प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा

Submitted by प्रथमेश काटे on 22 June, 2023 - 06:53

Part 1

( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )

१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.

५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला‌. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली‌.

प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.

लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.

दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.

क्रमशः
प्रथमेश काटे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप मोठ्या मोठया गॅप्स राहिल्यात आणि अनेक मोठी नावंही सुटलीत. हरकत नाही. तुम्हांला जसा दिसला तसा प्रवास लिहा.

@भरत - गॅप्स म्हणजे ? मला समजले नाही. आणि मी लेख सुरू होण्याआधी कंसात लिहिले आहे की माझ्या माहिती आणि मतांप्रमाणे हा लेख लिहिला आहे. ज्यांच्या बद्दल मला माहिती नव्हती किंवा जे गायक, गीतकार अथवा संगीतकार मला फारसे आवडत नाही, त्यांच्याबद्दल जाणूनबुजून नाही लिहिले.

@सामो - विसरलो नाहीये. सुरुवातीलाच माझ्या माहिती आणि मतांप्रमाणे हा लेख लिहिला असल्याचे नमूद केले आहे. आणि he is not my test. म्हणून त्यांचा या लेखात समावेश केला नाही.

>>तलत मेहमुद ला विसरु नका.<< +१
लहान असताना सेहगलची गाणी ऐकायला विचित्र वाटायची. पण आता आवडतात; हल्लीच सेहगल आणि लताबाईंचं मिक्स केलेलं गाणं (मै क्या जानू क्या जादू है...) ऐकलं.. मझा आगया...

लेखाचं शीर्षक " प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा " हे आहे. तुमच्या आवडी ठीक आहेत. पण तुम्हांला जे कलाकार आवडत नाहीत किंवा माहीत नाहीत त्यांची नोंद सु टली तर तो प्रवासाचा आढावा ठरणार नाही. केवळ तुमच्या आवडीचा आढावा ठरेल.

आणि मी पुढे म्हटलंच होतं - हरकत नाही. तुम्हांला जसा दिसला तसा प्रवास लिहा.

'प्रवास मला आवडणार्‍या/आवडलेल्या हिंदी चित्रपटसंगीताचा' असं शीर्षक हवं ना मग?

मुकेशची एन्ट्री 'दिल जलता है तो जलने दे', 'तू कहे अगर जीवनभर मैं गीत सुनाता जाऊं' वगैरे गात ५०चं दशक सुरू होण्यापूर्वीच झाली होती ना? अनिल बिस्वास आणि नौशादअली तुमच्या आवडीतले नसल्यामुळे ती गाणी डिस्क्वालिफाय झाली असतील बहुधा.

स्वाती +1
लेखाचे नाव मिसलिडिंग आहे

>>>>>आणि he is not my test. म्हणून त्यांचा या लेखात समावेश केला नाही.
आय सी!!! असतात असेही लोक असतात - तलत न आवडणारे Happy

@सामो - होय. आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट किंवा आवडता कलाकार दुसऱ्याला आवडत नसेल तर त्याला ' असेही लोक ' म्हणून तुच्छ लेखणारे ही असतात.

@सामो - होय, आणि आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट किंवा आवडता कलाकार दुसऱ्याला आवडत नसेल तर त्याला ' असेही लोक ' म्हणून तुच्छ लेखणारे ही असतात.

गायकांमधे सी आत्मा, सहगल (बाबा नाही) , पंकज मलिक ही सुरूवातीची काही मला आठवणारी नावं. यात खरे तर संगीतकारांची नावे यायला हवीत. धागा चित्रपटसंगीताचा आहे. काही प्रतिभावान संगीतकार होऊन गेले ज्यांची गाणी आजही जीभेवर आहेत पण त्यांची नावे विसरली गेली आहेत. त्यांची उजळणी व्हायला हवी.

किंवा धाग्याच्या शीर्षकात मला दिसलेला चित्रपट प्रवास असा बदल करा. सगळं सुरळीत होईल.

@स्वाती_आंबोळे - एवढ्या मान्यवर संगीतकारांना डिसक्वालीफाय करणारा मी कोण ? मला उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मी लेख लिहीण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसं आधीच नमूद ही केलं आहे ; पण आपण या संगीतकारांचे अति कट्टर फॅन दिसता, म्हणून या टीप वैगेरे चा विचार न करता, माझ्या आवडत्या कलाकारांबद्दल इतरांनीही लिहीलंच पाहिजे, असा काहीतरी बाळबोध अट्टाहास धरून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट आक्रमक पवित्राच घेतलात. घ्या ; पण माझ्यासाठी अशा अति कट्टर फॅन्सला आणि त्यांच्या मतांना काडीचीही किंमत नाही. आणि शीर्षक योग्यच आहे. लेख मी लिहीला आहे, त्यामुळे तो माझ्या आवडीनिवडी आणि मतांवर आधारित असणं ओघाने आलंच. तसं खास लिहीण्याची गरज नाही.

@अवल - लेखाचं नाव मिस लिडींग नाही ; आपली कमेंट वाचकांना मिस लीड करू शकते.

@सामो - माफ करा सर ; पण कमेंट्स मध्ये कुणीही लेखनाबद्दल थोडंही बरं न लिहिता फक्त आक्रमक भाषेत चुका काढत आहेत. किंवा अमुक तमुक गायकाचं नाव अॅड करा असं उगाचच सांगत आहेत. त्यामुळे जरा समजून घेण्यात चूक झाली.

ठीक, लेखनात बरं म्हणण्यासारखं काही सापडण्याची विनम्रपणे वाट पाहाते. ('शीर्षकाकडे दुर्लक्ष करून' - हे राहिलं.)

मलाही वाटतं की जर हा लेख तुम्ही, तुम्हाला असलेल्या माहितीच्या आधारावर लिहिला असेल तर मग टायटल मिसलिडिंग आहे. टायटल वाचून वाचकाची अशी धारणा होते की तुम्ही हिंदी चित्रपट संगीताचा आढावा घेणार आहात. हा खुपच व्यापक असा विषय आहे आणि टायटलला अनुसरुन ह्यात अजून बर्‍याच गोष्टी/गायक कवर केले पाहिजेत. तसं काही दिसत नाहीये आणि त्यामुळे मग वर काही लोकांनी लिहिलय तसं लिखाणात बर्‍याच गॅप्स दिसत आहेत.
तुम्ही लिहिलेल्या टीपेमध्ये तुम्हाला जे अभिप्रेत आहे त्याला अनुसरुन जर तुम्ही वेगळं टायटल दिलत तर मग पुढे तुम्हाला अचानक असं जाणवेल की लोकं आता आक्रमक(?) भाषेत फार कमी चूका काढत आहेत.

" मला दिसलेला हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास" हे एकदम चपखल शीर्षक होईल. एका माणसाने सगळ्या हिंदी चित्रपटसंगीताचा आढावा घेणे अशक्यप्राय मेहनतीचे काम आहे.

I think he has already added a note at the start so you are irrational to ask to change the title again.

प्रथमेश काटे>> you need to take comments here constructively. If you start fighting every comment, you will be burned in a day and comments will keep coming

>>>>>>I think he has already added a note at the start so you are irrational to ask to change the title again.
शीर्षक चूकीचे आहे हे सत्य आहे हो. मी ही उद्या उठून सामवेदाचे भाषांतर असे शीर्षक लिहीन आणि लेखात मला माहीत असलेल्या तीनच श्लोकांचे भाषांतर दिलेले आहे ते गोड मानून घ्यावे असे लिहीन.

पण हे नुसते टायटलबद्दल नाही. लेखाचा टोन असा आहे की १९४२ पासून टाइमलाइन धरली तर पुढच्या घडामोडींचा काळानुसार समग्र आढावा असेल असे वाटते. मग "अरे याचा उल्लेखच नाही", "तो राहिला की" असे वाचताना आपोआप डोक्यात येते. तसेच अशा लेखांत मग अचूकता असणे आवश्यक असते. किशोरचा ६० दशकात उत्कर्ष कधी झाला? त्या दशकात तो तुरळक प्लेबॅक (गाइड ई) व बहुतांश नायकाच्या रोल्स मधे असे. पार्श्वगायक म्हणून तो १९६९ पासून खरा नावाजला गेला.

कोणत्याही प्रकारचं गाणं चपखल बसतं हे आशाबद्दल म्हंटलं जातं. लताबद्दल नाही. ते लेखकाचे मत असेल पण लोकांचे वेगळे असेल तर लोक तसे लिहीणारच.

माझे काही आवडते खेळाडू आहेत व त्यांच्याबद्दल मी लिहीणार आहे असा अगदी सुरूवातीला डिस्क्लेमर असला, आणि लेखात जर १९७१ साली गावसकरने पदार्पण केले, मग १९८९ साली तेंडुलकरने आणखी काय काय केले असे लिहीले, सरदेसाई, वेंगसरकर व सेहवाग हे खेळाडूही भारी होते वगैरे लिहीले, बाकी कोणाचा उल्लेखच केला नाही, आणि अशा लेखाचे शीर्षक जर "भारतीय क्रिकेटचा प्रवास" असे लिहीले तर लोकांचा गोंधळ होणारच ना.

लेखकाच्या मतांचा काही प्रॉब्लेम नाही. पण एकूण "आढावा" टोन आहे त्यात दुरूस्ती करायची गरज आहे. मग तलत त्यात नसला तरी बिघडत नाही, आणि साहिर, हसरत व इंदिवर एकाच ओळीत आले तरी.

वरती बहुतांश लोक साधारण हेच सांगत आहेत.

लोल धनि. असकसकाय भौ.
टायटल मध्ये व्यापक टॉपिक जाहिर केला आणि ष्टार्टलाच लिहिलं की
“आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे.”

इथेच कॉन्ट्राडिक्शन नाही का?
असो, आपण कशाला एकमेकांमध्ये आक्र्मकता वाढवून चक्र्माचे धनि व्हायचे? Lol

फा, बेस्ट लिहिलयस Lol

मंडळी - लेखांत सुरुवातीलाच डिस्क्लेमर आलेलं आहे. दॅट्स गुड इनफ. शिवाय लेख बालभारतीत प्रकाशीत झालेला नाहि, माबोवर झालेला आहे. सो चिल, अँड मुव ऑन..

हल्ली माबोवर रॅगिंगचा प्रकार परत बोकाळतोय; हे फक्त माझंच निरिक्षण आहे कां?..

रॅगिंग काय त्यात? वाचताना काय गोंधळ उडतो ते लिहीले आहे, कोठे तपशीलाच्या चुका आहेत ते लिहीले आहे, आणि काय दुरूस्ती करायला हवी ते लिहीले आहे.

तेच लिहायला आलो होतो. रॅगिंग काय त्यात?
नीट शब्दात सांगितलय. उगाच रॅगिंग वगैरे म्हणून तुम्ही बळच कैवार घेऊन (गरज नसताना) काहीतरी अन्याय होत आहे असं भासवत आहात.
You need to chill too. Happy
लेखकाला नसतील घ्यायचे हे मुद्दे लक्षात तर ते सांगतीलच. लोकं पण नाद सोडून देतिल नंतर. सिंपल.

शीर्षक चूकीचे आहे हे सत्य आहे हो. मी ही उद्या उठून सामवेदाचे भाषांतर असे शीर्षक लिहीन आणि लेखात मला माहीत असलेल्या तीनच श्लोकांचे भाषांतर दिलेले आहे ते गोड मानून घ्यावे असे लिहीन.>>
याला म्हणतात सुतावरून स्वर्ग गाठणे ! अगदी शीर्षक सुद्धा शास्त्रकाट्याच्या अचूकतेने लिहिलं पाहिजे का? त्यांनी पहिल्याच वाक्यात स्पष्टपणे disclaimer लिहिलं आहे ते पुरेसं आहे की. जसे काही धागा उघडण्यात यांचे तीन सेकंद गेल्याने आयुष्यात कधीही भरून न येणारा तोटा झाला आहे.
हल्ली माबोवर रॅगिंगचा प्रकार परत बोकाळतोय>>>
पूर्वीचं माहित नाही, पण अलीकडे हौशी अपरिपक्व लेखकांची जरा अतीच चिरफाड चालू आहे असं वाटतं.

>> रॅगिंग काय त्यात?<<
वाद, प्रतिवाद (फक्त या बाफवरंच नाहि) आणि त्यानंतर येणारे कांडिसेंडिंग रिमार्क्स तुम्हाला रॅगिंगचा प्रकार वाटत नसेल तर सॅडली, इदर यु आर इग्नरंट/लॉयल टु योर कोटरी ऑर यु बोथ हॅव लाँग वे टु गो..

अ ति होत असेल तर बरोबर आहे. नाही व्हायला पाहिजे.
पण नीट भाषेत सांगितलं तर अगदी ताबडतोब आपला जबरी पापड मोडून घ्यायची, ह्या अपरिक्व लेखकांना आणि इतर त्यांचे कैवार घेऊन जोजवणार्‍यांना, काहीच गरज नाहीये.

Again, Raj, pick the IDs who have dropped simple comments here and I challenge you to show me if they have been posting condescending remarks elsewhere.
You have entered this conversation with a bias looks like.
Also, I feel you have locked yourself into some understanding about yourself that makes you think you are the best judge in pretty much all situations.

I’m afraid you may have a long way to go as you need to dig deeper and ask yourself how do you always convince yourself that you are right.

बुवा - आय डोंट हॅव बर्डन ऑफ प्रुफ हियर. जस्ट वेट अँड स्टे ट्युन्ड फॉर कपल मोर डेज.. यु विल गेट द आन्सर, देन आस्क मि द सेम क्वेश्चन...

Deal
to be specific, I’m saying, ids who have genuinely put informative comments.

वाद, प्रतिवाद (फक्त या बाफवरंच नाहि) आणि त्यानंतर येणारे कांडिसेंडिंग रिमार्क्स तुम्हाला रॅगिंगचा प्रकार वाटत नसेल तर सॅडली, इदर यु आर इग्नरंट/लॉयल टु योर कोटरी ऑर यु बोथ हॅव लाँग वे टु गो.. >>> मी माझ्या पोस्टबद्दल खुलासा केला आहे. बाकीच्यांनी काय हेतूने लिहीले आहे ते त्यांचे बघतील. काय इग्नोरंट, लॉयल वगैरे बळंच.

Pages