Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Allergy साठी अधीहर्षता असा
Allergy साठी अधीहर्षता असा शब्द वाचला.
बरोबर आहे काय ?
Allergy साठी वावडे हा सोपा
Allergy साठी वावडे हा सोपा शब्द माहित आहे.
अधीहर्षता नाही माहिती.
एक शंका : मातोश्री हा
एक शंका :
मातोश्री हा ‘मातृश्री’चा अपभ्रंश आहे.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%...
परंतु, ‘पिता’च्या बाबतीत पितृश्री/ पिताश्री असा शब्द काही कोशात सापडला नाही. तसेच पितोश्री असाही त्याचा अपभ्रंश कधी ऐकला नाही.
पितृश्री/ पिताश्री मराठीत बरोबर का नाही ?
डॉक्टर, तुम्हांला शब्दकोश
डॉक्टर, तुम्हांला शब्दकोश वाचायला आवडतात, तसे व्युत्पत्तीकोशही आवडतील. आंतर्जालावर उपलब्ध आहेत का माहीत नाही.
हा छापील दिसला. लेखकाचं नाव ओळखीचं वाटतंय. बहुतेक लोकसत्तेत सदर लिहीत होते.
भरत धन्यवाद. मराठी
भरत धन्यवाद.
मराठी व्युत्पत्तीकोश >>>
हो ना ! पण ते आंतरजालावर उपलब्ध झाले तर खूप छान होईल. छापील साठवायला आता नको वाटते.
( इंग्लिश व्युत्पत्तीकोशांचा भरपूर आनंद घेत आहे).
कंबुकंठ
कंबुकंठ
हा शब्द सौंदर्यलक्षण म्हणून आलेल्या वर्णनात वाचला.
“ग्रीवा सुंदर कंबु जैशी”
कोशात अर्थ बघितला तर -
कंबु = शंख
शंखासारखा गळा
अनिंद्य आहाहा. कंबुकंठी,
अनिंद्य आहाहा. कंबुकंठी, सिंहकटी स्त्री वगैरे शब्द खूपदा वाचलेले आहेत. कंबु चा अर्थ माहीत नव्हता. शंख फारच मस्त.
क + अंबु असे असेल का?
अंबु म्हणजे पाणी. कदाचित हपांना माहीत असेल.
हा हा. मला एवढं माहीत नाही हो
हा हा. मला एवढं माहीत नाही हो. फक्त क अंबु याची संधी कंबु होणार नाही एवढं सांगू शकतो.
या रेटने मी व्याकरण विषयक कमेंटी करायला लागलो तर लवकरच लोक मला वेगळ्या अर्थाने कम्बुकंठ म्हणतील - म्हणजे कायम कुणाच्या तरी नावे शंख करणारा गळा.
हपा
हपा
>>>> क अंबु याची संधी कंबु होणार नाही एवढं सांगू शकतो. Happy
ओके ओके
>>>>.म्हणजे कायम कुणाच्या तरी नावे शंख करणारा गळा.
कोणीतरी ते केलच पाहीजे हपा. तुम्ही बरोबर करताय. आम्हालाही समजतं ना. तुमचे प्रतिसाद आवडतात.
_/\_
करा ! जरूर शंख करा. आवडतो
करा ! जरूर शंख करा. आवडतो आहे आम्हाला....

>>>>>>>जरूर शंख करा. आवडतो
>>>>>>>जरूर शंख करा. आवडतो आहे आम्हाला
क्या बात है! अतोनात समर्पक म्हण वापरलीत कुमार सर.
हपा
हपा
लोक मला वेगळ्या अर्थाने
लोक मला वेगळ्या अर्थाने कम्बुकंठ म्हणतील
हपा
ह्याला म्हणतात 'प्रत्युत्पन्नमति' !
हर्पा, प्लीज रेट असाच राहू
हर्पा, प्लीज रेट असाच राहू द्या. मला अतोनात आदर व कौतुक वाटते. वाळूचे कण हातातून सुटतात तशी भाषेची समृद्धी लयाला जात आहे, कुणीतरी ओंजळ धरून आजचं मरण उद्यावर ढकलणं फार आवश्यक आहे.
'कंबु' प्रथमच ऐकलं. क आणि
'कंबु' प्रथमच ऐकलं. क आणि अंबु=कांबु होतं. क् (क हलन्त )नाही. पण शंख लक्ष्मीचा भाऊ आहे कारण दोघांचे बाबा रत्नाकर - समुद्र मंथनातून आलेले म्हणून. आणि अंबुजा म्हणजे लक्ष्मी, मग लहानपणी त्यांना 'अंबु -कंबु' म्हणत असतील लाडानं.
अस्मिता हाहाहा
अस्मिता
हाहाहा
वर लिहिलेले ...
वर लिहिलेले ...
माता-पिता या फरकाबद्दल कोण सांगू शकेल ?
'अंबु -कंबु' :फिदि:
'अंबु -कंबु'
इथे इतरही अर्थ सांगितले आहेत
इथे इतरही अर्थ सांगितले आहेत 'कंबु'चे, पण व्युत्पत्ती कळली नाही.
ते क्+अंबू नसून 'कं + उ'चा अपभ्रंशित उच्चार असावा असं दिसतंय - आता संस्कृत जाणकारांना काही क्लू लागत असेल तर सांगा.
मराठी भाषेविषयी कळकळीने
मराठी भाषेविषयी कळकळीने लिहिलेला लेख इथे वाचला : https://pudhari.news/sampadakiy/641315/far-from-being-a-classic-language... त्याच्या मध्यवर्ती चित्रात
“शब्दकोष”
असे लिहिलेले पाहून थोडा चक्रावलो. आतापर्यंतची समजूत अशी होती की शब्दकोशातला ‘श’ हा असाच असतो.
मग छापील शब्दरत्नाकरमध्ये पाहिले तेव्हा ‘कोश’चे खालील सर्व अर्थ दिले आहेत :
आच्छादन, खजिना, शब्दसंग्रह, रेशमाच्या किड्याचे घर, इत्यादी
आणि,
“कोष” या शब्दापुढे ‘कोश पहा’ असे लिहिलेले आहे. याचा अर्थ, शब्दकोश/ “शब्दकोष” हे दोन्ही प्रकार चालू शकतात असे दिसते…. ?
(बृहदकोशात कोश व कोष या दोन्ही शब्दांना एरर येते).
कोष/श वरून आठवले :
कोष/श वरून आठवले :
षट्कोणी की षटकोनी?
हिंदीत पहिले अचूक पण मराठीत ?
षट्कोण (इति शब्द रत्नाकर).
षट्कोण (इति शब्द रत्नाकर).
षट् / षड् या दोन्हीत दुसरे अक्षर पायमोडके.
नुकतंच एक नविन पुस्तक बघण्यात
नुकतंच एक नविन पुस्तक बघण्यात आलं. अगदी वरवर चाळलं पण छान वाटलं.
लिहू या बिनचूक मराठी - श्रीपाद ब्रह्मे, नेहा लिमये.
https://maharashtratimes.com/editorial/samwad/lihuya-binchuk-marathi-boo...
https://www.amazon.in/Lihoo-Binchook-Marathi-Shripad-Brahme/dp/B0C3R311RM
https://pustakwalas.com/product/lihu-ya-binchuk-marathi/
चांगले पुस्तक. स्वागत !
लिहू या बिनचूक मराठी - >>
चांगले पुस्तक. स्वागत !
लिहू या बिनचूक मराठी - >>
लिहू या बिनचूक मराठी - >>
मुळात पुस्तकाचे शीर्षक "लिहुया बिनचूक मराठी" असे हवे, नाही का?
>>>>“ग्रीवा सुंदर कंबु जैशी”>
>>>>“ग्रीवा सुंदर कंबु जैशी”>>> मस्त !
कंबु नवीन समजला.
'अरण्य' साठी 'कांतार' प्रथमच
'अरण्य' साठी 'कांतार' प्रथमच वाचला.
कांतार >>> कानन
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%...
खरं आहे. कन्नड सिनेमा कांतारा
खरं आहे. कन्नड सिनेमा कांतारा जेव्हा आला, तेव्हा हा शब्द पहिल्यांदा ऐकला. त्याच अर्थाने वापरतात तो शब्द.
'अंबु -कंबु' म्हणत असतील
'अंबु -कंबु' म्हणत असतील लाडानं. >>
Pages