क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्या. एवढ्या चांगल्या स्टार्ट नंतर अपेक्षा वाढल्या होत्या त्या मानाने गेले शेवटचे १३-१४ ओवर्स पेनफुल झाले बघायला. अगदीच जखडून ठेवले आफ्रिकेने.
चला पण कोहलीचा बड्डे चांगला सेलेब्रेट झाला Happy ग्रेट वर्क!!

कोहलीचे आतापर्यंतचे तीन चार फोर पाहता वाढदिवसाला शतक येणार वाटते.
>>>>>
झाले Happy

शेवटच्या स्लॉग ओवर सामना भारताच्या स्कोअर साठी नाही तर कोहलीच्या शतकासाठीच चालू होता.. पण झाले ते चांगले झाले. त्याची धावांची भूक अशीच कायम राहू दे.

खोलला आफ्रिकेला...
बोललो होतो नका घेऊ यांचे टेन्शन..
आपल्याला नाही मारत हे 350 धावा वगैरे...
चेस करताना तर आणखी अवघड झाले यांचे
शमीला तर चस्का लागला आहे विकेटचा..
जडेजाला सुद्धा लवकर आणायचा निर्णय अचूक..

शेवटच्या स्लॉग ओवर सामना भारताच्या स्कोअर साठी नाही तर कोहलीच्या शतकासाठीच चालू होता >>
तुला रोहित नि द्रविड वर केस दाखल करावी लागेल ह्याबद्दल. "Virat Kohli: It was a wicket that was tricky to bat on. We got a great start. My job was to keep the momentum going when I got in. But after ten overs, the ball started gripping and the wicket started slowing down. My role was to bat deep and till the end after the openers fell because that's what I've done, that was the communication as well - to have guys bat around me. "

मला उगीचच वाटलं होतं, द. आफ्रिका ' चोकर्स ' शापातून मुक्त झाली आहे ! >> भाऊ पण ही क्लच मॅच नाहि त्यामूळे अगदीच चोकर्स म्हणू शकत नाही.

धर्मसेना ने कधी भारतीय बॉलर ला बेनेफिट ऑफ डाऊट दिल्याचे बघितल्याचे आठवते का कोणाला ?

*अगदीच चोकर्स म्हणू शकत नाही.* - मान्य. पण अजूनही त्या मानसिकतेतून ते पूर्ण बाहेर आलेले नसावेत अशी शंका येणं स्वाभाविक आहे ! Wink

“ धर्मसेना ने कधी भारतीय बॉलर ला बेनेफिट ऑफ डाऊट दिल्याचे बघितल्याचे आठवते का कोणाला ?” - नाय ब्चा!! शारजात केलेल्या धुलाईच्या जखमा अजून ताज्या असतील. Happy

तुला रोहित नि द्रविड वर केस दाखल करावी लागेल
>>>

मी त्यावर आक्षेप व्यक्त केलाच नाहीये.
उलट माझ्या आधीच्याही पोस्ट वाचा. त्याचे शतकं आज होईल हे त्याचे पाहिले तीन चौकार बघूनच सांगितले होते. अर्थात जसा तो दर सामन्यात खेळतोय हे कोणीही सांगेल Happy
.
अय्यर शेल मध्ये गेलेला तेव्हाही शर्माने त्याला भलामोठा निरोप धाडलेला. कोहली एक बाजू लावून खेळेल आणि तू मार वगैरे... आणि त्याने लगेच गेअर चेंज सुद्धा केला. त्यामुळे आपण त्या लॉक झालेल्या सिच्युएशन मधून बाहेर पडून 300+ सुद्धा झाले. त्यामुळे गेम प्लान काय असावा ते उघड होते.

यावेळी आपला एक ही प्लान एकही पत्ता फेल जात नाहीये.. आपण हा वर्ल्डकप जिंकनारच.. इतके डॉमिनेशन कधी ऑस्ट्रेलियाला सुद्धा करताना पाहिले नव्हते.. टीम कुठल्या तीन चार खेळाडूंवर अवलंबून नाहीये. त्यामुळे हा संघ आता फेल होणे अवघड. समोरच्या संघाला आपला खेळ खूपच उंचावावा लागेल. सेमी आणि फायनलला खेळपट्टी दोन्ही डावात जवळपास सारखीच असेल अशी अपेक्षा. अगदी टोकाचा फरक नको. आता म्हटले तर तीच एक भीती आहे. पण आपण बाद फेरीत प्रेशरमुळे चोक नाही करत हे नक्की..

“ तेव्हाही शर्माने त्याला भलामोठा निरोप धाडलेला. कोहली एक बाजू लावून खेळेल आणि तू मार वगैरे” - निरोप काय होता हे माईंड रिडिंग मुळेच कळलं असणार हे उघड सत्य आहे. Happy

निरोप काय होता हे माईंड रिडिंग मुळेच कळलं असणार हे उघड सत्य आहे. Happy
>>>

इथे बरेच जण अमेरिकाचे आहेत. जे बहुधा पहिली इनिंग बघत नाहीत. मी घरून काम करतोय सध्या. सगळे सामने लाईव्ह बघतोय. तो भला मोठा निरोप टीव्ही वर दाखवत होते. जेव्हा शर्मा ईशानला बराच वेळ सांगत होता. मग ईशानने ते फक्त अय्यरला सांगताना देखील दाखवले. हाय लाईटमध्ये या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर तुम्ही उलटे मलाच खोडण्यात धन्यता मानत आहात Happy

आताही इरफान पठाण शर्माच्या खेळीचे विश्लेषण करत आहे ते बघा.. की कसे त्याने सुरुवातीपासूनच उचलून मारायला सुरुवात केली. आणि कसे त्यामुळे आफ्रिकेचे माईंड सेट बदलले की ही खेळपट्टी 350-400 ची आहे. हे देखील स्कोअर कार्ड बघून समजणार नाही. त्याचा impact आकड्या पलीकडे आहे. ते फटके आणि तो अॅप्रोच लाईव्ह बघायला हवा, समजायला हवा.. 5 ओवर 61-0 अशी भारताची सुरुवात होती. ती सुद्धा आफ्रिका या सध्याच्या दोन नंबर संघाविरुद्ध.. तिथेच ते कोलमडले. कमबॅक होतो इथूनही. पण तो होऊ नये हे काम पुढे कोहली करतो. Happy
पण अय्यरच्या शेलमध्ये जाण्यामुळे आपला हा प्लॅन गंडत होता. आफ्रिकेच्या गोलंदाजांना पुन्हा आत्मविश्वास मिळायला नको म्हणून तो निरोप होता. कारण तेव्हा समालोचक सुद्धा म्हणू लागले होते की हा 300 चा पीच नाही वगैरे.. पण आपण मारले तिथून सव्वातीनशे Happy

अय्यर शेल मध्ये गेलेला तेव्हाही शर्माने त्याला भलामोठा निरोप धाडलेला.>>> +११११११
धोनी जसा स्टंप मागून गेम फिरवायचा तसा शर्मा ड्रेसिंग रूममध्ये बसून गेम फिरवतो.

“ जे बहुधा पहिली इनिंग बघत नाहीत.” - सर, असं नका ना करू प्लीज!! आम्ही मारे मध्यरात्र-पहाटे अलार्म लावून उठून, कॉफीचे बॅरल्स रिचवत मॅच बघतो आणि तुम्ही आमच्यावर हायलाईट्स बघण्याचे कलंक लावता!!! यहाँ बदला वफ़ा काँ, बेवफ़ाई कें सिवा क्याँ हैं। Happy

आता जास्त सावधपणे खेळायला पाहिजेत पण पुढच्या मॅचेस.. आता एकही मॅच हरणं परवडणार नाही.
मी एकही मॅच लाईव बघत नाही तर जिंकतायत हे Uhoh आता हीच अंधश्रद्धा बाळगून Wink मी उरलेल्याही मॅचेस बघणार नाही , फक्त पेपरमधला लाईव स्कोअर अधूनमधून बघेन.. वर्ल्डकप के लिये साला कुछ भी करेगा.. Proud

मी एकही मॅच लाईव बघत नाही तर जिंकतायत हे Uhoh आता हीच अंधश्रद्धा बाळगून Wink मी उरलेल्याही मॅचेस बघणार नाही>>> असं नका करू. सामने बघत जा. माझी पण सेम अंधश्रद्धा आहे पण मी यावर एक तोडगा काढलाय. मी hotstar दोन तीन बॉल मागे ठेवतो आणि दुसरीकडे क्रिकइन्फो वर लाईव्ह स्कोर बघतो त्यामुळे पुढच्या बॉलला काय होणार हे सामना बघताना आधीच समजलेलं असतं. आपली विकेट गेली तरी आधीच माहीत असल्याने जास्त दुःख होत नाही आणि फोर सिक्स गेला तर तो कसा मारला असेल ही उत्सुकता आनंद देऊन जाते.

धर्मसेना बना अधर्मसेना! वगैरे मीम्स्/हेडलाइन्स येउ लागतील आता >> Lol

मी त्यावर आक्षेप व्यक्त केलाच नाहीये. >> कमाल आहे राव ! "शेवटच्या स्लॉग ओवर सामना भारताच्या स्कोअर साठी नाही तर कोहलीच्या तकासाठीच चालू होता" " त्याचे शतकं आज होईल हे त्याचे पाहिले तीन चौकार बघूनच सांगितले होते. अर्थात जसा तो दर सामन्यात खेळतोय हे कोणीही सांगेल " कुसुमाग्रज माय मराठी चिंध्या नेसून सरकार दरबारी उभी आहे असे काहीसे का म्हणून गेले ते आजही तितकेच चपखल लागू होते आहे. Sad

असामी हे वाचा
कदाचित मला काय म्हणायचे आहे हे समजेल.

With India facing South Africa next in the clash of the table toppers in Kolkata, Kohli will once again have the possibility of matching Sachin's world record of 49 ODI hundreds, but former England captain Nasser Hussain warned the team and nation to get their focus back on winning the trophy.

अर्थात जसा तो दर सामन्यात खेळतोय हे कोणीही सांगेल " कुसुमाग्रज माय मराठी चिंध्या नेसून सरकार दरबारी उभी आहे असे काहीसे का म्हणून गेले ते आजही तितकेच चपखल लागू होते आहे.

>>> ऋणमेश तुम्ही नीट मराठी लिहा असे म्हणतायत ते… कोणीही असा शब्दच नाहीय मराठीत… मी दुरुस्त करतो…
अर्थात जसा तो दर सामन्यात खेळतोय हे कोनपण सांगेल

कदाचित मला काय म्हणायचे आहे हे समजेल. >> तू हे जर आधी लिहिले असतेस तर तुला हे म्हणायचे आहे ह्यावर विश्वास ठेवला असता पण कोहलीच्या पहिल्या शतकानंतर तू इथे बर्‍याच जणांशी जो वाद घातला त्याची पार्श्वभूमी नि नंतर त्याच्या दोन हुकलेल्या शतकानंतर केले कमेंट्स बघता इथे तुझा उद्देश वेगळा होता हे धरणे फार कठीण वाटते रे बाबा (गमतीची बाब अशी कि खर तर आज तू पहिल्यांदाच आक्षेप घेतला असतास तो त्यात थोडेफार तथ्य आहे असे म्हटलेही असते) . असो.

शेवटच्या स्लॉग ओवर सामना भारताच्या स्कोअर साठी नाही तर कोहलीच्या शतकासाठीच चालू होता >>
अय्यर आऊट झाला त्या ३७व्या ओव्हर नंतर परिस्थिती होती २२७/३, कोहली ६८(८६)
पुढच्या १३ ओव्हर मधे आपण ९९ रन केल्या (ज्यात कोहलीचा शेअर सुमारे ६ ओव्हर खेळून ३३ रन होता तर बाकी ३ बॅटर नी मिळून ७ ओव्हर खेळल्या अन् ६६ रन केल्या)
This exactly reflects in what आसामी quoted...

जर बाकी बॅटर नी केवळ कोहलीला स्ट्राईक द्यायचं काम केलं असतं, तर स्लॉग ओवर सामना भारताच्या स्कोअर साठी नाही तर कोहलीच्या शतकासाठीच चालू होता हे म्हणता आलं असतं. पण इथे तसं काही झालं नाही आहे. बाकी बॅटर नी दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित accelerate केलं आहे अन् कोहलीच्या दुप्पट धावा जोडल्या आहेत....

अँकी आणि असामी, तुम्ही निव्वळ किरकोळ आकडेवारीच्या आधारावर असली तकलादू निरीक्षणं नोंदवताय. माइंड रिडिंग शिवाय असले निष्कर्ष खात्रीलायकरित्या काढणं केवळ अशक्य आहे. Wink Happy

Pages