भाषा (२) : शब्दवेध व शब्दरंग

Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53

भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !

नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).

अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !

येऊद्या भाषेविषयी काहीही..

अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> व्हिस्कॉसिटीसाठी विष्यंदिता
इन्टरेस्टिंग!
'फोर्स'साठी 'प्रेरक'ही वाचल्याचं आठवत नाही आधी. 'बल' म्हणत असू आम्ही मराठीतून शास्त्र शिकणारे धाडसी जीव. Proud

मध्यंतरी जुन्या काळचा काही पत्रव्यवहार वाचण्यात आला.
पत्राचा मायना लिहिताना व्यक्तींच्या नावापुढे 'साहेब' लिहीताना त्या साहेबचे एक वैशिष्ट्यपूर्ण लघुरूप असायचे :

रावसोा , आप्पासोा.
( शेवटी जास्तीचा काना वापरलाय )

जिंदगी गुलजार है मध्ये कशफच्या तोंडी सत्यानास हा शब्द दोनदा ऐकू आला. नवल वाटलं. शब्दकोशात
सत्यानाश = सर्वनाश हा शब्द उर्दूत आहे का ते पाहिले नाही.
नाश हा शब्द शोधला तर सं. नश् = नष्ट होणें; फ्रेंजि. नश् आर्मे. नस अशा व्युत्पत्ती ( अवांतर - तीनही जोडाक्षरे असलेला शब्द) दिसल्या. यातले सं - संस्कृत. आर्मे = आर्मेनियन? पण फ्रेंजि = ?

फ्रेंजि व्युत्पत्ती असलेले ४५ शब्द आहेत ते पाहिले तर प्राकृत इ. सारखी भाषा वाटते.

आणखी अवांतर - शब्दकोशात वापरलेल्या संक्षिप्त रूपांची यादी दिलेली असते. ती शोधायचा प्रयत्न अयशस्वी झाला. पण हा खजिना मिळाला.

शब्दकोषात कुठेच त्या लघुरूपांचे अर्थ दिलेले दिसत नाहीयेत.
पण भरत, तुम्ही जे ४५ शब्द शोधले आहेत, त्यात सातवा 'गहूं' (पृष्ठ ९८४) शब्द बघा. पोर्तुजि. गीर, गील, फ्रेंजि. गीव - असं लिहिलंय.
जर पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज मूळ असलेला असा अर्थ असेल तर फ्रेंजि म्हणजे फ्रेंच मूळ असलेला असू शकेल का असं वाटलं.
इथे कोणाला फ्रेंचची तोंडओळख असेल तर काही शब्द पडताळून पाहता येतील.

हाहा, गव्हाला फ्रेंचमध्ये गीव म्हणत असल्याचं गूगल ट्रान्स्लेटतरी सांगत नाहीये. जौद्या! Proud

पोर्तुजिकडे लक्ष गेलं नाही. पण पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज नसावं असं तुमच्यासारखंच गुगल ट्रान्सलेट वापरून शोधल्यावर वाटतंय.

जर पोर्तुजि म्हणजे पोर्तुगीज मूळ असलेला असा अर्थ असेल तर फ्रेंजि म्हणजे फ्रेंच मूळ असलेला >> अच्छा. हे नाहीये का? मी दोन्ही हेच गृहीत धरत होतो.

देहजीवा

वेश्येसाठी गणिका आणि नगरवधू यासह एकेजागी “देहजीवा” हा शब्द योजलेला दिसला.

देहजीवा >>> छान शब्द !
....
रच्याकने ..
सध्या भारतीय उपखंडावर घोंगावत असलेल्या चक्रीवादळाचे
Biparjoy (Biporjoy)
हे नाव बंगाली भाषेतील आहे.

Biparjoy (Biporjoy)

मी घाईत 'विप्रजय' वाचले Happy विप्रजोय नावाचे एक बंगाली दीर्घकाव्य आहे, कवी बांगलादेशी कुणी नसरुल्लाह आहेत बहुतेक, नाव नक्की आठवत नाही.

BTW , बंगाली आणि मराठीत बरेच कॉमन शब्द आहेत. उदा :

पुरस्कार
आरोग्य
आनंद
ज्ञान
आदर्श
संगीत
नियम
प्रशिक्षण
सांस्कृतिक

अजूनही भरपूर आहेत, अर्थ सेम टू सेम. बंगाली उच्चार मात्र गोड गोड बोबडे - प्रोशिक्षण, शोंगीत वगैरे Happy

उत्तम यादी !
त्यात दोन शब्दांची भर घालतो :
श्रीयुत
अनुवाद

( संदर्भ : शब्दरत्नाकर)

बट्टी

= गोठा. जनावरे बांधण्याची जागा

गतरम्यता

जुन्या आठवणींच्या एका धाग्यावर हीरा यांनी हा शब्द वापरलाय. Nostalgia साठी सर्वथा योग्य !

गतरम्यता वाचून स्मरणरंजन, अतीतमोह हे शब्द उगाच आठवले

>>> गतरम्यता
स्मरणरंजन बर्‍यापैकी रूढ आहे ना?
आणि 'नॉस्टॅल्जिक'साठी स्मृतिविव्हल?

nostalgia मधील algos = pain
म्हणून,
स्मृतिविव्हल सुयोग्य वाटतो.

सामो "यंत्राचे भाग / सुटे भाग" असा विचार तुम्ही केला असेलच. याव्यतिरिक्त काही सुचत नाही. (यंत्रांग असा विचार करून पाहिला पण ते ओढुन ताणुन वाटते.)

रच्याकने: बृहद्कोष संस्थळावर "भाग" हा शब्द शोधायला गेल्यास "This page is not working" असे नेहमी येते असे लक्षात आले. इतर कुठलाही शब्द दिला तर ते काम करते.

Pages