क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डग्लस मरीलिअर वाली सिरीज आणि झहीरनी शेवटच्या 4 बॉल वर 4 सिक्स हाणल्या होत्या या दोन्ही सिरीज वेगळ्या होत्या बहुधा.. झहीर चार सिक्सवाला सामना सुद्धा आपण हरलेलो
>>
येस, बरोबर आहे...
चेक केलं आत्ता. झहीर चा 4 सिक्स वाला सामना 2001 सिरीज मधे होता, जी पांढरा ड्रेस घालून खेळली होती.
डग्लस मरीलिअर वाली सिरीज 2003 वर्ल्डकप आधी झाली होती अन् आपण रंगीत कपडे घालून खेळलो होतो. त्या सिरीज मधल्या 159 मुळे दिनेश मोंगिया (याला आम्ही तेंव्हा वडापाव म्हणायचो) वर्ल्डकप टीम मधे आला...

अच्छा तो मोंगिया त्यामुळे आलेला का...
भारतात झिम्बाब्वे विरुद्ध चमकून आफ्रिकेत वर्ल्डकपला.. नशीब होते लेकाचे.. असे तेव्हा त्याला वाटले असेल. पण नंतर विचार करत असेल नसतो वर्ल्डकपला तर बरे झाले असते. लोकांच्या वाईट आठवणींचा भाग बनून राहिला बिचारा.

तेव्हा झिम्बाब्वेशी फार खेळणे व्हायचे. अँडी फ्लॉवर आपल्याला स्वीप रिव्हर्स स्वीप ने फार रडवायचा. आपल्या फिरकीला सेटलच होऊ द्यायचा नाही.

भारतात झिम्बाब्वे विरुद्ध चमकून आफ्रिकेत वर्ल्डकपला.. नशीब होते लेकाचे.. असे तेव्हा त्याला वाटले असेल. >> आपण हरलो त्यात मोंगिया हा मोठा फॅक्टर नव्हता. तेंव्हा मधल्या फळीत दणकून मारणारा नि मोठ्या इनिंग खेळणारा - मधे स्पिनर्स ना धुणारा असा डोमेस्टिक मधला दादा होता तो. त्याच जोरावर संघात आला होता. कामचलाऊ बॉलिंग पण करत असे. फायनल हरलो ह्याची कारणे बरीच आहेत पण मोंगिया दुसर्‍या पानावर लिहिण्यासारखे कारण आहे.

अँडी फ्लॉवर आपल्याला स्वीप रिव्हर्स स्वीप ने फार रडवायचा. >> हो पण फ्लॉवरच कशाला जिमी अँडरसन, चंडरपूल, हेडन - डावखुर्‍या रिव्हर्स स्वीपर्स ची लिस्ट मोठी आहे. आधी स्वीपच्या जोरावर गूच नि गॅटींग रडवून गेले होते.

“ काल मला खास कौतुक वाटलं तें कमिन्सचंही” >> +१ हायलाइट्समधे एकदा ६८ बॉल्स मधे १२ वर होता तो Happy पण नेहमीप्रमाणे बिनडोक हायलाइट्समुळे त्याने बॉल्स कसे तटवले, त्याला फिल्ड सेटिंग काय होते वगैरे का-ही-ही बघायला मिळाले नाही. त्याकरता बहुधा पूर्ण रेकॉर्डिंगच त्या वेळचे बघावे लागेल.

मॅक्सवेल मात्र खतरनाक होता काल. २००३ मधे ऑस्ट्रेलियाला एकदा अ‍ॅण्डी बिकेलने इंग्लंडविरूद्ध आणि सायमण्ड्सने पाकविरूद्ध अशाच परिस्थितीतून मॅचेस काढून दिल्या होत्या ते आठवले. पण ते दोन्ही डाव बहुधा पहिल्या बॅटिंगचे होते. ही कायच्या काय भारी होती कालची खेळी.

९०ज मधल्या मॅचेसने एकदम नॉस्टॅल्जिया आणला Happy बहुतांश मॅचेस पाहिलेल्या आहेत त्यातल्या. त्यावेळेस इतरही अनेक मॅचेस आठवतात ज्यामधे "आता इथून नॉर्मल खेळले तरी जिंकतील" अशी अवस्था असताना बेकार हरलो आहोत. मूळच्या अवघड परिस्थितीमधे खेळत असताना अशी स्थिती येत असे की अरे इथून आपण जिंकू शकतो. पण तेथूनच नक्की पुढे काय करायचे ते कळत नसल्यासारखे पब्लिक खेळे. असे "क्लोज द डील" करता न येणे याला काहीतरी फ्रेज आहे. आत्ता आठवत नाही. यश समोर आले तरी प्रेशर मुळे ते मिळवता न येणे, याला.

बाकी इथून सेन्सिबल खेळून सिंगल्स-डबल्स काढले तरी जिंकतील अशा अवस्थेतून एक दोन नगांनी हीरोगिरी करायच्या नादात फेकलेल्या विकेट्स आणि हातातून घालवलेल्या मॅचेस आणखी वेगळ्याच. वो एक अलगही दर्दभरी कहानी है Happy बहुधा १९९९ वर्ल्ड कप - वि झिंबाब्वे ही एक असेल त्यातली Happy

आणि तिसरी क्लासिक ९०ज कॅटेगरी म्हणजे सचिन असेपर्यंत एकदम कमांडिंग पोझिशन. तो आउट झाल्यावर एकदम टोटल पडझड. "Ten do. Ten don't" फलक सार्थ करणारी Happy

आपण हरलो त्यात मोंगिया हा मोठा फॅक्टर नव्हता. >>>> मी कुठे त्याला पराभवाला जबाबदार ठरवले आहे. पण सिलेक्ट झाला तेव्हा तो आपल्या नशीबावर खुश असेल, पण आज लोकांच्या आठवणीत तो एक वर्ल्डकप फ्लॉप प्लेअर म्हणूनच लक्षात आहे. डोमेस्टीक मध्ये असेना दादा,. जंगल मे मोर नाचा किसने देखा..

वो एक अलगही दर्दभरी कहानी है Happy बहुधा १९९९ वर्ल्ड कप - वि झिंबाब्वे ही एक असेल त्यातली Happy
>>>>

मॅच फिक्सिंगचा काळ होता तो. खेळाडूंना पाण्यासोबत निरोप यायचे..
अझर जडेजा त्यात होतेच.. आणि आपले शेपूट देखील फलंदाजीबाबत धन्य होते. या दोन्ही गोष्टींमुळे असे पराभव फार पाहिलेत.

बहुधा १९९९ वर्ल्ड कप - वि झिंबाब्वे ही एक असेल त्यातली
>>
अर्थात
ओलांगा ला उचलून मारायच्या नादात घालवली मॅच
सुपर सिक्स मधे ते 2 पॉइंट्स नसणं पण नडलं बऱ्यापैकी

विंडीज मधली एक मॅच आठवते
230-40 वगैरे चेज करत होतो. सचिन लवकर गेला, पण सौरव अन् द्रविड नी 197 / 200 पर्यंत नेलं. ते दोघे आऊट झाले अन् आपण 220-22 मधे आटोपलो

मी कुठे त्याला पराभवाला जबाबदार ठरवले आहे. >> हो, मी फक्त संदर्भ धरून पुढे लिहिले आहे.

बाकी इथून सेन्सिबल खेळून सिंगल्स-डबल्स काढले तरी जिंकतील अशा अवस्थेतून एक दोन नगांनी हीरोगिरी करायच्या नादात फेकलेल्या विकेट्स आणि हातातून घालवलेल्या मॅचेस आणखी वेगळ्याच. वो एक अलगही दर्दभरी कहानी है >> नुसते वन डे नाहि तर टेस्ट मधे पण हा रेग्युलर प्रकार असे. सचिन आल्यावर हा प्रकार अजून जखमेवर मीठ चोळल्यासारखा वाटत असे - तो असेतो आपण जिंकणार असे वाटत असे नि तो बाद झाला कि सगळा पत्त्यांचा बंगला कोसळत असे. द्रविड नि सेहवाग आल्यानंतर ह्याला बर्‍यापैकी आळा बसला. माझे स्पष्ट मत आहे कि आपला काँपिटिटीव्ह संघ नॉर्थ मधल्या (किंवा मुंबई नि साऊथ मधले नसलेले धरा हवे तर) भडक माथ्याच्या खेळाडूंमूळे (सेहवाग, भज्जी, नेहरा, युवी, गंभीर, कोहली, इत्यादी ) दादागिरी करणारा झाला नि त्याच बरोबर विजिगुषु प्रवृत्ती वाढली. हे असे हरणे पूर्ण बंद झाले नाअही पण प्रमाण एकदम खाली आले. ८३ च्या वर्ल्ड कप मधेही कुठल्या भागांमधले खेळाडू अधिक होते नि 'हू पूट देअर हँड अप व्हेन इट मॅटर्ड ' हे बघितले कि हे जाणवते

"दादा-द्रविड-सचिन यामध्ये कोण किती स्फोटक आहे हे समजायला यांचा करीअर स्ट्राईकरेट चेक करायची बिलकुल गरज नाही. " - स्ट्राईक रेट चा मुद्दा तू मांडलायस.

"क्षमतेवरच विश्वास नाही ईतके सोपे गणित होते." - क्षमतेवर विश्वासाचा प्रश्नच नव्हता. ते तंत्रच माहित नव्हतं इतकं साधं आहे हे. तुझ्या लाडक्या प्लेयर्सना जे फेव्हरेबल आहे तेच म्हणण्याचा अट्टहास कशासाठी? युवराज-धोनी चा फिनिशर म्हणून उदय चॅपेल-द्रविड काळात झाला जेव्हा इंडियाने ट्रॅडिशनली टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याची पद्धत बदलून चेस करायला सुरूवात केली आणि १७ मॅचेस सलग जिंकल्या (अजूनही हा रेकॉर्ड अबाधित असावा). असो..एका स्मरणरंजनातून चाललेल्या गप्पागोष्टींना वादाचं स्वरूप द्यायची माझी इच्छा नाही. तुला जे हवं ते म्हण.

तुझ्या लाडक्या प्लेयर्सना जे फेव्हरेबल आहे तेच म्हणण्याचा अट्टहास कशासाठी?
>>>>

इथे माझे कोण आता लाडके?
उलट सचिन दादा द्रविड हे माझे लाडके. माझे क्रिकेटचे पाहिले प्रेम होते. मी नाईटीज किड आहे. माझे क्रिकेट यांच्या पासून सुरू झाले. फक्त यांच्या सोबत संपले नाही इतकेच Happy

*नॉर्थ मधल्या (किंवा मुंबई नि साऊथ मधले नसलेले धरा हवे तर) भडक माथ्याच्या खेळाडूंमूळे (सेहवाग, भज्जी, नेहरा, युवी, गंभीर, कोहली, इत्यादी ) दादागिरी करणारा झाला नि त्याच बरोबर विजिगुषु प्रवृत्ती वाढली. * - स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रभावामुळे देशातील सर्वच खेळाडू सुरवातीस कांहींसै मवाळ वृत्तीने वागत असावेत ( लाला अमरनाथ, खंडू रांगणेकर अपवादात्मक ) . पण नंतरच्या स्वातंत्र्यकालीन पिढ्या सर्वसाधारणपणेच आक्रमक, बिनधास्त वागायला लागल्या. फक्तं नॉर्थलाच त्याचं श्रेय देणं हे वाडेकर, दिलीप सरदेसाई, रमाकांत देसाई, एकनाथ सोलकर, फारुक इंजिनियर, संदीप पाटील ...विनोद कांबळी ई.ई. मुंबईच्या आक्रमक, बिनधास्त खेळाडूंवर अन्याय केल्यासारखे होईल, असं मला वाटतं.

भाऊ , मी स्वभावाने आक्रमक - खेळा मधे नाही) म्हणतो आहे. वाडेकरांपासून थेट सचिनपर्यंत खेळाडून हे गंटलमन ह्या कॅटेगरी मधले वाटत आले आहेत. फार क्वचितच त्यांचा तोल मैदानावर ढळलेला बघितला आहे. Let my game do the talking ह्या mode मधे ते वाटत राहिले आहेत. ह्याउलट मी लिहिलेले खेळाडू बघा. परत फक्त ह्या खेळाडूंमूळे आपण जिंकलो असे म्हणत नसून attitude बदलला असे म्हणतो आहे. अर्थात ह्याला काहिहि आकडेवारीचा आधार नाही फक्त मला वाटते एव्हढेच म्हणतोय.

*..?दादागिरी करणारा झाला नि त्याच बरोबर विजिगुषु प्रवृत्ती वाढली *- सॉरी, असामिजी हे समीकरण नाही पटत. माझ्या मते खरी " विजिगुषु ' वृत्ती रुजवली ती वाडेकरने , वे..इंडिज व इंग्लंडला त्यांच्या देशात हरवून व तें देखील संघात फास्ट गोलंदाजीच्या नांवाने पूरी बोंब असताना !
शिवाय, कुणी फार नाठाळपणा केला, तर ' जंटलमन इमेज ' बाजूला करून प्रत्युत्तर दिल्याचे मुंबईकर खेळाडूंचे किस्सेही मी खात्रीलायक लोकांकडून ऐकलेले आहेत ! Wink

>>असे "क्लोज द डील" करता न येणे याला काहीतरी फ्रेज आहे. आत्ता आठवत नाही. <<
किलर इन्स्टिंक्ट म्हणायचं होतं का..?

SL 79-5 (11.2)
फार घाईत आहेत लंका घरी जायच्या

१७२ टारगेट
मदुशंकाला चमकायचा लास्ट चान्स
जर सुरुवातीला विकेट गेल्या तर डकवर्थ लुईस ऑन होईल.

पहिल्या स्लीपला कॅच होती यांनी ती लावलीच नव्हती. थेट दुसरी स्लीप लावलेली. ती सुद्धा त्यांचा मेन फोर्मातला गोलंदाज टाकत असताना. यांचे काही होऊ शकत नाही.
भारत न्यूझीलांड सेमी होईल आता.

*Afghanistan* need to win by at least *438* runs to surpass New Zealand on NRR.
*Pakistan* have to win by at least *287* or, assuming England are kept to *150*, chase down the target in *3.4 overs*. Proud

- ESPNCricinfo

Pakistan need to score more than 400 runs and need to lock English dressing room for 20 minutes.
Timed out

आता भारत वि न्यूझीलंड सेमी फायनल होणार म्हणजे आपली टॉप ऑर्डर गडगडणार. यावेळी रन आऊट कोण होणार ???

पाकिस्तानचा पेपर भारताला न्युझिलंडपेक्षा सोपा गेला असता असा माझा अंदाज आहे.
>>>>>>

बराच सोपा. आपण पाकिस्तान विरुद्ध कागदावर सुद्धा स्ट्रॉण्ग होतो आणि फॉर्मने सुद्धा.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ८-० ने सायकॉलॉजिकली सुद्धा पाकला वरचढ होतो. न्यूझीलंडबाबत मात्र तीच एक भिती आहे.
अफगाणने परवा वाट लावली नसती तर ते ही आफ्रिकेला चोक करत सेमीला येऊ शकले असते.

पण आता या न्यूझीलंडमुळे जरा टेंशनच आलेय. फायनलला ऑस्ट्रेलिया/आफ्रिका कोणीही येऊ दे आपण आरामात मारू असा विश्वास आहे. पण न्यूझीलंडचे टेंशन जास्त आहे. आणि हे ती टीम कागदावर किती मजबूत आहे यामुळे नसून गतकाळात जे घडलेय ते डोक्यात असल्याने टेंशन आहे.

आशा करतो हे फक्त माझ्याच डोक्यात असेल, भारतीय संघाच्या नसेल. शेवटी त्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे मॅटर करते.
त्यासाठी आपल्याला सुरुवात चांगली होणे खूप गरजेचे आहे. ती झाली की आपण त्यांना डॉमिनेट करू जसे आपण या स्पर्धेत सर्वांनाच करत आलोय.. एकदा ते करू लागलो की न्यूझीलंड अगदी सामान्य संघ भासेल.
पण जर सुरुवात चांगली झाली नाही तर पुन्हा डोक्यात जुन्या आठवणी दाटून येणार आणि आपण घाबरून सावध खेळणार. असे झाल्यास न्यूझीलंड नेहमीप्रमाणे आपल्याला डावपेचात भारी पडायची शक्यता राहणार Sad

टिव्हीवर मॅच व सिरियलस एकाच वेळी असतील, तर मैदानापेक्षा घरात अधिक ताण निर्माण होतो ! Wink

जर रनरेटवरच निकाल अवलंबून आहे तर अख्खा दिवस मॅच कशाला, धांवायची शर्यतच ठेवायची ना !!Punepaus.JPG

खरेय.. घरी टीव्हीवर मॅच बघायची असेल तर सामन्याचे महत्व पटवून द्यायला लागते Proud

बाई दवे,
अफगाणने २४४ मारले. साऊथ आफ्रिका चोक होऊ शकेल असा स्कोअर झालेला. बिचारे लास्ट सामना जिकले असते तर....

लोल भाऊ Happy

अरे आत्ता हा एक अंदाज दिसला पहिल्याच पानावर, पहिलीच पोस्ट.

माझे सेमीचे चार संघ -
भारत
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
श्रीलंका (हा माझा डार्क हॉर्स आहे Proud )

५०% टक्के बरोबर आहे. म्हणून काय झालं? ५०% तर बरोबर आहे ना? Proud

Pages