Part 1
( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )
१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.
५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली.
प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.
लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.
दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.
क्रमशः
प्रथमेश काटे
@सामो - हे पटलं. एडिट करतो.
@सामो - हे पटलं. एडिट करतो. थॅंक्यू.
@भरत - तुम्ही मला उद्देशून म्हणालात का. बरोबर आहे तुमचं.
@ऋन्मेष - खरंय सर. इथे मूळ लेखापेक्षा शीर्षकावरच अधिक चर्चा होते आहे. बाय द वे मी आपला चाहता आहे. तुमच्या कथा खूप आवडतात मला.
@भास्कराचार्य - मी ही मायबोलीचा वाचक आहे. या आय डी वरून एकही कथा किंवा लेख दिसला नाही. मग बरोबर आहे तुम्ही फक्त उद्धटासारख्या कॉमेंट्स करणं दुसऱ्याची खिल्ली उडवणं एवढ्यासाठीच या ब्लॉगवर आहात. त्यामुळे लेखनासाठी किती मेहनत लागते हे तुम्हाला काय कळणार ? या उत्तरानेही तुमचं मनोरंजन होईल, अशी अपेक्षा करतो.
मुळात हा विषय खुपच व्यापक आहे
मुळात हा विषय खुपच व्यापक आहे. सगळाच आढावा घ्यायचा म्हटला तर एक ग्रंथ नक्कीच होईल. लेखकाने आपल्या परीने लेख लिहाला, त्यात काही कमी असेल तर जाणकारांनी आपले अभिप्राय प्रतिसादात मांडावे, नक्कीच चांगली चर्चा होईल आणि धागाकर्त्याला पण पुढचे भाग लिहायला हुरूप येईल.
@काटे -https://www.maayboli
@काटे -
https://www.maayboli.com/user/35100/created
भास्कराचार्य यांचे लिखाण इथे सापडेल.
या उत्तरानेही तुमचं मनोरंजन
या उत्तरानेही तुमचं मनोरंजन होईल, अशी अपेक्षा करतो. >>> ऑफ कोर्स! खूप खूप धन्यवाद!
>>निदान इथे सूट झालेला नाही
>>निदान इथे सूट झालेला नाही असे मला वाटले.<<
हे मिक्सिंग बहुतेक हल्लीच झालेलं आहे. हा प्रयोग लताबाईंच्या उमेदिच्या काळात झाला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. असो..
बरोबर आहे तुमचं; कानसेन आहात.
तरिहि मिक्सिंग करणार्याराला क्रेडिट ध्यायलाच हवं. मस्त केलंय, अगदि दोघांनी स्टुडिओत एकत्र बसुन रेकॉर्डिंग केल्यासारखं. हे गाणं तर एवरग्रीन आहे. मागे काहि हौशी कलाकारांनी यमन रागातल्या गाण्यांची मेडली सादर केलेली; त्यात हे गाणं होतं. असे प्रयोग होत रहावेत असं वाटतं...
जिज्ञासा, धन्यवाद!
@वीरू - हो अगदीच.
@वीरू - हो अगदीच.
@भास्कराचार्य - सामो यांनी तुमच्या कथेची लिंक दिली आहे. कथा तर खरंच छान आहे ; पण मग एक चांगले लेखक असूनही अशा पद्धतीने कमेंट करता हे तुम्हाला शोभतं का ? नाही तुम्ही चुक दिसली तर नक्की सांगा ; पण मी desclaimer मध्ये आधीच सांगितले असूनही शीर्षकात असं आहे, तसं आहे म्हणून उगाच बोलणं योग्य आहे का ?
सामो, लताने दिवंगत कलाकारांची
सामो, लताने दिवंगत कलाकारांची गाणी गाऊन श्रद्धांजली नावाचे दोन अल्बम काढले होते. त्यातला दुसरा माझ्याकडे होता.. त्यातली जी गाणी मी पहिल्यांदा ऐकली ती आवडली. पण जी आधी मूळ गायकांची ऐकली होती, ती तितकीशी आवडली नाहीत.
हेमंतकुमारचं "रुलाकर चल दिये इक दिन हंसी बनकर जो आए थे "हे लताचं आधी ऐकलं. तेव्हा आवडलं. मग कधीतरी हेमंतकुमारचं
ऐकल्यावर ते पुसले गेलं.
लताच्या गायकीतला शार्पनेस तोवर कमी झाला होता.
तुम्ही ऐकलेल्या गाण्यात सैगलचा है आणि लताचा हे ऐकून येतो. इतका फरक पडला.
पूर्वीचं माहित नाही, पण
पूर्वीचं माहित नाही, पण अलीकडे हौशी अपरिपक्व
लेखकांची जरा अतीच चिरफाड चालू आहे असं वाटतं. >> न्यायाधीश महाराज एकदा लेख वाचा म्हणजे माझी परिपक्वता समजेल. आणि कदाचित आपली एखाद्या बद्दल माहिती नसताना त्याची योग्यता ठरवून टाकायची वाईट सवय दूर होईल.
काटे तुम्ही लोकांना स्पेसिफिक उत्तरे देत आहात असे दिसते. माझ्या प्रतिक्रियांना दिलेल्या उत्तरामधे हे वरचेही उत्तर आहे. तुमच्या परिपक्वतेबद्दल मी काही लिहीलेले नाही. ती दुसर्याची कॉमेन्ट आहे त्यांना काय ते उत्तर द्या. लोकांना उत्तरे द्यायच्या घाईत हे झाले असेल तर ठीक आहे पण एकाचे बिल दुसर्यावर फाडू नका.
भरत यांच्या:
जाऊ द्याहो. तुम्ही इथे उत्तरं देत बसण्यापेक्षा हिंदी चित्रपट संगीताच्या प्रवासावर पुढचे लेख लिहून टाका. >>> याला +१
सगळे शीर्षकावर तुटून पडलाय.
सगळे शीर्षकावर तुटून पडलाय. मी कथा विभागात पाहून कथा म्हणून वाचायला घेतली . याची भरपाई कोण देणार?
"५० चे दशक सुरू झाले, आणि '
"५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. " - इथे फॅक्च्युअल एरर आहे. आवारा १९५१ मधे आला. मुकेश चं करियर १९४१ मधे (१० वर्षं आधी) सुरू झालं. आणि आवारा आधी, मेला, अनोखी अदा, बरसात, आग ई. बर्याच यशस्वी गाण्यांची कारकीर्द होती.
@फारएण्ड - सॉरी, आणि समजून
@फारएण्ड - सॉरी, आणि समजून घेतल्याबद्दल थॅंक्यू. Btw ६० च्या दशकात जरूरत है, मेरे मेहबूब, मेरे सामने वाली खिडकी में, कहना है, एक चतुर नार इ. गाणी किशोरकुमारांनी गायली होती. ही सर्व १९६९ च्या आधीच्या चित्रपटांतील आहेत हा उत्कर्षच नाही का ?
@रीया - सॉरी. मी ब्लॉगवर तसा नवीनच आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी पोस्ट केला लेख.
ब्लॉग नाही हो दादा हा!
ब्लॉग नाही हो दादा हा!
बाय द वे मी आपला चाहता आहे.
बाय द वे मी आपला चाहता आहे. तुमच्या कथा खूप आवडतात मला.
>>>>
धन्यवाद, पण हल्ली मी कथा लिहित नाही. लोकांना आवडली नाही तर फार टीका होते. या वयात ती आता झेपत नाही
जोक्स दा अपार्ट,
आपल्या लिखाणावर कलाकृतीवर टीका झाल्यास ती नेहमी सकारात्मक घेत जा.. टीका तर या जगात शाहरुख वर सुद्धा होते
पुढील भागांच्या प्रतीक्षेत .......
किशोरबद्दल - साधारण १९६९
किशोरबद्दल - साधारण १९६९ पर्यंत तो बहुतांश स्वतःच नायकाचे रोल्स करण्याच्या मागे होता व शक्यतो फक्त देव आनंद करता पार्श्वगायन करत असे. याला अपवाद आहेत - तुम्ही लिहीले आहे तसे पडोसन सारखे पण अगदी एखाद दुसरे, व ते ही मुख्यतः बर्मन पितापुत्रांच्या संगीतात. इतरांनी तोपर्यंत त्याला तसा वापरलेला नाही - पण शक्यता अशी आहे की तो ही तोपर्यंत नायक म्हणूनच प्रयत्न करत असावा. हे सगळे वेळोवेळी वाचलेल्या माहितीतून. पण त्याची १९६९ च्या आधीची गाणी पाहिलीत एखाद दुसरा अपवाद वगळता देव आनंद करता व स्वतःकरता गायिलेलीच असतील.
१९६९ साली आलेल्या आराधना मधून राजेश खन्नाचा तर "स्टार म्हणून" उदय झालाच पण किशोर एक पार्श्वगायक म्हणून एकदम टॉपवर गेला. कारण नंतर पहिली काही वर्षे राजेश खन्ना करता व नंतर अमिताभकरता त्याचाच आवाज जास्त वापरला जात असे. मग ७० च्या दशकात गाण्यांची स्टाइलही बदलली. त्यामुळे किशोर इतका डॉमिनंट झाला की रफीही मागे पडला.
तरुणपणीचा लताचा आवाज म्हणजे
तरुणपणीचा लताचा आवाज म्हणजे सोन्याची बारीक , लवचिक तार!
स्वतंत्र भारताचा इतिहास
स्वतंत्र भारताचा इतिहास ज्याप्रमाणे २०१४ साली सुरू होतो तद्वतच बॉलीवूडचा इतिहास सुद्धा शाहरूख खानाच्या उदयाबरोबर सुरू होतो. शाखा निवृत्त झाल्यावर बॉलीवूड बंद होणार आहे. संपला आढावा.
उदयोन्मुख लेखकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही.
मायबोलीची काय खासियत आहे ना..
मायबोलीची काय खासियत आहे ना..... पहिल्या ३ ते ४ प्रतिसादातच हाणामारी सुरू होते.... रणकंदनच
तरुणपणीचा लताचा आवाज म्हणजे
तरुणपणीचा लताचा आवाज म्हणजे सोन्याची
बारीक , लवचिक तार! >> पूर्णपणे सहमत
@फारएण्ड - आपल्याला काय म्हणायचं आहे, ते समजलं नाही. किशोरकुमार सुरूवातीस स्वतः करता गात असले तरी त्याने काय फरक पडतो ? ती गाणी उत्कृष्ट होती. म्हणजेच गायक म्हणून किशोरकुमारांचा उत्कर्ष होत होताच ना.
Submitted by फारएण्ड on 23
Submitted by फारएण्ड on 23 June, 2023 - 21:07 >>> हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यासाठी राखीव असू देत. उत्तम चर्चा होईल.
या धाग्यावर किशोरच्या या गाण्याचा आढावा घेतला गेला तर छानच.
भास्कराचार्य तुम्ही मनोरंजन
भास्कराचार्य तुम्ही मनोरंजन शोधू नका. नावाशी तरी प्रामाणिक राहा
म्हणजेच गायक म्हणून
म्हणजेच गायक म्हणून किशोरकुमारांचा उत्कर्ष होत होताच ना. >>> ठीक आहे. इथे आपापले मत वेगळे असू शकते.
माझ्या दृष्टीने १९६९ पर्यंत तो मुकेश, रफी वगैरेंच्या "लीग" मधे नव्हता. मात्र नंतर लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांना मागे टाकून गेला. इथे आवाज, गायकी वगैरे मधे मागे टाकून गेला म्हणणार नाही. खुद्द किशोरही म्हंट्ला नसता - रफी वगैरे नावे इथे असताना.
उत्तम चर्चा होईल. >> टोटली. काल खुमखुमी आली होती. एकेक गायक, एकेक गीतकार, संगीतकार वगैरेंची इतकी वैशिष्ठ्ये, इतके वेगळेपण आहे की अगदी भरपूर चर्चा होईल. त्यात प्रत्येकाची आवड हे व्हेरिएबल आले आणि काही "ओपिनियनेटेड" लोक आले की आणखीनच
पण खुमखुमी आणि कंटाळा यात बहुतांश वेळा कंटाळा मात करतो.
पण खुमखुमी आणि कंटाळा यात
पण खुमखुमी आणि कंटाळा यात बहुतांश वेळा कंटाळा मात करतो. >>> करेक्ट. खूपदा सुचतं काय काय. पण लिहायला बसलं कि भीती वाटते कि बाप्रे, एव्हढं कधी उतरवणार !
माझ्या दृष्टीने १९६९ पर्यंत
माझ्या दृष्टीने १९६९ पर्यंत तो मुकेश, रफी वगैरेंच्या "लीग" मधे नव्हता. मात्र नंतर लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांना मागे टाकून गेला. इथे आवाज, गायकी वगैरे मधे मागे टाकून गेला म्हणणार नाही. >> +१ किशोर ने स्वतः सांगितले आहे कि सत्तरी पर्यंत तो अॅक्टींग नि दिग्दर्शन ह्यावर अधिक लक्ष देऊन होता नि गायन हा स्वातं:सुखाय प्रकार होता. बर्मन पिता पुत्रांच्या आग्रहामूळे त्याचा कल गायनाकडे अधिक गेला. एकूण म्हटली गेलेली गाणी नि स्पेसिफिक गायकांने गायलेली गाणी ह्याचे पर्सेंटेज बघितले कि हा मुद्दा उघड होतो.
disclaimer : वरचे पोस्ट मला असलेली माहिती आणि माझी मते ह्यावर आधारित आहे.
साजिरा, भास्कराचार्य जे काही
साजिरा, भास्कराचार्य जे काही गणित वगैरे करत होते, ते मनोरंजनासाठीच की.
“१९६९ पर्यंत तो मुकेश, रफी
“१९६९ पर्यंत तो मुकेश, रफी वगैरेंच्या "लीग" मधे नव्हता. मात्र नंतर लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांना मागे टाकून गेला. ” - बरोबर आहे. १९७५/७६ साली मुकेशचं निधन झालं. १९८० साली रफीचं. पण रफीच्या आयुष्यातली शेवटची काही वर्षं, विशेषतः राजेश खन्ना आणि नंतर अमिताभ (व्हाया विनोद मेहरा प्रभृती) ह्यांच्या उदयानंतर आणि शम्मी कपूर, राजेंद्र कुमार ई. मंडळींच्या अस्तानंतरचं संगीतही बदलत गेलं. किशोर कुमार १९८७ साली हे जग सोडून जाईपर्यंत त्याने बदललेल्या काळावर आणि संगितावर स्वतःची खूप मोठी छाप सोडली.
राहुल, हो सध्या माबोवर येणं
राहुल, हो सध्या माबोवर येणं खूप कमी होतंय. जिव्हाळ्याचा विषय म्हणून धागा उघडला. तुमचा प्रतिसाद वाचून छान वाटलं!
@फारएण्ड - उत्कर्ष म्हणजे
@फारएण्ड - उत्कर्ष म्हणजे विकास या अर्थाने म्हणालो मी. कलाकलाने विकसित होतच तर एखादे व्यक्तिमत्त्व लोकप्रिय होते.
आराधनाच्या आधी देखील किशोर
आराधनाच्या आधी देखील किशोर कुमार ए-लिस्टर होता. एस्डीने त्याला घेउन एक्से-एक गाणी डिलिवर केली - गाईड, जुल थिफ, नौ दो ग्यारा, प्रेम पुजारी, पेइंग गेस्ट, तीन देवियाँ (हा पिक्चर तर गाण्यांचा खजिना आहे); या व्यतिरिक्त पडोसन, चलती का नाम गाडी, दिल्ली का ठग वगैरे आहेतच. "रुप तेरा मस्ताना" ने त्याला पहिलं अॅवॉर्ड मिळवुन दिलं परंतु तोवर तो चांगला एस्टॅब्लिश झाला होता...
सिक्स्टीजची गाणी देवसाब करता गायली गेली यामागचं कारण त्याचा आवाज देवसाब करता(च) सूट करत होता हे नसुन संगितकार एस्डी हे आहे. तलत, मुकेश प्रमाणे किशोर कुमार देखिल मोजक्याच नायकांकरता आवाज देत होता (रादर त्याचा आवाज सूट होत होता) असा अंदाज बांधणं त्याच्या वर्सटिलिटिवर अन्याय करणारं आहे...
चला इथे सुध्दा शाखा आला आणि
चला इथे सुध्दा शाखा आला आणि धागा धन्य झाला
काहीही लिहा पण नूरजहान आणि
काहीही लिहा पण नूरजहान आणि सज्जाद हुसेन यांना अनुल्लेखाने मारू नका.
He called Talat Mahmood "Galat Mehmood" (Wrong Mehmood) and Kishore Kumar "Shor Kumar" (Noisy Kumar), and also criticised Naushad 's music.
Pages