रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले.
पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.
एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?
ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.
प्तशृंगी जत्रेला कोण्या
प्तशृंगी जत्रेला कोण्या मुलीवर जमावाने हात साफ करुन घेतला अशा विकॄत बातम्याही वाचनात आलेल्या आहेत.
नवीन Submitted by सामो on 20 April, 2023 - 02:47
हेच मी. टाकले होते
,गणपती वेळी कितीत तरी गर्दी मध्ये घाणेरडे प्रकार होतात पण गर्दी पुढे काही करता येत नाही
Submitted by हस्तर on 18 April, 2023 - 02:5
होय हस्तर कळले मला ते. मुलीला
होय हस्तर कळले मला ते. मुलीला परदेशी फिरायला जायचे होते. भारत मी सुचवला नाहीच उलट परावृत्तच केले. माहीते ना फर्स्ट हॅन्ड अनुभव. भयंकर आहे सर्व.
ही खारघरची गर्दी आमंत्रित
ही खारघरची गर्दी आमंत्रित होती. गावोगावी निमंत्रणे गेली होती. तिथल्या बसेस खारघराकडे वळवल्या गेल्या होत्या.
ह्या प्रकरणामध्ये भोळी श्रद्धा आहे पण भ्रष्टाचार त्याहून फार अधिक आहे. एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन होते हे.
खारघर उष्माघात प्रकरणातील
खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”! (सौजन्य: लोकसत्ता)
https://www.loksatta.com/maharashtra/kharghar-heatstroke-case-postmortem...
वृक्षारोपण वगैरे बरेच ग्रुप,
वृक्षारोपण वगैरे बरेच ग्रुप, संस्था करतात. त्यात काही खास नाही. >>> हो बरोबर. मी फक्त एवढंच लिहिलं काही कामं डोळ्याने बघितली, काही ऐकीव आहेत. मी स्वत: त्या मार्गातली नाहीये. आमच्या पट्ट्यात वृक्षारोपण, पाणी घालणे हे डोळ्यांनी बघितलं आहे आणि व्यसनमुक्ती कार्य लोकांकडून ऐकून माहितेय. तिकडे जाणारी अनुभव सांगतात त्यामुळे काही माहिती ऐकीव माझ्यासाठी.
खारघर उष्माघात प्रकरणातील
खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; डॉक्टर म्हणतात, “त्यांच्या शरीरात…”! (सौजन्य: लोकसत्ता) >>> आई ग.
पेज वेगळ्या लोकांनी ताब्यात
पेज वेगळ्या लोकांनी ताब्यात घेतले, जात पाहिली, सगळे नेते एकाच माळेचे मणी असे म्हणून घटनेचे गांभीर्य कमी होणार आहे का? आधी सकाळी दहाची वेळ होती म्हणून पाठ थोपटून घेतली. मग एप्रिल मधे मुंबईत उष्माघात होत नाही असा बचाव झाला.
यापेक्षा कुणीतरी जबाबदारी घेतली असती तर ते योग्य झाले असते.
जबाबदारी घ्यायलाच हवी सरकार
जबाबदारी घ्यायलाच हवी सरकार आणि गर्दी जमवणाऱ्या लोकानी आणि कायद्याने पण दोषी नाहीत का हे सर्व. जीव गेलेत.
कार्यक्रम हा रविवारी च ठेवला
कार्यक्रम हा रविवारी च ठेवला होता.
असे पण असल्या कार्यक्रमाला नोकरी ,व्यवसाय न करणारे रिकाम टेकडी लोक च जातात.
गृहिणी,किंवा निवृत्त झालेले,किंवा गावाकडचे जे शेती करतात किंवा रोजंदारी.
ही लोक च जास्त असणार.
कोणी नोकरी वाला असेल तर सुट्टी काढून तरी तो हा कार्यक्रम अटेंड करणार नाही.
तरी एकदा चुकारीचा असेल तर रविवार सुट्टी च वार असावा.
हिरा म्हणतात तसे आणि मी पण तसेच म्हणत आहे ही गर्दी जमवली गेली.
फुकट प्रवास,फुकट अन्न, मुंबई बघायला मिळेल न पैसे खर्च करता
हे आमिष दाखवून .
आणि शेवटी स्वारी वर ची श्रद्धा.
लाखो लोक अनुयायी असणारे अनेक
लाखो लोक अनुयायी असणारे अनेक .बाबा,गुरू,स्वामी, राजकीय नेते आहेत.
पण आर्थिक स्थित मजबूत व्हावी अनुयायी लोकांची.
अनुयायी लोकांच्या मुलांची शिक्षण पैस्या मुळे थांबू नये म्हणून ह्यांनी काही योजना राबवल्या आहेत का?
अनुयायी आजारी असेल ,बघणारा कोणी नसेल तर त्याची सेवा आणि आर्थिक मदत असले उपक्रम ह्यांनी राबवले आहेत का
एका पण गुरू,स्वामी,बाबा,राजकीय नेते ह्यांनी असले चांगले उपक्रम कधीच राबवले नाहीत लोक हिताची काम बिलकुल केली नाहीत.
वृक्षारोपण हे काही मोठे काम नाही.
वैयक्तिक पातळीवर सर्व च करतात.
वृक्ष तोड थांबवणे हे मात्र सामूहिक काम आहे ते मात्र हे बाबा लोक करत नाहीत.
आमचे सयाजी शिंदे पण खूप मोठ्या प्रमाणात झाडे लावतात आणि जगवतात पण.
ते पण स्वः हजर राहून.
पण ते त्याची शेखी मिरवत नाहीत.
ना अंध भक्त तयार करत.
मी त्यांच्या कुठल्याही कामाचे
मी त्यांच्या कुठल्याही कामाचे समर्थन करत नाहीये इथे. बऱ्याच जणांना ते कोण माहिती नव्हते, मला माहिती आहेत, इथल्या लोकांमुळे. मला माहिती असले तरी लोकांचे जीव जास्त महत्वाचे आहेत. ते कुठल्याही कारणाने जाणे हे अतिशय वाईट, दुख:दायी आणि चुकीचेच आहे. त्याला सरकारसह जे जे जबाबदार आहेत त्यांना कायद्याने योग्य ती शिक्षा व्हावीच.
आशा भोसले यांचे नाही का असंख्य fans पण त्याना जिथे पुरस्कार दिला आणि त्यांनी स्वीकारला तसंच या बाबतीत हवं होतं ना, कशाला ते शक्तिप्रदर्शन. काल मी हेच आमच्याकडे येणाऱ्या मदतनीस ताईंना म्हणाले. सरकारलाही या बाबतीत शक्तिप्रदर्शन हवं होतं. सामान्य लोकांचे कोणाला काय पडलंय.
"बैठकीत गेल्या मुळे लोकांची
"बैठकीत गेल्या मुळे लोकांची दारू सुटली"
ह्या वाक्याला पण तसा काही अर्थ नाही.
दारूचे व्यसन लागलेला व्यक्ती तेव्हाच दारू सोडतो जेव्हा शरीर कुरकुर करू लागते आणि डॉक्टर सांगतात आता दारू पिली पर उद्या मरशील.
असे बैठकांना जावून दारू सुटत नाही...
त्या साठी त्या व्यक्तीचे स्वतःवर खूप नियंत्रण असावे लागते.
१०० अट्टल दारुडे बैठीकी ला पाठवून बघा .
किती जण दारू सोडतील ते.
एकदा च अपवाद निघेल
वरातीमागून घोडे:
वरातीमागून घोडे:
माझ्या वैयक्तिक ओळखीतल्या एका मोठ्या शाळेच्या मुख्यध्यापिका बाई गेल्या होत्या ह्या कार्यक्रमात. एसटी चा प्रवास होता, पैसे त्यांनी भरले की कसे ते माहीत नाही, पण बहुधा बैठकीचेच आयोजन होते. नेमका त्या दिवशी मी मुंबईहून खान्देशात प्रवास करत होतो, रस्त्याने ह्या बैठकीच्या शेकडो गाड्या स्वतः पाहिल्या.
बैठकीविषयी: एकूण अंधानुकरण प्रकार आहे. हे करा ते करू नका. ज्या घरात ही बैठक वगैरे फालतुगिरी चालते त्या घरातले लहान सहान कार्य सुद्धा स्वारीच्या सहमतीने पार पडते. मुलाचे नाव ठेऊ का? मुलीचे लग्न करू का? वगैरे वगैरे. बैठक एकदा सुरू झाली की खंड पाडता येत नाही. इतर गाढवं बैठक चुकवलेल्या गाढवाला टोमणे मारतात, वाळीत टाकतात. हे वाळीत टाकणे त्या बैठकीचा जो कोण महा गाढव निरुपणकार असेल तो ठरवतो. अखंड xतीयापा..
असं समोर येतंय की या श्री सेवकांना सोशल मिडियापासून लांब राहण्याची "आज्ञा" केली गेली आहे.
धर्माधिकारी ह्यांचे कार्य काय
धर्माधिकारी ह्यांचे कार्य काय की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला .
हा प्रश्न लोकांनी विचारणे गरजेचे आहे.
१)वृक्षारोपण.
२) लोकांची दारू सुटली बैठकी ल गेल्यावर.
इतकेच श्री सेवक आणि मीडिया सांगते.
आणि लोक विश्वास ठेवतात
हे महाराष्ट्र भूषण होण्यास पात्र ठरवले गेले कारण
लाखो अंध भक्त पाळून असलेला माणूस ह्या एकमेव निकष वर.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे ..
हेच मला तरी सत्य वाटत.
ह्या राज्यात अनेक महान लोक आहेत.
त्यांना पुरस्कार ध्या .
जे खरेच महाराष्ट्र साठी काम करतात
अजिंक्यराव, डोळे उघडवणारी
अजिंक्यराव, डोळे उघडवणारी माहिती आहे. (ज्यांचे अजूनही बंद आहेत त्यांचे)
अल्कोहोलिक अनानिमस ला पण
अल्कोहोलिक अनानिमस ला पण द्या.
खूप पॉवरफुल बाबा दिसतोय !
मोहाली
मोहाली
आय पी एल मॅॅच सुरु झाली आहे.
पहा कुणालाही काहीही होणार नाही.
सरकार नी पुरस्कार दिला आहे तर
सरकार नी पुरस्कार दिला आहे तर ..
तो कोणत्या तरी गैर राजकीय व्यक्ती कडून दिला पाहिजे.
ज्यांचे खूप मोठे खरे कार्य आहे महाराष्ट्रात..
आणि अशी लोक आहेत.
पण अमित शाह ह्यांच्या हस्ते पुरस्कार दिला.
ह्याचा अर्थ सरळ आहे हा कार्यक्रम राजकीय फायद्या साठी च होता.
अडाणी किंवा बाकी उद्योगपती त्यांची money power वापरून स्वतःची संपत्ती वाढवता त.
देशाची संपत्ती लुटतात.
पण ते रोजगार तरी देतात.
ह्यांनी ह्यांचे अनुयायी राजकीय लोकांच्या हितासाठी च वापरले.
त्याचा फायदा घेवून हे राजकारणी सत्तेवर येतील आणि अजून मनमानी करतील.
ह्या मध्ये ना राज्य हित ना देश हित ना लोकांचे हित..
स्व फायदा मात्र आहे.
सरकारी खर्चाने वर्ल्ड रेकॉर्ड होतो गर्दी च.
पुरस्कार पण स्वतःलाच मिळतो
मग अडाणी हा श्रेष्ठ आहे ह्यांच्या पेक्षा कमीत कमी रोजगार तरी उपलब्ध केला.
वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शाळा
वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शाळा, अन्नाची पाकिटं देणं, गर्दीच्या ठिकाणी वागतूजव्यवस्थेस मदत, रक्तदान शिबिरं इत्यादी प्रकार बहुतेक सर्वच धार्मिक स्थळं आणि बाबाबुवाबापू करतात. ही कामं त्यांचा एकप्रकारे ’फ्रंट’ असतो. ते समाजोपयोगी काम करतात, हे त्यातून दिसतंच. शिवाय नवे लोक आकर्षित होतात. हे तमाम बुवाबापू फक्त समाजोपयोगी काम करताना कधीच दिसणार नाहीत. त्यांचं खरं काम त्यांचा कल्ट वाढवणं असतं. समाजोपयोगी कामं कल्टच्या वाढीस पोषक ठरतात. धर्माधिकारी यांनी वृक्षारोपण, व्यसनमुक्ती अशी कामं केली असतील, तर ती कामं मुक्तांगण, किंवा माधव गाडगीळ यांनीही निरलसपणे केली आहेत. बुवाबापू लग्न, नोकरी, घरगुती संबंध अश्या अनेक खाजगी बाबींमध्ये नाक खुपसतात. हे वागणं समाजोपयोगी निश्चित नाही.
पण सस्पेंशन ऑफ डिस बिलीफ
पण सस्पेंशन ऑफ डिस बिलीफ इतके की जिवावर बेतले तरी ह्या मानसिक गुलाम गिरीतून मुक्त होउन उठून जाता येउ नये? हे फार क्षोभ जनक आहे. मला तर जोन्स टाउन चीच आठवण झाली. सेल्फ प्रिझर्वेशन इन्स्टिंक्ट पण असतो एक. व त्या मृत्युचे कौतूक. हे समजण्या पलीकडे आहे.
आप्पासाहेबांच्या बैठकीची
आप्पासाहेबांच्या बैठकीची पोलखोल
– भूतपूर्व श्री सदस्य रेश्मा ठोसर
☺️जय सद्गुरू☺️
निमित्त इथं फेसबुकवर सुरू असलेली धर्माधिकारी फॅमिली अन शिंदे गुरुशिष्य भक्त गोंधळ आहे. वाटलं स्वानुभव रेखाटावा.
जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरू कृपा हे शब्द मला अति परिचयाचे आहेत. 12 वीची परीक्षा झाली अन ओळखीच्या व्यक्तीकडून बैठक समजली. भित्र्या मनाची मी कुटूंबासोबत बैठका करू लागले. आठवड्यातून 1 दिवस अडीच तास देऊ लागले. हळूहळू वाचायला बसावे वाटले. पण शिक्षकी पेशात असल्याने निरुपणाला बसण्याची आज्ञा झाली. म्हणजेच मला वाचायची किंवा निरूपण करायची इच्छा आहे असे लेखी रेवादांड्याला द्यावे लागते, ते हो म्हटले की झालो आपण अधिकारी. ह्याने म्हणे घराण्याची पुण्याई वाढते. मागच्या जन्माचे पाप धुतले जाते. काही आयुष्यात चांगल घडलं की सद्गुरुकृपा अन वाईट घडलं तर पूर्व जन्म पाप☺️
ह्यात नाव देऊन मी तब्बल 8 वर्ष निरूपण करायचे. तेव्हा तर 1 स्त्रियांची बैठक, शिवाय रात्री 2 वेळ पुरुषांची बैठक ऐकायला जायचे. त्यातून संपूर्ण रविवार निरुपणाला जायचे. लोक अधिकारी म्हणून संबोधायचे. बऱ्याचदा छोट्या भावाला चांगले संस्कार व्हावे म्हणून म्हणून बालभक्तीला झोपेतून उठवून जबरदस्ती नेलाय.
तिथं गेल की हजेरी लावा. उशिरा गेलं की लेट मार्क, 4 बैठका गेल्या की हजेरीवरून नाव कमी होणार असले नियम असायचे. रजिस्टर असलेली नाव जेव्हा श्री सदस्य ते धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रवास झाला तेव्हा मात्र सगळं खटकू लागलं. वर्षातून 4 स्पेशल बैठका ऐकायला वाडीत म्हणजे रेवदंड्यात जायचो तेव्हा वैभव पाहून अनेकदा मनात यायचं हे ह्यांच्याकडेच का? आपल्याला ह्या जन्मात तरी अशी संधी यावी. पण बैठकीत एकच सुरू, ठेविले अनंते तैसेंच रहावे, चित्ती असू द्यावे समाधान☺️
आपण सद्गुरू आदेश ह्या नावाखाली भित्रे बनत मानसिक गुलाम होतोय हे शेवटी 2013 ला प्रकर्षाने जाणवू लागले. अटी नियम पटत नव्हते. मनाविरुद्ध वागावे लागायचे. आपण कधी मोकळेपणे जगणं अनुभवू का असं वाटू लागलं.
कधी हा सत्कार, कधी सकाळी उठून कलियुगातील सत्यदत्तव्रतपूजा अन कधी एकमुखी दत्त अधिष्ठान स्थापना... ह्या करत दिवसभर बोकळत फिरलोय. ह्या गोंधळात समाज म्हणून नातेवाईक, पै पाहुणे ह्यांच्यात यायला जायला वेळच मिळाला नाही.
अंतरात्मा ,मन, शरीर, पंचमहाभूत, उपासना, श्रवण ह्यावर सद्गुरू आदेश हे सगळं ऐकून डोक्याचा पार भुगा झाला होता. घराच्या झाडांच्या कुंड्याची कधी देररेख न करणारी मी वृक्षारोपण करायला जाऊ लागले. आरोग्याची काळजी न घेणारी आरोग्य शिबिरात हजेरी लावली. ह्यांनी मात्र पेट्रोल पंप, वाड्या, गाड्या, बंगले उभारले.
*सद्गुरुंच्या घरी काही कार्यक्रम असल्यास वैठकीत नाव घेतली जात अन आपण आपली वेळ त्यांच्या खाजगी समारंभात द्यावी लागे. कधी स्वयपाकाला मदत तर कधी शेतात काम करायला फुकटचे मजूर म्हणून. त्यातही त्यांच्या घरात प्रत्यक्ष कामाला असणारा वर्ग बहुतेक उच्च वर्गीय अन बाकी कामाला मात्र बहुजन वर्ग.* जाती भेद पलीकडे माणूस म्हणून सर्व धर्माला तिथे टिकाव होता. लोक स्वतःचे कुळाचार, संस्कार सोडून फक्त भक्त होवुन दोन वेळा उपासना, बैठक श्रवण करून मनुष्य म्हणून प्रवास करू पाहत होते.
आदर्श कुटूंबव्यवस्था असावी म्हणून प्रसंगी व्यसनी नवऱ्याला पती परमेश्वर मानणे. आंतरजातीय विवाह केल्यास बैठकीत शरम वाटते म्हणून बैठकीला उपस्थित राहण्यास निर्बंध घालून त्या घराला वाळीत टाकणे, असे प्रकार स्वतः पाहिले आहेत. संस्कारवर्ग म्हणून बालभक्ती चालवताना बालकाला समजू लागल्यापासून अश्या प्रकारे देवभोळे बनवून निव्वळ हिंदू सण समारंभ कुटूंबात कसे साजरी करायचे ह्याचे मार्गदर्शन निरुपणात व्हायचे. पहाटे झोपमोड करून अधिष्ठानला तुळशीपत्र लावतो तो अधिक पुण्यवान असे म्हणून कित्येक जणांना ह्या शेड्युल मुळे हार्ट व बीपी संबंधी आजार जडलेत. बैठकीत जाता येता किंवा गादीवर बसताना कुणाला हार्ट अटॅक आला की, पुण्यवान ज्याला सद्गुरुचरणी वीरमरण आले म्हटले जात. पण त्या व्यक्तीच्या कुटूंबियांनी मात्र हा नैसर्गिक आघात समजून मोक्ष प्राप्त झाला म्हणून सुटकेचा निश्वास सोडायचा.
गादीवर बसणें म्हणजे मनाचे श्लोक वाचायला बसणे, दासबोध ओव्या वाचणे. अन निरूपण म्हणजे त्या ओवीवर थोडक्यात वाद्याशिवाय केलेलं कीर्तन. अश्या कीर्तनात संतांच्या वेगवेगळ्या दाखल्यांचा वापर करत श्रोते म्हणजे ऐकायला येणाऱ्यांना खिळवून ठेवणे. हे करण्यात काही हुशार व्यक्ती हेरली अन त्यांना भारी निरूपण करतो म्हटलं की शेट खुश. स्वारी उत्तम गाऊन घेते हा वाक्यप्रयोग केला जायचा म्हणजे नऊ महिने आईने पोटात बाळाला वाढवायचं, कष्ट करून जन्म द्यायचा अन पोराला बापाच नाव दिल्यासारखे वाटायचं. नवरा लायकीचा नसताना केवळ संसार टिकवण्यासाठी सद्गुरू आज्ञा पाळणाऱ्या बाया मी पाहिल्यात. ऐन तारुण्यात संसाराचा त्याग केलेली लोक पाहिलेत. नोकरी, व्यवसाय, नातलग ह्यांना गुंडाळून ठेवून केवळ जय सद्गुरू करणारी जमात पाहिलीय. बैठक झाल्यावर बाई दुपारच्या वेळी स्वयंपाक अन पोरं वाऱ्यावर सोडून बैठकीच्या सतरंज्या टाकणारी लोक पहिली. ही कामे म्हणजे पुण्य मिळवण्याचा मार्ग! असले विचार पेरले जाऊन पिढ्यानपिढ्या ह्यांच्या गुलाम झाल्यात.
बाबसाहेबांच्या जातीत जन्म घेऊन केवळ त्यांच्या कार्याची माहिती नसल्याने कधी घरच्यांनी कुळ देवता, कधी जन्मपत्रिका, कधी त्रंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी, कधी नवस, कधी गंडादोरा तर प्रसंगी ऐन उमेदीच्या काळात बैठकीला बसवून आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवला आहे.
कुटूंबीय कमी शिकलेले चालतील; पण बुद्धाचा धम्म व बाबासाहेबांचा संघर्ष दाखवणारा हवा म्हणजे आपण स्वतंत्र मताची व्यक्ती म्हणून घडू. लोक म्हणतात करून करून भागले अन देवपूजेला लागले. मी म्हणते जाऊ नये तेथे जावे पण विवेकासहित. हा विवेक जागरूक करण्याचे काम बार्टीच्या युथ लीडरशिप प्रोग्रॅमने केले. तिथं गेल्यावर बाबासाहेब ऐकला अन वाचला. अन महत्वाचा कृतीत उतवायचा प्रयत्न केला.
पूर्वी मीच होते जे कुटूंबासोबत अश्या उन्हात सद्गुरू सद्गुरू करत सत्कारला हजेरी लावायचे. पण कुटूंबात व्यक्तींना झालेला उन्हाचा त्रास पाहून सत्कारला जायचे नाही ठामपणे सांगू लागले. उपासना म्हणजे ग्रंथ वाचन बंद केलं. मला माझ्या पुढील आयुष्यात ना बैठक श्रवण करायची, ना उपासना, ना निरूपण करायचं म्हणत बाहेर पडली ती कायमची. तेव्हा माझ्यामागे बैठकीतील जी लोक माझी स्तुती करायची तीच लोक म्हणू लागली की *रेशमा ठोसर* ने पळून जाऊन लग्न केलं, ( इथं लग्नाला नवरदेव शोधलाच नव्हता) गादीवर बसून असं काम केलं, तोंड दाखवायला जागा ठेवली नाही म्हणून बैठक सोडली.☺️
मी रेवदंड्याला जाऊन सांगून आले. आमचा राम राम घ्यावा. ह्यापुढे प्रयत्न करणे, संघर्ष करणे हाच माझ्या आयुष्याचा मूलमंत्र असेल अन माणूस म्हणून जगेन. हे ठरवून जगू लागले. त्यातही आयुष्यात स्थित्यंतरे आली. काही म्हटले बैठक, उपासना सोडल्याने हे घडलं. मी म्हणते देर आये दुरुस्त आये. कुठलेही कर्मकांड, कुठल्याही धर्माचे पालन न करता जगायचे.
*असा माझा प्रवास आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे झालाय तो कायमचा.* ☺️
जय जय रघुवीर समर्थ. आता मला आमच्या हिंदूराष्ट्रभुमीत ओळखणारे अंडभक्त म्हणतील, खाल्या मिठाला जागली नाही. बैठक सोडल्याने हे लिहण्याची दुर्बुद्धी झाली. सद्गुरू हिला माफ करो.☺️
सध्या फक्त निर्सगाला सत्य मानून जगणारी मी. निर्भीडपणे हे मांडण्याची बुद्धी झाली. कुणी ह्याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणेल. पण मी ह्याला सम्यक बुद्धी म्हणेन.
आपलीच आगाऊ *रेशमा ठोसर.* (१७ एप्रिल २०२३)
चिनुक्स सहमत.
चिनुक्स सहमत.
रेशमा ठोसर यांचं पत्र शेअर केल्याबद्दल धन्यवाद सामना.
या बुवांनी बंगले गाड्या
या बुवांनी बंगले गाड्या पेट्रोलपंप जमीनी अशी बरीच माया जमवली आहे म्हणे. परमार्थाला लागलेल्या जीवाला कशाला हवी इतकी संपत्ती. "हम तो फकीर आदमी हैं, झोला लेकर चल पड़ेंगे। " असं म्हणावं आणि सगळी संपत्ती भक्तां मध्ये वाटून टाकावी.
पेट्रोलपंप ?
पेट्रोलपंप ?
ED CBI Where are you?
ED CBI Where are you?
JPC SIT ?
Sunstroke deaths: Maha sets
Sunstroke deaths: Maha sets up one-man committee.
मी बोललो आणि त्यांनी ऐकले.
या आणि चुना सफेती फासा.
चिनुक्स सहमत.
चिनुक्स सहमत.
रेशमा ठोसर यांचं पत्र शेअर केल्याबद्दल धन्यवाद सामना.
एखाद्या कल्ट वर टीका केली की काही अनुयायी धावून येतात व आम्ही वृक्षारोपण करतो, रक्तदान करतो, यंव करतो त्यंव करतो असे गुरगुरतात. हे सारे निरलस पणे करणाअरेही अनेक जण /संस्था आहेतच.
फक्त एक सदस्य समिति.
फक्त एक सदस्य समिति.
व्यसनमुक्त केले असेल पण लाखो
व्यसनमुक्त केले असेल पण लाखो लोकांना विचार न करण्याचे व्यसन लावले त्याचे श्रेय पण घ्या.
माझ पण असेच झाल.
माझ पण असेच झाल.
सिगारेट सुटली. पण गुटका मागे लागला.
Pages