Part 1
( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )
१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.
५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली.
प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.
लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.
दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.
क्रमशः
प्रथमेश काटे
वेगळा धागा काढा रे. इथे
वेगळा धागा काढा रे. इथे अवांतर होतं आहे हे.
>>साक्षात मदन मोहनला ये हवा
>>साक्षात मदन मोहनला ये हवा ये रात ये चाँदनी ची भूल पडली. ...<<
या वाक्याचा रोख "तुझे क्या सुनाउ मै दिलरुबा.." या रफिच्या गाण्यावर असेल तर वरची दोन्हि गाणी दरबारी कानडात बांधली आहेत. त्यातलं साम्य साहजिक आहे..
मी तरी मदन मोहन यांच्या पारड्यात माझं मत टाकेन. अनिल गुरव आणि तेंडल्यात जो फरक (करकिर्दीतला, टॅलंटमधला नव्हे) आहे तोच सज्जाद हुसेन आणि मदन मोहन यांच्यात आहे...
खेमचंद प्रकाश आणि रोशन या दोन
खेमचंद प्रकाश आणि रोशन या दोन नावांचा धागा धरून लिहितो.
खेमचंद प्रकाश म्हटल्यावर आठवतं महलमधलं आएगा आनेवाला. या गाण्याने लताला शब्दशः नाव मिळवून दिलं , हे अनेकांना माहीत असेल. तोवर रेकॉर्डवर गायकांची नव्हे तर ते गाणं ज्या पात्राच्या तोंडी असे त्या पात्राचं नाव दिलं जाई. रेडियोवरही हेच नाव सांगितलं जाई. पण गाणं ऐकल्यावर गायिकेचं नाव विचारणार्या पत्रांचा पूर आला . या चित्रपटात आणखी एक गायिका आहे. राजकुमारी - घबराके जो हम सर को टकराए तो अच्छा हो - ही गझल तिने गायली. हे गीत पहिल्यांदा कधी मनावर ठसलं ते माझ्या चांगलं लक्षात आहे. १९८२ साली नूरजहाँ भारतात आली होती. ते निमित्त साधून मॉर्टल मेन इमॉर्टल मेलडीज हा कार्यक्रम आयोजित केला गेला. दूरदर्शनवर एका रविवारी सकाळी तो कदाचित लाइव्ह दाखवला गेला. त्यात राजकुमारीने हे गाणं म्हटलं. त्या आधी महल टीव्हीवर पाहिला असेल. पण यावेळी पाहिलेलं लक्षात राहिलं आणि राजकुमारी हे नावही. इथे तिसाव्या मिनिटा पासून ते गाणं पाहता येईल. चित्रपटातलं मूळ गाणं ऐकून बाईंचा आवाज आणि गायकी तसेच आहेत हे बघता येईल. महल १९४९ चा. बरसात आणि अंदाज (दिलीपकुमारला मुकेश आणि राज कपूरला रफीचा आवाज असलेला) सुद्धा.
१९५० साली आला बांवरे नैन. संगीत रोशन. सगळ्यात गाजलं सहनायिकेवर चित्रित झालेलं खयालों में किसीके इस तरह आया नही करते हे गीता - मुकेशचचं गाण. पण यात नायिका गीता बालीची गाणी राजकुमारीने म्हटलीत. सुन बैरी बलम सच बोल रे इब क्या होगा , मुझे सच सच बता दो ही गाणी आता आतापर्यंत विविधभारतीवर नेमाने वाजत. इथे वानगी म्हणून मेरे रूठे हुए बलमा
रोशनचं हे संगीत ताजमहल, बरसात की रात इ. पेक्षा किती वेगळं आहे!
---
राजकुमारीचा आवाज त्यानंतर खूप वर्षांनी आलेल्या पाकिजामध्येही आहे.
मस्त चर्चा सुरू आहे इथे.
मस्त चर्चा सुरू आहे इथे. आत्ता वरवर चाळली आहे, नीट वाचायला हवी.
भरत यांनी दिलेल्या लिंका कधी ऐकते असं झालं आता.
शेवटच्या पोस्टमध्ये रोशनचं नाव दिसलं म्हणून - 'निगाहें मिलाने को' (दिल ही तो है) आणि 'बहू बेगम' सगळाच अल्बम हे ऑल टाइम फेव्हरिट्स!
तसेच 'ममता' आणि 'चित्रलेखा'ही! (ममता वगळता बाकी तीनही साहिरबरोबरचे!)
मदन मोहन यांचे सुपित्र संजीव
मदन मोहन यांचे सुपुत्र संजीव कोहली यांनी दिलेल्या मुलाखतीतून
People discuss and often list the number of tunes that have been plagiarised. You once told me that your father too had copied two songs. Which were they?
SK: There is this Rafi song, Tujhe Kya Sunaaoun Main Dilruba from Aakhri Dao, which was definitely inspired by Talat Mahmood’s Ye Hawa Ye Raat Yeh Chandni by Sajjad Hussain from Sangdil.
अन्यत्र वाचलं की सज्जादनी याबद्दल मदन मोहनना कन्फ्रंट केलं होतं आणि तुमचं गाणं कॉपी करणंही कठीण आहे हो, असं उत्तर मदन मोहन यांनी दिलं होतं. (टीप - मदन मोहनही माझे अतिशय आवडते संगीतकार आहेत)
अनिल बिस्वास सज्जादना the only original composer म्हणालेत. लताच्या मुलाखतीच्या अंशाची लिंक मी दिली आहे. त्यात ती म्हणते की सज्जादनी १०० सुद्धा चित्रपट केले नसतील. एका लेखात वाचलं की त्यांनी फक्त १६ चित्रपटांना संगीत दिलं.
वर भरत यांनी म्हटल्याप्रमाणे
वर भरत यांनी म्हटल्याप्रमाणे रेडीओ जॉकी आणि विविध भारती, ऑल इंडीया रेडीओ, आकाशवाणीचे निवेदक यातला फरक.
विविध भारती, एयर आणि आकाशवाणीचे बहुतेक निवेदक बेरोजगार झाल्यावर त्यांनी युट्यूबकडे मोर्चा वळवला. पण पद्धत तीच. रिसर्च टीम, स्क्रीप्टवरची मेहनत आणि या तीनही रेडीओ च्या शिस्तीतले निवेदन. यांतले बहुतेक निवेदक माझ्या लिस्टीत आहेत. त्यांच्या रीसर्च मुळे ऑथेंटिक माहिती मिळते. जावेद आणि अन्नु कपूर यांची मोलाची भर यात पडली.
पूर्वी ही माहिती व्हेरिफाय करायचो. पण बहुतेक वेळा ती बरोबर असल्याने आता डोळे झाकून विश्वास ठेवतो. इथे त्यातले किस्से आपोआप येतात. त्यामुळे गैरसमज देखील होतात. ( फिल्मी पत्रकार नाही ).
माहितीसाठी एक महत्त्वाचा
माहितीसाठी एक महत्त्वाचा स्रोत - अमीन सायानींनी काढलेल्या गीतमाला की छाँव में च्या सीडीज. त्यात त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या कलाकारांच्या मुलाखतींच्या अंशांचाही समावेश केला आहे. विविधभारतीवर एस कुमार्स के फिल्मी मुकद्दमे असे, त्यातलेही अंश आहेत. हेही नेटवर आहे असं दिसतं. मी सारेगम कारवाँ मध्ये ऐकतो.
ग्रेट माहिती !
आता खऱ्या अर्थाने धाग्याचे नाव सार्थक झाले !!
राजकुमारीचे वर जे गाणे भरत
राजकुमारीचे वर जे गाणे भरत ह्यांनी दिले आहे त्यात अब एवजी तिने इब गायले आहे. बहुदा रोशन ने तिला ते तसे गायला सांगितले. ती सोनू निगमच्या सारेगम मध्ये आली होती एक दोन वेळा त्यात ह्या गाण्याची आठवण आहे. पाकिजा मध्ये पण तिचे नजरिया की मारी आहे. मग्रूर च टूट गया हाय पण छान आहे त्यात पण आहे ती. अत्यंत गरिबीत वारली. अशीच एक मुबारक बेगम, तिचा आवाज खरच छान आहे. तिचं कभी तन्हाईयोमे नक्कीच ऐका लोक, अशक्य सुंदर आहे. स्नेहल भाटकर आहेत संगीतकार. त्यावेळी हे गाणं लता ने की मुबारक ने गायलं ह्यावर पैजा लागत म्हणे. तीच 'वो ना आयेंगे' (देवदास) पण छान आहे. ती पण अत्यंत गरिबीत वारली.
इब म्हणायला सांगणारे
इब म्हणायला सांगणारे दिग्दर्शक आणि गीतकार केदार शर्मा असावेत. योगायोग म्हणजे हमारी याद आएगी हाही त्यांचाच चित्रपट आइ गीतेही त्यांचीच. लताच्या तार खा मिळत नसल्याने ते गाणं मुबारक बेगमना मिळालं.
राजकुमारी यांची दूरदर्शनवर मुलाखत पाहिली होती. दिल्ली दूरदर्शनची असावी. त्यातला एक अंश मिळाला. बोलणं ऐकून सज्जाद हुसैनची आठवण येते का बघा
. इथेही घबराके हम अगदी तसंच म्हटलंय.
हो भरत त्यात लताची गाणी आहेत.
हो भरत त्यात लताची गाणी आहेत. तनुजा आणि नूतनच्या पहिल्या फिल्मला भाटकरांच म्युजिक आहे, नूतन त्यांच्याकडे गायली पण आहे. लता आणि आशाने मुबारकला फार छळले असे तिच्या एका मुलाखतीत आहे. आशा तर तिला धमकीवजा फोन करत असे व नंतर गंमत केली असे म्हणत असे. इतर अनेक प्रतीलतापेक्षा मुबारकचा आवाज खूपच उजवा आहे. जाता जाता, तेवढा चित्रगुप्त तुमच्या लिस्टीत घ्या
सी रामचंद्र, मदन मोहन, ओ पी,
सी रामचंद्र, मदन मोहन, ओ पी, रोशन , शंकर जयकिशन इत्यादींच्या बराच मागे चित्रगुप्त येईल . नौशाद आणि एल पी च्या मात्र आधी.
एक एक दशक घ्यावं. त्यातले
एक एक दशक घ्यावं. त्यातले त्या त्या वेळचे संगीतकार कव्हर केले कि त्या त्या काळचा आढावा आपोआप घेतला जाईल. हे एकट्याने करण्याचे काम नाही. नाहीतर पुस्तकच लिहायला घ्यावे लागेल. ४० च्या दशकापासून सुरूवात करावी. ( ४० चे दशक म्हणजे १९४० पर्यंत). ५० च्या दशकातली बरीच नावे ओळखीची आहेत. ६० च्या दशकातली नावे तर बॉलीवूड चित्रपट संगीताचा कळसच. या काळात एकाच वेळी किती तरी प्रतिभाशाली संगीतकार काम करत होते.
ओ पी नय्यरच्या तर नावावर सिनेमे चालायचे. मनोज मुन्तशीरने सांगितलेले खरे वाटत नव्हते म्हणून पडताळून पाहिले. चित्रपटाच्या पोस्टरवर नायक , नायिका यापैकी कुणीही नव्हते. ओ पी चं चित्र होतं. हा किस्सा सुद्धा खरा आहे.
>>त्यावेळी हे गाणं लता ने की
>>त्यावेळी हे गाणं लता ने की मुबारक ने गायलं ह्यावर पैजा लागत म्हणे.<<
असु शकेल, पण मलातरी मुबारक बेगम यांचा आवाज अनुनासिक वाटतो. त्याकाळात लताबाईंच्या स्वरापर्यंत कोण जात असेल तर त्या सुमनताई...
वानगीदाखल निंद उड जाए तेरी.. हे गाणं ऐका. मुबारक बेगमने सुरुवात केली आहे आणि शेवट सुमनताईंचा आहे. मधे मला वाटतं कृष्णा कल्ले आहे. .
लताबाई आणि मुबारक बेगम यांचं ड्युएट आता आठवत नाहि, मिळाल्यावर टाकतो...
लता आशा आणि सचिन. तोंंडातून
लता आशा आणि सचिन. तोंंडातून ब्र काढायचं काम नाही.
आशा आणि मुबारकचं ड्युएट आहे
आशा आणि मुबारकचं ड्युएट आहे - हमें दम दइके सौतन घर जाना
संगीत इक्बाल कुरेशी. आणखी एक टॅलेंटेड पण कमी काम मिळालेला संगीतकार. गाणी थोडा वेळ काढून.
लताबाई आणि मुबारक बेगम यांचं
लताबाई आणि मुबारक बेगम यांचं ड्युएट >>> घडीभर को तेरे नजदीक आकर हम भी देखेंगे आठवलं. पण ती शमशाद आहे हे नंतर आठवलं. पण आता इतकं चांगलं गाणं आठवलं तर चुकीचं असलं तरी लिहून टाकावं म्हणते
@भरत..नौशाद आणि एल पी एकाच
@भरत..नौशाद आणि एल पी एकाच तागड्यात? -:(
मी 'मोहे पनघट पे नंदलाल' हे एकच गाणं जरी ऐकलं असतं तरी मी नौशादची फॅन झाले असते.
Dil Humse Woh Lagaye - Lata
Dil Humse Woh Lagaye - Lata Mangeshkar, Mubarak Begum - BARADARI?
https://www.youtube.com/watch?v=DzpdsKe_G0Q&ab_channel=SEPLVintage
मोहे पनघट पे ज्या जमान्यात
मोहे पनघट पे ज्या जमान्यात बनलं त्या जमान्यात एलपी कार्यरत असते तर त्यांनीही त्या तोडीचं गाणं बनवलं असतं. त्यांना खूप लोक "चालू" संगीतकार समजतात. पण काळाच्या डिमांडनुसार बदलत रहायचं तरीही श्रवणीय गाणी द्यायची अशी कसरत त्यांनी केली. दोस्तीची सर्वच गाणी एलपींची क्षमता समजण्यासाठी पुरेशी आहेत. पारसमणीची गाणी जे देऊ शकतात त्यांना मोहे पनघट सारखं गाणं देणं अशक्य नव्हतं.
उत्सव मधे दिलंच कि हटके संगीत.
एक आहे, ते खूप म्हणजे खूपच कमर्शियल होते. त्यांनी ए बजेट वाल्या निर्माता दिग्दर्शकांना वेगळी गाणी दिली तर कमी बजेटवाल्यांना टाकाऊ गाणी दिली.
एल पी, आरडी, कल्याणजी आनंदजी यांचा जमाना सुरू झाला त्या वेळी एसडी, जयदेव, शंकर जयकिशन, नौशाद, सी रामचंद्र, खय्याम, ओ पी, रोशन , मदन मोहन यांचा सूर्य अस्ताला चालला होता. अर्थात खय्याम ने नंतरही तीन चार सिनेमे गाजवले. मदन मोहनचा लैला मजनू गाजला. सी रामचंद्र मात्र नंतर संगीतकार म्हणून गाजले नाहीत.
ए बजेट वाल्या निर्माता
ए बजेट वाल्या निर्माता दिग्दर्शकांना वेगळी गाणी दिली तर कमी बजेटवाल्यांना टाकाऊ गाणी दिली>> हे बरोबर
बरोब्बर !
प्रत्येक पिढी बिघडून ठेवलि. >>> बरोब्बर !
पुराना मंदीर पासून लोक तळघर असलेल्या हवेल्या बांधून त्यात भूतं पाळू लागले.
मधुमती आला आणि लोक आपल्या गर्लफ्रेण्डला ठाकूरच्या वाड्यावर जा म्हणून आग्रह करू लागले. तिने उडी मारली कि मग तिच्या हमशक्लला घेऊन बदला घेऊ लागले.
अस्तित्व चित्रपटापासून संगीत शिक्षकांच्यात वाढ झाली.
श्याम सुंदर आणि लता - ए दिल
श्याम सुंदर आणि लता - ए दिल उनको याद ना करना, बहारे फिर भी आयेंगी (पहिल्यांदा बहारे शब्द गाण्यात येतो तो नक्की ऐका, अहाहा एकदम), साजन की गलिया छोड चले. तिन्ही अप्रतिम आहेत. लता लाईव्ह शो मध्ये शेवटच्या दोनची कडवी तरी गायची.
एरिक रॉबर्ट्स a.k.a विनोद:)
एरिक रॉबर्ट्स a.k.a विनोद:) लताच लारा लप्पा. सुलोचना चव्हाण आणि विनोद जोडीच अखिया मिलाके म्हणून पण एक आहे पंजाबी ठेका आहे. त्यांच्या एका मुलाखतीमध्ये ह्याचा उल्लेख आहे.
त्यांचं (सुलोचना चव्हाण) आणि श्याम सुन्दर चे मौसम आया है रंगीन पण छान आहे. हे नक्कीच ऐका.
संगीतकार रवी.
संगीतकार रवी.
हावरा ब्रीजच संगीत १९५८ ला आलं तेव्हां तिसरी मंझिल प्रमाणेच गाजलं. पाठोपाठ १९६२ ला चायना टाऊन चं संगीत गाजलं. यातला पहिला ओपी तर दुसरा रवी. शम्मीच्या स्टाईलचं संगीत रवीने दिलंय. रवी आणि लता ही जोडी सुद्धा हिट होती. चायना टाऊन ते नागीन कसली अफाट रेंज होती या माणसाची.
हम तो मुहब्बत करेगा हे गाणं देणारा रवी लताकडून हुस्न वाले तेरा जवाब नही हे गाणं गाऊन घेतो यावर विश्वास बसत नाही.
किशोर कडून सी ए टी कॅट कॅट मने बिल्ली आणि त्याच वेळी येह वादिया ये फिजाएं बुला रही है तुम्हे हे सुद्धा हाच माणूस कंपोज करतो.
रवी यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं बहुधा हे एकमेव गाणं.
https://www.youtube.com/watch?v=WkNnIghHJ6I
ही सगळी मंडळी जन्माच्याही आधीची आहेत. ९० च्या आधीच्या पिढीला आपल्या जन्माच्या आधीची गाणीही तोंडपाठ असतात. स्वतःच्या वेळची तर असतातच आणि आताच्या पिढीचीही माहिती असते. इतकंच कि आताच्या गाण्यांबद्दल जिव्हाळा वाटत नाही. एखादं आयत सारखं गाणं आलं कि आवडतंच.
रवी म्हणजे रवीकांत शर्मा.
रवी म्हणजे रवीकांत शर्मा. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना घरगुती हिंसाचाराला तोंड द्यावे लागले. सूनेचं ऐकून मुलाने मारहाण केली. घराबाहेर काढायचा प्रयत्न केला. त्यांच्या घरात मधोमध पांढर्या रंगात रेष मारून रेषेच्या पलिकडचा भाग वापरायला बंदी केली गेली. जिना रेषेच्या पलिकडे येत असल्याने त्यांना जिन्याचा वापर करू दिला जात नव्हता. त्यामुळे दाद मागायला त्यांना कोर्टात जावं लागलं.
त्यांची सून म्हणजे आपली मराठमोळी वर्षा उसगावकर.
बहारें फिर भी आएगी आणि साजन
बहारें फिर भी आएगी आणि साजन कि गलियाँ ही दोन ऐकलीत. आवडतात. साजन कि गलियाँ लिटरली पाय ओढत ओढत चालल्याचा फील देतं. बाकीची शोधून ऐकतो. सुलोचना चव्हाण ( तेव्हा कदम)यांचं चोरी चोरी आग ऐसी दिल में लगाकर चल दिए एवढं एकच आठवतं.
ग्रेट माहिती !
ग्रेट माहिती !
आता खऱ्या अर्थाने धाग्याचे नाव सार्थक झाले !! >> काय म्हणायचं आहे आपल्याला ? मी देखील मला ठाऊक असलेली माहिती प्रामाणिकपणे लिहिली आहे. आणि कितीही कमेंट्स केल्या गेल्या तरी हा भाग हिंदी चित्रपट संगीताच्या ज्या काळावर आहे, तो काळ पूर्णपणे व्यापला जाऊ शकत नाहीच. कारण ते अशक्य आहे. अर्थात मायबोली वरील रसिक अशा माहितींची देवाणघेवाण करत आहेत हे अभिनंदनीय आहेच.
वेगळा धागा काढा रे. इथे
वेगळा धागा काढा रे. इथे अवांतर होतं आहे हे.>>> सहमत.
दोन पैसे लावता आले असते तर नक्कीच काढला असता. वर जे लिहीत आहेत त्यांच्यापैकी कोणी धागा काढावा.
काय म्हणायचं आहे आपल्याला ?
काय म्हणायचं आहे आपल्याला ? मी देखील मला ठाऊक असलेली माहिती प्रामाणिकपणे लिहिली आहे >> तुमचे मागचे दोन तीन प्रतिसाद गंमत केल्यासारखे वाटले. वर तुम्ही फेसबुक वर पण आहात असे वाचले. इथे वेगळ्या नावाने होतात का?
Pages