चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सेन्सॉर सर्ट्फिकेट बाजूला ठेवा जरा.
चित्रपट पाहून काय करू नये हे कळत असेल तर काय हरकत आहे ?
आणि जिथे तिथे कबीर सिंग किंवा तत्सम चित्रपटाची वकिली करायची कय गरज ? आहेत ना तुझी मतं ? हज्जारदा ऐकवलीत ना ? मग प्रत्येक ठिकानी मला तर आवडला हे मुद्दाम सांगायची काय गरज ?
कबीर सिंग ओटीटी वर आहे. १८ वयाच्या मुलाला तरी एव्हढी समज आलेली असते का ? ओटीटी,नेटवरचा कंटेट कुणीही बघतं.
मुलांना असे कंटेट दाखवू नयेत म्हणून चर्चा चालू असतील तर त्यात तोंड घालूच नये. तुमचे मत तुमच्याजवळ ठेवा. वेगळा धागा काढून पण बास नाही का होत ?

ऋन्मेश, सिनेमा सब्जेक्टिव्ह असतो हे मान्य. तुम्हाला कबीर सिंगचे उदात्तीकरण वाटले नाही हा तुमचा दृष्टिकोन असू शकतो, त्याचा आदर आहे. मला तसे वाटले नाही. दोन्ही सिनेमांमध्ये हिंसक पुरुषांचे उदात्तीकरण आहे असे वाटले. फ्रेम फ्रेम मध्ये कबीर सिंह कसा क्रूर, प्रायमल आहे असे प्रेम उतू जाताना दिसत होते. मागे एपिक बॅकग्राऊंड स्कोर... वाडा वाऊं वाउ...उदात्तीकरण आणखी कशाला म्हणायचे ? इतका विकृत माणूस असतो पण तरी प्रेयसी गरीब गाईसारखी त्याची वाट बघत असते. मारतो सुध्दा तो तिला.

काल परवा अल्पवयीन मुलाची आपसातल्या भांडणातून अठरा + वयाच्या मुलांनी हत्या केल्याची बातमी वाचली. भयानक !!
https://www.esakal.com/desh/delhi-crime-a-minor-boy-was-killed-by-four-t...

अल्पवयीन मुलीची नकारातून हत्या
https://www.youtube.com/watch?v=n-fCsphcRQU

शेकडो प्रकरणे या पानावर सर्च मधे आली आहेत.

१८ वयाच्या मुलाला तरी एव्हढी समज आलेली असते का ? ओटीटी,नेटवरचा कंटेट कुणीही बघतं.
>>
नसते का??
काही समाजात 18 ला लग्न लाऊन देतात.
त्यामुळे कुठल्याच गोष्टीचं सरसकटीकरण नको.
वेगळे लोक, वेगळी मतं, जरी तुमच्या मतांसारखी नसली तरी ठीक आहे.

जर तुम्ही तो सिनेमा मला आवडला नाही म्हणून बोलत असाल आणि दुसरा कुणी येऊन आवडला म्हणाला तर त्याचं व्यक्त होणं चूक (आणि तुमचं बरोबर) असं कसं...

काल परवा तेरा वर्षाच्या मुलाची आपसातल्या भांडणातून समवयीन मुलांनी हत्या केल्याची बातमी वाचली.
भयानक !!
>>
वाढदिवसाला दुबईला नेत नाही म्हणून बायकोने नवऱ्याला ठोसा मारून जीव घेतला हे ही वाचलं.
महाभयानक

अँकी नंबर वन आधी वाटल कि तुम्ही स्वतःचं मत सांगताय. पण ज्या आयडीचे वकीलपत्र तुम्ही घेतले आहे त्याने मत मांडुच नये हे मी म्हटलेले नाही.

मी फक्त सेन्स्सीबल मतं वेड्यात काढन्याचा इतिहास सांगितला. नीट वाचा. तुम्हाला जसं काही माहितीच नाही असं करताय. फक्त मलाच क्रॉस नाही करत तर तुमच्या मताला क्रॉस जानार्या प्रत्येकाला तुम्ही चवताळून काहीच्या काही विरोध करताय. सध्या तरी पालथा घडा वाटताय त्यामुळं तुम्हाला पास.

ज्यांना कबिर सिंग , Animal झेपत नाही त्यांनी झिम्मा 2 बघा उगाच वाद कशाला घालत बसायचा Happy

महाभारताचे नायक पांडव आहेत. पण ते जुगारात बायकोला लावतात. पण तरी ते कसे चुकीचे आहे हेच आपण यातून शिकतो. आणि याच विश्वासावर आपण लहान मुलांनाही महाभारत दाखवतो.

कोणाला माझा मुद्दा कळत नसेल तर ओके.
मी अजून सोप्या पद्धतीने समजवायचा प्रयत्न करतो.

ज्यांना वाद झेपत नाहीत त्यांनीही झिम्मा २ बघावा की मग, उगाच त्यावर वाद कशाला Happy

महाभारताचे नायक पांडव आहेत. पण ते जुगारात बायकोला लावतात. पण तरी ते कसे चुकीचे आहे हेच आपण यातून शिकतो. आणि याच विश्वासावर आपण लहान मुलांनाही महाभारत दाखवतो. >> हेच तर मी बोललेले ना ? तुझे वकील माझ्यावर का भडकले ?

पॉप्युलर आणि बरोबर यातला फरक कळ्ळा तरी पुष्कळ आहे. एखादी पॉप्युलर गोष्ट चुकीची आहे असं सांगणार्याला वेड्यात का काढतात ?
ती चुकीची आहे असं सांगण्म हे लोकशिक्षण असतं.
कुंकू पिक्चर बनला तेव्हाच्या समजुतीच्या विरोधात होता तो. त्याने लोकांच्या धारणा (चांगल्या अर्थाने ) बदलल्या. आता पुन्हा मागे जाऊन तशा गोश्टींचे उदात्तीकरन होनार असेल तर (काही) लोक आक्षेप घेणारच.
कबीर सिंग बनूच नये ही अपेक्षा ठेवने मतच झाले ना ? त्याला का विरोध करता ? बनवू नका म्हनून धमक्या तर नाही ना दिल्या ?
काही काही लोक केस पिकले तरी प्रगल्भ होत नाहीत.

सगळे सिनेमे सगळ्यांसाठी नसतात...
आवड आपली आपली...
Submitted by अँकी नं.१
>>>>>>

यातले आवड आपली आपली हे कळायला सोपे आहे. बरेच जणांना हे कळते आणि समोरच्याच्या आवडीचा, मताचा आदर केला जातो.
पण सगळे सिनेमे सगळ्यांसाठी नसतात हे सगळ्यांना चटकन कळत नाही.
कुठले सिनेमे काय उद्देशाने बनवलेले असतात, कुठले चित्रपट हे केवळ चित्रपट म्हणूनच घ्यायचे असतात हे कळणे गरजेचे.

बॉलीवूडमध्ये जुने कैक चित्रपट आहेत ज्यात हिरो हिरोईनचा पाठलाग करतो, ज्याला ईंग्रजीत stalking असे म्हणतात, अशी मवाल्यासारखीच हरकत आधी स्वता करून मग इतर मवाल्यांना मारून हिरोईन पटवतो, जे फार कूल आहे असे दाखवले जायचे. त्या हिरोला स्विकारणारी देखील जनता माझ्या मागच्या पिढीत होती.
त्याच्याशी कम्पेअर करता कबीर सिंग हा आव न आणता ग्रे शेड मध्येच रंगवला आहे म्हणून प्रामाणिक वाटला. ज्यात त्याच्यातील गुणांना गुण आणि दुर्गुणांना दुर्गुण म्हणूनच दाखवले आहे.

बाई दवे,
कबीर सिंग गाण्यांचा एक सेपरेट फॅन बेस आहे.
प्रेमाचे, विरहाचे, सारे रंग त्यात दिसतात... कम्प्लीट लव्हस्टोरी अल्बम आहे.. यावर एक स्वतंत्र धागा काढता येईल.

कबीर सिंग - एका उत्कट प्रेमाची धाडसी कहाणी
https://www.maayboli.com/node/79474

माझ्या वरील पोस्टमधील मुद्दे या धाग्यावर हलवतो... कोणाला चर्चा पुढे न्यायची असल्यास तिथे करा.. इथे झिम्मा वर्सेस कबीर सिंग नको Happy

ममा मिया द मुव्ही कोणी कोणी बघितला आहे? ही माझी फेवरिट जानरा आहे. गर्ली मुव्हीज. तर तो ज्यावरौन बेतला आहे ती ममा मिया द म्युझिकल ओरिजिनल शो सध्या मुंबईत एन मॅकला चालू आहे काल बघितला. पूर्ण धमाल आहे. दोन मेन प्रॉप व काही अगदी कमी प्रोप्स, वापरून घेतले आहे अ‍ॅबा गृपची गाणी आवडत असतील तर नकी आव् डे. फारच निश सेगमेंट आहे. खूप सारा ब्रिटिश ह्युमर, आचरट पणा व ७० ज नोस्टा ल्जिया आहे. ग्रेट पर्फॉरमन्सेस लाइव्ह गाणी व ऑर्केस्ट्रा एकदम एंजॉयेब ल आहे. १७ जाने वारी परेन्त शोज आहेत. नक्की बघा. आज परत मुव्ही बघितली. सर्व कास्ट ने उत्तम कामे व नाच केलेले आहेत. आंकोर नंतर पण दोन नाच आहेत. कॉस्चुम्स एकदम लै भारी.

animal सिनेमा बघितला. १८ प्लस प्रौढ व्यक्ती असूनही मला इतकी हिंसा झेपली नाही. स्पेशली बॉबी देओलचा लग्नातला सीन आणि शेवटचा रणवीर सिंगचा सिन . किसींग सिन पण आहेत.

स्टोरिलाइन टिपीकल साउथ इंडियन आहे .लार्जरthan लाइफ इमेज असलेला नायक , टिपिकल मस्कुलाइन जोक्स , धण धण वाजणारे पार्श्वसंगीत वगैरे . रश्मिका मांडनाच्या वाट्याला टिपिकल रोलबरोबर काही सीन आलेत त्यात ती छाप पाडते.
रणबीर कपूरने केस वाढवलेत त्यात तो संजू चित्रपटाच एक्स्टेंशएन असल्यारखा दिसतो
अनिल कपूरचा फिटनेस वाखाण्याजोगा .
काही प्रसंग गॉडफादर सिनेमातून जसेच्या तसे उच्चले आहेत. खरेतर आखा सिनेमाच म्हणायला हरकत नाही .

तर मुलाना घेऊन जाऊ नका .

इंडिआना जोन्स व डायल ऑफ डेस्टिनी हॉट स्टार वर आला आहे. लावला पण सीजी ऐवजी ओरिजिनलच आर्टिकल बघु म्हणून रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्कच बघितला. आता एस वेंचुरा व्हेन नेचर कॉल्स लाव णार् आहे. प्राइम वर रेंट वर उपलब्ध आहे. फुकट दिले तर काय जळेल मेल्याचे. रेंटचे पैसे पण हवेत माझ्याकडून वर्ल्ड रिचेस्ट म्यानला.

मी फक्त सेन्स्सीबल मतं वेड्यात काढन्याचा इतिहास सांगितला.
>>
परत तेच
तुमच्या मते जे सेंसिबल ते दुसऱ्या प्रमाणे नसेल तर त्यानी तसं सांगणं म्हणजे तुमच्या मुद्द्याला वेड्यात काढणं नसतं...

जसं तुम्हाला वाटतं की मी वकीलपत्र घेतलं आहे
मला वाटतं की तुमचं जनरलायाझेशन अस्थानी आहे.

पण म्हणून तुम्ही चूक होत नाही आणि मी ही...
कळलं तर बघा

All the best...

अहो पालथा घडा क्लब चे मेंबर
तुम्हाला पास दिला या मताचा आदर करता येत नसेल तर कशाला ज्ञानेश्वर बनता?
थोडक्यात तुमचं जे अशील आहे ते सोडून मायबोलीवर कुणीच सेंसीबल नाही. तसंच तुमच्या दिवट्या अशिलाने ज्यांच्याशी वाद घातलेत ते सगळे गावंढळ होते. असच ना?
वकील पत्र घेताच तुमची भाषा अशिलासारखी झाली. जे मी म्हटलेले नाही ते तोंडी कोंबून वाटेल ती बडबड करत आहात.
चालू द्या तुमचे.

ॲनिमल बघितला.
रणबीरच्या कॅरेक्टरचा संपूर्ण सिनेमातला वावर छपरी स्वरूपाचा आहे, त्यात मध्ये मध्ये रणबीर पिसाळल्यासारखं करतं. का, कुणास ठाऊक.

गोळीबाराचे, हाणामारीचे सीन्स, एकूणच हिंसा फार महागडी, आलिशान, किंवा हॉलिवूडी आहे.
उद्देश हिंसेच्या मुळाशी जाणं, हा नसल्यामुळे, इंपॅक्ट एवढाच होतो की ऑडियन्स ठार बधिर होतो. दणदणाटामुळे गात्रं सुंद होतात. एकदा तशी ती झाली की मग पुढं चाललेल्या बनावटगिरीत एका सीनचा दुसऱ्या सीनशी, एका डायलॉगची दुसऱ्या डायलॉगशी काही सांधेजोडच नाहीये, हे कळण्याच्या वाटा बंद होतात.

हे मॅचो टाईपचे, सदैव डरकाळ्या फोडणारे नरशार्दुल आतून रिकामे किंवा तत्सम खोटे पोलिस असतात, तर ते भरून काढायला किंचाळावं लागतं.

काही सीन गॉडफादर मधून ढापलेत, हरकत नाही, पण ह्यात त्या विशिष्ट सीन्समध्ये नकलीपणाचा सोस आहेच.

बाकी, जमाना बदललाय, आता स्त्रियांना वस्तू असल्यासारखं वागवण्याचे प्रकार मेनस्ट्रीम सिनेमांमधून दाखवून वर ते रॅशनलाईझ करणं, हे आपण कधीच मागं सोडून आलोय, असं वाटत होतं.

पण आजूबाजूला थेटरात बघितलं तर अजून तोच जमाना चाललाय, हे कळलं. किळस आणणारे जोक्स, त्याला शिट्ट्या वाजवणारं पब्लिक.

साडेतीन तासांचा पिच्चर, संपता संपेना.‌ भीती वाटायला लागली की मला हितंच थेटरात कोंडून ठेवणार आणि दिवसभर चालणार पिच्चर.
मजबुरी असल्याने मध्येच उठून बाहेर पडता येईना, म्हणून चाललेलं गटार बघत बसलो. असो.

बाकी, जमाना बदललाय, आता स्त्रियांना वस्तू असल्यासारखं वागवण्याचे प्रकार मेनस्ट्रीम सिनेमांमधून दाखवून वर ते रॅशनलाईझ करणं, हे आपण कधीच मागं सोडून आलोय, असं वाटत होतं.>>>
कबीर सिंग बघताना पण असेच वाटले होते. "ही माझी गाडी आहे" छाप मध्ये "ये मेरी बंदी है" म्हणताना त्याला म्हणावेसे वाटले की बाबा रे त्या बंडीला देखील एक स्वतंत्र अस्तित्व आहे.

अ‍ॅनिमल वर एवढी चर्चा. अति हिंसा सोसत नाही सो स्कीप करेल.
मिर्झापूर पण सी २ नव्हता सोसला.

सॅम बहादुर बघा. मस्त आहे. >> काल लेकाने आणि नवर्याने पाहिला.
कोणतीही पार्श्वभूमी माहिती नसतानाही लेकाला आवडला.
Animal चा , मेरी बहन को किसने छेडा वाला सीन वायरल आहे.
Background मध्ये लोकांच्या टाळ्या , हशा आणि शिट्या ऐकून कससचं झालं.
पण एकेकाची आवड असते so no comments

अनिमल बघितला इंटरव्हल पर्यंत खिळवून ठेवतो पुढे काय होणार ह्या आशेने पण नंतर चित्रपटात कायच्या काही दाखवलं अनलाॅजिकल ... नाही बघितला तरी चालेल मुद्दाम थेटरात जाऊन पैसे खर्चून बघण्यासारखा नाही

सॅम बहादूर - नक्की बघावा असा चित्रपट.

चित्रपट म्हणावा की माहितीपट याचा संभ्रम अजून मिटलेला नाही पण जे काही सादर केलंय ते खासच आहे. सिनेमाला कथा अशी नाहीये - भारताच्या इतिहासातील काही घटना आणि त्यात सर माणेकशाँचा असलेला सहभाग अशी साधारण मांडणी आहे.

विकी कौशलने कमाल केली आहे. तो एका टप्प्यानंतर खराच माणेकशॉ वाटायला लागतो. सैन्यातल्या माणसाचा रुबाब, कणखरपणा तो अगदी सहज दाखवू शकतो हे राझीच्या वेळेस समजले होते पण या सिनेमात ते काम कठीण होते. पोक काढून आणि खांदे झुकवून सगळ्या सिनेमाभर वावरायचं आणि तरी तो रुबाब, तो कणखरपणा दाखवायचा हे खूप कठीण काम त्याने अगदी सहज करून दाखवलय. कठीण अशाकरता की अशी देहबोली आणि रुबाबदारपणा ही विरुद्ध टोके आहेत.

"सैन्यात प्राण फुंकणे" हा शब्दप्रयोग आत्तापर्यंत वाचला होता. सिनेमात एका प्रसंगात खूप मार सहन केलेल्या आणि विजयाची आशा सोडलेल्या शीख बटालीयनपुढे नायक एक गुरुबाणीतले वचन सांगतो आणि पुढे एकच वाक्य म्हणतो - "आप सबको ये बचन पता ही होगा, मेरा काम था आपको उसकी याद दिलाना" . त्या नंतर सैनिकांच्या चेहर्‍यावर जो उत्साह दाखवलाय तो अप्रतिम आहे. पंजाबी न कळताही माझ्या अंगावर रोमांच आले.

भारताची फाळणी आणि त्यामुळे झालेले दोन्ही बाजूंच्या लोकांचे हाल याबद्दल आपण बरंच काही वाचलेले असते. पण तेंव्हा भारतीय सैन्याची पण विभागणी झाली. "निष्ठा" हा प्राण असलेल्या सैनिकांना ते किती कठीण गेलं असेल हा एक आयाम पहिल्यांदीच लक्षात आणून दिला या चित्रपटाने.

"दंगल" वाल्या दोघी अभिनेत्री याही सिनेमात आहेत. फातिमा शेख दंगलमध्ये पण प्रियंका गांधी सारखी दिसत होती. पण ती इंदिरा गांधी म्हणून फारशी शोभली नाही. इंदिरा गांधींचा करारीपणा कुठेच दिसला नाही. तिच्या ऐवजी सुप्रिया मतकरी बरी शोभली असती कदाचीत.

Pages