अवकाशाशी जडले नाते: अतिसूक्ष्म कणांपासून ते विश्वाच्या आकारापर्यंत गप्पा

Submitted by अतुल. on 10 July, 2023 - 09:01
Webb's first deep field

अवकाश....

अणुरेणु पासून तारे दीर्घिका पर्यंत खूप मोठा विश्वव्यापी पसारा.

आपले अवकाश (सूर्यमाला):
सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, चंद्र, कृत्रिम उपग्रह, मंगळ, लघुग्रह पट्टा, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो(?), हेलिस्फिअर, क्यूपर बेल्ट, टर्मिनल शॉक, धूमकेतू, उर्ट क्लाऊड

छोटे छोटे अवकाश:
अणु, रेणू, बोसॉन, फोटॉन, ग्लुओन, फर्मीओन, इलेक्ट्रोन्स, क्वार्क्स, क्वांटम्स, स्ट्रिंग्ज

मोठे मोठे अवकाश:
तारे, न्युट्रॉन स्टार्स, पल्सार्स, क्वासार्स, सुपरनोव्हा, नेब्युलाज, दीर्घिका, क्लस्टर्स

गूढ गम्य अवकाश:
डार्क म्याटर, डार्क एनर्जी, वर्म होल्स, कृष्णविवरे, श्वेत विवरे

संशोधकांचे अवकाश:
CERN, LHC, LIGO, NASA, Quantum, Relativity, Gravity, Time Dilation, Length Contraction, Light years, Ripple effect, Hubble, James Webb, Double slit experiment, Photo electric effect, Planck's constant, Spring theory, Schrodinger's Cat, Uncertainty Principle, Pauli exclusion principle, Wavefunction, Multiverse theory, Quantum entanglement, Quantum teleportation, Quantum computers,

या आणि अशा संदर्भातील शोध लागतात. त्याच्या बातम्या आपण वाचतो. तेंव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात. या व अशा गोष्टीवर प्रश्न/शंका विचारून चर्चा करण्यासाठी हा धागा. या जास्तीकरून गप्पाच असतील. हमरीतुमरी हरकत नाही पण दिवे घेऊन चर्चा. गणिती व क्लिष्ट समीकरणे, सिद्धता इत्यादी शक्यतो टाळून Lol Proud

PhysicsConference.jpg
(Conference on Physics which was held from 24 to 29 October 1927)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्वातील प्रत्येक चार घनमीटर जागेत एक अणू बसू शकेल>>>
एक सी सी मध्ये एक अणु असे वाचल्याचे स्मरत आहे.
अर्थात ह्यात प्रचंड फरक आहेतच.

नाही हो. Planck satellite मधून मिळालेल्या माहिती मधून सुध्दा हे बरेच कन्फर्म झाले आहे (10^80 atoms average)

तथापि माझ्या मागच्या प्रतिसादात अनवधानाने असा उल्लेख झाला आहे:

>> observable universe चा radius (१३.८ बिलियन्स प्रकाशवर्षं

हे मात्र चुकीचे आहे. १३.८ बिलियन्स वर्षे वय असले तरी पोकळी/स्पेस ४७ बिलियन्स प्रकाशवर्षे प्रसरण पावली असेल.

थोडे खोलात:
(कोणास बोअर होत असेल तर माफ करा Proud पण मी फक्त नोंद करून ठेवत आहे)

१३.८ बिलियन्स वर्षात ९४ बिलियन्स प्रकाशवर्षे अंतर विश्व प्रसरण पावले. हे अंतर हे Hubble constant वरून आलेले आहे.

आता हा हबल स्थिरांक कसा आला बघा (नाटकात प्रशांत दामले यांचे पात्र आपल्या नायिकेला क्लिष्ट गोष्ट समजून सांगण्यासाठी, "नाही समजले? थांब तुला सांगतो. आता नीट लक्ष देऊन एक हां" असे म्हणून ज्या आविर्भावात प्रेक्षकांकडे बघून हातवारे करून बोलतो, तसे हे वाचा Lol )

"कोणत्याही दोन दीर्घिका एकमेकींपासून दूर जाण्याचे अंतर दर ३.२६ प्रकाशवर्ष अंतरामागे सेकंदाला ६७.५ किमी या दराने वाढते त्यास हबल स्थिरांक म्हणतात"

Lol मला माहिती आहे हे फक्त एकदा वाचल्यावर कळत नाही. मला स्वतःलाच पाच वेळा वाचावे लागले होते Proud आणि हे कळते न कळते तोच पुढचे वाक्य येते "हा स्थिरांक सध्याचा आहे जो कमी कमी होत आहे" बोंबला! Lol

मुळात हे acceleration आहे. या दराने १३.८ बिलियन्स वर्षात विश्व (Space/पोकळी) आजवर सर्व बाजूंनी पसरत पसरत ९४ बिलियन्स प्रकाशवर्षे अंतरापर्यंत गेले असणार, म्हणून त्याची त्रिज्या ४७ बिलियन्स प्रकाशवर्षे इतकी समजतात.

आता हा जो प्रसरणाचा वेग आहे तो वास्तविक प्रकाशाच्या वेगाहून जास्त आहे. मग आइन्स्टाइन खोटा आहे का? तर नाही. हा वेग प्रकाशाहून जास्त असला तरी तो 'निर्वात पोकळी' साठी लागू आहे. आणि निर्वात जागा म्हणजे वस्तू (किंवा मॅटर) नव्हे. त्यामुळे ते प्रकाशाच्याच काय तर त्याच्या बापाच्या वेगाने सुध्दा जाऊ शकते Lol "आप्पून का स्पीड है भाय! अपनी मर्जी से भागेगा. ये प्रकाश वरकास कौन है? इनको जानता नहीं मै" असं आहे त्याचं म्हणणं Proud

तर हा हबल स्थिरांक हळू हळू कमी होतो आहे लक्षात आल्याने काही काळाने विश्व प्रसरण थांबून ते आकुंचन पावायला सुरू होईल अशी एक थियरी आहे.

साधे सोप आहे.
जगात प्रतेक गोष्टी च सर्वोच्च बिंदू आहे.
त्या नंतर उतार चालू होतो.
हा.
युनिव्हर्सल law च आहे.
आणि तो प्रतेक घटका ला लागू आहे
सूर्याचा अंत होईल तेव्हा तो सर्वोच्च उष्णता, प्रकाश निर्माण करेल.
त्याचा आकार पण सर्वोच्च पातळीवर पोचेल.
सर्व ग्रह तो पोटात घेईल आणि नंतर नष्ट होईल.

आणि जेव्हा पृथ्वी नष्ट होईल तेव्हा.
पृथ्वी चे तापमान खुप वाढलेले असेल.
त्या तापमानात कृत्रिम यंत्र वर पण कोणताच सजीव जीवंत राहू शकणार नाही.
निसर्ग चक्र बंद होईल.
हिवाळा,पावसाळा,उन्हाळा हे ऋतू नष्ट होतील.
समुद्र खूप मोठ्या लाटा निर्माण करेल.
ह्या स्थिती मध्ये सर्व सजीव नष्ट होतील आणि त्या नंतर पृथ्वी नष्ट होईल.
काही दशकं पूर्वी मंगळवार वाहते पाणी होते.(हे माझे मत नाही संशोधक लोकांचे मत आहे)
किती खूप कमी दिवसात तो ग्रह सजीव हिन झाला.

आताच खूप भागात ,४५ ते ५०, डिग्री पर्यंत तापमान जाते ते फक्त ६० पर्यंत गेले तरी माणूस तरी जगू च शकणार नाही
आणि तो दिवस खूप जवळ आलेला आहे.
ह्याच वर्षी मुंबई मध्ये इतके वातावरण खराब होते की .
वीज गेली असती .
पंखे,एसी बंद असते तर ..
किती तरी लोक मृत्यू मुखी पडले असते.

function at() { [native code] }उल तुमची स्मजावण्याची पद्धत आणि शिस्त दोन्हीही वाखाणन्याजोगी आहे. खूप वर्षांनी या विषयाकडे आलो. तुमच्या या विवेचनाचा फायदा झाला. त्याबद्दल आभार.

ब्लॅक होलचे तापमान किती आहे ? १ aK तापमान म्हणजे किती ? हे तापमान स्पेसमधे आहे का ? नसेल तर या तापमानाला काय होईल ?
याही पेक्षा थंड म्हणजे १०^-२१ K ( 1zK) या तापमानाचा काय परिणाम होईल ?
थर्मोडायनॅमिक्स आणि विश्वाचे प्रसरण आकुंचन यांचा आपसात काय संबंध आहे ?
मॅगेटोर काय आहेत ? किती दूर आहेत ?

याबद्दल सुद्धा माहिती मिळेल या अपेक्षेत आणि प्रतिक्षेत.

>> ब्लॅक होलचे तापमान किती आहे ? १ aK तापमान म्हणजे किती ? हे तापमान स्पेसमधे आहे का ? नसेल तर या तापमानाला काय होईल ? याही पेक्षा थंड म्हणजे १०^-२१ K ( 1zK) या तापमानाचा काय परिणाम होईल ?

छान प्रश्न! Happy जितके माझे यातले ज्ञान आहे त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय.

शून्य डिग्री केल्व्हीन (absolute zero) म्हणजे जिथे रूढार्थाने पदार्थामधील कोणत्याही कणांची हालचाल नाही. संपूर्ण म्हणजे आईशप्पथ संपूर्ण चिडीचिप!!! Lol

आता absolute zero म्हणजे संपूर्ण चिडीचिप मग त्या खाली आणि अजून काय? तर त्याच्या खालची जी तापमान आहेत ती थियरोटिकल आहेत (म्हणजे सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने येड्याची जत्रा Proud ) कारण ती फक्त क्वांटम फिजिक्स मध्ये अस्तित्वात असतात. त्या पातळीवर नॉर्मली पार्टिकल सुपरपोजिशन मध्ये असतात. म्हणजे एकाच वेळी स्थिरसुद्धा आहे आणि हलत सुद्धा आहे.

ब्लॅक होल चे तापमान १०^-8 K मानले जाते. कारण या तापमानास सुपरपोजिशन सुद्धा नसते. फक्त स्थिर! ब्लॅकहॉल सांगतं, 'मुकाट्याने गप्प बसायचं न हलता" Lol

१ aK म्हणजे त्याच्याही अजुन खाली (लागली वाट!). म्हणजे cmbr जे विश्वनिर्मितीवेळी तयार झाले त्यांच्याहुन कमी तापमान. तिथे मॅटर अस्तित्वात असले तरी त्यापासून तारे वगैरे बनू शकणार नाहीत. विश्व म्हणज फक्त अंधार आणि थंडी एव्हढेच झाले असते. हे तापमान स्पेस मध्ये आढळलेले नाही.

1 ak पेक्षा खाली 10^-32 K आहे जे थियरीमध्येसुध्दा सर्वात कमी तापमान आहे. 1zk (झेक्टो केल्व्हीन) हे याहून खाली जिथे मॅटर अणूरेणूच्या रुपात असूच शकत नाही. नुसतेच फॅमिओन बोसॉन असतील.

(थर्मोडायनॅमिक्स च्या प्रश्नांची उत्तरे उद्या पाहू)

धन्यवाद function at() { [native code] }उलजी,
खूपच छान उत्तरे मिळाली आहेत. विश्व थंड होतंय असं म्हणतात म्हणजे कायनेटिक एनर्जी शून्यवत होईल. ही आकुंचनाची प्रोसेस असेल का ? १ एके हे तापमान काही काळासाठी प्रयोगशाळेत शक्य झाले होते हे खरे का ?

नेब्युलाज बद्दल पण माहिती हवी आहे.

Thanks आचार्य.

माफ करा आधीच्या प्रतिसादात थोडा गोंधळ झालाय शेवटी शेवटी. ऍटोमिक केल्व्हीन (aK) म्हणजे ऍटोमच्या आतील कणांच्या हालचाली दर्शवते हे जरी खरे असले तरी ते ऍबसोल्यूट झिरोच्या (झिरो केल्व्हीन) खाली येत नाही. तर ते ऍबसोल्यूट झिरो आणि एक केल्व्हीन दोन्हींच्या मध्येच असते. त्यामुळे निगेटिव्ह केल्व्हीन्स कुठेच नसतात (व्याख्येनुसार असूच शकत नाहीत). त्यामुळे 1 aK हे ऍबसोल्यूट झिरोपेक्षा किंचित वर येते जे लॅब मध्ये साध्य झाले आहे (२०१९ मध्ये?)

विश्वाचे प्रसरण व आकुंचन हे थर्मोडायनॅमिक्सच्या दुसऱ्या नियमानुसार होते. सध्या प्रसरण होत आहे. म्हणजे स्पेस वाढते आहे. वस्तुमान व ऑब्जेक्ट्स तेवढेच आहेत तोवर इन्ट्रोपी (गोंधळ/अनियमितता) वाढतंच राहील.

वर्गात मुले तेवढीच पण वर्गाच्या भिंती अजून दूर जेल्या तर त्यांना हुंदडायला जास्त जागा मिळेल, बेशिस्त वाढेल. तेच जर जागा कमी केली तर जास्त हलायला जागा मिळणार नाही. Entropy म्हणजे तोच प्रकार.

यानुसार विश्वाचे आकुंचन सुरू झाल्यावर Entropy कमी होत जाईल हे जरी असले तरी अन्य कारणांमुळे ती वाढूही शकते. हे अद्याप अनिश्चित आहे (afaik)

नेब्युलाज म्हणजे तारा आणि त्याभोवती ग्रह हि संरचना (सूर्यमाला) तयार होण्यासाठी लागणारी कच्ची सामुग्री म्हणता येईल. कित्येक प्रकाशवर्षं लांबीचे धुळीचे आणि गॅसचे (प्रामुख्याने हायड्रोजन) अवाढव्य ढग असतात हे. त्याबद्दल मी या धाग्यात विस्ताराने लिहिले आहे:

https://www.maayboli.com/node/69086

पुन्हा एकदा. छान विवेचन.
वर येते जे लॅब मध्ये साध्य झाले आहे (२०१९ मध्ये?) >> माझ्या लक्षात नाही. इतक्यात काहीही वाचन नाही. इथे मिळतेय माहिती.
तो धागा माहिती नव्हता. धन्यवाद त्यासाठीही.

वरती मॅगेटोर चा उल्लेख आलाय. ते मलाही माहीत नव्हते/नाही. सहज गुगलून बघितले. कृष्णविवर (blackhole) ची पुढची अवस्था म्हणजे मॅगेटोर (?) असे काहीसे वाचायला मिळाले. पण डिटेल्स माहिती नाहीत.

https://www.mpg.de/research/negative-absolute-temperature इथे काही रोचक माहिती आहे.
आणि हे अजून एक.
The temperature scale from cold to hot runs +0K, ... , + 300 K, ... , + infinite K,
- infiniteK, ... , - 300 K, ... , -0 K. Note that if a system at - 300 K is brought
into thermal contact with an identical system at 300 K, the final equilibrium
temperature is not 0K, but is ± infinite, K.
----------------Appendix E
Negative Temperature
Thermal Physic
CHARLES KITTEL/ HERBERT KROEMER
डोक्यावरून जातंय. वाचन कमी पडतेय.

मॅगेटोर म्हणजे विश्वातला सर्वात मोठा चुंबक असावा बहुतेक. पुन्हा बघायला लागेल.
असे अनेक चुंबक आहेत. तसेच काही सुपरनोव्हा असे आहेत जे प्रकाशाच्या हजारो पटीने आपले मास अंतराळात फेकत आहेत. इथे आईनस्टाईनचा सिद्धांत फेल झाला अशी चर्चा होती. त्यानंतर या रहस्याचा उलगडा झाला. या फिनॉमिनॉचं नाव विसरलो.

फक्त नोंदींकरता :

१. https://interestingengineering.com/science/three-billion-light-year-gala...

२. जेम्स वेबने शोधल्या विश्वाच्या आरंभाआधीच्या आकाशगंगा. बिग बँगच्या काही गृहीतकांवर प्रश्नचिन्ह. हे विश्व खरंच किती जुनं ?
https://www.theguardian.com/science/2023/feb/22/universe-breakers-james-...

स्पेस डॉट ऑर्गने जेम्स वेबने बिग बँग चुकीची आहे असा या निरीक्षणाचा अर्थ नाही असे म्हटलेले आहे.
https://www.space.com/james-webb-space-telescope-didnt-break-big-bang-ex...

@केशवकूल,
इंटरेस्टिंग! ज्ञानात भर घालणारी माहिती पुरवलीत. रूढार्थाने पोजिटिव्ह केल्व्हीन, पण Boltzmann distribution इन्व्हर्ट झाले होते. दंगा करणारे अणू जास्त आणि शांत बसलेले कमी. सामान्यत: याच्या उलट असते. म्हणून निगेटिव्ह केल्व्हीन असे त्यांनी म्हटले आहे. डार्क मॅटर चा सुद्धा संबंध जोडलाय पण लक्षात नाही आला.

@आचार्य,
>> मॅगेटोर म्हणजे विश्वातला सर्वात मोठा चुंबक

याची कुठे लिंक असेल तर पाठवा. गुगलून मिळाले नाही.

बाकी ते बिलियन्स प्रकाशवर्षं आकाशगंगांचे पुंज आढळलेत ते प्रकरण फारच रोचक आहे. वाचतोय अजूनही त्याबाबत.

या धाग्यामुळे नवनवीन माहितीत खूप भर पडत आहे Happy

याची कुठे लिंक असेल तर पाठवा. गुगलून मिळाले नाही. >>> Extremely Sorry ! मॅग्नेटोर लिहायला हवं होतं. माझी चूक झाली.
या गोष्टी आता टच मधे नसल्याने लक्षात नाहीत. आठवेल तसे इथे नोंद करतोय. म्हणजे जेव्हां वेळ मिळेल तेव्हां निसटून जायला नको.

https://www.nasa.gov/vision/universe/watchtheskies/swift_nsu_0205.html

https://ui.adsabs.harvard.edu/abs/2005Natur.434.1107P/abstract

https://www.mpi-hd.mpg.de/hfm/HESS/pages/home/som/2012/02/

https://www.popularmechanics.com/science/a226/1280796/

सध्या या लिंक वर काम भागवा.

आचार्य,

>> Extremely Sorry ! मॅग्नेटोर लिहायला हवं होतं. माझी चूक झाली.

याची गरज नव्हती हो Happy लिंक साठी खूप खूप धन्यवाद

आता लक्षात आले. मॅग्नेटर्स हे एक प्रकारचे न्युट्रॉन स्टार्स आहेत ज्यांचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत प्रभावी आहे:
https://en.wikipedia.org/wiki/Magnetar

Neil deGrasse Tyson हे जगप्रसिद्ध astrophysicist आहेत. त्यांनी NASA मध्ये दीर्घकाळ काम केले आहे.
त्यांची Cosmos A Spacetime Odyssey हि खूप म्हणजे खूपच रोचक सिरीज आहे.
त्याचे हिंदी रूपांतर सुद्धा खूप छान आहे. जबरदस्त सादरीकरण. मला अशा डॉक्युमेन्टरिज प्रचंड आवडतात.

ज्यांना यात आवड आहे त्यांनी नक्की पहा:
https://www.youtube.com/watch?v=EAlSHe6YTRI

यात सांगितल्याप्रमाणे:
बिग बँग पासून आतापर्यंतचा काळ जर एक वर्षात टाकला (कॉस्मिक कॅलेंडर) तर कधी काय घडले हे पाहणे खूप मजेशीर आहे.
(एक महिना म्हणजे एक अरब वर्षे आणि एक दिवस म्हणजे चार करोड वर्षे)
इथून पुढे पहा: https://youtu.be/EAlSHe6YTRI?t=1650

१ जानेवारी: बिग बँग
१० जानेवारी: ताऱ्यांच्या निर्मितीस सुरवात
१३ जानेवारी: पहिली दीर्घिका बनली
१५ मार्च: आपली आकाशगंगा बनली
३१ ऑगस्ट: आपला सूर्य तयार झाला
२१ सप्टेबर: पृथ्वीवर जीवनास सुरवात
१७ डिसेम्बर: पहिला प्राणी जो समुद्रातून जमिनीवर आला
२८ डिसेम्बर: पहिले फुल
३० डिसेम्बर (सकाळी ६ वाजून २४ मिनिटे): पृथ्वीवर Astroid आदळून डायनासोरस नष्ट होण्यास सुरवात (Chixlub impact)
३१ डिसेम्बर (रात्री ९:४५): दोन पायांवर चालू शकणारे मानव अस्तित्वात आले
३१ डिसेम्बर (रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ४६ सेकंदपासून पुढे): लिखित इतिहासाचा काळ (साम्राजे, राजे, लढाया इत्यादी)
३१ डिसेम्बर (रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५३ सेकंदपासून पुढे): विविध धर्मांचा उगम
३१ डिसेम्बर (रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५९ सेकंदपासून पुढे): विज्ञानाचा उगम

भन्नाट आहे ना Happy

Interstellar सिनेमात टाईम डायलेशन बद्दल सांगितलं आहे, मला थोडं कळलं. Arrival मधेही Time can be non-linear in other dimensions असं म्हटलंय पण Arrival विशेष नाही. Interstellar जरुर बघा, नेटफ्लिक्सवर आहे. नोलन हा हॉलिवूडचा आशुतोष गोवारीकर आहे, त्यामुळे जवळपास तीन तासांचा आहे सिनेमा.

आईनस्टाईनच्या(?) मते Time and space ह्या वेगवेगळ्या संकल्पना नाहीत असं कुठंतरी वाचलं होतं. म्हणूनच spacetime ही एकच एकत्रित संकल्पना त्याने वापरली आहे. पृथ्वी ह्या अवकाशातील एका तरंगणाऱ्या चेंडूवरील जीव म्हणून ज्या मर्यादा मानवांना येतात, मग त्या perceive करण्याच्या असोत वा physical असोत, त्या आपल्या आकाशगंगेबाहेर किंवा दीर्घिकेबाहेरील ग्रहांवरील जीवांना येतीलच असं नाही. त्यामुळे तुलनेला सुद्धा वाव नाही. इथल्या फुलपाखराचं आयुष्य आठ दिवस आणि माणसाचं सरासरी शंभर वर्षं असं धरलं तर फुलपाखरांच्या तुलनेत माणूस जवळजवळ अमर आहे. त्यामुळे 'काळ' ही संकल्पना फार गुंतागुंतीची आहे किंवा ती अस्तित्वातच नसावी. पण मग विश्वाच्या पसाऱ्यात मोजायला काहीच रहाणार नाही म्हणून ती फक्त एका मर्यादेपर्यंतच व ठराविक मितींच्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच खरी असावी. चूभूद्याघ्या. त्यामुळे आपल्याला विश्वाचं रहस्य कधीही कळणं शक्य नाही, कारण आपल्या फुटपट्ट्या ह्या पृथ्वीवरील मितींमधे बसवून बनवलेल्या आहेत. इथलं भौतिकशास्त्र इथल्या थिअरीज ब्रह्मांडात सगळीकडे लागू होणं कठीण असेल. ते चूक नाही काही , yet to be discovered आहे. तीच तर विज्ञानाची गंमत आहे. Happy

शेवटचे तीन प्रतिसाद आता वाचले. अस्मिता छान मुद्दे. मितींचा मुद्दा अगदी सहमत. कीटकांचे जग द्विमितीय असेल काय असे मला कधीकधी वाटते. कारण त्यांना फक्त शेड्स दिसतात. द्विमितीय असेल नसेल पण आपल्यापेक्षा त्यांचे बुद्धीप्रामाण्य नक्कीच वेगळे असणार. मानव म्हणून जे त्रिमितीय अस्तित्व आपले आपल्याला जाणवते ते त्यांना तसेच कसे जाणवेल?

त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीप्रामाण्य पलीकडे (चौथी पाचवी मिती वगैरे जाणवत असलेले) जीव असतीलही पण ज्यांचे अस्तित्व आपल्याला कसे जाणवणार. या मर्यादा आहेतच.

वरच्या केशवकूल यांनी दिलेल्या लिंक इंटरेस्टिंग आहेत. नीट वाचून तपशीलात प्रतिसाद सावकाशीने लिहीतो. (ववि नंतरच)

ज्या वस्तू निर्जीव आहेत त्यांना पण मन आणि भावना असतात असं मला वाटतं. आपल्या लिमिटेशनमुळे आपण त्या समजू शकत नाही. की मी जास्त सेंटि आहे म्हणून मला असं वाटतं?

बोकलत माझे पण हेच मत आहे.
ताऱ्यांचा जन्म होतो,त्यांची वाढ होते ,मृत्यू होते आणि हे सतत एका layi मध्ये चालू आहे.

एकादी गाडी दृष्ट असते तिचे नेहमीच अपघात होतात.
अशी पण उदाहरणे दिसतात
प्रतेक निर्जीव वस्तूत पण हालचाल चालू असते क्रियेला प्रतिक्रियेमध्ये उत्तर मिळते

मला बिलियनच्या बाबतीत कन्फ्यूज व्हायला होतं . पृथ्वीचं वय 4.54 बिलिअन वर्षं आहे म्हणजे 45 कोटी वर्षं की साडेचारशे कोटी वर्षं ? हा आपला ग्रह खरोखरच साडेचार अब्ज वर्षांचा आहे ?

पृथ्वीचं वय 4.54 बिलिअन वर्षं आहे म्हणजे 45 कोटी वर्षं की साडेचारशे कोटी वर्षं ? = १ बिलिअन = १०० कोटी.

हा आपला ग्रह खरोखरच साडेचार अब्ज वर्षांचा आहे ? >> साडेचार अब्ज साडेचार अब्ज म्हणजे काहीच नाही. अगदी काल घडल्यासारखं आठवतंय सगळं.

Everyone should study astronomy. Then we realize how insignificant we are.

Pages