बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजु, मस्त वर्णन..
हा धागा आता "बेत काय करावा" वरुन आता "डोजे कसं करावं" असा झालाय Wink

मस्तं वर्णन सगळी.
अशी आगळी वेगळी पंगत असेल तर हरकत नसल्यास फोटो टाकावेत हि विनंती Happy
आयडियाज मिळतात Happy

स्मिता छान फोटो आणी डोजे चर्चा -मेनु अजुनच भारी.
अमराठी पन भारतिय २ कुटुंबाना बोलविले आहे. हा मेनू कसा वाटतो?>>> आशु, अमराठी लोकाना खपुन केलेल्या पुपोच काहिच कौतुक नसत आणी ते आवडुन खातही नाहित हा स्वानुभव आहे त्यामुळे दुसरा गोड पदार्थ ठेवण्याचा सल्ला देइल.

प्राजक्ता काल मेनू हीट्ट झाला. पुपो खूप आवडीने खाल्ल्यात आणि गोड-स्पायसी हे कॉम्बी खूप आवडले.
पण मागे दुसर्या ग्रूप ला खानदेशी भरीत मनापासून आवडले नव्ह्ते, हे खरं.
व्यक्ति तितक्या प्रकृती Happy

मला स्नॅक्स टाईप काहीतरी करून न्यायचं आहे, साधारण १० बायका आहेत. थोडं डाएट फ्रेंडली किंवा हेल्दी असं काहीतरी डोक्यात आहे, आणि टेरेस वर असल्यामुळे पटकन हातात घेऊन खाता येण्यासारखं करायचंय. रव्याचा केक एक डोक्यात आहे आणि किंवा ड्राय फ्रुट बॉल्स (बिना साखरेचे) पण तिखट काय न्यावं? मिनी सँडविचेस किंवा ढोकळा? सॅलड ही डोक्यात येतं, प्लिज काही सजेशन्स द्या ना

मिक्स भाज्यांचे आणि मिक्स पिठे किंवा भाजणी घालून मुटके , आधी वाफवून आणि मग थोड्या तेलावर तिळाच्या फोडणीत परतून.
साबुदाण्याचे आप्पे - चटणी
कोथिंबीर वड्या
मिनी ठेपले
किंवा गरम टोमॅटो सूप न्या..थोडा खटाटोप पडेल..पण आवडेल सर्वांना !!

मी संक्रांति हळदीकुंकू ला केलेला बेत ..सगळ्यांना खूपच आवडला म्हणून इथे देत आहे

कॉफी

रगडा पॅटिस
शेव खमणी
कोथिंबीर वडी
चितळे बाकर वडी
भडंग (लहान मुले पण होती म्हणून)

तीळ बर्फी
पान बर्फी (गुलकंद घालून)
मलाई बर्फी
Picture1.jpg

मस्त ! भरभक्कम मेनु
कांदा टॉमेटॉ चिरून ठेवलेला ३ कप्प्याचा कंटेनर आवडला.

मी एका गुजराती आणि एका पंजाबी कुटुंबाला लंच ला बोलावले आहे .. ११ मोठे आणि २ लहान लोकं आहेत .. कृपया मेन्यू सुचवा .. पूर्ण व्हेज मेन्यू किंवा व्हेज आणि नॉन-व्हेज कॉम्बिनेशन चालेल

शाही रायता
ढोकळा
थेपला / आळूची वडी (पत्री)
कोशिंबीर
स्विट डीश - गाजराचा हलवा

वेगळी भाषिक लोकं असं म्हणत नाहीत का, आम्हाला टिपिकल मराठी जेवायचं आहे, सोपं होईल ना आणि त्यांनाही वेगळं मिळेल.

गुजराती आणि पंजाबी..कुटुंब मिळून फक्त तीन जणं ? एक मोठे आणि दोन लहान?
दीड दीड जणांचे कुटुंब आहे की काय?

त्यांनी काहीच म्हटलं नाहीये कि गुजराती जेवण हवे कि पंजाबी कि मराठी ... मी ईथे सांगतले कारण मेनू सुचवताना जनरल आयडिया असायला .. headcount update केलाय ... धन्यवाद

सर्व प्रकारच्या भाज्या आवडीने खाणारी मंडळी असतील तर
बटरनट स्क्वॉश ची भाजी ( मृण्मयीची रेसिपी आहे मायबोलीवर ) . झुकिनीचा कोरोडा ( परत मृची रेसिपी) , अंबाडी , अख्खा मसूर , प्रज्ञा९ च्या रेसिपीने भेंडी यातले दोन प्रकार ,
सुरळीच्या वड्या, काकडीची कोशिंबीर
वैदर्भीय चिकन करी / दगडू तेली चिकन
मसाले भात , पोळ्या

गोड गाजर हलवा / शेवयांची खीर

पनीर , राजमा, काबुली चणे आणि बटाटे घालून काहीही करू नका Happy

शेवेची भाजी, पोळ्या, भेंडी ची भाजी मुलांसाठी, कढी, मुगाची खिचडी, पापड, सॅलड
गोड जिलबी अथवा गाजर हलवा अथवा कलाकंद

थंडी त मिळणाऱ्या लाल रसरशीत गाजराचा सिझन सम्पलाय ना?
मला तरी केशरी गाजरांचा हलवा म्हणजे शिक्षा वाटते .

उन्हाळ्यात कस्टर्ड, फ्रुट सॅलेड, थंड रसमलाई, जेवणानंतर आइस्क्रीम, मँगो मिल्कशेक वगैरे ट्राय करायला हरकत नाही

वेगळी भाषिक लोकं असं म्हणत नाहीत का, आम्हाला टिपिकल मराठी जेवायचं आहे, सोपं होईल ना आणि त्यांनाही वेगळं मिळेल.>>>> +1
आपला सणावाराचा टिपीकल मेन्यू ठेवा. कढी केलीत तर खीर नको. गा ह, गुजा, बासुंदी हे आधी करून ठेवता येतील...

त्यांनी काहीच म्हटलं नाहीये कि गुजराती जेवण हवे कि पंजाबी कि मराठी ... मी ईथे सांगतले कारण मेनू सुचवताना जनरल आयडिया असायला .. headcount update केलाय ... >>> अहो मी उपहासाने नाही विचारलं , सहजच विचारलं.

उकडुन बटाट्याची मटार घालुन भाजी
पालक घालुन दाल किवा दाल फ्राय
जिरा राइस्/पुलाव
बुन्दी रायता
कॉकेटेल समोसा/सुरळीच्या वड्या
पोळ्या/पराठे रेडिमेड
आइस्किम/फ्रूट सॅलेड

Pages