आहे हे सांगितलेलं नाही.
उगाचच काय फिदीफिदी हसतोस?
सोया वडी चि एखादी रेसेपि
सोया वडी चि एखादी रेसेपि सान्गा ना
अनु, सोया वडी = सोयाबीन चंक्स
अनु, सोया वडी = सोयाबीन चंक्स असं गृहीत धरुन सांगतोय, खालील दुव्यावर बघा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/113854.html?1152753549
धन्यवाद मिलिन्दा
धन्यवाद मिलिन्दा
कडिलिंबाची पान जास्त दिवस कशी
कडिलिंबाची पान जास्त दिवस कशी टिकवायची? म्हणजे फ्रिज करावीत कि बाहेर वाळवुन मग वापरावीत?
फ्रीझरमधे ठेवलेली छान टिकतात.
फ्रीझरमधे ठेवलेली छान टिकतात. काळी पडत नाहीत. फक्त फ्रीझरमधून काढली की लागलीच फोडणीत किंवा पदार्थात घालायची.
फ्रिझर मधे हवाबंद ड्ब्यात
फ्रिझर मधे हवाबंद ड्ब्यात ठेवायची का??
झिप लॉक च्या पिशवीत ठेवाय्ची
झिप लॉक च्या पिशवीत ठेवाय्ची आणि फ्रिझर मधे टाकायची
कढीलिंबाची पानं जर डीप फ्राय
कढीलिंबाची पानं जर डीप फ्राय करुन हवाबंद डब्यात भरली तर अनेक महिने टिकतात. चांगल्या कड्कडीत तेलात तळायची.
अमृता- कढीपत्ता भारतातील
अमृता- कढीपत्ता भारतातील उन्हात कडकडीत वाळवून मग त्याची पावडर करुन मी अमेरिकेतील नातेवाईकांना पाठवते. वास ईन्टॅक्ट राहतो आणि चवही. फक्त पानंच हवी असतील तर मात्र ह्या मेथडचा उपयोग नाही.
http://www.hintsandthings.com
http://www.hintsandthings.com/kitchen/stretchers.htm
नाइस हिन्ट्स. गरजुनी बघावे.
कढीलिंबाची पाने फ्रीझरमधे पण
कढीलिंबाची पाने फ्रीझरमधे पण काळी पडतात. ह्याचे निवारण काय? फ्रिजमधे तर आठवड्यात बिघडतात. काय करावे?
अमी
रैना, कडकडीत उन तर मिळण सध्या
रैना, कडकडीत उन तर मिळण सध्या अशक्य आहे
सायो, डिप फ्राय करायच ऑपशन चांगल वाटतय.
झिपलॉक मधे ठेवलेली पान काळी पडत नाहित का? मृ, कशात पान ठेवायची सांग ग.
झिपलॉक फ्रीझरबॅगमधेच ठेवते
झिपलॉक फ्रीझरबॅगमधेच ठेवते गं. अगदी कोरडी असायला हवी पानं फ्रीज करण्यापूर्वी. माझी तरी काळी पडली नाहीत.
मरेना... आता मला जाउन आधी
मरेना... आता मला जाउन आधी झिपलॉक फ्रिझर बॅग आणावी लागेल
साध्यात ठेवल तर बहुतेक काळी पडत असतिल.
आता थोडी पान ठेवुन बघते काळी होतायत का ते.
मी अशीच पुदिन्याची पानं ठेवली
मी अशीच पुदिन्याची पानं ठेवली होती, काळी पडली. झिपलॉक फ्रिझर बॅग साध्या झिपलॉकपेक्षा वेगळी असते का ?
सिंडे, पुदिन्याची माझी पण
सिंडे, पुदिन्याची माझी पण काळी पडलीत. पण वास मस्त आहे टिकलेला. कढीपत्ता किंचित डार्क हिरवा झालां काळा पडला नाही आणि स्वादही गेला नाही.
हो दोन्ही वेगळे प्रकार आहेत.
लेफ्ट्-ओव्हर पिझ्झा
लेफ्ट्-ओव्हर पिझ्झा मायक्रोवेव्ह मधे गरम न करता साध्या तव्यावर मध्यम आचेवर ठेवला तर मस्त क्रस्टी होतो.
झिपलॉक फ्रिझर बॅग साध्या
झिपलॉक फ्रिझर बॅग साध्या झिपलॉकपेक्षा वेगळी असते का ?>>> होय.
तसाच reynolds कंपनीचा पण आहे. तोही चांगला आहे.
http://www.amazon.com/Johnson-70055-Ziploc-Vacuum-Pump/dp/B001DRNESE
हा हँडी वॅक्युम वापरुन बघा. नेहमीच्या फ्रिझर बॅग पेक्षा चांगला तर आहेच. स्वस्त ही आहे. मोठ्या आणि महाग vaccum sealer मध्ये पैसे invest करायचे नाही आहेत त्यांना एकदम चांगला पर्याय.
धन्यवाद मुलींनो
धन्यवाद मुलींनो
कढिलिंबाची पाने तेलात थोडी
कढिलिंबाची पाने तेलात थोडी परतून त्याची पूड करुन ठेवायची. हि पूड हिरवीगार होते. फ्रीजबाहेरही टिकते.
कुठल्याही भाजी आमटीत वापरता येते. या बरोबर थोडी चण्याची / उडदाची / तूरीची डाळ, हिंग, लाल मिरची वगैरे परतून चटणी करता येते . कढीलिंब कोलेष्ट्रोल कमी करतो. म्हणूण नेहमी खास करुन जिथे ओले खोबरे वापरतो तिथे वापरावा (खोबर्याबरोबर ). पण खूपदा तो काढून टाकला जातो. अशी पूड केली तर तो खाल्ला जातो.
या चटणीला चटणीपुडी म्हणतात
या चटणीला चटणीपुडी म्हणतात ना? खोबर्याचे परिणाम नाहिसे करायला किती कढीलिंब खावा लागेल? .ए.भा.प्र.
थँक्स दिनेश, आता पुदिन्याची
थँक्स दिनेश, आता पुदिन्याची पाने टिकवण्यासाठी टिप्स द्या
इथे फारच मोठी जुडी मिळते पुदिन्याची.
Pages