बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन किलो कांदे आलेत. काय काय करता येइल? मला एका वेळी अर्धा कांदा पुरतो. का एक किलो ऑफिसच्या क्यांटिन मध्ये देउन टाकू? पण कांदे काही खराब होत नाहीत. ठेवुन ठेवुन वापरले तर वीस पंचविस दिवस नक्की जातील.

भजी, थालिपिठं, पोहे, पिठलं असे पदार्थ थोडे जास्त प्रमाणात करून फ्रीझ करू शकता.

कांदे मोठे मोठे चिरून थोड्याश्या तेलावर मोठ्या आचेवर कच्चट वास जाईतो खरमरीत परतून घ्या आणि गार करून मिक्सरमध्ये पेस्ट करून फ्रीझ करा. नंतर लागेल तशी कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीत ही पेस्ट वापरू शकता.

फ्रीजमध्ये जागा असेल तर फ्रीज मध्ये ठेवा खूप दिवस टिकतील>> फ्रिज रिकामाच आस्तो जवळ जवळ. इतके गोंडस कांदे आहेत. व महाग सुद्धा असतील. एक किलो आत ठेवुन देते. पेस्ट पण करुन ठेवते.

कांदे टिकतील चांगले सहा महिने पण,माझ्या सासरी,माहेरी 50 kg कांदे भरतात, म्हणजे डब्यात नाही पसरून ठेवतात बेड च्या खाली किंवा साठवणीच्या खोलीत,
अधे मध्ये हात फिरवावा लागतो फक्त ,2kg आरामात टिकतील महिना दोन महिने

आदु, आमच्याकडेही जाळीच्या ट्रॉलीमध्ये ठेवतो कांदे तीन/चार किलो आणुन. महिना दीड महिना पुरतात.
पण मुंबईला दमट हवामान आहे. तिथे त्यामानाने लौकर खराब होत असतील बाहेर ठेवले तर.

आम्ही पण कोकणात असेच घेऊन ठेवतो पावसाळ्याची बेगमी म्हणून घाऊकप्रमाणात कांदे ..पण ते उन्हात चांगले वाळवून मग पसरवून ठेवतो एका पडवीत तर टिकतात.
नुसते ठेवले तर मुंबईच्या हवेला पावसाळ्यात टिकणं अशक्य आहे. बटाटे ही टिकत नाहीत मोड येतात, कुजतात , काही ही होतं.

@ निल्सन
एकदा मी एका वास्तुशांतीला गेलेले तिथे लेमन कोरियांडर सूप वेलकम ड्रिंक म्हणून दिला होता>> wow मस्त आयडिया !
रेसिपी द्या ना अंजली.>> अर्रर्रर्र ... सॉरी हं मी खूप उशिरा पाहिले, मी फार हौशी स्वैपाक करणारी नाही ढोबळ रेसिपी सांगते
अगदी किंचित म्हणजे खूप किंचित तेलावर एक मिरची बारीक चिरून फ्राय करते त्यातच लगेच मूठ भर कोथिंबीर चिरून परतवून घेते , १/२ गाजर किसून परतवून घेते (optional )
मक्याचे वाफवलेले दाणे मिक्सरमधून अर्धवट काढून घेतलेले त्यात घालते , मीठ व जितके सूप व्हायला हवे तितके पाणी घालते उकळी आली की कॉर्न फ्लावर किंवा तांदळाचे पिठाची स्लरी घालून दाट झाले की त्यात भरमसाठ लिंबू पिळते (लिंबाचा आंबटपणा यायला, तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी पिळा ) गॅस बंद केल्यावर पातेले बाजूला करून जरा सूप निवले कि मग त्यात हवी तितकी पण भरपूर कोथिंबीर अगदी ssss बारीक चिरून घालते

कोथिंबीर उकळत्या पाण्यात घातली कि ती काळी पडते असे माझे झाले बरेचदा त्यामुळे अगदी शेवटी कोथिंबीर घालायची किंवा अगदी सर्व्ह करताना घालू शकता

(गाजर घातले तर सूप चा कलर बदलू शकतो सो बेताचे घाला किंवा नकोच, पाणी थंड घाला नाहीतर तेलाचं तवंग वरती येतो सूप पिताना )

माझ्याकडे (जर्मनीत )येत्या गुरुवारी दुपारी ३ वाजता (तेव्हा भारतात संध्याकाळचे साडे ६ वाजलेले असतील ) ६ जेष्ठ नागरिक येणार आहेत (६८ ते ८० अशी रेंज आहे ) ते सर्व मुंबईहून विमानाने प्रवास करून येणार आहेत. तर ते आल्यानंतर त्यांना चहा देणार आहेच पण वेळ अर्धवट असल्याने तोंडात टाकण्यासाठी काय बनवू हे कळत नाहीये. मला ते रेडी हवे आहे शक्यतो .. की जस्ट डबा /पातेले उघडून वाटीत /ताटलीत देता येईल.(कोणाला शुगर वगैरे त्रास नाहीये). हे लोक रात्री जेवायला हि असणार आहेत तेव्हा साधा भात व आमटी फुलके व फ्लॉवर मटार रस्सा किंवा भेंडीची भाजी, कोशिंबीर , ताक करणार आहे
चिवडा बाद (पात्तळ पोहे नाहीत)
ओल्यानारळाच्या वड्या करून ठेवीन , अजून काय करता येईल ?

ढोकळा/ खांडवी/ अळू वडी/ कोथिंबीर वडी/ इडली - चटणी/ पांढरा ढोकळा. ह्या पैकी एक काहीतरी.

आप्पे पण हे आयत्यावेळी करावे लागतील. चटणी.

साबुदाणा वडा, मिक्स भजी प्लेट. भाज्या व पनीरचे तुकडे बेसनात घालून तळायचे व बरोबर केचप.

थँक्स अश्विनीमामी सुचवल्याबद्दल , लांबच्या प्रवासातून आल्या आल्या लगेच तळण किंवा तळलेलं नको वाटतंय द्यायला (शक्यतो)
त्यातलेत्यात कोथिंबीर वडी करेन असे वाटतेय उंडा आदल्या दिवशी उकडून ठेवेन आणि ते येण्या आधी शॅलो फ्राय करून ठेवेन
इथे हल्ली नेहेमीचे जाडे साबुदाणे मिळत नाहीयेत Sad
प्रसादाच्या शिऱ्याच्या छोट्या मुदी आणि कोथिंबीर वडी विथ चहा हे करता येईल असं वाटतंय शिरा नाहीच खाल्ला तर डिनरच्या वेळी देईन
अजून एक म्हणजे काडीला टोचून चेरी टोमॅटो व मोझरेला चीझ, ऑलिव्ह, बेसिल पान असे (हे आयत्या वेळी विचारून करता येईल )
पहिल्याच दिवशी भारताच्या डिनर timing शी जुळवून घेणे कठीण जाईल सो ते लोक eve ६ किंवा ७ ला जेवतील असा अंदाज आहे.

अजून एक म्हणजे काडीला टोचून चेरी टोमॅटो व मोझरेला चीझ, ऑलिव्ह, बेसिल पान असे (हे आयत्या वेळी विचारून करता येईल>> हो हो ते ब्रुशेटा पण सुचवणार होते.

साधे सँडविच चालत असतील तर करायला एकदम सोपे आहेत. क्युकंबर चीज/ टमेटो चीज / कोल स्लॉ रशिअन सलाड घालून. ब्राउन ब्रेड वापरता येइल. किंवा मल्टिग्रेन. / दाभेली.

तिथे मिळत असतील तर मारी बिस्किटे, ग्लुकोज पार्ले जी बिस्किटे विथ टी नथिंग लाइक इट. कुकीज व फ्रूट्स, टी केक. एक एक पीस बास होईल. कट फ्रूट्स.

अश्विनी मामी >> साधे सँडविच चालत असतील तर करायला एकदम सोपे आहेत. क्युकंबर चीज/ टमेटो चीज / कोल स्लॉ रशिअन सलाड घालून.
येस्स हे बरं वाटतंय याचे ४ चौकोनी तुकडे करून ठेवले कि हातात घेऊन खाता येईल , पुदिना चटणी करून ठेवेन आधीच
मारी बिस्किटे, ग्लुकोज पार्ले जी बिस्किटे विथ टी>> होय चहा सोबत मारी ग्लुकोज व साधे टोस्ट असे देईन आणून ठेवली आहेत घरी मोनॅको पण आहेत
आता लिहिताना लक्षात आले की पॅटिस करता येतील साधी ब वड्यासारखी/चमचमीत भाजी करून इथे शीट्स मिळतात त्यात भरून १० मिन बेक करता येईल
त्या शीट्स भाजी न भरता बेक केल्या तर आपल्या खारी सारखे खारी बिस्कीट बनते कोणते सुपरमार्केट माझ्यावर प्रसन्न होते यावर कोथिंबीर वडी कि सँडविच ते ठरवते (मला जेव्हा जे अगदी हवे म्हणजे हवेच असते त्या वेळी बरोब्बर सुपर मार्केट मध्ये ती गोष्ट संपलेली असते )

done म आता .. चहा-बिस्कीट, कोथिंबीर वडी किंवा सँडविच किंवा पॅटिस, शिऱ्याच्या छोट्या मुदी

चहा, कॉफी सोबत ढो़कळा, सुरळीची वडी, कोथिंबीर वडी हे पर्याय आणि कुकीज बिस्किट्स + काही फळं असतील तर ती (सगळं टेबलवर सेल्फ सर्व्ह मांडून ठेवायचं, ज्याला जसं लगेल तसं घेऊन खाता येइल) एकदम हलका - फुलका प्रकार जमेल माझ्यामते. कारण नंतर १.५-२ तासांत जेवायचंही आहे.

या आधी कधी परदेश प्रवास / परदेशी खाणे जास्त खाल्ले नसल्यास चीझ आणि कच्चे टॉमेटो / बेसिल हे अगदी पहिल्या दिवशी देऊ नका.
माहितीतले ,सवयीचे पदार्थ असू द्यात पहिले दोन तीन दिवस तरी.

प्रवासाची दगदग, इमिग्रेशनचे सोपस्कार. हवामानातला, भाषेचा बदल ; वेळेचा फरक या सगळ्या कारणांनी आधीच त्रस्त असणार पाहुणे .

मेधाशी सहमत..
मी चहा, बिस्किट, तयार कुकीज/ स्लाईस केक, ताजी फळे आणि तिखट मीठाच्या ओवा घालून केलेल्या शंकरपाळ्या ठेवल्या असत्या. त्या फार तेलकट होत नाहीत.

आता लिहिताना लक्षात आले की पॅटिस करता येतील साधी ब वड्यासारखी/चमचमीत भाजी करून इथे शीट्स मिळतात त्यात भरून १० मिन बेक करता येईल>> मी हेच सुचवणार होते पण ज्येनाचा आहार कमी असतो तेव्हा पॅटिस हेवी होतील मग डिनरला कुणी फारसे जेवणार नाहीत.
कोथिबिर वड्या, ढोकळा, खारी,बिस्किट आणी फक्कडसा जरा जास्त चहा हे पुरे होईल.

लांबच्या आणि तापदायक प्रवास करून आल्यावर काही तरी साधं, हलकं खाणं बरं वाटेल. पॅटिस, कोव, ढोकळा हे जरा पोटात बसणारे प्रकार वाटतात. उपमा/सांजा आणि चहा/कॉफी, बिस्किट्स करणार्‍याला सुटसुटीत आणि खाणार्‍याला हलकं होइल.

विमानात सहसा बसल्याजागी खाऊनपिऊन वैतागतात ज्येना असा अनुभव आहे. चहा/कॉफी हवीच, पण नंतर दीडदोन तासांत जेवायचंच असेल तर नुसता (पोहे नाहीत म्हणालात, तेव्हा) कुरमुर्‍याचा किंवा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आणि बिस्किटं इतकंच ठेवलंत तरी खूश होतील. त्यांना कधी अंघोळी करतो आणि गरम साध्या घरगुती जेवणाचे दोन घास खाऊन गुडूप होतो असं झालेलं असतं. Happy

स्वाती मला पण हेच वाटत , अगदीच वाटत असेल तर कुरमुऱ्याचा चिवडयाच्या जोडीला थोडा गोडाचा शिरा ठेवू शकता खाल्ला तरी बेस्ट नाही तरी बेस्ट. आणि एवढा स्वयंपाक करून शिरा करणं कठीण वाटत असेल तर कप केक आणू शकता किंवा आदल्या दिवशी ही करून ठेवू शकता. अगदीच कोणाला वाटलं तर ते खाऊ शकतात.

अमित Lol
ज्येनांना ब्रेड सहसा झेपत्/आवडत नाही असा अनुभव आहे माझा. आल्या आल्या चहा, बिस्किटे, चिवडा, बाकरवडी इ. बस झाले . नंतर जेवणाचा बेत छानसा असेलच.

एकांनी सीमांत पूजनात खिचडी कढी चा मेनू ठेवला होता.लोकांनी नावं ठेवली.पण मी भरभरून स्तुती केली.फक्त ती खिचडी नॉर्थ इंडियन प्रभाव वाली नाही पाहिजे, लसूण वाली.प्लेन मूग डाळ आणि तांदूळ आणि फार तर खोबरं.

अमित Biggrin
परत एकदा - आपण ज्येना दृष्टिकोन ठेवून काही तरी साधं करतो ते त्यांच्या नजरेत रीड- फालतू असतं हां!

Pages