प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा

Submitted by प्रथमेश काटे on 22 June, 2023 - 06:53

Part 1

( हा लेख दोन तीन भागात अपलोड केला जाईल. आणि हा लेख मला असलेली माहिती आणि माझी मते यांवर आधारित आहे. यात मला ज्या गायक, गीतकार, संगीतकारांबद्दल माहिती आहे, त्यांचाच उल्लेख केला आहे. आणि जे कलाकार खास आवडतात, भावतात त्यांच्याबद्दलच थोडं विस्ताराने लिहिले आहे. )

१९४२ ला मन्ना डे यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने हळूवार मोहम्मद रफी ऐकू येऊ लागले. १९४९ सालच्या ' महल ' चित्रपटातील ' आयेगा आनेवाला ' या गाण्यापासून लतादीदींच्या कारकिर्दीची यशस्वी घोडदौड सुरू झाली होती.

५० चे दशक सुरू झाले, आणि ' आवारा हूं ' म्हणत मुकेशनेही दणक्यात एन्ट्री घेतली. आणि मला वाटतं इथूनच हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला‌. ' या दशकातच शंकर - जयकिशन, ओ पी नय्यर, हेमंत कुमार यांसारख्या उत्कृष्ट संगीतकारांच्या, साहिर लुधियानवी, हसरत जयपूरी, इंदीवर इ. प्रतिभावंत गीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मन्ना डे ( प्यार हुआ इकरार हुआ है, तू प्यार का सागर है इ. ) मोहम्मद रफी ( सर जो तेरा चकरायें, उडीं जब जब जुल्फें तेरी इ. ) लतादीदी मंगेशकर ( मेरा दिल ये पुकारे आजा, अपलम चपलम, ramaiya vastavaiya इ. ) यांसारख्या गायकांना शब्द सौंदर्याने नटलेली, श्रवणीय, सुरेल चालींनी सजलेली आधिक उत्तमोत्तम गीते मिळू लागली. आणि या महनीय गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात ही गीते गाऊन त्यांची शोभा वाढविली‌.

प्रत्येक गायकाचे आपलं एक वैशिष्ट्य होतं. मन्ना डे यांचं गायन शास्त्रशुद्ध, शब्दोच्चार स्पष्ट असत. मुकेशच्या आवाजात करूणता, तरलता असे. Emotional songs आणि मुकेश असं जणू समीकरणच बनून गेलं होतं. मात्र याच दशकात " मेरा जूता है जपानी " सारखं अॅटीट्यूड दर्शविणारं मजेशीर गीत, "जीना इसी का नाम है " सारखं जीवन कसं जगावं हे शिकवत ओठांवर हलकंसं हसू फुलवणारं गाणं गाऊन आपण कुठल्याही एका विशिष्ट चौकटीत राहणारे गायक नाही हेही त्यांनी दाखवून दिलं.
मोहम्मद रफींचं गाणं म्हणजे निखळ गोडवा. प्रत्येक ओळीला, प्रत्येक शब्दाला हळूवारपणे, प्रेमळपणे गोंजारल्या सारखं गाण्याची त्याची शैली, आणि त्याचा सुमधुर आवाज मुग्ध करून टाकतो. " सर जो तेरा चकराये " सारख्या गाण्यात सुद्धा त्यांनी जो गोडवा ओतला आहे तो अगदी लाजवाब आहे.

लतादीदींबद्दल बोलावं तितकं कमीच. कुठल्याही प्रकारातलं गाणं असो ते त्यांच्या आवाजात चपखल बसायचं. सुरांशी, तानांशी त्या सहजगत्या खेळायच्या.

दशकाच्या शेवटाला किशोरकुमार नामक एका तरूण, हरहुन्नरी गायकाचा उदय होऊ लागला होता. आणि ६० च्या दशकात त्यांचा अधिकच उत्कर्ष झाला. गाण्याचं कुठलंही प्रशिक्षण न घेताही इतर नावाजलेल्या गायकांसमोर कुठेही कमी न पडता त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. " हाल कैसा है जनाब का, एक लडकी भिगीं भागी सी " सारखी अवखळ, स्वच्छंदी गाणी असोत, " मेरे मेहबूब," सारखे emotional song असो किंवा " मेरे सामने वाली खिडकी में, " " कोरा कागज था ये मन मेरा," " वोह शाम कुछ अजीब थी " इत्यादी सुंदर भावगीते असोत सर्व श्रेणीतील गाणी पूर्ण न्याय देऊन गात त्यांनी सुरुवातीच्या काळातच आपली versitality दाखवून दिली.
दरम्यान लक्ष्मीकांत - प्यारेलाल या संगीतकार जोडीने पदार्पण केलं. आणि लवकरच दर्जेदार, नितांतसुंदर अशा गीतांची निर्मिती करत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. याच दशकात आर. डी. बर्मन सारख्या अत्यंत ब्रिलियंट, प्रयोगशील आणि क्रिएटिव्ह संगीतकारानेही संगीतसृष्टीत पाऊल टाकले. ते दैनंदिन वापरातील वस्तूंमधून धून तयार करून त्याचा आपल्या गाण्यांमध्ये एखाद्या वाद्याप्रमाणेच खुबीने वापर करीत. ( उदा. मेरे सामने वाली खिडकी में या गाण्यात कंगव्याच्या दातांनी तयार केलेली धून ) त्यांनी काही मोजकी गाणी गायली देखील आहेत. त्यांच्या जराशा वेगळ्या Texture च्या आवाजाचीही पुढे क्रेझ निर्माण झाली.

क्रमशः
प्रथमेश काटे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> आय डोंट हॅव बर्डन ऑफ प्रुफ हियर.
हाव सो व्हेरी कन्वीनियन्ट! गाट टु मार्वल ॲट द लाजिक!

मन्ना डेंच्या पार्श्वगायनाची सुरुवात १९४२ मध्ये झाली हे माहीत नव्हतं. ही नवी माहिती मिळाली. धन्यवाद.

फा, बडे अरमानों से रख्खा है सनम तेरी कसम - इंदिवरचं हे गीत १९५१ मध्ये आलं. तेव्हा काळाचा विचार करता त्यांना साहिर, हसरतसोबत बसू द्या . त्याच काळातले शैलेंद्र, शकील, राजेंद्र कृष्ण प्रतिभावंत नसतील किंवा ते इ. मध्ये असतील.

माहिती उपलब्ध असणं हे आजकाल तरी फार सोपं आहे. आणि लेख बिख लिहायचा तर माणूस माहिती शोधेल. तेव्हा जे आले नाहीत, ते आवडीचे नाहीत असं सरळसोट सांगितलं तर सोपं जाईल.

अपलम चपलम आलं पण त्याचा संगीतकार सुटला.. ओ पी नय्यर आले , जुल्फेंही उडली , सी आयडी आला. पण शमशाद, गीता आल्या नाहीत . आणखी एका नावाचा उदय कधी होतो की होतच नाही (माहिती नसल्याने वा आपल्या टेस्टमध्ये बसत नसल्याने) याबद्दल किंचित उत्सुकता आहे.
---
प्रथमेश काटे, वर मोरोबांनी तुम्हांला अपरिपक्व म्हटलंय असं वाटतं.

फा, बडे अरमानों से रख्खा है सनम तेरी कसम - इंदिवरचं हे गीत १९५१ मध्ये आलं. तेव्हा काळाचा विचार करता त्यांना साहिर, हसरतसोबत बसू द्या . >>> हो Happy मुळात हे तीन त्यांचे आवडीचे गीतकार असतील तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम असायचे कारण नाही.

या विषयावर इतके प्रतिसाद आले कारण लोकांच्या प्रचंड आवडीचा विषय आहे. लेखकाने आपली काय ती भूमिका स्पष्ट करावी पण प्रत्येक प्रतिक्रियेने इतके ऑफेण्ड होण्याची गरज नाही. लिहा पुढे. विषय आवडीचा असल्याने वाचू व काय वाटते ते लिहूच. फक्त विरोधातील मते सुद्धा स्वीकारायची किंवा किमान इग्नोअर करायची तयारी ठेवा.

लेख नाही आवडला (हे प्रांजल्यतापूर्वक आणि अनाक्रमकपणे सांगून माझे दोन तीन शब्द संपवतो).

'प्रवास अमेरिकन प्रेसिडेंट्सचा' असं शीर्षक देऊन 'मला फक्त ट्रंपच आवडतो', 'तो सोडून मला कोणाबद्दल माहिती नाही, म्हणून इतरांबद्दल लिहिणारच नाही' असं म्हणून फक्त ट्रंपबद्दल लिहिलं, तर लोक त्यावर काहीतरी म्हणणारच. मग अगदी राजनी लिहिलेला लेख का असेना. Proud

@ वैद्यबुवा :-
मलाही वाटतं की जर हा लेख तुम्ही, तुम्हाला
असलेल्या माहितीच्या आधारावर लिहिला असेल तर
मग टायटल मिसलिडिंग आहे. टायटल वाचून
वाचकाची अशी धारणा होते की तुम्ही हिंदी
चित्रपट संगीताचा आढावा घेणार आहात > अशी तुमची कमेंट वाचल्यावर प्रथम तुम्ही सुज्ञ वाचक वाटला होतात. खरंतर तेही चुकीचं होतं, कारण कुणी जेव्हा एखाद्या विशिष्ट विषयावर लेख लिहितो, तो त्याच्या माहितीनुसारच लिहीणार हा कॉमन सेन्स आहे ; पण तुम्ही साध्या सरळ भाषेत मुद्दा मांडल्यामुळे मला तसा ( तुमच्या सुज्ञपणा बद्दल ) गैरसमज झाला होता ; पण जबरी पापड मोडून घेणं अशा भाषेने, आणि तुम्ही ओळख किंवा माझ्याबद्दल कुठलीही माहिती नसताना मला अपरिपक्व लेखकाची पदवी बहाल केल्याने तुम्ही काय आहात समजलं.

आणि विषय व्यापक असला तरी लेख हा कुणीही आपल्या योग्यतेप्रमाणेच लिहीत, त्यात सगळं सगळं आलं पाहिजे असा बालिश विचार तुम्ही स्वतः करता आणि कुणी आपली चूक सांगायला गेलं तर मान्य करत नाही यावरून आपण अपरिपक्व वाचक आहात असं तुम्हाला वाटत नाही का ?

लेखकाला नसतील घ्यायचे हे मुद्दे लक्षात तर ते
सांगतीलच. लोकं पण नाद सोडून देतिल नंतर. सिंपल >> हे मुद्दे लक्षात घेण्यासारखे नाहीतच. आणि 'नाद' सोडून देतील म्हणजे काय ? मी कारणाशिवाय उगीचच इतरांशी वाद घालणारा वेडसर वैगेरे वाटलो की काय? उलट मी अशा बालिश, निरर्थक कमेंट्स चा नाद सोडून द्यायची गरज आहे.

शीर्षक चूकीचे आहे हे सत्य आहे हो. मी ही उद्या उठून
सामवेदाचे भाषांतर असे शीर्षक लिहीन आणि लेखात
मला माहीत असलेल्या तीनच श्लोकांचे भाषांतर
दिलेले आहे ते गोड मानून घ्यावे असे लिहीन.>> एवढं अति करण्याची मुळीच गरज नाही आणि सामो असा आय डी ठेवून तुम्ही स्वतःला सामवेदाचं भाषांतर करण्यायोग्य समजता आहात की काय ? तसं असेल तर एकदा स्वतःचीच कमेंट पहा. त्यातला उर्मटपणा चा टोन दिसल्यावर आपला हा गैरसमज दूर होईल. आणि मी आपली माफी मागून माझा मुद्दा स्पष्ट केला होता. मग उगाच उगाच अशी उद्धट, अतिरेकी कमेंट करून फक्त आपल्या मनातली ठसठस व्यक्त करून काय साधलत ?

'प्रवास अमेरिकन प्रेसिडेंट्सचा' असं शीर्षक देऊन
'मला फक्त ट्रंपच आवडतो', 'तो सोडून मला
कोणाबद्दल माहिती नाही, म्हणून इतरांबद्दल
लिहिणारच नाही' असं म्हणून फक्त ट्रंपबद्दल
लिहिलं, तर लोक त्यावर काहीतरी म्हणणारच. >> कुणीही लेखक कुठलाही आपल्या माहितीच्या आधारावरच लिहीतो, हा एवढा कॉमन सेन्स न ठेवता लगेच दुसऱ्या ची खिल्ली उडवायला तयार राहणाऱ्या लोकांची धन्य आहे. करा. टीका करा, खिल्ली उडवा आणि चारचौघात आपला बालिशपणा सिद्ध करा‌.

प्र का Lol

अपरिपक्व ते मोरोबा म्हणाले ओ. मी नाही.

तुम्ही मयेकरांचे फ्रेंडं दिसता. काही लोकांचा आक्रमक्पणे यथेच्य समाचार घेताय अन मयेकरांना काहीच म्हणत नाही? ये बात कुछ हजाम नही हुई सरकार. Lol

मयेकर Light 1
Lol

मनोरंजक लेख !
पुढील अनेक भागांच्या प्रतिक्षेत

पण हे नुसते टायटलबद्दल नाही. लेखाचा टोन असा
आहे की १९४२ पासून टाइमलाइन धरली तर पुढच्या
घडामोडींचा काळानुसार समग्र आढावा असेल असे
वाटते. >> असे काही नाही.अजूनही इतर लेख वाचावेत. आपल्या लक्षात येईल की यात टोन वैगेरेंचा संबंध नाही. ही लेख लिहीण्याची बेसिक पद्धत आहे. समग्र आढावा असणं कसं शक्य आहे ? हा एक साधा लेख लिहीण्याचा छोटासा प्रयत्न आहे. आणि टीप वाचूनही आपण अस म्हणत असाल तर नो कमेंट्स. ' आणि कुठल्याही प्रकारातील गाणं लतादीदींच्या आवाजात चपखल बसतं असं मी म्हणतो. आपण त्यांची गाणी ऐकली तर आपल्याही लक्षात येईल.

किशोरकुमार चा ६० च्या दशकात उत्कर्ष झाला ' हे विधान चुकीचं असू शकतं. चूक मान्य करतो.

पूर्वीचं माहित नाही, पण अलीकडे हौशी अपरिपक्व
लेखकांची जरा अतीच चिरफाड चालू आहे असं वाटतं. >> न्यायाधीश महाराज एकदा लेख वाचा म्हणजे माझी परिपक्वता समजेल. आणि कदाचित आपली एखाद्या बद्दल माहिती नसताना त्याची योग्यता ठरवून टाकायची वाईट सवय दूर होईल.

प्रथमेश काटे
तुम्ही कँँपात रहात नाही. हा प्रॉब्लेम आहे.

एखादा लेख जेव्हा लेखक सार्वजनिक करतो तेव्हा आपण आपला वैयक्तिक विचार करून चालत नाही. त्याचे पडसाद सर्वत्र उमटणार. तुमचे वैयक्तिक अनुभव वाचकांना सर्वसमावेशक वाटायला हवेत.
वाचक आपल्याला अनुकूल मतंच नोंदवतील असे नाही. त्यांचे प्रतिकूल मतही खूप काही शिकविते ते स्विकारण्याची तयारी असावी. कोणही सर्वज्ञ नाही. वैचारिक देवाणघेवाण लेखक आणि वाचक दोघांना समृध्द करते.
त्यांची सर्व मतं तुम्हाला पटायला हवी असं नाही आणि तुमची सर्व मतं त्यांना पटायला हवी असं नाही . माझा अनुभव सांगतो मायबोलीवर बहुसंख्य वाचक, लेखक वेगवेगळ्या विषयात तज्ञ आहेत. इथं वैचारिक प्रगल्भता आहे. काही अपवाद असले तर उडदामाजी काळे गोरे....

@A M I T - थॅंक्यू सर. पुढच्या वेळी नक्कीच अधिक विस्ताराने लिहायचा प्रयत्न करेन.

लेखकाने आपली काय ती
भूमिका स्पष्ट करावी पण प्रत्येक प्रतिक्रियेने इतके
ऑफेण्ड होण्याची गरज नाही. लिहा पुढे. विषय
आवडीचा असल्याने वाचू व काय वाटते ते लिहूच.
फक्त विरोधातील मते सुद्धा स्वीकारायची किंवा
किमान इग्नोअर करायची तयारी ठेवा. > विरोधातील मते स्विकारण्याची तयारी आहेच ; पण त्या मतांना सबळ कारण तर असावं. मी desclaimer मध्ये स्पष्ट लिहिले आहे की माझ्या माहिती आणि मतांप्रमाणे लेख लिहिला आहे, आणि लेखक आपल्याला उपलब्ध माहितीवरूनच लेख लिहितो तसं वेगळे लिहायची गरज पडत नाही. आणि एवढ्या मेहनतीने तयार केलेल्या लेखावर अर्थहीन कारणांनी चुकीच्या पद्धतीने मत व्यक्त केली जात असतील तर मी प्रत्येक comment वर offend होणार. इग्नोअर वैगेरे करणार नाही.

माहिती उपलब्ध असणं हे आजकाल तरी फार सोपं
आहे. आणि लेख बिख लिहायचा तर माणूस माहिती
शोधेल. तेव्हा जे आले नाहीत, ते आवडीचे नाहीत असं
सरळसोट सांगितलं तर सोपं जाईल. शैलेंद्र, शकील, राजेंद्र कृष्ण प्रतिभावंत
नसतील किंवा ते इ. मध्ये असतील.>> मी माहिती शोधूनच लेख लिहिला आहे. आणि तुम्ही एकदा वरचा Desclaimer नीट वाचाच. मी शैलेंद्र यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. लेख नीट वाचलात तर लक्षात येईल. आणि अनेक गीतकार होते हे मला ठाऊक आहे ; पण सगळ्यांची नावे मला माहिती नाहीत. आणि असती तरी प्रत्येकाचं नाव स्वतंत्रपणे लिहीणं शक्य नाही. त्यामुळे हो ते इ. मध्येच आहेत. आणि त्यांच्याही प्रतिभेची जाणीव मला आहे. उगाच टोमणे मारण्यात अर्थ नाही.

@केशवकूल - माफ करा मला समजले नाही सर. कॅंपात म्हणजे ? जरा समजावून सांगाल का ?

लेखात संपा दन करता येईल. टेस्ट चे पण स्पेलिन्ग चुकीचे आहे. > आता एडिट करण्यात अर्थ नाही. आणि कमेंट मधली स्पेलिंग चुकल्याने काय इतका फरक पडतो ? जाऊद्या हो.

@हर्पेन, येस - खूप आभारी आहे.

@वैयबुवा - आपण मला अपरिपक्व नाही म्हणाला असलात तरी तुम्हीही खूप काही म्हणालात. आणि मयेकर या नावाने कुठलीही कमेंट नाही.

@दत्तात्रय साळुंखे - नाही सर मी वैयक्तिक विचार करत नाहीये ; पण चूका काढताय, तर सबळ कारण हवं ना. मी मध्ये हा लेख माझ्या माहिती प्रमाणे आणि मतांप्रमाणे लिहिला असल्याचं सांगूनही जर तुम्ही यांचं नाव घेतलं नाही, ते तुमच्यासाठी प्रतिभावंत नसतील अशा खिल्ली उडवणाऱ्या कमेंट्स येत असतील तर याचा अर्थ लोक फक्त चूका काढण्यासाठीच लेख वाचतात किंवा तोही न वाचता फक्त चुका काढण्यासाठी लेख ओपन करून मनाला येईल त्या कमेंट्स करतात असं वाटतं. आणि आपले वैयक्तिक विचार सर्वसमावेशक कसे वाटू शकतात ? तुमचा मुद्दा समजला नाही.

>>>आपले वैयक्तिक विचार सर्वसमावेशक कसे वाटू शकतात ? >>>>
यालाच व्यक्तींकडून समष्टीकडं जाणं असं म्हणतात....तुम्ही जे लिहिता ते लोकांना आपल्या मनातलंच लिहिलंय असं जेव्हा वाटतं तेव्हा ते लिखाण लोकप्रिय होतं... generalization of personal experience....
थोड्याफार फरकाने माणसांचे बहुतेक अनुभव सारखेच असतात म्हणून वैयक्तिक अनुभव सर्वांचा होतो.

प्रवास हिंदी चित्रपट संगीताचा.
शीर्षकानुसार माहिती त्रोटक आहे हे मान्य.

पण असे शीर्षक टाकले तर त्रोटक माहिती देणे हा अपराध असल्यागत तुटून पडू नका लोकहो.

आता इथे प्रत्येक जण म्हणेल की आम्ही कुठे तुटून पडलोय. आम्ही सौम्य भाषेतच चूक काढलीय.

पण जेव्हा मूळ लेख बाजूला राहून पन्नास विरोधाचे प्रतिसाद एकत्रित येतात तेव्हा धाग्याकर्त्याला trolling चाच फिल येतो.

बघा विचार करा.
मी माझे मत मांडले.

~~~~~

असो
धागाकर्त्यांनी नवीन धागा काढावा जिथे चित्रपट संगीताची चर्चा होईल.
हा धागा शीर्षक चर्चेसाठी वापरता येईल Happy

जेव्हा मूळ लेख बाजूला राहून पन्नास विरोधाचे प्रतिसाद एकत्रित येतात तेव्हा धाग्याकर्त्याला trolling चाच फिल येतो.

सही.

तुम्ही इथे उत्तरं देत बसण्यापेक्षा हिंदी चित्रपट संगीताच्या प्रवासावर पुढचे लेख लिहून टाका. >>>

नको, त्यांची उत्तरं जास्त मनोरंजक आहेत.

काटेसर, अजून २ भाग म्हणजे ७-८ दशकांचा प्रवास १५०० ते २००० शब्दांचा होईल.
वर्तमानपत्रांतल्या छोट्या जाहिरातीत (क्लासिफाईड्स) २० ते ३० शब्द असतात. वधूकडून कधी कधी जास्त अपेक्षा असतात, तेव्हा ही छोटी जाहिरात ५०-६० शब्दांची सुद्धा होते.
८ सेंमी बाय १० सेंमी (विजिटिंग कार्डचा दुप्पट आकार) टेंडर नोटिस जाहिरातीमध्ये अंदाजे २५० शब्द असतात. आपण शाळेत निबंधच किमान ५०० शब्दांचा लिहायचो. दांडेकर पुलावर निबंध लिहा म्हटलं तर ५०० शब्द होतील. दांडेकर पूल किंवा भोपळे चौकाचा ७-८ दशकांचा इतिहास लिहा म्हणलं तर ५०००० शब्द सहज होतील.
दिवाळी अंकांतल्या कथा २५०० ते ५००० किंवा जास्तही शब्दांच्या असतात. लघुकादंबर्‍या अंदाजे २५००० ते ४०००० शब्दांच्या असतात. लता किशोर रफी दिलीप देव आनंद राज (इथले नव्हे) यांना विशेषणे लावा असं म्हटलं तरी हजारेक शब्द जमतील. लताच्या एकाच गाण्यात १०० ते २०० शब्द असतात.
मोदींच्या पत्रकार परिषदेत अंदाजे २००० ते ३००० शब्द बोअल्ले गेले. ते भारतात येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत, तेव्हा ५००० शब्द नक्की बोलले जातील.
इथल्या आजवर आणि भावी प्रतिसादांचे सर्व शब्द मोजले तर १ ते ५ लाख शब्दांची कादंबरी होईल. त्यात हा २०० शब्दांचा प्रतिसाद एक आकडेवारीची नोंद म्हणून ठेवतो.

राज यांनी दिलेली लिंक ऐकली पण ओरिजिनलच फार सुंदर आहे. लताचा आवाज सगळीकडे सूट होत नाही हेमावैम. निदान इथे सूट झालेला नाही असे मला वाटले.

Pages