Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दायक आणि कारक यांचे अर्थ
दायक आणि कारक यांचे अर्थ वेगळे आहेत. हे दोन शब्द अन्य नामाला प्रत्यय म्हणून लावण्यासंबंधी काही नियम आहेत का ?
नुकताच मी ‘नुकसानदायक’ हा शब्द वाचला. तो खटकतो कारण नेहमी ‘नुकसानकारक असेच वाचलेले आहे.
काही नामांना एकाच अर्थी दोन्ही प्रत्यय चालू शकतात का ?
..
हा तो मजकूर :
“रात्री ब्रा घालून झोपणं, आरोग्यासाठी नुकसानदायक!”
https://marathi.abplive.com/web-stories/is-it-good-to-wear-bra-at-night-...
अतिक्रांत काल
अतिक्रांत काल
आज हा शब्द आडवा गेला. आवडला
अतिक्रांत काल - ज्या कामाची पूर्वनिर्धारित/ योग्य घटिका (उदा. मुहूर्त) निघून गेली आहे, उशीर झाला आहे असा काल.
म्हणजे वाक्यात कसं वापराल?
म्हणजे वाक्यात कसं वापराल?
)
(ज्या कामाची... असा काल - ही वाक्यरचना गोंधळात टाकणारी आहे.
वाक्यरचना गोंधळात टाकणारी आहे
वाक्यरचना गोंधळात टाकणारी आहे... My bad !
... म्हणजे वाक्यात कसं वापराल?..
मी असे वाचले :-
"मातोश्रींची षष्टीपूर्ती गेल्या कार्तिकात.धामधुमीत वेळ झाला नाही. आता अतिक्रांत कालात प्रतिष्ठेला अनुकूल समारोह योजिला असे....."
दुसरे :
"तहाची बोलणी सिद्धीस गेली नाहीत. नुकसान झाले. आता अतिक्रांत काली नामी मुत्सद्दी पणास लावले, उपयोग नाही."
ओह ओके, आलं लक्षात. धन्यवाद.
ओह ओके, आलं लक्षात. धन्यवाद.
समाजकारण हा नेहमीचा शब्द
समाजकारण हा नेहमीचा शब्द आहे.
परंतु त्या ऐवजी लोककारण हा शब्द इथे वाचण्यात आला :
चांडींनी अखेपर्यंत लोककारण सोडले नाही. त्यांच्या जाण्याने लोकप्रिय नेता काँग्रेसने गमावला.
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/article-about-remarkable-pol...
एळकोट ( येळकोट ) या शब्दाचे
एळकोट ( येळकोट ) या शब्दाचे अर्थ संदर्भानुसार बदलतात :
१. खंडोबा संदर्भात : एकजुटीने प्रयत्न
[का. एळु ( = सात) + कोट ( = कोट संख्या किंवा तट. खंडोबाचें सैन्य सात कोटी असेल किंवा त्याच्या किल्ल्याचे सात तट असतील.
२. मूळस्वभाव (त्याचा एळ- कोट राहीना)
३. (निंदाव्यंजक) : गोंधळ; गडबड; अव्यवस्था.
तो खेळाडू आहे; लबाड पण आहे;
तो खेळाडू आहे; लबाड पण आहे; खोडकर सुद्धा आहे आणि वाकबगार देखील !
असा तो तीन अक्षरी मराठी शब्द कोणता ?
बाजिंदा?
बाजिंदा?
बाजिंदा बरोब्बर !
बाजिंदा बरोब्बर !
फारसी उगम
व आणि ध ही अक्षरे घेऊन केलेले
व आणि ध ही अक्षरे घेऊन केलेले खालील दोन अक्षरी शब्द रंजक आहेत :
विध = प्रकार; तऱ्हा
विंध = छिद्र पाडणे
विधि =विधान, ब्रह्मदेव
विधी = नियम
विधु = चंद्र, एक ही संख्या
वीध = लग्नानंतर पहिल्या वर्षीं करावयाचे मानपान, सणवार.
दाटला काळोख होता चहुदिशांना
दाटला काळोख होता चहुदिशांना
निरवाचा शाप होता वेदनांना
त्याच काळेखातुनी पण सूर वाहे
विंधलेल्या काळजाचे गीत झाले
- सुधीर मोघे
विंधलेल्या काळजाचे गीत झाले
विंधलेल्या काळजाचे गीत झाले
अरे वा, सुंदर !
ही फक्त कविता आहे की गायलेले गीत सुद्धा ?
कविता पानोपानी या कार्यक्रमात
कविता पानोपानी या कार्यक्रमात ते सादर करत असत.
https://youtube.com/watch?v=OcBAsg54nqw&feature=share7
अच्छा !
अच्छा !
छान कार्यक्रम दिसतोय. पाहतो
विधु = चंद्र >>> विधु विनोद
विधु = चंद्र >>> विधु विनोद चोप्राच्या नावाचा अर्थ आज समजला.
+१विधु हे प्रथम नाव असलेली
+१
माझ्या माहितीत विधु हे प्रथम नाव असलेली ती एकमेव व्यक्ती आहे.
विधु विनोद हे जरी वेगळे लिहिलेले असले तरी ते त्यांचे स्वतःचे जोडनाव दिसते.
वडिलांचे नाव डी एन चोप्रा असे विकीनुसार आहे.
तो क्षीणही विधु, महोन्नती घे
तो क्षीणही विधु, महोन्नती घे क्रमाने
जाणोनि हे, सुजन ज्या दुबळीक आली,
त्याची कधी न करिती सहसा टवाळी.
( पहिली ओळ. : की तोडिला तरु फुटे अणखी भराने..)
-- वामन पंडित, भर्तृहरी नीतिशतक अनुवाद.)
हीरा, छान.
हीरा, छान.
तसेच चंद्र व सूर्य यांचा एकत्रित उल्लेख असलेला हा संदर्भ :
तर्कित होते निज पर भट विधु कीं रवि असें पहाते ज्या ।' -मोभीष्म १.३९.
(दाते शब्दकोश)
विधु हा शब्द वामनपंडितांनी
विधु हा शब्द वामनपंडितांनी अनेकदा वापरला आहे. वृत्तबद्ध लिहिताना पर्यायी अर्थाचे असे अनेक शब्द जिभेवर असणे हे पूर्वी महत्त्वाचे असे.
सामान्यतः "चंद्र" हा suffix
सामान्यतः "चंद्र" हा suffix म्हणून येतो ना?
उदा. रामचंद्र, शरदचंद्ररावजी इत्यादी इत्यादी.
इथे मात्र "विनोदचंद्र" च्या ऐवजी "विधु विनोद" असे नाव वेगळे वाटते.
रामचंद्र, शरदचंद्र
रामचंद्र, शरदचंद्र
ही महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यातील पद्धत आहे परंतु त्यांचे कुटुंब काश्मिरी + पेशावरचे असल्याने तिकडची पद्धत वेगळी असावी.
चंद्रकांत, शशीकांत, शशांक
चंद्रकांत, शशीकांत, शशांक अशी नावे असतात.
विधु विनोद दोन्ही वेगळे आहे त्यांच्या नावात.
इथे आंध्र तेलंगणात मुला मुलींची दोन नावे ठेवण्याची पद्धत आहेत. काही मोठे झाल्यावरही दोन्ही नावे लावतात, काही नाही. तसे तिकडे असेल का माहीत नाही.
चंद्रकांत, चंद्रशेखर,
चंद्रकांत, चंद्रशेखर, चंद्रप्रकाश, चंद्रचूड, इत्यादी नावे आठवली. इथे या शब्दांत पुढच्या अर्ध्या शब्दाला महत्त्व आहे. चंद्राचा कांत, चंद्र ज्याच्या शिखरी आहे असा, चंद्राचा प्रकाश, चंद्र ज्याच्या चूडेत आहे असा इत्यादी. शरदचंद्र वगैरे शब्दात चंद्र महत्त्वाचा आहे. शरदातला चंद्र अशा अर्थाने (रामचंद्र = राम, जणू काही चंद्र??? जाणकारांनी प्रकाश टाकावा). नक्की ते विशेषण कुणाला लावले आहे, चंद्राला की त्याबद्दलच्या गोष्टीला, त्यावरून चंद्र आधी येणार की नंतर ते ठरते.
भालचंद्र?
भालचंद्र?
खरंच की! म्हणजे बहुव्रीही
खरंच की! म्हणजे बहुव्रीही असेल तर चंद्र कुठेही येऊ शकतो. चंद्रशेखर - भालचंद्र. तत्पुरूष असेल तर दुसऱ्या भागाला महत्त्व असतं. शरदचंद्र (शरत्चंद्र)मध्ये चंद्र महत्त्वाचा.
आणखीन एक यातली मेख. चंद्रकांतमधला कांत हा उमाकांतमधला कांत (नवरा या अर्थाने) नसून 'च्या प्रमाणे कांती असलेला' - असा अर्थ आहे.
उमाकांतमधला कांत (नवरा या
उमाकांतमधला कांत (नवरा या अर्थाने) नसून >>>
रजनीकांत = रात्रीचा राजा.
इथेही नवरा असा अर्थ नसावा असे वाटते.
'आकांत' कसं झालं मग?
'आकांत' कसं झालं मग?
यातला 'कांत' कुठलाच कांत नाही.
अकांत >>> आकांत (हा अपभ्रंश
अकांत / आकांत हे अपभ्रंश.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%...
आक्रांत =
मोठ्यानें रडणें; हंबरडा फोडणें; विलाप करणें; आकांत [सं. आक्रंदन किंवा म. आकांत अप.]
'आक्रांत' आहे. समजलं.धन्यवाद.
'आक्रांत' आहे. समजलं.धन्यवाद.
Pages