चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आज रील बघताना टायगर 3 मध्ये पठाण ची एन्ट्री बघण्यात आली..
https://www.facebook.com/reel/1956635204718608?s=yWDuG2&fs=e&mibextid=Ni...

त्या दिवशी एकीकडे वाचले की animal पुढचा भाग निघणार आहे त्यात कबीर सिंग दाखवणार आहेत. काय चालू आहे या देशात काही कळत नाही.

साडेतीन तासांचा पिच्चर, संपता संपेना.‌ भीती वाटायला लागली की मला हितंच थेटरात कोंडून ठेवणार आणि दिवसभर चालणार पिच्चर. >>>>
हम्म, 'ऍनिमल'चे रिव्यू वाचून बघावा का नाही असा प्रश्न पडला आहे.

'सॅम बहादूर'चे सोशल मीडियावर फार वाईट रिव्यू आले आहेत. इथला रिव्यू पॉझिटिव्ह वाटतो आहे.
लहान मुलांना नेता येईल का 'सॅम बहादूर'ला?

लहान मुलांना नेता येईल का 'सॅम बहादूर'ला? >>> युद्धाचे काही प्रसंग आहेत. त्यात हिंसा आहे पण ती कुठे अधोरेखीत न करता एका उत्तुंग व्यक्तीमत्वाची ओळख करून देण्यावर भर दिला आहे. त्यामुळे अगदी लहान मुले नको पण १०-११ वर्षांच्या मुलांना दाखवायला हरकत नाही. शहिद शब्दाचा अर्थ त्यांना कळायला हवाच. मी गेलो त्या शो ला पण बरीच मुले होती.

सॅम बहादुर चा एका त्यांना अनेकदा प्रत्यक्ष भेटलेल्या एका (निवृत्त) मिलीटरी जनरलने केलेला रिव्यू. हा वाचून तर नक्कीच पिक्चर बघावासा वाटत आहे.
https://www.rediff.com/movies/column/a-general-reviews-sam-bahadur/20231...

यापूर्वी एका मेजरने ट्विटरवर केलेला रिव्ह्यू वाचला होता. पण हा सय्यद अता हसनैन यांचा रिव्ह्यू वाचून तर मस्टच आहे हा पिक्चर बघणे.

बाय द वे, त्यांची भूराजकिय परिस्थितीवरची आर्टिकल्सही वाचनीय असतात. सिल्क्यारा बोगद्याच्या रेस्क्यू ऑपमधे ते एनडीएमए टीममध्ये होते.

सॅम बहादुर मिक्स रिव्ह्यू येत आहेत. सेलेब्रिटी रिव्यू मी वाचत नाही. पण सामान्य पब्लिकची मते पाहिली तर मला साधारण अशी टोटल लागली आहे.
1- विकी कौशल ती भूमिका जगलाय. अवार्ड विनिंग परफॉर्मन्स
2- चित्रपटाला ठोस कथा नाही. डॉक्युमेंटरी बनवावी तसा बनवला आहे.
3- युद्धाचे प्रसंग फारसे जमले नाहीत. अजून चांगले चित्रीकरण हवे होते.
4- इंदिरा गांधी जी कोणी कलाकार आहे ती शोभली नाहीये.
5- मुख्य पात्राला हिरो बनवायला बाकीच्यांना पपलू टपलू दाखवले आहे.
6- जितकी हवा आहे तितका चित्रपट म्हणून ग्रेट नसला तरी विषय रोचक आहे. जरूर बघावा आणि मुलांना दाखवावा असा आहे.

थिएटरला जाऊन सिनेमे बघणे होणार नाही इतक्यात.
पण दोन्हीत सॅम बहादूरला पसंती दिली असती. बायोपिक मधे हा वेगळा असेल ही अपेक्षा आहे ती मेघना गुलजारमुळे.

Animal watched in theater so now Sam Bahadur will watch on OTT. Meghana Guljar films are meant for OTT. Relax watching.

फिल्ड मार्शल माणेकशा यांच्या कन्येने (माया ) सॅमबहादूर हा सिनेमा पाहिल्यावर दिलेली प्रतिक्रिया

“Pride will always be there. “They have made the film to make the country proud of whatever it was. But, the time that I tear up, every time, I’ve seen the film twice now, and I’ve teared up both times, is the last two seconds of the film when you turn to the audience, and you’re smiling. That just kills me every time.”

https://www.bollywoodshaadis.com/articles/field-marshal-sam-manekshaws-d...

थिएटरमध्ये 'नेपोलिअन' पाहीला. अभिनेत्याने, छान काम केलेले आहे. जोसेफिन व नेपोलिअनची मैत्री छान चितारली आहे. रशिअन लोकांची 'स्कॉर्च द अर्थ' पॉलिसी, वॉटरलु ची बॅटल - इतिहास आठवत गेला.

मिशन राणी गंज पाहिला - बघू नका. अक्षय च्या सत्य घटनेवर आधारीत कथाबीज घेऊन हिरोगिरी करणार्‍या टिपीकल सिनेमापैकी एक. ३३ किंवा माईल ९ हे ह्या विषयावरचे सिनेमा बघा त्यापेक्षा.

३३ किंवा माईल ९
,++
हे हिदी आहेत की इंग्लिश? आणि कुठे आहेत..
रानीगांज हिरोगिरी आहे हे मान्य.. पण विषयामुळे आवडला.. वरचे सुद्धा बघायला आवडतील..

ओके.. इंग्लिश असतील तर शोधणे नको. इंग्लिश पिक्चर बघणे म्हणजे मला अभ्यासच करतोय असे वाटते Happy

Archies बघा लोकहो , सगळे मिळून पिसं काढू.
दहा मिनिटात लक्ष उडेल. मूळ कार्टून होते म्हणून खरोखरच कार्टून दिसायला हवं असं काही नाही. सुहाना आणि खुशी कपूर महामूर्ख वाटत आहेत. रश्मिकापेक्षा कुणी वाईट निघेल असं वाटलं नव्हतं पण नाही 'भगवान के घर अंधेर तर हैच आणि देरही नाही'. सुहाना अधर-अधर गुळमट बोलते आणि 'डॅडी डॅडी' करते, इथेही रिव्हरडेल नावाच्या खोट्या ड्रिमलॅन्डची 'फर्स्ट डॉटर' आहे. हे गाव ॲन्ग्लोइंडियन वसाहत आहे म्हणे, त्यामुळे हे कुठलेच वाटले नाही तरी यांना मूर्ख समजू नका . सुहाना खुशीला बघून किंचाळली तर माझं कुत्रं अवाक होऊन टीव्हीकडे बघू लागलं. खूप वर्षांनी मैत्रीण भेटल्याची किंकाळी अंगावर झुरळ पडलेल्या किंकाळीसारखी होती. खुशी मध्यमवर्गीय आहे पण रिव्हरडेलचं मव म्हणजे बार्बीचं मव.!

अगस्त्य नंदा सरप्राईजिंगली बरा वाटत आहे. हे पूर्णपणे इंग्रजी आहे, उगाच मधे एखादा हिंदी शब्द घातला आहे. सुहाना बोलताना ओठाला ओठ लागू देत नाही, तिचा बाबा पत्त्यातल्या राजा सारखा अधुनमधून एका बाजूने उभा रहातो. भयंकर प्लॅस्टिकी वाटतं आहे. कुणालाच अभिनय तर सोडा बोलताही येत नाही. आता डिसेंबर महिना आला आहे तर याला यावर्षीचा सगळ्यात भंगार सिनेमा म्हणता येईल. सुहाना आणि खुशी लाईव्ह भातुकली खेळत आहेत असं वाटत रहातं. बंद करत आहे.

पूर्णपणे इंग्रजी आहे उगाच मधे एखादा शब्द हिंदी घातला आहे. >>>>>>

वाचलो.. म्हणजे मला चुकूनही हा बघायची दुर्बुद्धी होणार नाही Happy
आणि तसेही बघितला नसाताच. कारण अर्धाअधिक ट्रेलर बघूनच समजले होते की हा नॉट माय टाईप आणि तुझ्यासारख्यासाठी पिसे काढू मटेरिअल असणार Proud

अस्मिता +१
अत्यत बन्डल मुव्हि..,तरी नेटाने अर्धा तास बघितला...पिळ आहे नुसता पिळ!!.... नेपोकिड्स कडुन शुन्य अपेक्षा होत्या पण जिनामिदो सारखा मास्टरपिस देणार्‍या झोयाने हे असल काही बनवाव याच दु:ख झाल...

Archies बघा लोकहो , सगळे मिळून पिसं काढू. >>> धन्यवाद. तू पिसं काढ, मी वाचते, हाहाहा.

तो अगस्त्य नंदा अभिषेक बच्चन सारखा वाटतो मला. अभिषेक आवडतो अर्थात अमिताभ तो अमिताभ.

मुळात आर्चीज भारतीय बॅकग्राउंड मध्ये काढणं ही कल्पनाच साहसी आहे.ट्रेलर बघून हा चित्रपट कथेपेक्षा त्यातल्या 60ज स्टाईल च्या गाण्यांसाठी किंवा नंतर आल्बम काढायला बनवला असावा असं वाटलं.
मला रिव्हरडेल पण बघवत नाही त्यातली पात्रं चांगली असून.कॉमिक्स ला सिरीज करणे, त्यात अनेक खून, गॅंग,भुतं,कल्ट घुसवणे, मध्येच एक मोठी भूतकाळ भविष्यकाळात टाईम मशीन उडी मारणं काय.जाऊदेत.नको त्या आठवणी.

हे झालं का रिलीज ? परवा त्याचे स्पेशल स्क्रीनिन्ग होते ते ही एन मॅक मध्ये. धागा काढा अस्मितावहिनी. पिसे काढना मंगता है.

अस्मिता Lol

अस्मिता तू अर्चीज च्या पॅरा च्या शेवटाला "बंद करत आहे" असे उद्वेगाने लिहितेस आणि पॅरा च्या सुरुवाती ला लोकांना तेच बघायला सांगतेयस Wink Wink Lol

भयंकर प्लॅस्टिकी वाटतं आहे. कुणालाच अभिनय तर सोडा बोलताही येत नाही.>>> ते कळतंच आहे अगदी सहज. अनन्या, झान्वी, अर्जून ह्यांना सहन करत आलो, आता ह्या फळी ला अजिब्बात नाय सहन करणार. नेपो किड्स मुर्दा बाद. (सर्वच नव्हे)

अडाणी पणा बद्दल एक डाव मापी पण..मला रिव्हरडेल पण बघवत नाही >>> हे रिव्हरडेल काय आहे? सीरीज?

ती भयंकर दारुडे डोळे वाली अजय देवगण ची लेक ही येण्याची धमकी देतेय चित्रपटात (बाबौ...सैरा वैरा पळत सुटलेली बाहुली)

आर्चीज अगदी कायच्या काय आहे, गली बॉय काढणारी हिच का ती असा प्रश्न पडला. सगळे इंग्रजाळलेले(ॲन्ग्लोइंडियन म्हणे) , हिंदीपण अँक्सेंटमध्ये बोलणारे.काही डायलॉग तर इंग्लिश टू हिंदी मध्ये ट्रान्सलेट केलेत, फार विनोदी वाटतं ऐकताना. कधीही उठून बॉलरूम डान्स सुरू करतात.सुहाना, खुशी दोघींनी टिपिकल टीनएजर्सचा लाडिक अँक्सेंट पकडलाय हिंदी इंग्लिश बोलताना.
Riverdale मला पण बघवली नव्हती, मला वाटतं पहिला सीजनपण संपवला नाही मी.
हा पिक्चर मात्र महाबकवास आणि childish आहे. सग्गळ्ळं खोटं खोटं आणि नाटकी वाटत होतं.

आशु, रिव्हरडेल म्हणजे आर्चीज कॉमिक्स पात्र वापरून नंतर सुमारे 98% लेखक लिबर्टी घेऊन काढलेली प्रसिद्ध नेटफलिक्स सिरीज.अर्थात बेटी व्हेरोनिका आणि चेरील च्या कापड्यांसाठी नक्की बघावी एकदा.

जॅकी, नीना गुप्ताचा सिनेमा चालू केला होता. पण झोपेमुळे बंद केला. रोज थोडा थोडा बघून होईल.

Pages