प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा

Submitted by प्रथमेश काटे on 22 June, 2023 - 06:53

Part 1

( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )

१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.

५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला‌. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली‌.

प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.

लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.

दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.

क्रमशः
प्रथमेश काटे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याची दोन तीन गाणीच उल्लेख करण्याच्या लायकीची होती त्याला लोक तरी काय करणार.
त्यामुळेच दर्जा कायम उच्च राहिला> Biggrin

हि माझी माहिती -
सज्जाद ने किशोर ला शोर कुमार म्हटले होते.
नौशाद ने 90s मध्ये गुड्डू म्हणुन एक शेवटाचा चित्रपट केला, (शाहरुख खान होता, बरीच बेकार गाणी होती) तेव्हा त्याने कुमार सानू चा आवाज वापरला. तेव्हा वाचलेले की ज्या नौशाद ने OG किशोर कुमार च्या आवाजाला - इस सडक se us पार आवाज dene लायक - असे म्हटलेले त्याच नौशाद la आज किशोर ची नक्कल करणार्‍या कुमार सानु la वापरायची वेळ आली.
नक्की काय कधी कोणी म्हटलेले जाणून घ्यायला आवडेल.

आणि ह्याला बहुतांशी त्याचे संगीतेतर वागणंच कारणीभूत आहे - हे दुर्दैवी आहे असं मला म्हणायचं होतं. >> +१ त्याची लतासाठी असलेली गाणी ऐकल्यावर ह्या मनुष्याने धुमाकूळ घालाय्ला हवा होता हि पहिली रिअ‍ॅक्शन येते.

“सज्जाद हुसैन, गुलाम महमूद, रामलाल यांची फारशी माहिती नाही. ” - गुलाम महंमद म्हटलं कि पटकन पाकिझा ची च गाणी आठवतात.

रामलाल, सेहरा. (. पंख होते तो उड आती रे फेम)
गीत गाया पत्थरों ने
आणखीही असतील
उत्तम सनई वादक. वादक म्हणूनच चित्रपट सृष्टीत प्रवेश. नंतर पुढे संगीत दिग्दर्शक
काहे कोयल शोर मचाए रे मध्ये त्यांचे वादन आहे.

पंख होते तो उड आती रे..
>>
हे गाणे ऐकण्यात माझे अख्खे बालपण गेले आहे.. टेप रेकॉर्डर च्या जमान्यात रोज रात्री झोपताना दिवे मालवले गेले की आमच्याकडच्या काकामामांना हे गाणे ऐकायची हुक्की यायची..

मिर्जा गालिबसाठी गुलाम मोहम्मदना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ते नौशादचे सहाय्यक म्हणूनही काम करीत. स्वतंत्र संगीतही अगदी १९५० पासून देत होते.

रघू आचार्य, वरच्या लिंक्ससाठी धन्यवाद. काल ऐकायला सुरुवात केली. तुम्ही प्रति मिनिट किती शब्द बोलता यावर बिदागी ठरल्यासारखे बोलणार्‍या एफेम रेडियोच्या आरजेंची आता सवय झाली आहे. विविधभारतीवरचे जुने आणि जुन्या पठडीतले बहुतेक निवेदक निवृत्त झाले आहेत, त्यामुळे तेही ऐकणं कमी झालं आहे. त्यामुळे हे संगीत के सितारे ऐकताना प्रत्येक शब्द तोलून मापून निवडलेला, स्पष्ट उच्चारत केलेलं निवेदन याची सवय सुटली होती. आज पूर्ण ऐकेन.

>>गुलाम महंमद म्हटलं कि पटकन पाकिझा ची च गाणी आठवतात.<<
घुलाम मोहम्मदने मिर्झा घालिबची काहि गझल संगित देउन अजरामर केली आहेत. उदा: नुक्त चिन है घम-ए-दिल (सुरैया), आह को चाहिये एक उमर (सुरैया), येह न थी हमारी किस्मत (सुरैया), आणि दिल-ए-नादान तुझे (तलत+सुरैया).

रामलाल (चौधरी) च्या गाण्यांच्या यादीत थोडी भर - वर "पंख होती तो.." (मालकौंस) चा उल्लेख आलेला आहेच, त्याबरोबर "तुम तो प्यार हो.." (मारु बिहाग), आणि "तकदिर का फसाना.." (देस) यांची नोंद घ्यायलाच हवी..

एकाहुन एक सरस रत्न आहेत...

धन्यवाद भरत.

लताचा उल्लेख झाला आणि चितळकर मास्तरांना विसरले असे कसे झाले ? चितळकर लता ही जोडी एकत्र असताना मास्तर सुद्धा टॉपला होते. एका साऊंड रेकॉर्डिस्ट साठी मास्तरांनी लताशी पंगा घेतला आणि त्यांचा आलेख खाली आला.

लता मदन मोहन ही उत्कृष्ट जोडी होती.

सलील चौधरी, खेमचंद प्रकाश वर कुणीतरी लिहा.

ते एक सर दिसले नाहीत एव्हढे प्रतिसाद होऊनही. कुणाला माहिती असेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मायबोलीतली शाई संपलीय का बघा प्लीज.

तरुणपणीचा लताचा आवाज म्हणजे सोन्याची
बारीक , लवचिक तार
>>>

उगीचच माझं अवांतर…..

मला त्यांचा आवाज काचेची लवचिक तार वाटते… खणखणीत आणि गोलावा असलेली, बांगडीसारखा कुठलाही रंग आत्मसात करणारी

“ रामलाल (चौधरी) च्या गाण्यांच्या यादीत थोडी भर - वर "पंख होती तो.." (मालकौंस) चा उल्लेख आलेला आहेच, त्याबरोबर "तुम तो प्यार हो.." (मारु बिहाग), आणि "तकदिर का फसाना.." (देस) यांची नोंद घ्यायलाच हवी..” - वाह! रामलाल ची छोटीशी कारकीर्द, पण मस्त गाणी.

“ लताचा उल्लेख झाला आणि चितळकर मास्तरांना विसरले असे कसे झाले ?” - नंतरच्या काळात दोन्ही बहिणींनी कितीही अनुल्लेख केला तरिही सी. रामचन्द्र शिवाय लता आणि ओ पी नय्यर शिवाय आशा ह्या दोन कारकीर्दी पूर्ण होऊच शकत नाहीत.

सगळे इतकं छान भरभरून लिहीत आहेत पण मूळ लेखक कुठे
आहेत? >> मीही आहेच ; पण माझ्या लेखनाविषयी कुणीच काही म्हणत नाहीये. तर काय बोलणार ? अर्थात हे सर्व गायक, गीतकार, संगीतकार महान होतेच. त्यांच्या बद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल चर्चा होतेय ही चांगली गोष्ट आहे ; पण मी लिहिलेल्या लेखाबद्दल काय ?

@सामना - नाही पुढचा भाग लवकरच ; पण हा कथा कादंबरी लेखनाचा विभाग आहे, पुढील भाग योग्य मायबोली च्या योग्य विभागात पोस्ट करेन.

माझ्या लेखनाविषयी कुणीच काही म्हणत नाहीये
>>>
पुन्हा एकदा बघा, पहिली अख्खी दोन पानं तुमच्याच लेखनाबद्दल होती की.

@सामना - नाही पुढचा भाग लवकरच ; पण हा कथा कादंबरी लेखनाचा विभाग आहे, पुढील भाग योग्य मायबोली च्या योग्य विभागात पोस्ट करेन.

Submitted by प्रथमेश काटे on 25 June, 2023 - 07:49 >>> काहीच्म कळलं नाही. माझा प्रश्न खालीलप्रमाणे होता.

फेसबुक वर सिनेमा गली ग्रुप मधे हाच लेख आहे. ते आणि हे एकच का ?

@सामना - होय मीच 'सिनेमा गल्ली' या फेसबुक ग्रुपवर माझाच लेख आहे.

@साजिरा - दोन पानं माझ्या लेखनाविषयी असतील ; पण त्यात Genuine मत मांडणारे किती आणि निरर्थक चुका काढणारे ( इथे ' निरर्थक ' हा शब्द महत्वाचा.) किती ?

मंडळी दमाने... रॅगिंग इतके नको कि नवीन लेखक घाबरून पळून नको जायला... सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच कापायला निघालात....

प्रथमेश- इग्नोरास्त्र वापरा.. नाहीतर अवघड आहे...

च्रप्स म्हणताहेत की रॅगिंग हळू हळू करा म्हणजे दीर्घकाल करता येईल.

असो. सज्जादचं सरगम के साथी सलग आणि संपूर्ण ऐकलं. ही गाणी सुटी सुटी , येताजाता ऐकताना जाणवल्या नाहीत अशा काही गोष्टी काल जाणवल्या. पहिलं अनपेक्षितपणा. प्रत्येक गाण्यात काही काही जागा अशा आहेत की ज्या नेहमीच्या वाटत नाहीत. मी सामान्य श्रोता आहे, जाणकार नाही म्हणून हे खात्रीने लिहिता येत नाही. काही गाण्यात प्रत्येक कडवंही किंचित वेगवेगळं बांधलेलं वाटलं. इन्ट्रो आणि इंटरल्युड म्युझिकमध्ये वाद्यांची गर्दी नाही. प्रत्येक वाद्याचं स्वतंत्र अस्तित्व लक्षात येतं आणि ते संगीतही गाण्याच्या चालीइतकंच ध्यान खिळवून ठेवणारं आहे. साक्षात मदन मोहनला ये हवा ये रात ये चाँदनी ची भूल पडली. रुस्तम सोहराबमधल्या ऐ दिलरुबा मध्ये लताचा आवाजही एखाद्या वाद्यासारखा घेतलाय. त्यातल्याच फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम वरून होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा आठवलं. दोघांची सिच्युएशन सारखी आहे. पण भाव बरेच वेगळे. नूरजहाँचं बदनाम मोहब्बत कौन करे , सुरैयाचं ये कैसी अजब दास्तां हो गयी है, ही गाणी तर आधीच मनावर ठसलेली होती.
तिथेच विविधभारती साठी घेतलेली त्यांची एक मुलाखत मिळाली. मुलाखत विविधभारतीच्या लौकिकाला साजेशी नाही. कोणी प्रोड्युसर बाई स्वतःच बसल्यात. त्यांनी मेंडिलिन हेच वाद्य का निवडलं ते आवर्जून ऐकण्यासारखं आहे. त्यांचा स्वतःच्या कामाबद्दलचा आत्मविश्वास आणि अभिमान सार्थ आहे.
सुरुवातीला लताचं त्यांच्याबद्दलचं बोलणं जोडलं गेलं आहे.

शक्य झाल्यास कुणी तरी वेगळा धागा काढावा. जमल्यास सर्वांनी क्रमवार तिकडे प्रतिसाद हलवावेत, किंवा एकानेच हे काम केले तरी चालेल. ज्याच्या धाग्याला चांगला प्रतिसाद मिळेल त्यानेच शिवधनुष्य उचललेलं बरं.

इथेच लिहायचे असेल तरी काही अडचण नाही.

सज्जाद, गुलाम मोहम्मद आणि हृदयनाथ मंगेशकर हे संगीतकार साज (वाद्य) वापरताना अशा तर्‍हेने वापरत कि गाण्याच्या चालीवर, शब्दांवर वाद्यमेळा शिरजोर होणार नाही. गाण्याचा अर्थ अचूक पोहोचला जाईल. रामलाल चौधरींनी ते पाळलेले दिसत नाही. पण कानाला छान वाटतात त्यांची गाणी. गुंज उठी शहनाई या चित्रपटात बिस्मिल्ला खां आणि रामलाल दोघांनीही शहनाई वाजवली आहे. पण रामलाल यांचे नाव त्यात आलेच नाही. त्या वेळी रामलाल यांची मनःस्थितीही बरी नव्हती. त्यांना ही गोष्ट इतकी लागली कि चित्रपटससृष्टीपासून ते दूर झाले. एक चांगला संगीतकार चित्रपट सृष्टीने गमावला.

खेमचंद प्रकाश यांच्याबद्दल पुढे..

“ खेमचंद प्रकाश यांच्याबद्दल पुढे” - वेगळ्या धाटणीचं संगीत देणार्यांच्या यादीत रोशन आणि खय्याम ही दोन नावं अ‍ॅड करून ठेवतो. म्हणजे त्यावर नंतर लिहीता येईल. अर्थात अजून त्यांच्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ आहे.

Pages