१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
तांदुळाच्या पॅकवर लिहिलेलं
तांदुळाच्या पॅकवर लिहिलेलं असतं aged rice म्हणून तो जुना असतो १ वर्ष...
अंदाजाने १ पेर वर पाणी घालण्यापेक्षा १ कप तांदुळाला बरोब्बर २ कप पाणी टाक. किंचीत मउ हवा असेल तर सव्वा दोन कप.
पॅक्ड तांदळासाठी नाही, पण हि
पॅक्ड तांदळासाठी नाही, पण हि शिताची परिक्षा तांदळासाठी आहे. एक दाणा दाताने चावून बघायचा, कटकन तुटला तर जूना आणि जरा ठिसूळ लागला तर नवा समजायचा. बासमति तांदळासाठी दुप्पट पाणी योग्य. शिजताना चिमूटभर मीठ, थोडा लिंबाचा रस आणि तूप घातले तर भात चिकट होणार नाही.
धन्स सगळ्याना , मिती अस
धन्स सगळ्याना ,
मिती अस लिहिलेल असता हे मला माहीतीच नव्हत ,पुढच्यावेळी नक्कि बघेन.
दिनेशदा ,हा प्रय्प्ग नक्कि करेन .
मायबोली आणि मायबोलीकर्स झिन्दाबाद!!!!
मला पटकन होणार्या
मला पटकन होणार्या ब्रेकफास्ट आयडीयाज हव्या आहेत. नेहेमी उपमा, पोहे ,ईड्ल्या, उकडपेंडी हे खाउन कंटाळा आला आहे. सीरीयल, अंड नको.
अमया, इथे उपहार सदरात बरेच
अमया, इथे उपहार सदरात बरेच पदार्थ सापडतील असे !!!
मला काही करायला सोपे, पण
मला काही करायला सोपे, पण तरीही पौश्टीक असे मेनू सांगू शकाल का?जसे मिश्र पिठाची चपाती, साग चना, दही कोशिंबीर अशा मेनूमधे जवळपास सगळे हवे ते आहारघटक मिळतात्...असे अजून काय करता येइल?
उकडलेली अंडी झट्पट
उकडलेली अंडी झट्पट सोलण्यासाठी काही युक्ती आहे का....अंड उकडताना काही स्पेशल करायला लागत का?
मदतीबददल आगावु धन्यवाद.
एक मुलगी, उकडलेल अंड ओट्यावर
एक मुलगी,
उकडलेल अंड ओट्यावर हलकेच आपटायच, एक क्रॅक गेली की ओट्यावर तळ्हाताने हलकेच दाबुन फिरवायच (लाटण कस फिरवतो पुढे मागे, तसं). कवच पटकन निघत. मग पाण्यात धुवुन घेतल की सगळी बारीक कपच्या पण निघुन येतात - ही माझी पद्धत. अजुन सोप्प्या आयडियाज असतिल मात्तबर गृहिणींकडे
अंडी उकडून निघाली की लागलीच
अंडी उकडून निघाली की लागलीच गार पाण्यात बुडवून ठेवायची, ४-५ मिनिटांनी सोलायची.
थंडगार बर्फाच्या पाण्यात लगेच
थंडगार बर्फाच्या पाण्यात लगेच घालायची गरम पाण्यातून काढली की. १० मिनीटात सोलायची.
उलट वास पण येत नाही अश्याने जर हार्ड बॉइल केले असेल तरी.
लाजो, म्रु, मन:स्वि नी: तत्पर
लाजो, म्रु, मन:स्वि नी: तत्पर उपाय सुचवल्याबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद. करुन बघते.
अंडी उकडताना मिठ घालायचं, चव
अंडी उकडताना मिठ घालायचं, चव पण छान येते आणि कव्हर लवकर निघतं.
मीठ घालुन चवीत काही फरक पडत
मीठ घालुन चवीत काही फरक पडत नाही. अंड फुटलं तर ते पटकन सॉलिड होतं म्हणुन मीठ घालतात.
चायनीज स्टोअरमध्ये Rice
चायनीज स्टोअरमध्ये Rice Paper मिळतात न. जे लाजोने सांगितल होतं सुशीसाठी वापरा म्हणून. ते मायक्रोवेव्हमध्ये पापडासारखे भाजले तर छान तांदळाच्या पापड्यांसारखे लागतात.
काय सांगतेस काय?? सहिच.. जे
काय सांगतेस काय?? सहिच.. जे पेपर स्प्रिंग रोल साठी वापरतात तेच न?
हे पेपर कसे वापरायचे नक्की?
हे पेपर कसे वापरायचे नक्की? मी एक पाकीट आणल होत, पण न कळल्याने शेवटी टाकून द्याव लागल!
हे वर लिहिलंय ना, अंडं
हे वर लिहिलंय ना, अंडं उकडल्यावर गार/बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवायचं, यानं एकसंध सोललं जातं का?
म्हणजे माहित नाही का, पण क्वचित कधीतरी सोलताना बारीक बारीक खपल्या निघतात टरफलाच्या अगदी. आणि त्या सुद्धा आत चिकटलेल्या असतात. जामच वैताग येतो.
बारीक बारीक खपल्या निघतात
बारीक बारीक खपल्या निघतात टरफलाच्या अगदी. आणि त्या सुद्धा आत चिकटलेल्या असतात. जामच वैताग येतो.>>>> आर्फी ..मोदक..
अमृता, स्प्रिन्ग रोलसाठी
अमृता, स्प्रिन्ग रोलसाठी वापरत तू? ते तर मैद्याचे असतात न? हे अगदी ट्रान्स्परंट असतात. आपल्या उकडीच्या पापड्या असतात न तत्याहूनही पातळ.
धनश्री, इथे बघ ते राईस पेपर
धनश्री, इथे बघ ते राईस पेपर वापरून. लाजोची छान रेसिपी आहे. मी पुष्कळदा करते हल्ली.
http://www.maayboli.com/node/10559
आर्फी, हो अगदी एकसंध सोलले
आर्फी, हो अगदी एकसंध सोलले जाते. बर्फाच्या पाण्याची पण गरज नाही नुसत्या थंडगार पाण्यामुळे सुद्धा नीट सोलले जाते. इथले वाचून मी परवाच करुन पाहिले.
आर्फी, हे बघा
आर्फी, हे बघा http://elise.com/recipes/archives/005251how_to_make_perfect_hard_boiled_...
आर्च... हो खरच कि ग..ते
आर्च... हो खरच कि ग..ते मैद्याचे असतात.. मागे मी आणलेले.. २ वेळा जेमतेम स्प्रिंग रोल्स केले नंतर काही जमल नाही.
नळाच्या थंड पाण्यात ठेवुन मस्त निघतात अंड्याच्या साली..
आर्फी, तू म्हणतो आहेस तसे
आर्फी, तू म्हणतो आहेस तसे अंडे नीट न उकडले गेल्याने होते असा माझा अनुभव आहे.
स्वाती, प्रीती,
स्वाती, प्रीती, मिलिंदा,
धन्यवाद!
आर्च धन्यवाद.. पण ती लिंक
आर्च धन्यवाद.. पण ती लिंक उघडत नाहीये. तो कोणता ग्रुप आहे? तिथे फक्त ग्रुपच्या सभासदांसाठी अस लिहील आहे.
धनश्री तो 'मायबोली गणेशोत्सव
धनश्री तो 'मायबोली गणेशोत्सव २००९' ग्रूप आहे. त्यात सामील झाल्यावर दिसेल तुम्हाला ती पाककृती.
<<पण क्वचित कधीतरी सोलताना
<<पण क्वचित कधीतरी सोलताना बारीक बारीक खपल्या निघतात टरफलाच्या अगदी. आणि त्या सुद्धा आत चिकटलेल्या असतात. जामच वैताग येतो.>>
अंडी जर ताजी असतील तर त्यांत आम्लाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अंडं कवचाला चिकटून राहतं आणि सोलताना कवच काढणं कठीण जातं. याउलट अंडी जर जुनी असतील तर त्यातून कार्बन डायॉक्साईड वायू कवचातील सूक्ष्म छिद्रांतून बाहेर निघून गेलेला असतो व त्यामुळे आम्लता कमी होऊन अंडं कवचाला चिकटून राहत नाही, व त्यामुळे सोलणं सोपं जातं.
पण आता अंडी नवी जुनी कशी
पण आता अंडी नवी जुनी कशी ओळखायची? याची युक्ती सांगा. मळकी म्हणजे जुनी असं धरुन चालायला हरकत नाही!
ताजी अंडी पाण्यात ठेवली असता
ताजी अंडी पाण्यात ठेवली असता बुडतात आणि आडवी राहतात. शिळी अंडी पाण्यात पूर्णपणे बुडत नाहीत, कारण त्यातील हवेचे प्रमाण वाढलेले असते.
Pages