सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या
Indian Space Research Organisation chairman S Somanath on Friday visited Goddesses Chengalamma temple in Sullurpeta town of Tirupati district ahead of the April 22 launch of the PSLV-C55 rocket launch.

Somnath, accompanied by other officials participated in the traditional puja for the success of ISRO's rocket launch.
आता बोला!
मग खेड्यातल्या लोकांना का नावं ठेवायची?

ISRO चे शास्त्रज्ञ देवळात गेले, त्यांनी देवाला rocket च्या यशस्वी उड्डाणासाठी प्रार्थना केली / नवस बोलला की लगेच त्याचा issue करायलाच हवा का?
शास्त्रज्ञ म्हटला की तो नास्तिकच पाहिजे, असे कुठे लिहिलेले आहे???

रॉकेटला लिंबू मिरची आणि काळी भावली पण लावायला पाहिजे. आणि रॉकेट सोडायचा मुहूर्त जुने पंचांग बघून काढायला पाहिजे.
एलोन मस्कने हे काही केले नाही. मग काय होणार? फुटलं रॉकेट!

यशस्वी उड्डाणासाठी प्रार्थना केली / नवस बोलला की लगेच त्याचा issue करायलाच हवा का? >> हो! अगदी करायलाच हवा. मिरॅकलवर विश्वास दाखवणे आले की आसूड उगारलेच पाहिजेत. इंटेग्रिटी धुळीला मिळाली इथे. उच्व/ जबाबादारीच्या पदावरच्या व्यक्तीने ऑप्टिक्स सांभाळलेच पाहिजेत.
नास्तिक का आस्तिक प्रश्नच नाही. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कोणाला साकडं घालायचं का कोणाच्या भजनी लागायचं तो त्यांचा प्रश्न. कोणाला पडलेली नाही. ऑफिस संपल्यावर नारळ फोडून येते तरी काही प्रश्न न्हवता.इतर ऑफिशिअल्स बरोबर पूजा बांधणे आणि त्याच्या बातम्या करणे निषिद्धच असले पाहिजे. अनेक पातळ्यांवर वर्कएथिक्स पायदळी तुडवले गेले आहेत इथे.

हे जरा जास्तच होतंय. देवाला जाऊ की नये जाऊ हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आफिशियल्स बरोबर पूजा केली म्हणून काय झालं?

एक बोकड कापला कि नाही? त्याच रक्त रॉकेटवर शिंपडावे लागते.
नासाचे लोक अस करतात हे मी "STORY OF NASA " ह्या पुस्तकात वाचलंय.

रॉकेट बनवून उड्डाणासाठी तयार आहे. पृथ्वीचे अक्षांश-रेखांश, वेग आणि इतर ग्रहांची स्थिती आदी ज्या काही गोष्टी उड्डाणासाठी आवश्यक आहेत त्यानुसार वेळ ठरवली आहे, इस्रोच्या महासंगणकात त्यानुसार countdown सुरु आहे, इतरही उड्डाणपूर्व कामे झाली आहेत अशी जर स्थिती असेल तर उरलेल्या वेळात जाऊ दे ना त्यांना देवळात दर्शनासाठी! अथक काम करून त्यांचा मेंदू थकत नसेल का? ती माणसे नाहीत का? मग मनःशांती साठी गेले एखाद दिवस देवळात तर त्याचा उगाच बाऊ कशाला??? बरे त्यांना उच्च-पदस्थ अधिकाऱ्याने पत्रक वगैरे काढून देवळात जायला सांगितले का? तसे असेल तर निश्चित आकाशपाताळ एक करा, पण स्वतःच्या मर्जीने, सगळी कामे आटपून गेले असतील तर आपण का छाती पिटून घ्यावी???

समजा ते देवळात जाण्याऐवजी tension-free होण्यासाठी एखाद्या pub मध्ये गेले असते तर काय भूमिका असती येथे छाती बडवणाऱ्यांची ???

हे आवडल. पब आणि देऊळ ह्यांची तुलना.
डांस बार मध्ये पण जाऊ शकतात. तुम्ही सिरीअसली घेऊ नका. आमची काय छाती आहे छाती बडवून घेण्याची. रंगू बाजाराला जातेय तर जाउद्या.

रॉकेट बनवून उड्डाणासाठी तयार आहे. पृथ्वीचे अक्षांश-रेखांश, वेग आणि इतर ग्रहांची स्थिती आदी ज्या काही गोष्टी उड्डाणासाठी आवश्यक आहेत त्यानुसार वेळ ठरवली आहे, इस्रोच्या महासंगणकात त्यानुसार countdown सुरु आहे, इतरही उड्डाणपूर्व कामे झाली आहेत अशी जर स्थिती असेल तर उरलेल्या वेळात जाऊ दे ना त्यांना देवळात दर्शनासाठी! >> वैयक्तिक मनःशांतीसाठी जायचे असल्यास त्यात काहीच वावगे नाही.
यशस्वी ऊड्डाणासाठी प्रार्थना करणार असाल, त्यासाठी देवाला साकडे घालणार/ नवस बोलणार असाल तर मग तुम्हीच तुमच्या प्रोजेक्टवर घेतलेल्या प्रयत्नांना आणि ज्ञानाला अंडरमाईन केल्यासारखे होईल.
फिजिक्सच्या नियमानुसार रॉकेट कसे ऊडते हे एका ८-१० वयाच्या लहान मुलाला समजाऊन संगितल्यावर पुन्हा रॉकेटच्या यशस्वी ऊड्डाणासाठी देवाला साकडे घालण्यामागे त्याला काय कारण आहे म्हणून सांगाल?

अरे अरे, शांत गदाधारी भीम !
उच्च पदावरच्या व्यक्तींनी विवेकी असावं यात शंकाच नाही. पण कायद्याने तसे बंधन नाही. जर एखाद्याला देवाची भक्ती वगैरेंनी आत्मविश्वास येत असेल आणि तो ते खासगी ठेवत असेल तर इतरांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्याच्या श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा त्याचा खासगी मामला. त्याचा आदर केला पाहीजे.

मात्र या श्रद्धा त्याने सरकारी कामात, कंपनीच्या कामात ( कंपनीच्या धोरणात बसत नसताना), सार्वजनिक कामात आणल्या तर नक्कीच आक्षेप नोंदवायला पाहीजे.

माझा देव, धर्म यावर विश्वास नाही. पण माझ्या हाताखालचा मनुष्य त्याच्या घरात देव देव करून त्यामुळे परफॉर्मन्स चांगला देत असेल तर माझ्यासाठी ते चांगलेच आहे. पण देव देव केल्याने कामातले लक्ष उडाले तर नारळ द्यायची भीती घालायला शून्य सेकंद वेळ घेईन.
या सोशल मीडीयाच्या जन्माच्या वेळच्या चर्चा आहेत मित्रांनो !

आपल्या वेदांमध्ये रॉकेट सायन्स आहे. त्यानुसारच ISRO रॉकेट बनवते. त्याच्या शेवटच्या भागात पूजा करायला पाहिजे असे असणार.

मेंदूचा थकवा घालवायला गेले हे तुम्हाला कसं समजकस? त्या बातमीत धडधडीत खोटं कारण लिहिलंय म्हणजे. का बरं असं खोटं लिहितात हे?

बरं त्या बातमीत जे लिहिलं आहे ते करायला पब मध्ये गेले असते तरी अर्थात नसतंच चाललं. ते सोडा... आमच्या वर्क एथिक्स प्रमाणे कामानंतर टीम मधल्या काहीच जणांनी वाईंडडाऊन करायला पब मध्ये जाणे आणि तिकडे कामाच्या गोष्टी करणे हे ही बसत नाही. आम्ही एथिकल माणसं आहोत.

ते रॉकेट उड्डाणासाठीच्या पूजेसाठी जरी गेले असतील तरी बिघडले कुठे? त्याना वैयक्तिक choose काही नाही का?

इतका वेळ स्वामी, श्रध्दा, अंधश्रध्दा, महाराष्ट्र भूषण आणि आता हे. माझा मेंदू पोकल झाला आहे.
आता झोपायला जावे हे इष्ट.

बिघडत कशानेच काही नाही पण अशा दुहेरी (विज्ञानवादी आणि दैववादी) बिलीफ सिस्टीम असणार्‍या लोकांना हिप्पोक्रॅट म्हणता येते आणि ह्या कारणामुळे ते एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाचे नैतृत्व करण्यास पूर्णेपणे अयोग्य ठरतात.

या आदिम काळापासूनच्या चर्चा आहेत. मधे खंड पडल्याने त्या आउट्डेटेड झाल्या असतील तर...

- आपण (भारत देशाने) वैज्ञानिक दृष्टीकोण स्विकारलेला आहे. घटनाकारांनी याचा उल्लेख केला आहे. (कुठे ते लक्षात नाही). मात्र हे धोरण अधिकृत आहे. त्यामुळे सरकारचे उच्चपदस्थच काय अगदी कनिष्ठ नोकर सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोणाला बांधिल आहेत. कनिष्ठ कर्मचार्यांकडून चुका होऊ शकतात. त्यांचे पद, शिक्षण बघता त्यांना प्रशिक्षणाची गरज असते.

पण सरकारी नोकरीतली उच्च पदावरची व्यक्ती ही परिपक्व समजली जाते. त्यामुळे नियम, कायदा, राज्यघटना हे त्याचे धर्मग्रंथ असायला हवेत. सेवा शर्ती हे त्याचे बायबल, गीता असायला हवेत.

तरीही त्याच्या खासगी गरजा लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे त्याने सरकारी कामासाठी पूजा करताना काळजी घ्यावी इतकेच. जर खासगी कंपनीत कामाला असेल आणि तिथे पूजा अर्चा चालत असेल तर त्याच्या आड राज्यघटना येत नाही. खासगी कंपन्या, दुकाने, व्यवसाय यांना ही सक्ती नाही.

ते रॉकेट उड्डाणासाठीच्या पूजेसाठी जरी गेले असतील तरी बिघडले कुठे? त्याना वैयक्तिक choose काही नाही का?
Exactly!!!

त्यांनी कोणत्याही कारणासाठी देवळात जाऊ दे, प्रॉब्लेम काय आहे???
(की देवळात गेले, दर्ग्यात नाही गेले हा प्रॉब्लेम आहे?)

बरे, ते देवळात गेल्याने (म्हणजे ते पूजा वगैरे करण्यात काही तास घालवल्याने) त्यांचे त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाले / होते, असे वाटणाऱ्यांना एक प्रश्न.
अमेरीकेच्या NASA चे शास्त्रज्ञ तर देवळात जात नसतील. मग १ फेब्रुवारी २००३ रोजी त्याच्या यानाला का अपघात झाला? का आपण भारतीय वंशाच्या 'कल्पना चावला' यांना गमावले??? आहे उत्तर??? ते यानावरील उष्णता रोधक आवरण निघाले आणि हवेशी घर्षणामुळे उष्णता निर्माण झाली वगैरे वगैरे, ते नको. मुळात NASA च्या शास्त्रज्ञांनी 'देवळात जाऊन वेळ वाया घालवला नाही' मग तरीही त्यांच्या बाबतीत अशी चूक का झाली???

त्यानी त्यांच्या ऑफिस मध्ये पूजा नाही केली मंदिरात केली आहे. आणि रॉकेट ही मंदिरात केलेल्या पूजेमुळेच काम करतात आस तरी कुठं म्हटलंय? राज्यघटनेचा उल्लेख केला म्हणून विचारतो एखाद्या सरकारी कामासाठी सरकारी अधिकाऱ्याने पूजा केली म्हणून कोणत्या कायद्याचा भंग होतोय. आपल्या राज्यघटनेवरच श्री राम, श्री कृष्ण यांचे फोटो आहेत.वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे मंदिरात जायचे नाही हा अर्थ चुकीचा आहे.

या चर्वित चर्वण झालेल्या विषयासाठी वेगळा धागा काढावा किंवा इथे (मायबोलीवर असतील तर, असणारच) जुन्या चर्चा शोधून त्यावर ही चर्चा तिकडे हलवावी.

चिकमंगळूरला जाणारी ट्रेन आता बेजॉनदासपूरला निघालेली आहे. तिला योग्य रूळावर आणा.

वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे मंदिरात जायचे नाही हा अर्थ चुकीचा आहे. >> हा प्रश्न मला नसेल असे समजतो. कारण माझ्या प्रतिसादात हे शब्द नाहीत. मलाच असेल तर मी हे कुठे म्हटलेय ? नसलेले शब्द घुसवून वादविवाद करण्यात इंटरेस्ट नाही. क्षमस्व ! सरकारला धर्म नसतो हे जर देशाने स्विकारलेले आहे तर त्यात बदल होईपर्यंत असे बालिश प्रश्न इग्नोर करण्यात शहाणपण वाटते.

ईस्रोचे शास्त्रज्ञ यानाच्या यशस्वी ऊड्डाणासाठी देवळात जातात/गेले असतील असे गृहीत धरले तर भारताचे चांद्रयान का भरकटले आणि पडले असावे?
थोड्क्यात देवळात जाऊन साकडे घालण्या न घालण्याचा आणि ऊड्डाण मोहीमेच्या यशापयाशाचा सबंध नाही. ज्या कृतीतून कॉज ईफेक्ट रिलेशन एस्टॅब्लिश करता येत नाही रॅशनलिटी रिझन्स साठी ती कृती करण्याची परवानगी वैज्ञानिक दृष्टीकोन देत नाही.

रॉकेट उड्डाणासाठी पूजा करा असा सरकारी आदेश असेल तर चुकीचं आहे. पण शास्त्रज्ञ आहेत म्हणून त्यांनी सरकारी कामासाठी पूजा करायला देवळात गेले तर होणारी टीका चुकीची वाटते.

ही चर्चा इथे नको प्लीजच>>>>
हे ISRO च्या शास्त्रज्ञांकडून पूजा करण्यावरुन इथे बाऊ करणाऱ्यांना सांगा!!!

हा धागा अप्पासॉरी व राज्यसरकारचं bashing करण्यासाठी असताना इथे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पूजा करण्याचा विषय कशाला आणला? जनरल हिंदू धर्माला ट्रोल करायचं आहे का?
सरकारी कामात धर्म आणू नका हे वाचून तर हसायलाच आलं. राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी चालायची ना? डॉ कोविंद यांनी बंद केलं ते. पण सरकारी इफ्तारला आक्षेप नसतो. म्हणजे मग हिंदू धर्मालाच स्पेसिफिक विरोध आहे हे सांगा की.

बरं इस्रोमध्ये रॉकेट सायन्स असतं, ते फिजिक्सचा भाग आहे, ओके? मग या विषयावर जगातले मोठमोठे फिजिसिस्ट काय म्हणतात हे बघु.

“I go into the Upanishads to ask questions."
Niels Bohr- याला atom अर्थात अणूचा शोध लावण्यासाठी नोबेल मिळालंय. शालेय फिजिक्समध्ये पण या सरांचं नाव असतं.

"Most of my ideas & theories are heavily influenced by Vedanta. ”- श्रोडींजर (तोच तो मांजरवाला). याला पण फिजिक्ससाठी नोबेल भेटलेलं.

"The Bhagavad Gita… is the most beautiful philosophical song existing in any known tongue" - Robert J Oppenheimer
ओपनहायमर हा atomic bomb चा जनक मानला जातो.

सरकारी कामात धर्म आणू नका हे वाचून तर हसायलाच आलं. राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी चालायची ना? >>> कुणी लिहीलंय असं ?
सरकारी नोकर आणि राष्ट्रपती सारखेच का ?

Pages