सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"स्वभाव, विचार, वागणुक, प्रामाणिकपणा इ. याचा आस्तिक/नास्तिक असण्याचा संबंध नाही असे म्हणता येईल का? "
मापृ + १११

"स्वभाव, विचार, वागणुक, प्रामाणिकपणा इ. याचा आस्तिक/नास्तिक असण्याचा संबंध नाही असे म्हणता येईल का? " >>> हो, खरंतर.

पण इथे बरेचसे जण फक्त हिंदू धर्मातील बुवाबाजी वर सुसाट सुटले आहेत ,याचे कारण काय असावे>>>>>

म्मायबोलीवर सगळे हिंदु एकवटलेत आणि
मायबोलीच्या शेषाची रवी करुन हिंदु धर्माला घुसळताहेत. एका बाजुला पुरो व दुसर्‍या बाजुला प्रति.

ह्यातून अमृतरूपी नवनीतच बाहेर येईल ना!
अशी घुसळण होणे चांगलेच. सगळे थर एकत्र येतात. वर खाली असा भेद रहात नाही.
नाही तर stagnation येते.
Bw

पण इथे बरेचसे जण फक्त हिंदू धर्मातील बुवाबाजी वर सुसाट सुटले आहेत ,याचे कारण काय असावे>

इथे बहुसंख्य हिंदुच आहेत मग तेच होणार ना ? शिवाय वरचे चावून चोथा झालेले वाक्य तेच म्हणतात ज्यांना अशा चर्चेने आपली दुकाने बंद व्हायची चिंता असते.

निर्माला देवींबद्दल अनिल अवचट यांनी आपल्या पुस्तकात प्रदीर्घ लेख लिहिला आहे. मीही माझ्या कल्ट विषयक दिवंगत लेखात त्यांचे उल्लेख केला होता.

<लोकांचे रोग पळवून लावण्याचे नाटक करणे ही नाटके मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात चालत नाही का ?.......असतीलही नव्हे आहेतच.पण आपल्या पायाला लागलेला चिखल धुण्या आधी दुसऱ्याचे पाय कशाला तपासा?

Submitted by देवकी on 23 April, 2023 - 10:26

नक्कीच !!!
पण इथे आपले पाय ऑलरेडी दुसऱ्यांनी धुवायला सुरुवात केली आहे , त्याचे काय ?

Submitted by फुरोगामी on 23 April, 2023 - 10:29

"इथे" जे हिंदूबुवाबाबामातांबद्दल लिहीत आहेत, ते हिंदू नाहीत. "दुसरे" कोणीतरी आहेत.

हो. आणि पुढेमागे ह्यांना पाकिस्तानात हाकला अशी हाकाटी होण्याची शक्यता आहे. ती सध्याचं होऊन चुकली आहे म्हणा!
" आम्हांला आमच्या धर्मात हे धर्मद्रोही नकोत" असेही म्हटले जाऊ शकते.
धर्म pure आणि पवित्र राखण्याचे काम करणारी आणि त्यासाठी देखरेख व नजर ठेवणारी एक स्वनिर्मित दंडधारी शक्तिशाली ब्रिगेड आहे बहुधा.

त्यांचे भाषणही पाहिले थोडेसे. सुरुवातीलाच अमित शहांची तोंड फाटेस्तोवर स्तुती, अहोरुपम अहोध्वनी. २५ लाख ही रक्कम फारच किरकोळ पण ती मु मं सहाय निधीला देत आहे हे वाक्य इतके घोळवून घोळवून सांगितले व हुकमी टाळ्या घेतल्या.

काल ईद होता खारघर सारखी च वेडी गर्दी रेल्वे स्टेशन, चौपाटी ,मार्केट , रस्त्यावर .
वेड्या लोकांनी केली होती.
लहान लहान पोरं घेवून .
त्यांची तर मोठी पिलावळ असते.
येतून तेथून सर्व जनता (म्हणजे बहुसंख्य जनता)
मग ती कोणत्या ही जाती ची असू ,धर्माची असू एक साथ विवेहिन,आणि बुध्दी हिन च असते.
बोहरी मुस्लिम सोडून .
त्यांचे सार्वजनिक ठिकाणी वागणे अतिशय शिस्त बद्ध असते.

<लोकांचे रोग पळवून लावण्याचे नाटक करणे ही नाटके मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात चालत नाही का ?.......असतीलही नव्हे आहेतच.पण आपल्या पायाला लागलेला चिखल धुण्या आधी दुसऱ्याचे पाय कशाला तपासा?>>>>> +१
मुळात आस्तिक किंवा नास्तिक असणे हे माणसाचे चांगुलपणा दाखवणार निर्देशांक नाही"
स्वभाव, विचार, वागणुक, प्रामाणिकपणा इ. याचा आस्तिक/नास्तिक असण्याचा संबंध नाही असे म्हणता येईल का? " >>>>>+१

धागा भरकटला. आता रूळावर आणण्याचे प्रयत्न केले तरी उपयोग नाही. मी यातून रजा घेतो.
सर्वांचे आभार.

भारतीय हे आदर्श राज्यकर्ते होण्याचा लायकीचे नाहीत( भारतीय हे राज्य करण्यांच्याच लायकीचे नाहीत असे ब्रिटिश बोलायचे मी योग्य बदल केला)
पुरातन कथा ,आणि छत्रपती न चे स्वराज्य सोडले तर आदर्श सत्ता धारी भारतात कधीच नव्हते.
त्या मधील पुरातन कथा ह्या फक्त कथा असू शकतात.
त्या मध्ये आताची भारताची राज्यव्यवस्था ही लोकशाही पद्धतीची आहे असे वाटत असेल पण ती तशी नाही.
कोणाला निवडून दिले पाहिजे ह्याची जाणीव असेल इतकी सजक लोक च भारतात नाहीत.
त्या मुळे खारघर मधील घटने वर ना चोकशी होणार, ना पोलिस मध्ये रिपोर्ट होणार.

ना राज्यकर्त्यांना लोक दोषी समजणार.
तिथे गर्दी केलेले च मूर्ख होते हा निष्कर्ष सरकार पासून लोकांपर्यंत सर्व काढणार.
जो पर्यंत सजक,विचारी,निर्णय क्षमता असणारी लोकंची संख्या वाढणार नाही तो पर्यंत निम्न दर्जा चेच राज्यकर्ते भारताच्या सत्ता स्थानी असणार.
मतदान च हक्क सर्वांना देणे मला तरी अयोग्य वाटत आहे.
मतदान च हक्क मिळण्यासाठी .
भारताचा इतिहास,भारताची राज्य घटना,नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य, .
सरकार ची काम असे विषय असणारी परीक्षाच हवी.
एक पण गुन्हा असलेला व्यक्ती,खराब वर्तन असलेला व्यक्ती गुंड,चोर, लुटेरा, अशिक्षित, व्यसनी ह्या लोकांना बिलकुल मतदान करण्याचा अधिकार नको

कुस्ती पटू स्त्रिया नी लैंगिक शोषण च आरोप करून पण ब्रीज भूषण वर साधी fir पन नोंदवली गेली नाही.
भारतीय लोकशाही हतबल ठरली,भारतीय राज्य घटना हतबल ठरली,भारतीय न्याय व्यवस्था हतबल ठरली .
इतकी कूच कामी .
राज्य व्यवस्था क्वावचीत च जगात दुसऱ्या कोणत्या देशात असेल.
आणि आपण इथे अंध भक्त लोकांच्या चुका नी त्यांचे मृत्यू झाले त्यांना न्याय मिळेल ही आशा ठेवून आहोत.
स्वतः अंध भक्ता जे तिथे होते
त्यांना ना सरकार ची चूक वाटत.
ना आपण स्वतः मूर्ख आहोत ह्यांची जाणिव आहे.
ना तिथे कोणता गुन्हा घडला आहे असे त्यांना वाटत नाही.
डोकं फोडून घेतले तरी अशी लोक कधीच सुधारत नाहीत

काही ठिकाणी पुरोगामी चुकीचे लिहीत नाहीत त्यांच्या शी सहमत व्हावे लागते >>>>>>>
धन्यवाद !
बरेचसे जण शाल पांघरून फक्त हिंदू धर्माला नावे ठेवतात म्हणून त्यांना इतर धर्मांचे पाय देखील मातीचेच असल्याचे दाखवावे लागते.
हिंदू धर्मातील बुवाबाजी वर टिका करण्यासाठी इथे लगेच कोंडाळे जमते , चांगली गोष्ट आणि त्या बाबत माझेही समर्थन .
बिनधास्त टीका करा हिंदू धर्मातील बुवाबाजी वर , बुवाबाजी मुळे सामान्य लोकांची अडवणूक फसवणूकच होते यात दुमत नाही .
पण ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मातील बुवाबाजी कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येते .

नक्कीच !!!
पण इथे आपले पाय ऑलरेडी दुसऱ्यांनी धुवायला सुरुवात केली आहे , त्याचे काय ?

Submitted by फुरोगामी on 23 April, 2023 - 10:29

"इथे" जे हिंदूबुवाबाबामातांबद्दल लिहीत आहेत, ते हिंदू नाहीत. "दुसरे" कोणीतरी आहेत.

हिंदूंनी इतर धर्मियांच्या भानगडीत कशाला नाक खुपसायला पाहीजे ? त्यांनी खुपसले तर चालेल का ?
त्यांनी खोड काढली तर देतील ना उत्तर. आपल्या घरात मतभेद असतील म्हणून शेजारच्यांशी भांडण काढणे हा शहाणपणा आहे का ?

त्यांना सुधरायचे असेल तर सुधारतील ना ते. नसेल सुधारायचे तर नाहीत सुधारणार.
हिंदूंना सुधारायचे असेल तर सुधारतील. त्यासाठी समविचारी लोक त्यांचे विचार मांडणार. तुम्ही कोण त्यांना या धर्माबद्दल बोला सांगणारे ? तुमचा अधिकार काय ? तुम्हाला लोकांनी अडाणचोट रहावे असे वाटते का ?

"इथे" जे हिंदूबुवाबाबामातांबद्दल लिहीत आहेत, ते हिंदू नाहीत. "दुसरे" कोणीतरी आहेत. >>>>>>>>
स्वतःचे " तिसरेपण " सिद्ध करण्याचा किती हा अट्टाहास ?
Happy

सामना , प्रचंड सहमत.
आधी अमक्या बद्दल बोला, तमक्याबद्दल बोला, मगच किंवा तरच तुम्ही आमच्या धर्माबद्दल बोलू शकाल अशी अट आणि गर्भित धमकी जाणवते असल्या स्टेटमेंटमधून.

चुकीचा अर्थ काढलाय !
पुन्हा स्पष्ट करतो .
बुवाबाजी विरूद्ध चर्चा करा , टीका करा , मोहीम काढा ,काही हरकत नाही .
आपल्या आजूबाजूला जे कोणी बुवाबाजी चे थोतांड जोपासत असेल त्याला त्यातील फोलपणा समजावून सांगा .
मी स्वतः कित्तेक नातेवाईकांशी बुवाबाजी विरोधात बोलत असतो , तरीही एखादा सोडला तर बाकी सगळ्यांशी संबंध व्यवस्थित आहे .
प्रश्न अशा लोकांच्या बद्दल आहे ज्यांनी इथे सगळी हयात फक्त हिंदू धर्माविरुद्ध लिहिण्यात घालवली आहे .
म्हणून फक्त त्यांनाच उद्देशून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात बुवाबाजी नाही का विचारले होते , आणि मला नाही वाटत यात काही गैर आहे .
बाकीच्यांना उद्देशून बिलकुल नव्हते .
आणि धर्माचा विचार केला तर एक तरी धर्म परिपूर्ण आहे का ? प्रत्येक धर्मात शेकडो त्रुटी आहेत .
मग फक्त हिंदू धर्मावरच टीका करण्याची इच्छा का होते ?
की या सगळ्या आय डी चे मुळ मालक उदारमतवादी हिंदूच आहेत असेच गृहीत धरायचे का ?

एक्स्ट्रा २ एबी, सारवासारवी बद्दल अभिनंदन.

१ कोणाला उद्देशून लिहिलं त्यांचं नाव घ्या की.
२. असं लिहिणारे लोक "दुसरे" आहेत हे कसं ठठरवलं?
३ हयात घालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ कळतो का?
४ हिंदू धर्मातील अनिष्ट गोष्टींविरोधात लिहिणे हे हिंदू धर्माच्या विरोधात लिहिणे नसून हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणे असते हे आपल्या मेंदूत घुसवून घ्या. तुम्ही अशांना विरोध करता तेव्हा तुम्हीच हिंदू धर्मविरोधी होता.

आणि धर्माचा विचार केला तर एक तरी धर्म परिपूर्ण आहे का ? प्रत्येक धर्मात शेकडो त्रुटी आहेत .
मग फक्त हिंदू धर्मावरच टीका करण्याची इच्छा का होते ? >>>> तुम्हाला माणसाचाच मेंदू बसवला असावा ही अपेक्षा आहे. असेल तर मागच्याच उत्तरात तुम्हाला उत्तर मिळाले आहे. ते टणकन मेंदूवर आपटून परत येत असेल तर तुम्हाला काहीही सांगण्यात अर्थ नाही. कारण तुम्ही परत तेच विचारताय. सोंग करताय का ? तरी हा शेवटचा प्रयत्न.

इथे तुम्हाला दुसर्या धर्माचा कुणी दिसला का ? हिंदूंनी इतर धर्मावर का टीका करायची ?
तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी काही केलं नसेल तर ते तुम्हाला शिव्या घालतील कि शेजार्‍याला ? कि पोरांना तुम्ही सांगणार शेजारच्या डिसोझाला का बोलत नाही ? शेखला का बोलत नाही ? सिंग ला का बोलत नाही ? मीच बरा सापडलो !
सिंग, डिसोझा, शेख त्यांच्या पोरांना तुमच्याकडे शिव्या घालायला पाठवतात का ? तेव्हढा मेंदू त्यांना आहे.

Pages