क्रिकेट विश्वचषक - २०२३

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01

आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.

कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!

एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदर सगळीच टीम त्यांच्या स्पेसिफिक रोलबद्द्ल साशंक वाटते आहे. इंजरी मूळे सारखे बदलते संघ नक्कीच एकसंध टीम बांधू देत नाही आहे >>> पुन्हा एका पुनर्बांधणी वगैरे करतील जर या कप मधे फार पुढे गेले नाहीत तर. मग असे काही करतील की दहा वर्षे टॉपची टीम होईल Happy

पण १९९९ मधे असेच सुरूवातीला ढेपाळले होते. मग ६ की ७ मॅचेस सलग जिंकले Happy

पण १९९९ मधे असेच सुरूवातीला ढेपाळले होते. मग ६ की ७ मॅचेस सलग जिंकले >> हो बरोबर फा, ते माझ्याही डोक्यात आले होते फक्त ती टीम जास्त अनुभवी नि तावून सुलाखून निघालेली होती ह्या टीम पेक्षा म्हणून तेव्हढे होईल असे वाटत नाही.

पीच कंडीशन आणि ऑस्ट्रेलिया टीम कंडीशन बरोबर ओळखली मी आज.. वरचा अंदाज गरजेपेक्षा जास्तच बरोबर ठरला.. आणि म्हणूनच मी मॅच न बघता पिक्चर बघून आलो Happy

इतक्या लांब चालणाऱ्या व वैविध्यपूर्ण वातावरणात खेळल्या जाणाऱ्या ह्या महत्त्वाच्या स्पर्धेत कोणत्याही संघाचं मूल्यमापन सुरवातीच्या कामगिरीवरुनच न केलेलंच बरं . जवळ जवळ स्पर्धेबाहेर फेकले जात असलेले संघ ( उदा. पाकिस्तान ) पूर्वी ही स्पर्धा जिंकून गेले आहेत !

उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्याला अवास्तव मह्त्व देण्यात काहीच अर्थ नाही. जिंकलो तर ठीक पण हार पण जगबुडी असल्यासारखे असणार नाही. परत बाद फेरीमधे भारत पाकिस्तान सामना सामना झाला तर तो जिंकणे अधिक मह्त्वाचे असेल.

पाकिस्तानशी दर वर्ल्डकप ला जिंकलो आहोत.
हा रेकॉर्ड तुटायला नको.
यावरून पाकिस्तानी मित्रांना चिडवायला मजा येते.

तसेच हे जिंकणे कायम राहिले तर पुढे बाद फेरीत भेटले तर आपण सायकॉलॉजिकली वरचढ राहू त्यांना..

हा रेकॉर्ड तुटायला नको. >> निव्वळ ह्या कारणासाठी हे वरचे पोस्ट लिहिले होते. ह्या रेकॉर्ड पेक्षा मी तीन वर्ल्ड कप जिंकलेला दुसरा संघ हा रेकॉर्ड मी प्रीफर करेन.

प्रीफरचा प्रश्न आलाचा कुठे ईथे? पाकिस्तानशी जिंका मग वर्ल्डकप नाही जिंकलो तरी चालेल असे कोण म्हणतेय ईथे Happy
दोन्ही झाले तर काय वाईट आहे Happy

आणि विनिंग स्ट्रीक कायम राहील तोपर्यंत आपण सायकोलॉजिकली वरचढ राहणार त्यांना नेहमी...

"उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्याला अवास्तव मह्त्व देण्यात काहीच अर्थ नाही." - नको रे उगाच अँटीक्लायमेटीक बोलू.

विकेंड, पहाटे/अपरात्री उठून एकत्र मॅच बघण्याचा माहौल, मग दुपारची मस्त झोप आणि रात्री ऑबर्न वि. एलएसयू असा साग्रसंगीत (आणि विकेंड असल्यामुळे, रंगीतही ;)) प्लॅन आहे. उगाच ह्यात मीठाचा खडा पडला तर संध्याकाळचा 'रंग' अधिक गहिरा करावा लागेल. Happy (I get your point, though).

हाय टेन्शन मॅच आहे म्हणून आसामीजी आधीच घाबरलेले दिसताहेत. आसामी जी घाबरु नका उद्याची मॅच आणि वर्ल्ड कप आपणच जिंकणार

दोन्ही झाले तर काय वाईट आहे >> ह्या वाक्यामधे " निव्वळ ह्या कारणासाठी हे वरचे पोस्ट लिहिले होते. ह्या रेकॉर्ड पेक्षा मी तीन वर्ल्ड कप जिंकलेला दुसरा संघ हा रेकॉर्ड मी प्रीफर करेन." दोन्ही होऊ नये असे म्हणतोय असे का वाटले रे ? मी फक्त ह्या मॅच ला अवास्तव मह्त्व नकोय एव्हढेच म्हणतोय. एकंडर जनता हा सामना जिंकला म्हणाजे वर्ल्ड कप जिंकला अशा मोडमधे सुटली आहे सर्वत्र म्हणून म्हटलेय.

संध्याकाळचा 'रंग' अधिक गहिरा करावा लागेल. >> Lol ऑबर्न वि. एलएसयू तू पण फॉलो करतोस का ?

वर्ल्ड कप गेला खड्ड्यात... उद्याची मॅच महत्वाची... हेच सर्व भारतीय म्हणतील... असामी तुम्ही अमेरिकन सिटीझन का?

फक्त ह्या मॅच ला अवास्तव मह्त्व नकोय एव्हढेच म्हणतोय.
>>
रंगारंग कार्यक्रम या मॅच ला
रिझर्व्ह डे याच मॅच ला

अवास्तव महत्त्व द्यायला बीसीसीआय नीच सुरुवात केली...

कारणं कांहीही असोत, कोणत्याही खेळात भारत पाक आमने सामने असले की एका वेगळ्याच स्तरावरचा तणाव निर्माण होतोच. विध्वंसक न होता, हा तणाव त्या त्या सामन्याची गंमत, प्रेक्षकवर्ग वाढवत असतो व विरुद्ध देशातील खेळाडूंचाही चाहतावर्ग निर्माण करत असतो. Good for sports, isn't it !!

फालतू पाकीट, मोबाईल, घड्याळ नकोय.... आजच्या मॅचचं तिकीट खिशातून काढ पटकन !!!20190201_190852.jpg

अरे इमाम उल हक जबरी वाटतोय. एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे त्यात.
बुमराह, सिराज, भाई लोग, ब्रेक लावा आता.
पिच काही भारी नाही वाटत आहे. लाईन, लेंत वेरियेशन्स वरच मदार आहे.

५ ओवर २३-०
बुमराह आज सुद्धा काटा गोलंदाजी करत आहे.
सिराज आज सुद्धा पसरला आहे.
बुमराह ३ ओवर ५
सिराज २ ओवर १८

Pages