क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्फराज आणि त्याचे बाबा ज्याप्रमाणे इंडिया टीममध्ये सिलेक्षन व्हावं याची अधाशीपणे वाट बघताहेत ते बघून मजा येते. Lol मी bcci मध्ये असतो तर सर्फ्याचा फोटो इंस्टा वर टाकला असता आणि लिहिलं असतं जो दहा वीस किलो वजन कमी नाय करू शकत तो काय पाच पन्नास धावा करेल. तशीही त्याची सुमार बॅटिंग आयपीलमध्येही दिसले.

बाकी आगरकर निवड समिती अध्यक्ष होण्याचं आश्चर्य वाटलं नाही. मागच्या खेपेला बरेचदा नाव कांसिडर होऊनही त्याच्या ऐवजी चेतन शर्मा ची वर्णी लागली होती.

त्याचे इश्यूज सॉर्ट आऊट होऊन त्याने इंडियन टीममधे यावं आणि घवघवीत यश मिळवावं ह्यासाठी त्याला भरभरून शुभेच्छा! >>>

होपफुली तो सूर्या च्या केस कडून काही टिप्स घेईल.

३७१ चं टारगेट आहे इंग्लंडसमोर. लायन नसला तरी इंग्लंड सहजासहजी चेस करू शकतील असं वाटत नाहीये. चुरशीची होईल चौथी इनिंग.

वेस्ट इंडीज वर्ल्डकपमधून बाहेर!!
>>
झिम्बाब्वे, विंडीज अन् लंका पैकी दोनच टीम येणार हे कळल्यावरच वाईट वाटलं होतं..

विंडीज गेले पण बाकी दोन्ही टीम सध्या तरी टॉप ला आहेत. टेबल टॉपर सोबत भारताची मॅच बंगलोर ला आहे. झिम्बाब्वे पेक्षा मी श्रीलंका सोबतचा सामना बघणं प्रेफर करीन... (तिकिटं मिळाली पाहिजेत फक्त)

राच्याकने, आपल्या टीम ला ड्रीम इलेवन रूपानी नवीन स्पॉन्सर मिळाला. बुडीत खाती जाणाऱ्या बैजू ला बीसीसीआय नी सोडलं.

एम्पीएल / किलर जाऊन अदीदास आल्यावर झालेला आनंद या डील नंतर खलास.

वेस्ट इंडीज वर्ल्डकपमधून बाहेर!! >> एकंडर जेव्हढे गलथान खेळले आहेत ते, ते बघून बाहेरगेले ह्यात आश्चर्य वाटले नाही. किती वर्ष तेच तेच ईश्यू घेऊन दळणार आहेत ?

बाकी आगरकर निवड समिती अध्यक्ष होण्याचं आश्चर्य वाटलं नाही. >> पैसे वाढवून दिले आहेत त्यामूळे आगरकर ने दिल्ली सोडली.

होपफुली तो सूर्या च्या केस कडून काही टिप्स घेईल. >> जी कुजबुज सर्फराजबद्दल येते तीच आधी सूर्याबद्दल येत होती. आयपील मधे मुंबई कडून खेळणे , रोहित च्या नजरेत येणे ह्याचा त्याला फायदा झाला. सर्फराज्बाबत ती शक्यता शून्य आहे. रोहित रणजी खेळायला जाणार नाही नि सर्फराज आयपील मधे दणकून खेळणार नाही ( त्याचा एकंडर खेळ टेस्ट साठी परफेक्ट आहे. आयपील च्या नाडी लागला कि बोंबलले सगळे)

स्टार्क ने पोपला काढलेला बॉल काय जबरदस्त होता पण त्याच बरोबर पोप अ‍ॅक्रॉस द लाईन मारायला गेला होता (बाझबॉल मूळे का ? )

“स्टार्क ने पोपला काढलेला बॉल काय जबरदस्त होता” - स्टार्कचा तो पूर्ण स्पेलच जबरदस्त होता. प्रत्येक बॉलला विकेट जाईल असं वाटत होतं.

क्वालिफाईंग राऊंड मी विंडीज राहते की जाते यासाठीच फॉलो करत होतो.
पण बाहेर गेल्यावर दुख झाले तेव्हा लक्षात आले की ते दुख विंडीजच्या माजी खेळाडूंसाठी होत आहे. आताच्या संघातल्या कोणाबद्दलच फारसे वाईट वाटले नाही.

अ‍ॅलेक्स कॅरीने स्टोक्समधल्या दैत्याला जागं केलंय. फक्त अजून ७०+ रन्स करण्याइतपत हे टिकेल का हे बघायचंय. either way, it's a thriller!!

ऑस्ट्रेलिया जिंकणार आहेत पण मला चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे बॉलिंग टॅक्टिक काही पचले नाहीयेत.

हॅज बॉलिंग फुल अँड स्ट्रेट अँड अटॅकिंग स्टंप्स टू टेलएन्डर्स गॉन आऊट ऑफ फॅशन ?

हॅज बॉलिंग फुल अँड स्ट्रेट अँड अटॅकिंग स्टंप्स टू टेलएन्डर्स गॉन आऊट ऑफ फॅशन ? >> मला ते टीट फॉर टॅट्स टाईप वाटले. लॉयन ला शॉर्ट बॉल बॅराज टाकताना पाहिली तेंव्हाच लक्षात आलेले हे. आपणही अशीच शॉर्ट बॉलिंङ करतो बुमरा आल्यापासून. बाकी स्टोक्स ला गरज नसताना शॉर्ट एंड्ला किती वेळ शॉर्ट बॉलिंङ केली ती डोक्यावरून गेली माझ्या. मॅच जवळजवळ घालवलेलीच तिथे. ज्या क्षणी टॅक्टिक्स बदलून धावा थांबवल्या नि लाँग साईडला मारायला फोर्स केले विकेट गेली.

बाकी इंग्लंड ने बेअरस्ट्रो विकेट बद्दल बोलू नये हे उत्तम. पोप ने गेल्या वर्षी ग्राअंड होम ला रन आउट केले होते तेही ह्याच धर्तीचे होते. बेअरस्ट्रो ढिसाळपणे वागला. कॅरी चा थ्रो रिफ्लेक्स होता हे सरळ सरळ दिसत होते. स्पिन बॉलर असताना मॉक स्टंपिंग करतात तसाच प्रकार होता.

फूटबॉल सारखेच क्रिकेट मधे व्हेन कॅच इस अ कॅच अँड कंट्रोल ऑफ बॉडी म्हणजे काय हे परत रीडीफाईन करायची गरज आली आहे.

इंग्लंड नी टॉस जिंकून बोलिंग घेतली तेंव्हा जरा ऑड वाटलं, म्हटलं की परत चौथ्या इनिंग मधे बॅटिंग करायची काय हौस...

पण बॉलर्स नी अजून तरी कांडिशन्स चा योग्य फायदा उचलला आहे. ऑसीज लंच ला ९१/४

मिचेल मार्श ने तुफान फटकेबाजी करून इनिंग चा रोख पालटवला आहे.

अर्थात इंग्लंड ने अति ढिसाळ फिल्डिंग करून ऑस्ट्रेलिया ला गेम मध्ये ठेवले. बेअरस्टो अगेन हॅंड अ व्हेरी सबपार डे विथ द ग्लोव्हस.

वूड ने काय खतरनाक बॉलिंङ टाकलीये राव. स्टार्क असाच चालला तर धमाल येईल आज. वूड ला एव्हढ्या उशिरा का खेळवलय इंग्लंडने देव जाणे !

इंग्लंड ने अति ढिसाळ फिल्डिंग >> एकदम पथेटिक होती. मार्श ने फूल फायदा उठवला त्याचा.

वूड ला एव्हढ्या उशिरा का खेळवलय इंग्लंडने देव जाणे ! >>>

फिटनेस. वूड खूप इंज्युरी प्रोन असल्याने इंग्लंड त्याला 2-3 कसोटी सामने बॅक टू बॅक खेळवत नाही.

आज धोनीचा वाढदिवस...
शेवटच्या षटकात 8-10 धावा करणेही अवघड आहे हे 90च्या दशकातील क्रिकेट बघितलेल्या पिढीला चांगलेच माहीत आहे कारण भारतानेही असे सामने काही धावांनी जिंकलेत, अश्या वेळी धोनीचा हा किस्सा जबरदस्त वाटतो
धोनीने एकदा पत्रकार सुनंदन लेलेना गप्पा मारताना सांगितले होते की शेवटच्या षटकात तो 18 धावा काढू शकतो, त्यासाठी पहिल्या 2 चेंडूत किमान 1 खणखणीत षटकार मारता यायला हवा, आणि काही दिवसातच धोनीने श्रीलंकेसोबत शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना 4 चेंडूत 16 धावा काढून सामना जिंकला आणि ते सिद्ध केलं.

2011 चा शेवटचा षटकार विसरणे तर शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माही.

- फ्रेंड फेसबूक भिंत

ऑसीज नी विकेट्स काढल्या नी बाझाबॉल बासनात ठेऊन इंग्लंड ला क्लासिक अप्रोच घ्यायला लागला आहे.

स्टोक्स आहे तोवर आशा आहे. नाहीतर आत्ता १४२/७ परिस्थिती आहे...

परत एकदा ऑस्ट्रेलिया चे टेल एन्डर्स समोर नॉन सेन्स टॅक्टिक.

अशीच प्रेडिक्टेबल शॉर्ट पीच बॉलिंग करत राहिले तर इंग्लंड लीड हि घेऊन जाईल.

इंग्लंड २१२/९.
एकटा स्टोक्स खेळतो आहे! कमिन्स ८४ मधे ६। शून्यात बद झाला त्याचा बदला!

ब्रॉड VS वॉर्नर - 17 वेळा आऊट.

ऍशेस मालिके च्या अखेरीपर्यंत ब्रॉड ने एका फलंदाजाला बकरा बनवायचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला तर नवल वाटणार नाही.

सध्याचा रेकॉर्ड - मॅकग्रा VS अथरटन - 19 वेळा आऊट

बाझाबॉल बासनात ठेऊन इंग्लंड ला क्लासिक अप्रोच घ्यायला लागला आहे. >> लवकर लक्षात आले त्यांछ्या कि ऑसीज सारख्या तगड्या संघाविरुद्ध खेळताना कमी वेळात जास्त धावा काढणे म्हणाजे ऑसीज ना जिंकण्याची संधी अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे. ऑसीज अ‍ॅप्रोच जमलाय एकदम - आम्हाला हवे तसे खेळणार, तुम्ही बाझबॉल खेळा किंवा क्लासिक .

एका फलंदाजाला बकरा बनवायचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला तर नवल वाटणार नाही. >> कमिन्स वि रूट पण त्याला चेस करतोय.

सध्याचा रेकॉर्ड - मॅकग्रा VS अथरटन - 19 वेळा आऊट
>>
पण हे रेकॉर्ड फक्त 17 टेस्ट मधे झालं आहे...

बाकी आज फक्त दुसराच दिवस आहे या टेस्ट चा. अजून 10 ओव्हर बाकी आहेत, आणि तिसऱ्या डावातल्या जवळ जवळ निम्म्या विकेट निघाल्या आहेत. पण ट्रॅक टर्निंग नसल्यामुळे कुणाला पीच बद्दल काहीही तक्रार असायचा संबंध नाही...

Pages