
अवकाश....
अणुरेणु पासून तारे दीर्घिका पर्यंत खूप मोठा विश्वव्यापी पसारा.
आपले अवकाश (सूर्यमाला):
सूर्य, बुध, शुक्र, पृथ्वी, चंद्र, कृत्रिम उपग्रह, मंगळ, लघुग्रह पट्टा, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो(?), हेलिस्फिअर, क्यूपर बेल्ट, टर्मिनल शॉक, धूमकेतू, उर्ट क्लाऊड
छोटे छोटे अवकाश:
अणु, रेणू, बोसॉन, फोटॉन, ग्लुओन, फर्मीओन, इलेक्ट्रोन्स, क्वार्क्स, क्वांटम्स, स्ट्रिंग्ज
मोठे मोठे अवकाश:
तारे, न्युट्रॉन स्टार्स, पल्सार्स, क्वासार्स, सुपरनोव्हा, नेब्युलाज, दीर्घिका, क्लस्टर्स
गूढ गम्य अवकाश:
डार्क म्याटर, डार्क एनर्जी, वर्म होल्स, कृष्णविवरे, श्वेत विवरे
संशोधकांचे अवकाश:
CERN, LHC, LIGO, NASA, Quantum, Relativity, Gravity, Time Dilation, Length Contraction, Light years, Ripple effect, Hubble, James Webb, Double slit experiment, Photo electric effect, Planck's constant, Spring theory, Schrodinger's Cat, Uncertainty Principle, Pauli exclusion principle, Wavefunction, Multiverse theory, Quantum entanglement, Quantum teleportation, Quantum computers,
या आणि अशा संदर्भातील शोध लागतात. त्याच्या बातम्या आपण वाचतो. तेंव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात. या व अशा गोष्टीवर प्रश्न/शंका विचारून चर्चा करण्यासाठी हा धागा. या जास्तीकरून गप्पाच असतील. हमरीतुमरी हरकत नाही पण दिवे घेऊन चर्चा. गणिती व क्लिष्ट समीकरणे, सिद्धता इत्यादी शक्यतो टाळून


(Conference on Physics which was held from 24 to 29 October 1927)
>> फुग्यावर बसलेल्या माशीसाठी
>> फुग्यावर बसलेल्या माशीसाठी फुगा द्वीमिती आहे.two dimensional. तो फुगा त्रिमिती मध्ये फुगतो. तद्वत आपले त्रिमिती विश्व हे चौथ्या मिती मध्ये प्रसरण पावत आहे.
>> Submitted by केशवकूल on 16 July, 2023 - 18:55
हे अगदी भन्नाट उदाहरण आहे. याद्वारे हि कल्पना स्पष्ट करता येते. पूर्वी एकदा Quora वर अशाच एका प्रश्नाचे उत्तर देताना मी अगदी हेच उदाहरण वापरले होते. त्या उत्तरातला काही भाग इथे पेस्ट करत आहे (संपूर्ण उत्तराची लिंक याच्या खाली):
---
अशी कल्पना करा कि एक मोठ्ठा चेंडू आहे आणि त्यावर एका छोट्या मुंगीचे चित्र आहे. त्या चित्रातल्या मुंगीला जाणीवा आहेत अशी कल्पना करा. तिला कळते. पण काय? तिला फक्त चेंडूच्या पृष्ठभागावरची इतर चित्रे दिसतात. कारण तिचे जग द्विमितीय आहे. त्यामुळे हि चित्रमुंगी जर चेंडूवर सरकू लागली तर तिला त्या चेंडूवरील आजूबाजूची चित्रे दिसतील. तिला त्रिमितीय जगात वावरणारे आपण दिसणार नाही. तो चेंडूचा द्विमितोय पृष्ठभाग हेच तिचे विश्व असेल. ती चित्रे म्हणजे त्या विश्वातल्या वस्तू व जिथे चित्र नाही तो तिच्या दृष्टीने निर्वात अवकाश असेल. हा द्विमितीय पृष्ठभाग वक्र आहे व त्यापासून चेंडू बनलाय हे आपल्याला कळते. कारण आपण त्रिमितीय जगात आहोत. पण चित्रमुंगीच्या दृष्टीने विचार करता तिला आपले जग कळत नाही. तिला फक्त चेंडूचा पृष्ठभाग आणि त्यावरील अन्य चित्रे इतकेच कळते.
आता ह्या चेंडूत आपण जर हवा भरायला लागलो तर चेंडू जसजसा मोठा होईल तसतसे हा पृष्ठभाग प्रसरण पावू लागेल. चित्रे एकमेकांपासून दूर जायला लागतील. चित्रमुंगीला वाटेल तिचे विश्व प्रसरण पावतेय. हे अगदी तसेच आहे ना जसे आपण वर चर्चा केली होती? …आकाशगंगा दूर दूर जात असलेले हे विश्व प्रसरण पावत आहे… हो तेच आहे! फक्त फरक हाच कि आपण विश्वाच्या बाबत बोलत होतो जे त्रिमितीय आहे, ज्यामध्ये आपण आहे व ज्यात आकाशगंगा आहेत. आणि इथे आपण चेंडूच्या बाबत बोलतोय ज्याचा पृष्ठभाग द्विमितीय आहे, ज्रयामध्ये चित्रमुंगी आहे व इतर चित्रे आहेत.
अगदी हेच. चित्रमुंगीला वाटले कि तिचे द्विमितीय जग (चेंडूचा पृष्ठभाग) कुठे संपेल? तर आपल्याला माहित आहे क ते कुठेच संपणार नाही कारण ते वक्राकार आहे. तद्वत:च आपण ज्या विश्वात राहतो ते त्रिमितीय जग म्हणजेच अवकाश आणि काळ हे सुद्धा वक्राकार आहेत.
---
(संपूर्ण उत्तर: https://qr.ae/prrwaP)
पटण्या सारखे आहे.
पटण्या सारखे आहे.
>> << ICRF साठी सूर्य हाच
>> << ICRF साठी सूर्य हाच मध्यभागी समजला गेला आहे. >>
>> ----- आपल्या मिल्की गॅलेक्सी ची व्याप्ती १००,००० प्रकाश वर्ष आहे आणि त्यामधे अनेक सूर्य (१०० अब्ज) आहेत पैकी कुठला ?
ICRF साठी त्यांनी आपलाच सूर्य मध्यवर्ती धरला आहे.
आपल्या सुर्यमालेचा
आपल्या सुर्यमालेचा गुरुत्वकेंद्र मध्यवर्ती धरला आहे ना?
तर तो सुद्धा स्थिर नाही.
गणित आणि निरीक्षण हे मॅच होत
गणित आणि निरीक्षण हे मॅच होत नाही.
कारण वैश्विक स्थिरांक च आपल्याला अजून माहीत नाही.
असे पण वाचनात आले आहे.
मानव हो. अगदी बरोबर. सूर्य
मानव हो. अगदी बरोबर. सूर्य नाही म्हणता येणार पण सूर्यमालेचा गुरुत्वकेंद्र (barycenter). पूर्ण सूर्यमाला ज्याभोवती फिरते तो अक्ष. गुरु सारख्या मोठ्या ग्रहामुळे जो अगदी सूर्याचा मध्यभाग न राहता त्याभोवती थोड्या अंतरावरच्या वर्तुळात फिरत राहतो.
आपणा सर्वांना ध्रुव बाळाची
आपणा सर्वांना ध्रुव बाळाची कथा माहित आहे. त्याला अढळपद पाहिजे होते. आकाशात एकाच तारा अढळ आहे. तो आहे पोलारीस. म्हणून हा तारा आपण ध्रुव बाळाला बहाल केला व त्याला आपण ध्रुव म्हणू लागलो.
पण हा ध्रुव तारा खरोखरच अढळ आहेका ? नाही. सुमारे ५००० वर्षांपूर्वी थुबान (अल्फा द्रााकोनीस) हा पृथ्वीचा ध्रुव तारा होता आणि अजून १३००० हजार वर्षांनी व्हेगा नावाचा तेजःपुंज तारा आढळ पदी विराजमान होईल. जाणून घेण्यासाठी ही लिंक
https://starchild.gsfc.nasa.gov/docs/StarChild/questions/question64.html...'s%20rotation,will%20be%20the%20North%20Star.
Mass मुळे स्पेस का curve होते
Mass मुळे स्पेस का curve होते?
फुगा , चादरी मध्ये दगड ठेवला की चादर curve होते.
अशी उदाहरणे नको.
स्पेस आणि फुगा, चादर ह्या मध्ये खूप फरक आहे.
फक्त गणिती सूत्र जुळवण्यासाठी आपण मास मुळे स्पेस curve होते हे स्वीकारले आहे का?
>> अजून १३००० हजार वर्षांनी
>> अजून १३००० हजार वर्षांनी व्हेगा नावाचा तेजःपुंज तारा आढळ पदी विराजमान होईल.
हे खूप इंटरेस्टिंग आहे. दर २६००० वर्षांनी पृथ्वीचा तिरका अक्ष एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे १३००० वर्षांनी सगळ्या ध्रुवबाळांची व्हेगाबाळे होणार आहेत
आपल्या मोबाईल मध्ये SkyView म्हणून एक ऍप आहे ज्याद्वारे आकाशातले खगोल त्यांच्या इत्यंभूत माहितीसह आकाशात पाहता येतात. फारच भन्नाट अनुभव असतो तो. इतरही अशी ऍप असतील. मायबोलीवर वावे आहेत त्या कदाचित याबद्दल अधिक लिहू शकतील.
एक दीड महिन्यापूर्वी जेंव्हा आकाश निरभ्र होते तेंव्हा या ऍपचा वापर करून मी ताऱ्यांची ओळख करून घेऊ लागलो. हा व्हेगास रात्री नऊ च्या आसपास पूर्व-उत्तर आकाशात दिसतो. खरंच तेजस्वी आहे. निळसर झाक आहे. पांढरा शुभ्र गणवेश निळीच्या पाण्यात धुवून परिधान करून आलेल्या एखादया वक्तशीर शाळकरी मुलासारखा तो ठराविक वेळी आकाशात ठराविक ठिकाणी हजर असायचा
साधारणपणे पंचवीसएक प्रकाशवर्षे दूर आहे तो.
त्याचवेळी थेट डोक्यावर आकाशात अजून एक तेजस्वी तारा दिसतो. या बाप्पूला मी अनेक वर्षे त्यावेळी तिथं पाहतोय. जेवणखाण झाल्यावर फिरायला गेलं आणि ढेकर देत जरा वर बघितले की हा तिथे हजर
डोक्यावर नाइटलॅम्प लावल्यासारखा! बर आपल्याकडे याला फार कोण ओळखतही नाही. इतका तेजस्वी, पण सगळ्या प्रसिद्ध ग्रहतारे मंडळींत याचे नाव का नसेल याचे आश्चर्य वाटे. इतके मार्क मिळूनही बोर्डात न येणाऱ्या विद्यार्थ्यासारखा
परवा मी त्याच्याकडे माझा मोबाईल वळवला तेंव्हा कळले की तो ARCTURUS नावाचा तारा आहे. (मराठीत स्वाती नक्षत्र?) त्याला आता मी जे पाहत होतो तो मी शाळेत असतानाचा त्याचा प्रकाश होता हे लक्षात आल्यावर उगीचच भरून आले 
तसेच तिकडे दक्षिण आकाशात त्याचवेळी खूप क्षीण अशी जोडगोळी दिसते. त्या ऍपने मला सांगितले की हे बंधू म्हणजे शिवरायांच्या काळातला प्रकाश आहे! म्हणजे आता माझ्या डोळ्यात पोहोचलेले किरण तिथून निघाले तेव्हा इथे शिवरायांचा काळ होता. मी नकळत नमस्कार केला.
आकाशदर्शन खूप खूप अंतर्मुख करते
उन्हाळ्यात तर छंदच लागला होता.
>> फक्त गणिती सूत्र
>> फक्त गणिती सूत्र जुळवण्यासाठी आपण मास मुळे स्पेस curve होते हे स्वीकारले आहे का?
फॉर्म्युलाच असा बनवायचा की काहीतरी करून curve आलाच पाहिजे
(??) असे का? नाही नाही. असे नाही. असे Manipulation केले जात नाही. (केले असते तर ते वैज्ञानिकांनी स्विकारलेही नसते)
तर निरीक्षणे आणि आधी मांडलेल्या थियरीचा अभ्यास करून नवीन थियरी बनवली जाते. त्यामध्ये
existing theory+observations+intuition = new theory
असे काहीसे आपण म्हणू शकतो. त्यानुसार अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी बुध या ताऱ्याच्या कक्षेचा निरीक्षण करून नीट अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की तो न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम तंतोतंत पाळत नाही. अन्यथा त्याची कक्षा वर्तुळाकार झाली असती. पण इथे तर ती थोडी elliptical आहे. तसेच १९१९ साली जे सूर्यग्रहण झाले तेंव्हा जिथे गुरुत्वाकर्षण जास्त आहे तिथे प्रकाशकिरण थोडे वक्र झालेले दिसले. या सर्वांवरून त्यांनी न्यूटनच्या थियरीमध्ये सुधारणा घडवून आणत नवीन थियरी मांडली जी या निरीक्षणांना सपोर्ट करत असेल.
बर इतकेच नाही तर नवीन थियरी नुसार इतरही निरीक्षणे जुळायला हवीत. (नाहीतर ते सगळे जुळते आणि दुसरीकडे मात्र भलतेच अर्थ निघत आहेत
असे व्हायला नको)
तर या सगळ्यातून तावून सुलाखून ती थियरी निघते म्हणून तर आपण अजुनही त्यावर चर्चा करत आहोत
नाहीतर तशा बऱ्याच थियरीज येऊन जातात व गेल्यातसुद्धा.
>> या फुल पोकळित बिंग बॅंग एक
>> या फुल पोकळित बिंग बॅंग एक डॉट इतका मॅटर आहे. काय मॅटर झाला मधला मॅटर नाहि.
मी कल्पना केली केली की आइन्स्टाइनला फोन आला, "ए अलबर्ट भाऊ, जरा येतो का इकडे? एक म्याटर झालाय राव"
तर त्याची काय reaction असेल? "Oh from your voice, I think it's dark matter"
बाय द वे विश्वामध्ये बहुतांश निर्वात पोकळीच आहे याची पुष्टी करणारे एक खूप छान वाक्य परवा एका व्हिडीओमध्ये ऐकले,
आणि यानंतरचे वाक्य होते
"जर आपण अवकाशयान घेऊन कोणत्याही एका दिशेने अगदी सरळ सरळ जायला सुरवात केली, तर कोणत्याही खगोलाला न धडकता आपण विश्वाच्या सरहद्दीपर्यंत (माहीत असलेल्या. म्हणजे ४७ बिलियन्स प्रकाशवर्षे) जाण्याची प्रॉबॅबिलिटी १०० टक्के आहे"
"Our universe is suppper empty"
असे काही वाचले ऐकले की मोठी मौज वाटते
फिजिसिस्ट् बार्बी!
नाऊ शोइंंग फिजिसिस्ट् बार्बी!
बाय द वे विश्वामध्ये बहुतांश
बाय द वे विश्वामध्ये बहुतांश निर्वात पोकळीच आहे >>> बहुतांश म्हणजे स्मजलं. पण त्या पलिकडे पोकळीच आहे. याची कल्पना केली कि नैराश्य येतं. एखादं भयानक वेगाने जाणारं यान घेऊन गेलं तरी ही पोकळी संपणारी नाही. रिक्षाचालक म्हणिंग राईट.
खूप खूप आकडे असतात म्हणजे ३
खूप खूप मोठे आकडे असतात म्हणजे ३ वर १२० शून्य.
ही अशी विशाल मोज माप निघतात.
दृश्य विश्वाचा आकार च अंदाज करायला गेलो की.
आणि ह्या सर्व मोठ्या संख्या locked संख्या आहेत.
आपल्याकडे
शून्य आहेत म्हणून किती ही वाढवा त्याला काही अर्थ नाही.
प्रकाश वर्ष हे परिमाण वापरले तरी असेच मोठे आकडे येतात.
या ज्ञानाचा उपयोग करून
या ज्ञानाचा उपयोग करून पुण्यातली वाहतूक कोंडी कशी दूर करायची ते सांगा.
आपल्या आकाशगंगेत एकूण किती
आपल्या आकाशगंगेत एकूण किती तारे असावेत? काही अंदाज? २०बिलिअन? ६०० बिलिअन? हे जाणकार लोकांचे अंदाज आहेत.
थोडक्यात कोणालाही निश्चित माहित नाही. 20 बिलिअन खूप कमी आहे आणि 600 बिलिअन होण्याची शक्यता आहे - जरी नक्कीच नाही - खूप जास्त आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्सचे खगोलशास्त्रज्ञ मार्टिन वेनबर्ग यांच्या मते, आकाशगंगेमध्ये कदाचित २०० अब्ज तारे आहेत, जरी ती संख्या “२ किंवा ३ च्या घटकाने मोठी किंवा लहान असू शकते.”
तुम्हाला काय वाटतंय?
आम्हाला काही वाटत नाही.इथे
आम्हाला काही वाटत नाही.इथे लाख रुपये 1 रुपयाच्या कॉइन मध्ये दिले तर ते मोजायला पण कागद पेन बरोबर घ्यावा लागेल आणि पूर्ण दिवस जाईल.
आकाशात असणारे 200 अब्ज तारे ह्या विषयी काय अंदाज करणार.
200 अब्ज लीहाता पण येत नाही मला.
2 वर किती शून्य म्हणजे 200 अब्ज.
हे पहिले कोणी तरी सांगा
Google न वापरता
When you are 31 years, 7
When you are 31 years, 7 months, 9 hours, 4 minutes, and 20 seconds old, you’ve lived your billionth second.
हे दोन अंक इंटरनेटवर सहज
हे दोन अंक इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत आणि त्यांच्याबाबत बरीच एकवाक्यता आहे:
Total atoms in the Universe: 10^80 atoms
Radius of the Universe: 4.4×10^26 meters
दोन्हीवरून साधे गणित केले तर लक्षात येते की हे सगळे (वस्तुमान) इतके विरळ आहे कि विश्वातील प्रत्येक चार घनमीटर जागेत एक अणू बसू शकेल. सर्व पोकळीच, बहुतेक सगळे शून्य
आणि हि पोकळी अजून वाढतच आहे (वैश्विक प्रसरणामुळे). म्हणजे साबणाचा एका थेंबापासून कोणीतरी (चौथ्या/पाचव्या मितीत असलेल्याने?) फुगा बनवून हळूहळू त्यात हवा भरून तो फुगवावा तसा प्रकार आहे.
अशा रीतीने आपण फिजिक्स मधून अध्यात्मात जातो. मग पुण्याचे ट्रॅफिक आणि आयुष्यातल्या बाकी समस्यांचे फार काही वाटत नाही

Total atoms in the Universe:
Total atoms in the Universe: 10^80 atoms
Radius of the Universe: 4.4×10^26 meters
>>>> हे दोन्ही कसं शोधून काढलं शास्त्रज्ञांनी?
शनीचे आणखी 65 उपग्रह सापडले.
शनीचे आणखी 65 उपग्रह सापडले. शनीच्या एकूण चंद्राची संख्या 145 झाली.
माझा प्रश्न.
त्याच्या पहिल्या चंद्राचे नाव टायटन, त्यानंतर लॅपेटस'चा शोध लावला. नंतर 'रिया', 'डायोनी' आणि अखेर इ.स.1684 मध्ये 'टेथीस' नावाच्या उपग्रहाचा शोध लागला.
तर या चंद्राची नावे अशी आहेत हे कसं कळतं?
शनी च्या अवकाशात वेगवेगळ्या
शनी च्या अवकाशात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे चंद्र वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असतील
त्याचे निरीक्षण करून ..
हा Titan, हा अमका, हा तमका असे ओळखत असतील.
Hemant 333
Hemant 333
Hemant 333 हे तुमचे नाव आहे हे मला कसे कळले?
माहित नसेल तर सरळ विचारायचे, " Hemant 333, तुम्हारा नाम क्या है,?
ऍनिमल कम्युनिकेटर्स प्रमाणेच
ऍनिमल कम्युनिकेटर्स प्रमाणेच उपग्रह कम्युनिकेटर्स असतात.
एखादा उपग्रह सापडला की लगेच उपग्रह कम्युनिकेटरला त्याचा फोटो पाठवतात. मग कम्युनिकेटर उपग्रहाशी बोलून त्याचे नाव, वय, वजन विचारून घेतो आणि ती माहिती शास्त्रज्ञाला पुरवतो. उपग्रह सर्व प्रश्नांची उत्तरे देतात पण आपल्या भावंडांबद्दल काहीच माहिती देत नाहीत.
मुका असेल तर?
मुका असेल तर?
>> हे दोन्ही कसं शोधून काढलं
>> हे दोन्ही कसं शोधून काढलं शास्त्रज्ञांनी?
मॉडेल्स वरून.
Observations + Statistics वरून possible models बनवतात. त्यावरून estimations काढतात.
दीर्घिका (galaxies) एकमेकांपासून किती वेगाने (doppler effect) व कोणत्या दिशांनी जातात हे पाहून त्या एकत्र असू शकतील तो काळ कधीचा असेल ते काढतात. म्हणजे BigBang time. म्हणजे त्या काळातले किरण (EM waves) आजवर किती अंतरावर गेले असतील, तो observable universe चा radius (१३.८ बिलियन्स प्रकाशवर्षं असा काहीतरी आहे तो). त्यावरून observable universe चा volume मिळेल.
आणि ज्या वेगात स्वतःभोवती दीर्घिका फिरत आहेत ते पाहता त्यात किती वस्तुमान असायला हवे आणि प्रत्यक्षात किती आहे त्यावरून त्यात dark matter आणि visible matter चे प्रमाण किती आहे ते काढले. ते फक्त ५% visible matter येतं. (५ टक्क्यात कसं परवडंल सांगा बघू
)
आणि मग फक्त ५% visible matter दीर्घिकेत. तर मग एकूण दीर्घिका किती असतील? आणि त्यानुसार एकूण observable universe मध्ये किती वस्तुमान याचे एस्टिमेट केले.
ह्यांच्या कुटुंबात एक च
ह्यांच्या कुटुंबात एक च स्त्री आहे ती म्हणजे पृथ्वी म्हणून पृथ्वी ला खूप मूलबाळ आहेत.
बाकी सर्व पुरुष च आहेत.
तो सूर्य,तो बुध इत्यादी इत्यादी.
ती पृथ्वी फक्त एकच.
हा माझा शोध आहे.
लॉजिक आणि शोध दोन्ही बरोबर आहे ना
अतुल, हे इतकं सोपं आहे कि
अतुल, हे इतकं सोपं आहे कि मूडच गेला.
जरा अवघड असेल तर इंटरेस्ट येतो.
मी कार्यालयाकडे निघालो. माझ्या गाडीचे वस्तुमान 1.3 KN आहे. आकारमान. 8 m * 2m इतके असून रस्त्याची रूंदी 15 ft व लांबी 900 M आहे. या रस्त्यावर आता सरासरी 20 sq M ची दोनशे वाहने उभी आहेत. पुढच्या हायवेला 15 मिनिट जाम लागला आहे.
तर 26 किमी वरील कार्यालयात मी किती वेळात पोहोचेन?
धन्यवाद अतुल. आचार्य
धन्यवाद अतुल.
आचार्य
शोले मध्ये जय हा मौसीकडे
शोले मध्ये जय हा मौसीकडे बसंतीसाठी बीरूच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो, आणि मौसी ला बिरु किती चांगला टप्प्याटप्याने सांगताना दुसरी बाजू पण सांगून जातो
तसे मी फक्त किती सोपे आहे हे सांगून सुरवात केली
बाकी पुढे बरेच आहे.
Pages