बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्लवी, प्रसादाचा शिरा सगळ्यानाच आवडतो तर , प्रसादाचा शिराच पोटभरीचा का नाही करत .

पल्लवी, प्रसादाचा शिरा सगळ्यानाच आवडतो तर , प्रसादाचा शिराच पोटभरीचा का नाही करत .> मंजूताई, प्रसादाचा शिरा घरी करणार आहे आणि तो गरम राहण्यासाठी काही पर्याय नाही. इथल्या(ब्रिस्बेनच्या) थंडीत, थंड शिरा प्रसाद पुरता चालून जाईल. गाजर हलवा केटरर आणेल त्यामुळे तो गरम राहायची सोय करेल. 
तुम्ही आंबट डिश हवी म्हणाल वाटलेलं >  Happy Happy

घरात कोथिंबीरीची मोठी जुडी आणली. नेहमीच्या जेवणासाठी थोडी वापरली, पण आता उरलेल्या कोथींबिरीचे काय करावे हे कळत नाही.
कोथिंबीर वडी, थालीपीठ हे पदार्थ सोडून इतर कोणता पदार्थ सुचवाल का?

चटणी.
कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, लसूण, थोडं दाण्याचं कूट, थोडं सुकं खोबरं - सगळं मिक्सरवर बारीक करायचं.

Sandwich साठी चटणी करून freezarmadhe ठेवा.
कोथिंबीर,त्याच्या अर्धा पुदिना, हि. मि,आले, डाळे,मीठ,एकत्र वाटून लिंबू पिळून ठेवावे.

फ्रिज मधे राहते छान!! सावलित सुकवुन
ठेवता येइल
पराठे / पुर्या छान होतात,सुरळिच्या वद्या, चटणी करुन फ्रिज करा.
कोथिबिर वद्यासाठिचे रोल करुन फ्रि़ज करता येइल
हवे तेव्हा कापुन तळा.
कोथिबिर समोस्याचि रेसिपी अन्नपुर्ना मधे आहे.

सावलीत सुकवून नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.
हातावर चुरडून कोणत्याही भाजीवर कसुरी मेथी सारखी पेरता येते. खूप चविष्ट लागते

कोथिंबीरीची ताकातली भाजी किंवा भिजवलेले डाळ दाणे घालून बेसन लाऊन पाण्यातली पातळ भाजीही करतात. अजून एक भाजी प्रकार म्हणजे भिजवलेली मुगडाळ आणि कांदा घालून परतून केलेली भाजी.

भजीही छान होतात.

मीरा, हो ना ! न तळता फ्रीजमध्ये ठेवारच्या रोज दोन चार दोन्ही जेवणात मटकावयाच्या Happy

लेमन कोरिएंडर सूप करा ना.. लै भारी लागते त्यात जरा मक्याचे वाफवलेले दाणे पण घाला>>> रेसिपी द्या ना अंजली. एकदा मी एका वास्तुशांतीला गेलेले तिथे लेमन कोरियांडर सूप वेलकम ड्रिंक म्हणून दिला होता. त्यात क्रश मक्याचे दाणे होते. तो इतका भारी होताना ना की त्याची चव अजून पण विसरू शकत नाही. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय केला पण तसा काही मिळाला नाही.

Pages