१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
मग अवन जरास गरम करुन त्यात
मग अवन जरास गरम करुन त्यात ठेवुन दे १-२ तास.
मग अवन जरास गरम करुन त्यात
मग अवन जरास गरम करुन त्यात ठेवुन दे १-२ तास.<<<< अनिलभाई १-२ तास??? त्या चकल्यांची आधी लाकडं होतिल आणि मग कोळसा.....
त्यापेक्षा त्या चकल्या मिक्सरमधे फिरवुन घे आणि जेवताना थोड तिखट घालुन दही किंवा तेला बरोबर चटणी सारख खा... मस्त तोंडीलावण होइल आणि खपतिल पण लवकर...
इथे दिलेल्या पध्द्तीने पेपर
इथे दिलेल्या पध्द्तीने पेपर डोसा केला होता (मनःस्वीनी च्या पध्द्तीने) पीठ उरलय खुप. त्याच अजुन काहि करता येइल का?
त्याच्यातच अजुन डाळी भिजवून
त्याच्यातच अजुन डाळी भिजवून वाटून घालून अढाई कर. नाहीतर हांडवा कर.
हांडवा कसा करायचा?
हांडवा कसा करायचा?
फ्रीजमधे कुठल्या
फ्रीजमधे कुठल्या खायच्याप्यायच्या गोष्टी ठेवू नये याबाबत कुणाला माहिती आहे का? मला माहिती हवी आहे. कधीकधी एखादी गोष्ट फ्रीजमधे ठेवली की तिच्या चवीत बदल होतो.
हांडवो
हांडवो
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/138627.html?1211249606
मायक्रोवेव्ह मधे रताळं कसं
मायक्रोवेव्ह मधे रताळं कसं भाजायचं ? तेल लावुन ग्रिल करायचं का ?
तसचं ठेवलं तरी छान शिजतं, तेल
तसचं ठेवलं तरी छान शिजतं, तेल लावायची गरज नाही. ग्रिलवर जास्त छान चव लागते, पण वेळ जास्त लागेल.
लाजो. अवन एकदम गरम करायच नाही
लाजो.
अवन एकदम गरम करायच नाही ग बयो. जरास गरम करुन बंद करायच. मग त्यात ठेवायच्या चकल्या.
धन्यवाद प्रीति आज
धन्यवाद प्रीति
आज शिवरात्रीनिमित्त करुन बघते...
एका कार्यक्रमासाठी बरेच लोक
एका कार्यक्रमासाठी बरेच लोक येणार होते म्हणून मैत्रिणीने मोठं पातेलंभरून बटाटे पोहे केले होते. ऐनवेळी लोक उगवले नाहीत. निम्मं पातेलंभरून पोहे उरले. म्हणून तिने ते पाण्याचा हात लावून थोडे ओले केले, मिक्सरमधून फिरवले, त्यात कांदा आणि गरम मसाला घातला आणि चक्क वडे थापून तळले. घरातल्या लोकांचा उड्या पडल्या त्यावर, नुसते पोहे कोणी खायला तयार नव्हते
मस्त होतात हे वडे. तेलकट मात्र आहेत. पण संपवासंपवी आणि बदल म्हणून बेस्ट आयडीया.
हम्म, मागे कोणीतरी पोह्याचे
हम्म, मागे कोणीतरी पोह्याचे कटलेट लिहीले होते, ती साधारण अशीच पाकृ होती.
हं पोहे खूप तेल पितात पण छान
हं पोहे खूप तेल पितात पण छान लागतात वडे.
हो पोह्याचे वडे प्रचंड तेल
हो पोह्याचे वडे प्रचंड तेल पितात. ब्रेड रोल सारखे. पण चवीला भारी लागतात.
नाचणी सत्वाची खीर करताना नाचणीत चमचाभर पाणी घालुन त्याची पेस्ट केली आणि ती (एकीकडे दूध चमच्याने हलवत) उकळत्या दुधात घातली तर गुठळ्या होत नाहीत अजिबात.
हे पोह्याचे कटलेट मी एकदा
हे पोह्याचे कटलेट मी एकदा असंच सहज थोडेसे तेल स्प्रे करून मायक्रोवेव्ह मधे ठेवले होते. मस्त लागत होते.
मम्मी हे कटलेट शॅलोफ्राय करूनच करते.
माझ्याकडे दीप चे तयार तूप
माझ्याकडे दीप चे तयार तूप उरलेय पुष्कळ (भारतात गेल्याने सम्पले नाही). आता वास येतोय त्याला. एकदा उकळुन वास जाईल का?
इथे उसगावात कोणते तूप वापरतात सगळे? कि अन्सॉल्टेड बटर चे करावे घरी??
मी तरी अन्सॉल्टेड बटरचेच करते
मी तरी अन्सॉल्टेड बटरचेच करते नेहमी.
इथे मागे पण जुन्या /वास येणार्या तुपाची चर्चा झाली होती. समई किंवा निरांजनात घालून संपवता येईल. वास येणार्या तुपाचा दिवा देवाला दाखवायचा नसेल तर नुसताच घरात कुठेतरी लावता येइल.
( वेलकम ब्यॅक, दोघांनीही बर्फाच्याच दिवसात परत यायचं असं ठरवलं होतं का
)
तुप बाकी कशात वापरले जाणार
तुप बाकी कशात वापरले जाणार नसेल तर हात पाय, पायाच्या तळव्यांना वापरुन संपवता येईल.
पंचामृत फेशिअल कर ज्ञाती मी
पंचामृत फेशिअल कर ज्ञाती
मी पण अनसॉल्टेड बटरचे तूप करते.
हम्म!! एक अख्खा दोन किलोचा न
हम्म!!
पण तो वास नाकात बसतो अगदी 
एक अख्खा दोन किलोचा न उघडलेला डबा आहे
दोन्ही स्टॉर्म आमच्या येण्याच्या तारखा बघुनच आले
पिकअप करायला चार तासाचा रस्ता तेरा तास ड्राईव्ह केला नवर्याने :(:-(
न उघडलेला डबा असेल तर परत कर.
न उघडलेला डबा असेल तर परत कर.
नाही होणार, बरेच दिवस झाले
नाही होणार, बरेच दिवस झाले आणून
पण डब्बा उघडलेलाच नसेल तर
पण डब्बा उघडलेलाच नसेल तर तुला कसं कळलं वास येतोय हे
एक भा प्र........
लाजो, एक डबा उघडा आहे
लाजो, एक डबा उघडा आहे त्यातल्या तुपाला वास येतोय, त्याशिवाय आणखी एक न उघडलेलाही आहे. आता तोही तीन महिने जुना झाला ना..म्हणजे मी आणुन तीन महिने आणि दुकानदाराने आणुन न जाणो किती..
अग ज्ञाती, एनीवे तुला त्या
अग ज्ञाती, एनीवे तुला त्या डब्ब्याच काही करता येणार नहिये तर उघडुन बघ. कदाचित वास नाही येणार कारण सिल बंद होत म्हणुन खराब होण्याची शक्यत कमी आहे.
पण तु आणलेसच कशाला २-२ डब्बे, देशात जाणार होतिस तर??? आगाऊ, भोचक प्रश्न

दिवे घे
तसाच ठेऊन दे डब्बा आणि गुढीपाडव्याला, घरभर तुपाच्या दिव्यांची आरास कर
लोकहो , चॉकलेटी रंगाच्या
लोकहो , चॉकलेटी रंगाच्या पँटवर भोपळ्याच्या रसाचे डाग पडले आहेत. ड्रायक्लिनींग केले तरी जात नाहीत काही उपाय सुचवा प्लीजच.
दिप्या चॉकलेटी पॅटवरचा
दिप्या चॉकलेटी पॅटवरचा भोपळ्याचा रस पिळून घे त्यात थोडी मलई, साखर घाल आणि गॅसवर आटव म्हणजे भोपळा चॉकलेट तयार होईल.
ईईईईईईईईईईईईईईईई
ईईईईईईईईईईईईईईईई
न उघडलेल्या तूपाच्या डब्यातील
न उघडलेल्या तूपाच्या डब्यातील तूपाला, वास येण्याची शक्यता जरा कमी आहे. त्यामूळे जर परत करणे शक्य नसेल तर तो उघडायची रिस्क घेता येईल. वार येत नसेल तर भराभर वापरून संपवता येईल. वास येणारे तूप मात्र खाण्यासाठी वापरणे योग्य होणार नाही.
Pages