Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओम गुगलायन मह:>> हे आवडलं
ओम गुगलायन मह:>>
हे आवडलं
कालचीच गोष्ट.. मी डायरेक्ट
कालचीच गोष्ट..
मी डायरेक्ट कूकर मधेच फोडणी वैगेरे करुन आमटी करतो.. फोडणी केली.. डाळ वैगेरे टाकली.. चमच्यान ढवळल. आणि कुकर लावला.. चमचा गडबडित कूकर मधेच

नंतर सुद्धा ती आमटी खाताना सारखी पाल आठवत होती 
३-४ शिट्ट्या झाल्या.. झाकण काढले...आमटी परत ढवळताना काहीतरी घट्ट-घट्ट लागले... मी म्हणालो यात बटाटा कुठुन आला ? मी तर घातला नव्हता.. नंतर एकदम काहीतरी पिवळ-पिवळ दिसल... मी जोरात ओरडलो.. मला वाटल त्यात पाल किंवा तत्सम किटक पडला कि काय ..
नंतर ५ मिनिट तसाच बसलो घाबरुन.. मग धाडस करुन परत कूकर ढवळला तर चमचा होता...
चमच्याचा दांडा पिवळा होता..
गुगल देवो भव का >> मल्ल्या गुगल नको रे.. रक्षाबंधन आठवते मला मग
केदार कोणी गुगलीण राखी
केदार

कोणी गुगलीण राखी बाधायला आली होती का ?
मल्ल्या गुगल नको रे..
मल्ल्या गुगल नको रे.. रक्षाबंधन आठवते मला मग
केदार मला पण आठवले तुझे राखीचे प्रकरण.
केदार (तू पाच मिनिटं घाबरून
केदार
(तू पाच मिनिटं घाबरून बसलेला असतानाचं दृष्य इमॅजिन करून वेड्यासारखी हसतीए मी... :हहगलो:)
कशाला घाबरलास केद्या ? पटकन
कशाला घाबरलास केद्या ? पटकन कोणातरी चिन्या जपान्याला बोलवायच आणि घालायचा पाल-भात.
असुदे तुम्ही ते शोधून वाचाच
असुदे तुम्ही ते शोधून वाचाच इथेच कुठेतरी आसेल मागच्या पानांवर.
सगळे आपापल्या जागेवर आले आहेत
सगळे आपापल्या जागेवर आले आहेत तर? बरं वाटलं वाचुन. :फिदीफिदी:
बाकी चिन्गुडीच्या इडल्या खायल्या हव्या.
चिन्गुडी,परत अशा ईडल्या
चिन्गुडी,परत अशा ईडल्या केल्यास तर मुंबईत पाठवून दे. दगडफेक ला ईडलीचा पर्याय आहे
चिन्या जपान्याला बोलवायच आणि
चिन्या जपान्याला बोलवायच आणि घालायचा पाल-भात >>
अरे त्याना शिजलेल आवडत नाही.. कच्च खातात ते
नंतर एकदम काहीतरी पिवळ-पिवळ
नंतर एकदम काहीतरी पिवळ-पिवळ दिसल... मी जोरात ओरडलो.. मला वाटल त्यात पाल किंवा तत्सम किटक पडला कि काय ..
तु का उगाच आरडा ओरडा करतोस ?
जपानात हे काही नविन नाही..
आशुतोश्०७११ला अनुमोदन. आणि मग
आशुतोश्०७११ला अनुमोदन. आणि मग टिव्ही वर ब्रेकिंग न्युज येइल.
"अमक्या तमक्या ठिकाणी संतप्त जमावाने इडलीफेक केली. त्यात अमुक इतके जण जखमी झाले."
केदार, अहो माहिती खरी असली तरी नका हो सांगु, इथे ढवळायला लागल पोटात
आता वरण किंवा आमटी बघितली की काही खर नाही माझ. 
केदार्,हे तुझ वरण नॉन्-व्हेज
केदार्,हे तुझ वरण नॉन्-व्हेज दिसतय
गूगल आणि राखी ...........
गूगल आणि राखी ...........
आत्ता आठवलं मला
गूगल आणि राखी ...........
गूगल आणि राखी ........... वाचला तुझा किस्सा......
गूगल वर Rakhi शोधल्यावर समजेल
गूगल वर Rakhi शोधल्यावर समजेल काय ?
नमस्कार मंडळी, मी माबो ची
नमस्कार मंडळी,
आणि मग काय एकदम फिस्स्स................. 
मी माबो ची नवीन सदस्य आहे. मी देखील अट्ट्ल वेंधळी असल्यामुळे तर मला हा धागा खूपच आवडला...........एकदम भन्नाट किस्से आहेत सगळे आणि यातले काही मा़झ्याबरोबरपण घडलेले आहेत त्यामुळे जास्तच मजा आली.............
आता माझा एक किस्सा सांगते,
मी नवीन ऑफिसला जॉईन होऊन तीन-चारच दिवस झाले होते. तेव्हा माझ्या एक्स्टेन्शनला येणारे बहुतेक फोन हे आमचे एक वरिष्ठ सहकारी प्रशांत यांच्यासाठीच येत. त्यादिवशी ते थोडावेळासाठी बाहेर गेले होते, पण त्या दरम्यान त्यांच्यासाठी सलग पाच- सहा फोन येऊन गेले होते.............पुन्हा एकदा फोन वाजला........आणि पलीकडून प्रशांत एवढं ऐकू यायचा अवकाश तर मी आपलं प्रशांत सर बाहेर गेलेत.........(कुठे गेलेत याच्या तपशीलासह).........थोड्या वेळाने परत येतील.........वगैरे, वगैरे झाल्यावर त्यांच्यासाठी काही निरोप आहे का ........?असे विचारुन उत्तराची वाट बघत होते.......तेवढ्यात पलीकडून आवाज आला.........अगं मी प्रशांतच बोलतोय..............
नंतर दिवसभर इतर सहका-यांनी इंटरकॉम वरून फोन करून " प्रशांत सर आहेत का?" विचारून नुस्ता वैताग आणला............
काहीवेळेस मी आळस करुन
काहीवेळेस मी आळस करुन कोणाकोणाचे मोबाईल नंबर्स नाव सेव्ह न करता ठेवायचो, ती सवय मोडायला कारणीभूत झालेला किस्सा.
एकदा फावल्या वेळात मी काही जुने वा नको असलेले नंबर्स मोबाईलवरुन डिलीट करत होतो. अर्थात त्यात वर सांगितल्याप्रमाणे काही नुसतेच नंबर्स होते. तेव्हा आधी फोन करुन मगच डिलीट करणं चालू होतं. अशाच एका नंबरावर फोन केला.....
"हॅलो"..मी
"बोला,काय म्हणताय? कसे आहात?"..पलीकडून एका स्त्रीचा आवाज. बहुतेकदा आवाज ओळखुन मी तरुन जातो. ह्या वेळी कोणाचा आवाज असावा ते आठवेचना.
:.......",,माझी ईथे जीभ टाळ्याला चिकटलेली. कोण आहे ते कळेना. फक्त समाधानाची बाब एवढीच की माझा नंबर तिच्या फोनवर सेव्ह होता,म्हणजे ओळखीची तर होती.
"आज कसा काय बर्याच दिवसांनी फोन केला?"..तिची चौकशी चालूच.
ईथे माझं तत पप फोनवर चालूच.
"मी तुम्हाला परत फोन करतो"..मी फोन ठेवला.
संध्याकाळी माझा मित्र आणि त्याची बायको घरी आले. आल्या आल्या त्याच्या बायकोचा पहिला प्रश्न.
"अस काय? सकाळी फोन केला आणि काहीच बोलला नाहीत?"
माझ्या डोक्यात १००० वॅटचा प्रकाश पडला.
फक्त सोय
फक्त सोय म्हणुन....
----------------गूगल आणि राखी ------------
गेल्या वर्षी जपान मधे झालेला हा किस्सा..
रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला बहिणीने भारताहुन राखी पाठवली., पण चुकुन तिने घरी पाठवायची ऐवजी ऑफिस च्या पत्त्यावर पाठवली.. आता ऑफिस च्या सुरक्षा नियमाप्रमाणे ते पार्सल माझ्या जपानी बॉस कडे गेले इन्स्पेक्शन साठी .. त्याच्यावर फक्त राखी लिहिले होते आणि त्यावरुन त्याला काहीही बोध होत नव्हता..त्याने मला पाकिटात काय आहे हे विचारले, पण तो मला काय ते पाकिट उघडु देइना..
आणि मला भाउ-बहिण, सण, दोरा-गोंडा, रक्षण वैगेरे जपानी शब्द काही केल्या आठवेनात्..मग अचानक माझी ट्युब पेटली..आणि गुगल महाराज कि जय !! असे म्हणुन मी गूगल उघडले आणि तेथे राखी टाइप करुन google images ला क्लिक केले..
आणि पहतो तो काय, त्याच्या मोठ्या स्क्रीन वर, राखी ऐवजी राखी सावंत चे नको त्या अवस्थेतले फोटोज, आणि रक्षबंधनाऐवजी मिका सिंग च्या बंधनात अडकलेली राखी पुढे आली (एक वेळ राखी गुल्झार परवडली असती..).. मी आणि जपानी बॉस्..दोघेही जाम हादरलो..मला हसावे का रडावे तेच कळेना..आणि बॉस मात्र ते दृश्य त्याच्या चिंचोळ्या डोळ्यात साठवत होता
मग परत रक्षबन्धन असा शोध घेतला आणि योग्य ते फोटोज आले.
इति - केदार_जोशी
----------------------------
परवा मेक माय ट्रिप वरून कलीग
परवा मेक माय ट्रिप वरून कलीग साठी मद्रासचे बूकिन्ग केले. त्याचे येतानाचे पहाटे ६.२० चे केले त्याने ही पाहिले नाही व मी ही नाही. मला वाट्ले ते संध्याकाळचे आहे. तो सोम्वारी संध्याकाळी पोहोचला तर फ्लाइट सकाळीच गेलेली. मग त्याने दुसर्या दिवशीचे तिकीट काढ्ले. मेरा दिमाग है की भुजिया? जास्तीचा भुर्दंड मलाच सोसावा लागला. वर त्याने किती शिव्या दिल्या असतील कोण जाणे.
मामी तुम्ही एकट्या नाही, हम
मामी तुम्ही एकट्या नाही, हम तुम्हारे साथ है! फक्त हे मी स्वतःसाठी केलेले आहे. सकाळचे ८:३० ला मुंबईहुन सुटणारे फ्रॅंकफर्टचे विमान पकडायला मी रात्री ८:३० ला गेले, वर त्यांना भांडून आले काऊंटरवर लवकर का सोडले विमान म्हणून
ये. ग्रेट. दुसरे म्हणजे घरचा
ये. ग्रेट. दुसरे म्हणजे घरचा प्रिन्टर आहे त्यावरून १५ प्रयत्नांनतरही आइचे परतीचे तिकीट प्रिणट करता आलेले नाही. खालील गोष्टी झाल्यात.
१) प्रिन्ट होइ परेन्त आइ तिथेच उभी राहते. पांड्या पांड्या बालिस्टर का नाही झालास भाव डोळयात आणून.
२) दोन्ही कुत्रे निषेध व्यक्त करतात.
३) फोन व बेल वाजते.
४) मुलीला पाणी खाणे काहीतरी रूम सर्वीस हवीच असते.
५) प्रिन्ट क्र. १, २, ३, फेल जातात. आइ तिथेच आहे.
६)सर्व नीट करून कमांड दिली - पेपर जॅम.
७) परत प्रयत्न ( देवाचे स्मरण करून) प्रचंड मोठ्या राक्षसी साइज मध्ये १० पेपर वेस्ट होइ परेन्त
प्रिन्ट. पण अर्धेच तिकिट ( मध्ये उभे कापल्या सारखे.
८) ऑफिसातून प्रयत्न केला. तिथे इथली लोगिन आय्डी चालत नाही.
९) आज परत प्रयत्न केले, क्र. १०, ११, १२, लॅंड्स्केप करून पाहिले, बारिक केले,
प्रिन्ट स्क्रीन करून पाहिले. शेवटी जे आले ते आइला दिले आहे नाहीतर स्टेशन वर ल्याप टोप घेउन जाणार व टी टी च्या पाया पड्णार. म्हातारीला बसवून दे म्हणून.
१०) २० ए ४ साइज पेपर वाया गेले म्हणून मुलगी रागवली. - किती झाडे मारलीस म्हणून.
११) आइ वैतागून झोपली. मला प्रिन्ट येत नाही हे बहुतेक बहिणीला सांगणार.
शुभरात्र.
केदार ....... राखी
केदार ....... राखी
मामी , रुनी लवकर का सोडले
मामी , रुनी

लवकर का सोडले विमान म्हणून >> हे म्हणजे, गिरे तो भी ... सारखे झाले
हे म्हणजे, गिरे तो भी ...
हे म्हणजे, गिरे तो भी ... सारखे झाले
>>
नाय रे मिचमिच्या
उल्टा चोर कुतवालको डांटे ' असं झालं ते!
गेल्या आठवड्यात एका सिनियर ला
गेल्या आठवड्यात एका सिनियर ला असंच उगिचच छेडलं, म्हणलं तुझं इन्क्रिमेंट झालं पार्टी कोण देणार? मी त्याच्या बॉस ची सेक्रेटरी म्हणल्यावर त्याने माझं म्हणणं भलतंच सिरियस घेतलं. मग एक दिवस ठरला, मला होम मेड फूड खायची हौस, सवय, XXX काहीही म्हणा... आमच्या बाहेर जायच्या दिवशी मी डबा आणायचा नाहिये हे विसरून शेपूची भाजी पोळी असं सगळं घेऊन आले.... त्या दिवशी त्याच्या शिव्या खाल्ल्या.... परत गेलेला मंगळवार ठरला, त्या दिवशी पण तिच गत...
मग आज जायचंय असं ठरलंय... हे लक्षात आलं सकाळी डबा तयार करून भरून झाल्यावर... :khokho:
मग डबा घरीच ठेवून आलेय.. (फुशारकी मारत) मैत्रिणीच्या १०० शिव्या खाल्यात त्या वेगळ्या...
आज हा पठ्ठ्या डबा घेऊन आला नाही म्हणजे मिळवलं...
दक्षे
दक्षे
काही दिवसांपूर्वी नवर्याचा
काही दिवसांपूर्वी नवर्याचा एक कलिग सहकुटुंब जेवायला आला होता. जास्त ओळखीचा नव्हता. पास्ता, कटलेटस, जेवणानंतर चॉकोलेट पुडिंग वगैरे मेन्यू होता. सगळ्यांना दोनदा सर्व्ह करुन झाल्यावर मी जरा मुलाचं जेवायचं बघण्यात गुंतले होते. नवरा त्याला अजून घ्यायचा आग्रह करायला लागला आणि वाढायला घेऊन गेला. कलिगने सुरुवातीला एकदा नको नको म्हणायचं असतं तसं म्हटल
नवर्याने मी ही आग्रह करावा ह्या हेतूने मला हाक मारली. माझं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नव्हतं. संदर्भ जराही समजून न घेता मी म्हटलं, " जेवणानंतर डेझर्ट आहे हं. ते खायला पण जागा ठेवा पोटात." ... कलिग एकदम सावरुन बसला. नवरा पण गडबडून गेला. दहा सेकंदात काय झालं ते माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत फार उशीर झाला होता.
नवर्याचं चिडवणं अजूनपर्यंत मुकाटपणे ऐकून घ्याव लागतं ते वेगळंच.
मी कशी वेंधळी आहे वगैरे सांगत मी सगळ्यांना हसवायचा प्रयत्न केला तरी बूंद से गयी सो गयी ...
आले सगळे परत. मज्जा येतिय
आले सगळे परत. मज्जा येतिय वाचायला
काहीवेळेस मी आळस करुन
काहीवेळेस मी आळस करुन कोणाकोणाचे मोबाईल नंबर्स नाव सेव्ह न करता ठेवायचो, ती सवय मोडायला कारणीभूत झालेला किस्सा. >>>>> माझी पण ही सवय मोडायला घडलेला किस्सा एक कँडीडेट ने मुलाखती साठी आदल्या दिवशी फोन केलेला कधी येऊ वगरे, त्याला मुलाखतीची वेळ वगरे देऊन ही तो आला नाही म्हणून मी त्याला फोन करुन डायरेक्ट कोण आहे न बघता बोलायला सुरवात केली see if you are not coming then let me know, i have to schedule other interviews वग्रे पलिकडुन एक नाजुक आवाज 'he is driving right now , i will tell him to call you back" मनात शिव्या देऊन मोकळी हल्ली नोकर्या मिळत नाहेत आणी ह्याना गरज नाही ई ई . थोड्या वेळाने फोन आला, स्मिते कधी येऊ इंटर्व्यु ला ?? मी चाट , नंतर लक्षात आल मी आशुतोषचा नं लावला चुकुन. तेव्हा पासुन नं सेव्ह करुन ठेवते पहिले .
Pages