Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो, छान आहे तो चित्रपट. मी
हो, छान आहे तो चित्रपट. मी कितीतरी वेळा पाहिलाय.
अच्छा. धन्यवाद.
अच्छा. धन्यवाद.
असे वाटले होते कि काही काही सिनेमे विशिष्ट वेळेमुळे आवडतात तसे झाले असेल.
यातल्या शाम रंगा रंगा रे या गाण्यावर कुणी जाणकाराने लिहीले तर आवडेल. कोणता राग आहे हे शोधायचा खूप प्रयत्न केला. पण याबाबतीत औरंगजेब असल्याने कोणताही राग ऐकला कि अरे हाच हाच असे वाटून जाते. रबिंद्र संगीतात आहे हे नक्की. भप्पी लाहिरीने कधी कधी चकित केले आहे. तसे या चित्रपटात त्याने धक्के दिले आहेत.
त्या दोघांचा ‘स्वामी’(१९७७)
त्या दोघांचा ‘स्वामी’(१९७७) चित्रपटही छान आहे.
हो. हम दिल दे चुके सनम चा
हो. हम दिल दे चुके सनम चा ओरिजिनल.
हो फार मस्त गाणे आहे ते.
हो फार मस्त गाणे आहे ते. मागच्या वर्षी बप्पी लाहिरी गेला तेव्हा टीव्हीवर लागले आणि तेव्हा बर्याच दिवसांनी ऐकले. पण छान वाटते ऐकायला, आणि पाहायलाही. आता त्याला बासू चटर्जी/ऋषिकेश मुखर्जी "युनिव्हर्स" म्हंटले असते पण ती ७०ज मधली मध्यमवर्गीय दुनिया पाहायला छान वाटते.
र.आ. "हरिन्द्रनाथ" चट्टोपाद्ध्याय हे नाव ऐकले आहे पूर्वी. तेच का? जुली मधले माय हार्ट इज बीटिंग लिहीणारे. तेव्हा पिक्चर्समधे कामही करत. विकीवर पाहिले तर हा पिक्चर दिसला नाही लिस्ट मधे.
https://en.wikipedia.org/wiki/Harindranath_Chattopadhyay
सरोजिनी नायडूंचे भाऊ!
हो. अपने पराए छान आहे. त्यात
हो. अपने पराए छान आहे. त्यात आशालता विळीवर बसून भाजी
चिरत असते असा प्रसंग आहे का? शबाना आझमी संवादांशिवाय किती बोलली आहे यात!
हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय बावर्चीतले आजोबा.
अशोककुमारचं रेलगाडी हे गाणंही त्यांनी लिहिलंय. ते कादंबऱ्या लिहीत आणि या चित्रपटाची कथा त्यांची हे माहीत नव्हते.
फारेंड, भरत
फारेंड, भरत
Thanks for correcting me. हरींद्रनाथ हे नाव बरोबर आहे. पण इथे माझी चूक झाली आहे.
निष्कृति या कादंबरीवर चित्रपट बेतलेला आहे. लेखक सरतचंद्र चट्टोपाध्याय.
आशालता आणि शबाना दोघीही भाजी चिरताना दाखवल्या आहेत.
हम दिल दे चुके सनम चा ओरिजिनल
हम दिल दे चुके सनम चा ओरिजिनल.>>>> हे नव्हते माहीत . बघायला हवा ओरिजीनल
लेखक सरतचंद्र चट्टोपाध्याय.
लेखक सरतचंद्र चट्टोपाध्याय. >> ओह. यांचेही नाव ऐकले आहे
प्राइम वर "तीन अडकून सीताराम" हा मराठी पिक्चर पाहिला. काही खास जमलेला नाही. पण कॉमेडी आहे, फ्रेश सादरीकरण आहे. पहिल्या अर्ध्या भागात उत्कंठा राहते. पण नंतर रखडला आहे.
पटकथा संवाद मला खूप वीक वाटले. मंत्र्यांसकट सगळे पांढरपेशी भाषाच वापरतात, इतकेच नव्हे तर बोलण्यात येणार्या उपमा, टीका ही सुद्धा अस्सल शहरी पांढरपेशी आहे. तीन लीड्स आहेत त्यांच्या बॅण्टर मधून सहज निर्माण होणारे विनोद काही चांगले आहेत, पण तितकेच.
फा मला अज्जिब्बात आवडला नाही
फा मला अज्जिब्बात आवडला नाही तो
वेळ वाया.
कोणालाही जराही माहिती नसावी जगात काय चाललय? जेल म्हणून जे काही दाखवलय, अगाध!
एकतर तीच कल्पना दोनदा वापरलीय, तीही अती सवंगपणे. माझ्याकडून -10/10
सरतचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे
सरतचंद्र चट्टोपाध्याय म्हणजे देवदास, परिणीता. श्रीकांत ही दूरदर्शन मालिका ( गुगल न करता आठवणारे)
विकिवरून मंझली दीदी, छोटी बहु (हा पाहिलाय) हेही आहेत .
भरत, तुमचं वाचन दांडगं आहे.
भरत, तुमचं वाचन दांडगं आहे.
हरीन्द्रनाथांवर मध्यंतरी एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. स्वातंत्र्य चळवळीत गाणी लिहीणे, कथा - कादंबर्या आणखी बरंच काय काय. बहुतेक संगीत क्षेत्रात पण मुशाफिरी आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.
सरतचंद्रांच्या कोणत्या तरी कथेतला उतारा होता शाळेत.
शाम रंग रंगा रे - चारूकेशी राग आहे का ? मिश्र काफि वर थांबलो होतो. कारण त्यात अनेक भजनं आहेत. सूर सातही असल्याने गोंधळ उडत होता.
टेप अडकली आहे.
चारूकेशी मधली गाणी (मेघा रे मेघा रे, तेरी उम्मीद ते रा इंतजार, शाम तेरी बन्सी ) ऐकल्या नंतर जातकुळी एकच वाटतेय. कुणीतरी सुटका करा यातून.
Three of us बघितला.
Three of us बघितला.
छान आहे. सर्वांचाच अभिनय अतिशय सुंदर.
हम दिल दे चुके सनम चा ओरिजिनल
हम दिल दे चुके सनम चा ओरिजिनल.>>>> हे नव्हते माहीत . बघायला हवा ओरिजीनल>>> अशाच टाईपचा नसीर, अनिल आणि पद्मिनीचा ‘वह सात दिन’ आहे.
वो सात दिन एका साऊथ इंडीयन
वो सात दिन एका साऊथ इंडीयन मुविवरुन घेतलाय. तो पिक्चर मी दुरदर्शनवर रविवारी दुपारी बघितला होता, प्रादेशिक भाषेतले चित्रपट लागायचे ना त्यात. (या आख्ख्या वाक्यात मी सिनेमासाठी तीन वेगवेगळे समानार्थी शब्द लिहिले, हाहाहा) .
वो सात दिन सुद्धा स्वामी वरून
वो सात दिन सुद्धा स्वामी वरून घेतला आहे. स्वामी सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या एका लघुकथेवरून चित्रांतरित करण्याकरता बासूदांनी पुन्हा लिहिला आहे. त्यावरून मग अन्य भाषेत सिनेमे बनले.
या घराण्याचा मूळपुरूष स्वामी. म्हणून चित्रपटाचे नाव पण तेच. नायिकेचा नायक पण तोच.
नेफ्लिवर घुमर बघितला. सयामी
नेफ्लिवर घुमर बघितला. सयामी खेर आणि अभिषेक बच्चनचा.
मस्त आहे एकदम. अजिबात कुठेही संथ, रेंगाळतोय असं अजिबात वाटलं नाही. फास्ट पेस मुव्ही.
शबाना आझमी आणि सयामीचं काम जास्त आवडलं.
सरतचंद्र चट्टोपाध्याय यांची
सरतचंद्र चट्टोपाध्याय यांची 'चरित्रहीन' ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. ही रविंद्रनाथ टागोरांच्या 'बिनोदिनी' या कथेसारखी वाटते.
इथली चर्चा आवडून मी 'अपने पराये' सुरू केला आहे. सर्वांची कामं उत्तम आहेत. मनात एव्हढी माया असून बोलण्याने बोलणं वाढत जाऊन किती वितुष्ट येतं. भारती आचरेकर किती तरूण दिसली आहे. गिरीश कर्नाडच्या पात्राला काही विशेष धारच नाही, उत्पल दत्तला हे घर सोडून जातात तर काहीच वावगं वाटत नाही, अमोल पालेकरच्या पात्राला कसलं गांभीर्यच नाही. अशा धमक नसलेल्या नवऱ्यांच्या तेजस्वी-तत्वनिष्ठ बायका बघून मला पडघवलीतली अंबा आठवते. 'शाम रंग रंगा रे' गाणं या सिनेमातलं आहे ह्याची कल्पना नव्हती. सुरेख गाणं आहे.
बंगाली दिग्दर्शक जेव्हा बंगाली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा बनवतात, मागे रामकृष्ण परमहंस व शारदा माता यांचा फोटो दाखवतात. पिकूतही होते.
@अस्मिता, अशी कुटुंबं
@अस्मिता, अशी कुटुंबं बघण्यात होती / आहेत.
अमोल पालेकरचं जे पात्र आहे ते हॅपी गो लकी टाईप आहे. एकत्र कुटुंबात ७० ते ८० च्या दशकात खपून जायचे असे लोक. लहान मुलं जमवणारे, बाहेर मुलांच्यात हिरो असणारे, कसला न कसला छंद असणारे पण करीयरचं गांभिर्य नसणारे. माझा एक मामेभाऊ असाच होता. सख्खा भाऊ बराचसा असाच. आता अशा कादंबर्या, कथा, चित्रपट शहरी प्रेक्षकाला अपील होणे शक्य नाही.
)
( टंकन दोष सातत्याने होताहेत. रजा घ्यावी लागेल बहुधा.
हो, मीही बघितली आहेत. फक्त
आता शोधलं तर 'अपने पराये' सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'निष्कृती' नावाच्या कादंबरीवर बेतलेला आहे अशी माहिती मिळाली. 'निष्कृती' शब्दाचा अर्थही एखाद्याला संकटातून वाचवणे असा आहे म्हणे.
मनात एव्हढी माया असून
मनात एव्हढी माया असून बोलण्याने बोलणं वाढत जाऊन किती वितुष्ट येतं. >>> बासू भट्टाचार्य ( हे दुसरे बासूदा ) आणि गुलजार यांच्या चित्रपटाचा विषयच इगो, अभिमान, अहंकार असायचा. विशेषतः स्त्री पुरूष नात्यातला. हवंय पण सांगायचं नाही ,समजून घ्यायला काय होतं, मीच का पुढाकार घ्यायचा या छोट्या गोष्टी वाटतात पण त्यातून कुठल्या कुठे नाती ताणली जातात...
'निशक्रिती' शब्दाचा अर्थही एखाद्याला संकटातून वाचवणे असा आहे म्हणे. >>> ओह! हे माहिती नव्हतं,
धन्यवाद !!
तुम्ही निष्कृतीबद्दल लिहिलेलं
खरं आहे.
तुम्ही निष्कृतीबद्दल लिहिलेलं आता बघितलं. मी इंग्रजीतलं तंतोतंत लिहिलं, सुधारते.
आताच नाळ २ पाहून आलो. खूप खूप
आताच नाळ २ पाहून आलो. खूप खूप आवडला. माझ्या ६ वर्षांच्या मुलाने सुद्धा एन्जॉय केला. साधी सरळ निरागस कथा. मंजुळे च्या सिनेमा मध्ये असतो तसा मानवी भावनांच सुरेख चित्रण. तीनही बाल कलाकारांचा सुंदर अभिनय. आणि लाजवाब छायाचित्रण. क्या बात है. परंतू गाणी श्रवणीय असायला हवी होती, पार्ट 1 प्रमाणे. यातलं एकही गाणं लक्षात राहत नाही. मुलांना घेऊन नक्की बघायला जा, कारण तसही लहान मुलं पाहू शकतील असं कंटेंट खूप दुर्मिळ झालंय सध्या...
इकडे आला तर नक्की बघणार नाळ २
इकडे आला तर नक्की बघणार नाळ २.
नाळ भाग पहिला बघितला नाही तर
नाळ भाग पहिला बघितला नाही तर काही अडणार नाही ना?
लहान मुलांना आवडेल असा पिक्चर असेल तर जाता येईल . किबहुना म्हणूनच जायचे आहे
. पण पाहिला भाग मी सुद्धा पाहिला नाहीये.. संथ आहे असे ऐकलेले..
उजळणी करुन जा की रे!
उजळणी करुन जा की रे!
मी ही नाळ बघितलेला पण आता जाम काही आठवत नाही. आमच्या शाळेच्या बाई म्हणायच्या उजळणी करा.पुढचं पाठ मागचं सपाट असं नको. त्यामुळे उजळणी मस्ट आहे रे बाबा! संबंध असो अगर नसो. मंजुळेचा आहे त्यामुळे मजाच येईल.
नाळ 1 मी पाहिलेला होता,
नाळ 1 मी पाहिलेला होता, नवऱ्याने नाही. मी बेसिक त्याला सांगितले, दत्तक वगैरे बद्दल. बाकी फार काही अडत नाही. त्याने पण तितकाच एन्जॉय केला मूव्ही.
ओके धन्यवाद ..
ओके धन्यवाद ..
नाळचं दिग्दर्शन मंजुळेंच नाही
नाळचं दिग्दर्शन मंजुळेंच नाही. नाळ - २ बद्दल माहिती नाही.
@ अमितव
@ अमितव
काल तुमच्या पोस्टला हा प्रतिसाद लिहीला आणि=चुकून पोस्ट केलाच नाही..
----
कुठे बघू पण तो आता हा प्रश्न पडलाय. गूगल केले तर झी 5 वर दाखवत आहेत. त्याचे सबस्क्रीप्शन संपले आहे. नाहीतर आता रात्रीच बघायचा विचार होता.
कारण उद्या दिवसाच जाऊ शकतो. संध्याकाळी नाही जाऊ शकत. तेव्हा दिवाळी साजरी करायची असते. परवा दिवसभर जाऊ शकत नाही कारण देवाने एका मुलगा आणि एका मुलगी दिल्याने भाऊबीज जल्लोषात साजरी करावी लागते. त्यात भारताची वर्ल्डकप सेमी फायनल आहे ते वेगळेच. दिवाळी संपताच माहेरी जात असल्याने गुरुवार पासून वेगळाच प्लान आहे.
बूक माय शो चेक केले तर मला जमेल असा शो उद्या सकाळी साडेदहाचा आहे. तो चुकवला आणि राहिले तर राहिलेच. पुढच्या आठवड्यात इथली पब्लिक पिक्चरची चिरफाड करून बघायचा मूड घालवून टाकतील. कधी कधी पिक्चर बद्दल चारचौघाकडून ऐकून मग बघायला जाण्यापेक्षा आपण बघून चार चौघांना सांगण्यात एका वेगळीच मजा असते.. वाळवी, आत्मpamphlet वगैरे असेच चटकन एकटाच जाऊन बघून आलो होतो.
----
असो,
उठलो तरी आहे अलार्म लाऊन
Pages