Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> व्हिस्कॉसिटीसाठी
>>> व्हिस्कॉसिटीसाठी विष्यंदिता
इन्टरेस्टिंग!
'फोर्स'साठी 'प्रेरक'ही वाचल्याचं आठवत नाही आधी. 'बल' म्हणत असू आम्ही मराठीतून शास्त्र शिकणारे धाडसी जीव.
विष्यंदी प्रेरक हे viscosity
विष्यंदी प्रेरक हे viscosity-inducing agent सारखे वाटले.
संप्रेरक (हॉर्मेन्स) आणि
संप्रेरक (हॉर्मेन्स) आणि उत्प्रेरक (कॅटलिस्ट) हे दोन शब्द आठवले त्यावरून.
विष्यंदिता, गर्भध>>
विष्यंदिता, गर्भध>>
दोन्ही छान !
मध्यंतरी जुन्या काळचा काही
मध्यंतरी जुन्या काळचा काही पत्रव्यवहार वाचण्यात आला.
पत्राचा मायना लिहिताना व्यक्तींच्या नावापुढे 'साहेब' लिहीताना त्या साहेबचे एक वैशिष्ट्यपूर्ण लघुरूप असायचे :
रावसोा , आप्पासोा.
( शेवटी जास्तीचा काना वापरलाय )
जिंदगी गुलजार है मध्ये
जिंदगी गुलजार है मध्ये कशफच्या तोंडी सत्यानास हा शब्द दोनदा ऐकू आला. नवल वाटलं. शब्दकोशात
सत्यानाश = सर्वनाश हा शब्द उर्दूत आहे का ते पाहिले नाही.
नाश हा शब्द शोधला तर सं. नश् = नष्ट होणें; फ्रेंजि. नश् आर्मे. नस अशा व्युत्पत्ती ( अवांतर - तीनही जोडाक्षरे असलेला शब्द) दिसल्या. यातले सं - संस्कृत. आर्मे = आर्मेनियन? पण फ्रेंजि = ?
फ्रेंजि व्युत्पत्ती असलेले ४५ शब्द आहेत ते पाहिले तर प्राकृत इ. सारखी भाषा वाटते.
आणखी अवांतर - शब्दकोशात वापरलेल्या संक्षिप्त रूपांची यादी दिलेली असते. ती शोधायचा प्रयत्न अयशस्वी झाला. पण हा खजिना मिळाला.
शब्दकोषात कुठेच त्या
शब्दकोषात कुठेच त्या लघुरूपांचे अर्थ दिलेले दिसत नाहीयेत.
पण भरत, तुम्ही जे ४५ शब्द शोधले आहेत, त्यात सातवा 'गहूं' (पृष्ठ ९८४) शब्द बघा. पोर्तुजि. गीर, गील, फ्रेंजि. गीव - असं लिहिलंय.
जर पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज मूळ असलेला असा अर्थ असेल तर फ्रेंजि म्हणजे फ्रेंच मूळ असलेला असू शकेल का असं वाटलं.
इथे कोणाला फ्रेंचची तोंडओळख असेल तर काही शब्द पडताळून पाहता येतील.
हाहा, गव्हाला फ्रेंचमध्ये गीव म्हणत असल्याचं गूगल ट्रान्स्लेटतरी सांगत नाहीये. जौद्या!
पोर्तुजिकडे लक्ष गेलं नाही.
पोर्तुजिकडे लक्ष गेलं नाही. पण पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज नसावं असं तुमच्यासारखंच गुगल ट्रान्सलेट वापरून शोधल्यावर वाटतंय.
जर पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज
जर पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज मूळ असलेला असा अर्थ असेल तर फ्रेंजि म्हणजे फ्रेंच मूळ असलेला >> अच्छा. हे नाहीये का? मी दोन्ही हेच गृहीत धरत होतो.
साो - साहेब हे एकोणिसाव्या
साो - साहेब हे एकोणिसाव्या शतका अखेर सर्रास वापरलं जाई
भरत, "खजिन्या" बद्दल खास आभार
भरत, "खजिन्या" बद्दल खास आभार
चांगली चर्चा. वाचतोय. 'खजिना'
चांगली चर्चा. वाचतोय.
'खजिना' उत्तमच !
देहजीवा
देहजीवा
वेश्येसाठी गणिका आणि नगरवधू यासह एकेजागी “देहजीवा” हा शब्द योजलेला दिसला.
भरत, "खजिन्या" बद्दल आभार !
भरत, "खजिन्या" बद्दल आभार !
देहजीवा >>> छान शब्द !
देहजीवा >>> छान शब्द !
....
रच्याकने ..
सध्या भारतीय उपखंडावर घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचे
Biparjoy (Biporjoy)
हे नाव बंगाली भाषेतील आहे.
त्याचा अर्थ आपत्ती (disaster)
त्याचा अर्थ आपत्ती (disaster) असा आहे गुगलनुसार.
Biparjoy (Biporjoy)
Biparjoy (Biporjoy)
मी घाईत 'विप्रजय' वाचले
विप्रजोय नावाचे एक बंगाली दीर्घकाव्य आहे, कवी बांगलादेशी कुणी नसरुल्लाह आहेत बहुतेक, नाव नक्की आठवत नाही.
BTW , बंगाली आणि मराठीत बरेच कॉमन शब्द आहेत. उदा :
पुरस्कार
आरोग्य
आनंद
ज्ञान
आदर्श
संगीत
नियम
प्रशिक्षण
सांस्कृतिक
अजूनही भरपूर आहेत, अर्थ सेम टू सेम. बंगाली उच्चार मात्र गोड गोड बोबडे - प्रोशिक्षण, शोंगीत वगैरे
उत्तम यादी !
उत्तम यादी !
त्यात दोन शब्दांची भर घालतो :
श्रीयुत
अनुवाद
( संदर्भ : शब्दरत्नाकर)
बट्टी
बट्टी
= गोठा. जनावरे बांधण्याची जागा
गतरम्यता
गतरम्यता
जुन्या आठवणींच्या एका धाग्यावर हीरा यांनी हा शब्द वापरलाय. Nostalgia साठी सर्वथा योग्य !
गतरम्यता वाचून स्मरणरंजन, अतीतमोह हे शब्द उगाच आठवले
स्मृतीरमणता
स्मृतीरममाणता
मशिनके पूर्जे ( हिंदी शब्द)
मशिनके पूर्जे ( हिंदी शब्द) - स्पेअर पार्टस
याला मराठीत काय म्हणु?
>>> गतरम्यता
>>> गतरम्यता
स्मरणरंजन बर्यापैकी रूढ आहे ना?
आणि 'नॉस्टॅल्जिक'साठी स्मृतिविव्हल?
स्मरणरंजन बर्यापैकी रूढ आहे.
स्मरणरंजन बर्यापैकी रूढ आहे.
गतरम्यता >>> प्रथमच ऐकला.
nostalgia मधील algos = pain
nostalgia मधील algos = pain
म्हणून,
स्मृतिविव्हल सुयोग्य वाटतो.
सामो "यंत्राचे भाग / सुटे भाग
सामो "यंत्राचे भाग / सुटे भाग" असा विचार तुम्ही केला असेलच. याव्यतिरिक्त काही सुचत नाही. (यंत्रांग असा विचार करून पाहिला पण ते ओढुन ताणुन वाटते.)
रच्याकने: बृहदकोष संस्थळावर
रच्याकने: बृहद्कोष संस्थळावर "भाग" हा शब्द शोधायला गेल्यास "This page is not working" असे नेहमी येते असे लक्षात आले. इतर कुठलाही शब्द दिला तर ते काम करते.
"भाग">>> खरंच की !HTTP ERROR
"भाग">>> खरंच की !
HTTP ERROR 500
मानव धन्यवाद. यंत्राचे सुट्टे
मानव धन्यवाद. यंत्राचे सुट्टे भाग बरोबर.
मला वाटते भाग बोस डी के नंतर
मला वाटते भाग बोस डी के नंतर भाग हा शब्द काही काळ पडद्यामागे गेला होता.
Pages