प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा

Submitted by प्रथमेश काटे on 22 June, 2023 - 06:53

Part 1

( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )

१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.

५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला‌. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली‌.

प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.

लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.

दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.

क्रमशः
प्रथमेश काटे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहले आप, पहले आप प्रमाणे कुणीतरी धागा काढावा असे चालू असल्याचे पाहून चला आपणच सुरूवात करून द्यावी असे वाटले. पण प्रत्यक्ष धागा काढताना धारपांच्या कथेतल्या प्रमाणे भीतीचा थेंब मनाच्या पापुद्र्यावर पसरला. इतर सगळे हातभार लावतील ही अपेक्षा जर पुरी झाली नाही तर मात्र हे शिवधनुष्य धागा काढणार्‍या एकट्याला पेलावे लागेल. चार ओळी टंकायला काही लागत नाही, पण माहिती जमवणे, त्यातून नेमकी उचलणे आणि पुन्हा धाग्यात ती नीट बसवणे हे सगळे डोळ्यासमोर आले आणि उत्साह मावळला. Proud

@ढंपस टंपू - माहिती जमवून, त्यात आधीपासून माहीत असलेली माहिती जोडून लेख तयार केल्यावर जर काहीच्या काही चूका काढणाऱ्या, टिंगल टवाळी करणाऱ्या कमेंट्स येत असतील तर त्यावर प्रतिक्रिया देताना मी गंमत का करेल ? आणि मायबोलीवर मी प्रथमेश काटे असं माझं सरळ नावच लावलं आहे. आपल्याप्रमाणे ' युनिक ' आय डीचा वापर नाही केला.यावरूनच कल्पना यावी.

त्या मॉर्टल मेन इम्मॉर्टल मेलडीज या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातला सगळा प्रवास बघायला मिळेल. वेळ काढून बघा मंडळी. प्रत्येक वेळी टाळ्या पडल्या की मान झुकवून नमस्कार करणारी राजकुमारी , आवाज दे कहाँ हैं मधल्या सुरेंद्रच्या ओळी गाताना इजाजत मागणारी नूरजहाँ . दिलीपकुमारचं उर्दू , असं बरंच काही आहे तिथे. मीही तो कार्यक्रम टीव्हीवर पाहिला त्यानंतर पाहिलेला नाही.
राजकुमारीबद्दलच्या प्रतिसादात लिंक दिली आहे.

संगीतकार मदनमोहन यांचे जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यांना अभिवादन !

तसेच दोन तीन दिवसांपूर्वी भारताची पहिली गायिका जिच्या गाण्यांची रेकॉर्ड ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडीयाने प्रकाशित केली तिचाही जन्मदिवस होता. त्यांना ग्रामोफोन गर्ल आणि फर्स्ट रेकॉर्डिंग सुपरस्टार ऑफ इंडीया अशा संबोधनाने गौरवले गेले होते.

या गायिकेचे नाव गौहर जान. हे टोपण नाव होते. त्या ब्रिटीश होत्या. मूळचे नाव अँजलिना युवोवाई. पित्याचे नाव रॉबर्ट विलियम . आईचे नाव एडलिना व्हिक्टोरिया. आई कथक नृत्यांगना होत्या आणि गायनही शिकल्या होत्या. आईकडूनच नृत्याचे प्रारंभिक धडे मिळाले. एडलिना १९८३ पासून नवाब वाजिद अलींच्या दरबारात नृत्य पेश करू लागल्या. त्यातून त्यांना उत्तम कमाई व्हायची. इतकी कि कोलकत्या बाहेर एक राजेशाही हवेली त्यांनी २५ हजार रूपयांत विकत घेतली होती. इथेच गौहर जान यांच्या नृत्य आणि गायनाच्या प्रशिक्षणाची सुरूवात झाली.

सुगम संगीताच्या प्रशिक्षणासाठी संगीत गुरू काळे गुरूजी , शास्त्रीय संगीतासाठी पटियाळा घराण्याचे अलिबक्ष महाराज यांची शिकवणी सुरू झाली.

नृत्यासाठी पंडीत बिंदादीन महाराज ( बिरजू माहाराजांच्या आजोबांचे बंधू) यांची नेमणूक केली गेली.
बंगाली कीर्तन शिकण्यासाठी गुरू चरणदास येत. या वातावरणात गौहर जान शायरी करू लागल्या. त्यासाठी त्यांनी हमदम हे नाव वापरले.

१८८७ साली गौहर जान दरभंगाच्या राजदरबारात राज-नर्तकी म्हणून रुजू झाल्या. याच दरम्यान वाराणसी येथील नृत्यालयातीला गुरू त्यांना नृत्याचे धडे देत राहीले.
त्याआधी एक वर्षे म्हणजे १८८६ साली ग्रामोफोन कंपनीने त्यांचे गाणे ऐकून त्यांच्या गाण्याची रेकॉर्ड बनवली.
१९०४ साली त्यांची पहिली मुलाखत गुजराती पारसी थेटरचे कलाकार अमृत केशव नायक यांनी घेतली.

१९१० साली त्यांना मद्रास राज्यातल्या व्हिक्टोरिया पब्लीक हॉलचे निमंत्रण आले. तिथे त्यांनी हिंदी - उर्दू गीतांची पेशकश केली. त्या वेळी मद्रास मधे हिंदी विरोधी वातावरण नव्हते.

१९११ मधे जॉर्ज पंचम यांच्या भारत भेटी दरम्यान त्यांच्या समोर गायन आणि नृत्य पेश करण्यासाठी संधी मिळाली. गौहर जान एव्हढ्या लोकप्रिय होत्या कि या कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांनी अटी व शर्ती घातल्या आणि घसघशीत बिदागीची मागणी केली. त्या वेळच्या सुप्रसिद्ध गायिका जानकीबाई या त्यांना सहाय्यक म्हणून काम करत होत्या.

त्यांच्या प्रसिद्धीची चर्चा, किर्ती ऐकून म्हैसूरचे राजे कृष्णराज वड्डीयाच, चतुर्थ यांनी त्यांना त्यांच्या दरबारात गौहर जान यांची नियुक्ती राज नर्तकी व संगीतकार म्हणून केली. त्यांच्यासाठी रंगमहालाची व्यवस्थाही केली.

गौहर जान यांनी त्यांच्या कारकिर्दीत हिंदी, उर्दू, गुजराती, फारसी, मराठी, अरबी, तमिळ, फ्रेंच आणि इंग्लीश अशा भाषातून ६०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

त्या त्या वेळच्या सर्वात जास्त मानधन घेणार्‍या गायिका होत्या. त्यांच्या पहिल्या गाण्यासाठी ( तीन मिनिटापेक्षा कमी कालावधी असलेले) त्यांना तीन हजार रूपये मिळाले होते. त्या काळी हे मानधन अव्वाच्या सव्वा होते.

खूप पैसे हाती आल्याने व्हायचे तेच झाले. अफाट खर्च, अंदाधुंद जीवनशैली, अयोग्य व्यक्तीशी लग्न यामुळे त्यांची कारकीर्द लवकरच उतरणीला लागली. १९३० साली ५७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हां त्यांची लोकप्रियता इतकी ओसरली होती कि दोन चार वर्तमानपत्रात चार ओळीची बातमी छापून आली.

बॉलीवूडचे चित्रपट संगीताचे विश्व सुरू होण्याआधीच ग्रामोफोन रेकॉर्ड वर गेलेली गायिका म्हणून त्यांचे नाव सुरूवातीस घ्यावे लागेल.

( सौजन्य : कायप्पा. जालावर कन्फर्म करता येते).

आपण अंध गीत आणि संगीतकार रवींद्र जैन यांनाही विसरायला नको. गीत गाता चल, राम तेरी गंगा मैली आणि रामायण मालिका त्यांनी संगीतबद्ध केल्या होत्या. ते पण एक गुणी संगीतकार होते.

Pages