सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला माणसाचाच मेंदू बसवला असावा ही अपेक्षा आहे. >>>>>
तुला गाढवाचा मेंदू बसवला आहे का ?
मी उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर बोल , वैयक्तिक पातळीवर बोलण्याची गरज नाही .
बाकी ते मुलंबाळं बद्दल विषय काढून तू तुझी लायकी दाखवली , तुझ्या सडक्या डोक्यातील विचार दाखवले .
एखाद्याला निरुत्तर करायचे असेल तर त्याच्या घरच्यांना मध्ये ओढा हे तुमच्या विकृत गँग चे फेमस टूल किट आहे .

<इथे तुम्हाला दुसर्या धर्माचा कुणी दिसला का ?>

त्यांनी याचं उत्तर दिलं आहे - <की या सगळ्या आय डी चे मुळ मालक उदारमतवादी हिंदूच आहेत असेच गृहीत धरायचे का ?>
इथे हिंदू धर्माबद्दल लि हिण्याआधी जन्मदाखल्याची प्रत इथे टाकायला हवी असेल. Who you?

ज्यांचे विचार पटत नाहीत, त्यांना दुसरा धर्म बहाल करणे हे त्यांचं स्टँडर्ड टुलकिट आहे. ममताबेगम, उद्धुद्दिन. हेच टुलकिट मायबोलीवरच्या सदस्यांवरही वापरतात. याचा अनुभव अनेकदा आला आहे. इथल्या एका आयडीबद्दल तो अमुक धर्माचा आहे म्हणून इतर सदस्यांना मायबोली संपर्कातून ईमेल्स पाठवल्या गेल्या होत्या. जास्तच चीडचीड झाली की हलाला की पैदाइश, राइस बॅग कन्व्हर्ट इ. विशेषणे बाहेर येतात.

शिवाय ते सतत मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दल शोधून शोधून लिहीत असतात तसंच इतरांनीही करावं अशी त्यांची अपेक्षा आहे.

इथे अनेकांनी या धर्माधिकारींच्या व इतर सेक्टबद्दल लिहिलं. त्यांना त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव आहेत. तसे मुस्लिम ख्रिस्ती बुवाबाबांबद्दल अनुभव कोणाला नसतील हे मुळातल्या इवल्याशा मेंदूत शिरायला जागा नाही, कारण तिथे फक्त द्वेष भरला आहे.

इथे हिंदू धर्माबद्दल लि हिण्याआधी जन्मदाखल्याची प्रत इथे टाकायला हवी असेल. Who you? >>>>>>>>>>
भुरटे , इतर धाग्यांवर फेमिनिस्ट म्हणवून घेवून आरती ओवाळून घेण्यात तु तर पटाईत आहेसच ,पण भाजप समर्थकांच्या घरातील बायका बद्दल अपशब्द वापरणाऱ्या विकृत गँग चा तू तर म्होरक्या आहे हे ही खूप वेळा सापडले आहे .
सर्व धर्मावर निष्पक्ष चर्चा करणार असाल तर हिंदू धर्मांतील उणिवा शोधण्यात सगळ्यात पुढे राहायला मलाही आवडेल .
फक्त हिंदू धर्मावर टीका करण्याची तुमची संकुचित वृत्ती दाखवू नका .
पुरस्कार सोहळ्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही , यास सरकार देखील जबाबदार आहेच .
मग पुरस्कार सोहळ्याचा आणि हिंदू धर्मावर टीका करण्याशी संबंध काय ?

तुला गाढवाचा मेंदू बसवला आहे का ? >>>> पक्ष, चिन्हापासून कुणाचेही काही चोरत नाही. ते तुमचे तुम्हाला लखलाभ.

मी उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर बोल , वैयक्तिक पातळीवर बोलण्याची गरज नाही .>>> कुठले मुद्दे? मुंबईत लाल किल्ला कुठे आहे असे विचारले तर त्याला मुद्दा म्हणतात का? Proud

बाकी ते मुलंबाळं बद्दल विषय काढून तू तुझी लायकी दाखवली , तुझ्या सडक्या डोक्यातील विचार दाखवले .>>> भाषाच सांगतेय सगळं काही. Wink

एखाद्याला निरुत्तर करायचे असेल तर त्याच्या घरच्यांना मध्ये ओढा हे तुमच्या विकृत गँग चे फेमस टूल किट आहे >>> ज्याला छोटुसा का होईना पण मानवी मेंदू आहे त्याला आधीचे उत्तर सहज समजले असते. वेगळी केस वाटल्याने उपमा / रूपक / दृष्टीन्त / दाखला याचा वापर केला. पण अर्थातच ते वाया गेले हे दिसतंच आहे. थोडक्यात, कुठल्याही परिस्थितीत नसलेल्या अवयवात ते शिरणार नाही. Rofl

( कृपया कोणत्याही मेंदू असलेल्या (चतुष्पाद सहीत) प्राण्याचा उल्लेख अपमान होईल अशा पद्धतीने करू नये ही नम्र विनंती.).
Wink

चर्चा फारच अवांतर होईल आणि फार पर्सनल मला लिहायचे नाहीये म्हणून मी लिहीत नव्हते पण आमच्या पर्सनल इश्युजमुळे जो माबोवर माहीतेय बऱ्याच जणांना म्हणून लिहिते सर्व धर्मांच्या कल्टमधे या ना त्याप्रकारे आम्हाला ओढायचे प्रयत्न झाले आहेत पण आम्ही ठाम राहिलो, यात ना सो त असताना ख्रिस्ती आणि श्रीरामपुरला इस्लाम, हिंदू दोन्ही आणि इथे ओढत नाहीत डोंबिवलीत फक्त सुचवतात (धर्म हिंदू) . मुलाला बघून श्रीरामपुरला रस्त्यात लोकं थांबवून ह्या दर्ग्यात ह्या बाबाकडे चला करायचे. सहजयोगही तिथे समजला, म्हणून मी फुरोगामी यांच्या एका वाक्याला अनुमोदन दिलं. जैन किंवा बौद्ध धर्माचे असे काही अनुभव आले नाहीत.

इथे मला हे लिहायचं नव्हतं कारण मुळ इथली चर्चा फार वेगळ्या नोटवर आहे आणि आताही मला ही पोस्ट लिहून चर्चा दुसरीकडे वळवायची नाहीये.

बाकी माझा भाऊ किंवा नवरा क्रियायोग मार्गात आहेत पण तो त्यांना शिकायचा होता आणि त्यात इंटरेस्ट होता, श्री श्री योगानंद यांचे योगीकथामृत वाचून तो भाग वेगळा. ते कुठेही कोणी ओढले नाहीये त्यांना किंवा पर्सनल इश्यूज मुळेही नाहीयेत. मी त्यात नाही. मला त्या दोघांनी कधीही ये ये केलंही नाही. मी ही त्यांना जाऊ नका म्हणाले नाही. पहिल्यांदा वीस वर्षांपूर्वी मीच ते पुस्तक वाचलं, अतिशय सुंदर आहे म्हणून मीच नवरा आणि भाऊ यांना वाचायला सांगितलं पण ते वाचून मला क्रियायोग शिकावा वाटलं नाही मला त्यात इंटरेस्ट नाही आणि त्यांना तो शिकावा असं वाटलं. हल्ली पाच वर्ष नवरा ते शिकून त्यात आहे, भावाने लॉकडाउन मध्ये ऑनलाइन कोर्स केलेला त्याचा.

हे फार अस्थायी असेल तर एडिट करायला हरकत नाही admin यांनी.

त्या विकृत गँग ला वड्याचे तेल वांग्यावर काढायची सवयच आहे . बर ते ही करू द्या !
त येथील सदस्यांच्या घरातील मुलाबाळांचा विषय काढण्या पर्यंत विषय नेण्याची गरज समजली नाही .
असल्या घाणेरड्या वृत्तीच्या सामण्या ला भरत मुक समर्थन देतो हे ही लक्षात घ्या !

जिथे फायदा दिसतो तिथे लोक डोकं टेकतात. हिंदू दर्ग्यावर, पीर इथे डोकं टेकवतात. शनिवारवाडया समोर नदीकाठी दर्गा आहे तिथे हिंदू जास्त असतात. हाजीअली, मलंग बाबा इथेही जातात.

मुसलमान नवसाला पावतो म्हणून दगडूशेठ गणपती, शिर्डी, तिरूपति, प्रति बालाजी ला जातो. दक्षिणेतले मुसलमान अय्यप्पा ला गर्दी करतात. आणखी एक स्थान आहे नाव आठवत नाही.

एक जैन व्यापारी होता. मालक शोरूम खाली करायला सांगत होता. हा ऐकत नव्हता. याच्या दरवाजात रोज शटर उघडताना उतारा दिसायचा. त्याने हा इतका डिस्टर्ब झाला कि सगळे बाबा, माता, देवस्थान झाले. शेवटी अजमेर ला गेला. आता मालकावर मंत्र उलटणार म्हणायचा. या नादात धंदा बुडाला. निम्म्या किमतीला फर्निचर विकलं, शेवटी तर मिळेल त्या किमतीला विकून निघून गेला. मला 13000 ची एक एक्झिक्युटिव्ह चेअर 3200 ला दिली. चार घेतल्या.

या मंडळींना धर्म, देव यापेक्षा संकटातून सोडवणारा कुणीही अडला हरी न्यायाने चालतो. परिस्थितीपुढे सारासार विचार गहाण पडत असतो. हेच मार्केट आहे.

एक्स्ट्रा २ एबी, प्रथम इथे कोण दुसरेच लोक हिंदू धर्माबद्दल लिहीत आहेत ते स्पष्ट कर.
मग बुवाबाबांवर टीका करणं म्हणजे हिंदू धर्मावर टीका कशी ते स्पष्ट कर.

अनिष्ट गोष्टींचा विरोध म्हणजे हिंदू धर्माला विरोध होत नसतो हे अगदीच पटलं
कारण कायमच हे ऑर्गयुमेंट ही लोकं करत असतात, आधी त्यांना का नाही बोलत? हे कसं दिसत नाही वगैरे
अरे दर वेळी सर्व समावेशक अखिल वैश्विक पातळीवरच प्रश्न मांडला तरच तो व्हॅलीड ठरतो का?

आमच्या शेजारी गणपती बसला आणि त्याच्या गोंगाटाने त्रास होत असेल तर ते बोलायचं नाई कारण लगेच मुसलमानांच्या भोंग्याचा त्रास होत नाही वाटतं
आता नाही होत खरंच कारण आसपासच्या एरियात कुठंच मशीद नाहीये
पण तरीही तक्रार करताना सगळ्यांची केली पाहिजे असलं यांचं अर्ग्युमेंट

हो. खूप whataboutary असते. आधी ' त्यांच्या ' वर टीका करा मगच आमच्यावर बोला.
किंवा मग ' तुमच्या पंचवीस प्रतिसादात एक तरी मुस्लिमविरोधी दिसला का, नाही ना, मग तुम्ही हिंदुद्वेषी आहात. '
विचित्र आर्ग्युमेंट असते.
गेल्या दीडशे वर्षांत अनेक सुधारक मर मर मेले म्हणून आज आपला समाज थोड्या बऱ्या स्थितीला पोचला आहे.
अजूनही कित्येक अनिष्ट प्रथा परंपरा आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत. त्या हटवण्यासाठी त्यावर बोलावे, लिहावे लागणारच ना? की मरू दे आमचा धर्म, आत्ता काय गरज आहे सुधारणांची म्हणून गप्प बसायचे?

गेल्या दीडशे वर्षांत अनेक सुधारक मर मर मेले म्हणून आज आपला समाज थोड्या बऱ्या स्थितीला पोचला आहे......+१.

' तुमच्या पंचवीस प्रतिसादात एक तरी मुस्लिमविरोधी दिसला का, नाही ना, मग तुम्ही हिंदुद्वेषी आहात. '
>>>>>>>>>>>
माझा बिलकुल आग्रह नाहीये की मुस्लिम धर्मावर तूम्ही बोलाच म्हणून !
हा पण धाग्याचा विषय पुरस्कार मूळे झालेल्या दुर्घटनाबद्दल आहे ना ? मग दुर्घटनाला जबाबदार नेते , सरकारी अधिकारी , पुरस्कारवाले अधिकारी बंधू यांच्यावर बोला ना ?
का धाग्याचा विषय कोणताही असू द्या, हिंदू धर्माला सडकून काढलेच पाहिजे , नाहीतर फाऊल धरला जातो का ?

आणि जर परखड मते मांडायला एव्हढे उतावळे झाले आहात तर सगळया देव धर्माची पोलखोल करा किंवा वेगळा धागा काढा !

तिथे सढळ हाताने मुस्लिम / ख्रिश्चन आणि हिंदु धर्माची टरफले काढू या !
लिब्रि , पुरोगामी आणि सेकूलर लोकांचे खरे चेहरे तिथेच दिसतील .

समजा एखाद्या मोठ्या घरात मोठे एकत्र कुटुंब रहात आहे. घरात कचरा व घाण फार झाली आहे, त्याबद्दल काय करता येइल अशी बैठक सुरू आहे. सर्वजण विधायक सूचना करत आहेत. अचानक एक जण आरडाओरडा करू लागतो की आपल्या घरातल्या कचर्‍याचं काय घेऊन बसलात, शेजारच्या घरात बघा, किती कचरा आहे. त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करताय तुम्ही. ई ई. हे त्याचं नेहेमीचच आहे. यावरून आपण तीन निश्कर्ष काढू शकतो.
१ तो माणून आळशी व ऐदी आहे.
२ घरत कचराच साठून रहाण्यात त्याचे हितसंबंध आहेत. कदाचित त्याला गांजाचे व्यसन आहे व आपला गांजा लपवायला तो कचरा वापरत आहे.
३ शेजारच्या घरातल्या कचर्‍याचे त्याचे ऑब्सेशन शेजार्‍याविषयी असलेल्या जेन्युईन कळवळ्यातून नव्हे तर केवळ आपले पाप झाकण्यासाठी आहे.

" आणि जर परखड मते मांडायला एव्हढे उतावळे झाले आहात तर सगळया देव धर्माची पोलखोल करा किंवा वेगळा धागा काढा ! "
पुन्हा तेच! सगळ्या म्हणजे कुणाच्या? सगळ्या धर्मांच्या?
का म्हणून? इथे लोकांच्या मानसिकतेवर चर्चा चाललीय. ' लोक ' ह्या शब्दामध्ये सरकारी यंत्रणेतलेसुद्धा सगळे लोक आलेच की.
इथे हलगर्जी आणि निष्काळजीपणा, बाबा, बुवांचा आदेश पाळण्याची वृत्ती ह्यावर चर्चा चाललीय. ती इथेच चालू दे. वेगळा धागा कशाला?

गेल्या रविवारच्या लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेसमध्ये पहिले पान भरून या कार्यक्रमाची सरकारी आमंत्रणवजा जाहिरात छापली आहे. कार्यक्रमाची वेळ साडेदहा अशीच छापली आहे. हस्तर पाकिस्तान स्टँडर्ड टाइइमने कार्यक्रम दहाचा होता (आणि दहा मिनिटांत संपणार होता) असे सांगताहेत का?

अरे बाप्रे
अर्ध्या तसाच फर्क
आताच्या आ त्ता मला फाशि द्या

हिंदूधर्माला नावं ठेवण्यासाठी सदर व्यक्ती हिंदू असण्याची गरज नाही तसेच सदर व्यक्तीने इतर धर्मानाही शिव्या घातलेल्या असाव्यात अशी अट घालता येणार नाही.

त्याचवेळी सदर व्यक्तीने हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म घेतला असेल किंवा माबोवर इतरत्र आपण निधर्मी /नास्तिक/ हिंदू धर्म न मानणारे /धर्म सोडून दिलेले असल्याचं लिहिलं असेल तर केवळ शिव्या देण्यापुरता हिंदू धर्मावर हक्क सांगू नये. हक्क न सांगता, घरात न शिरता बाहेर उभं राहून मनसोक्त शिव्या द्याव्यात. ते तुमचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.एका धाग्यावर मी राम मानत नाही लिहून दुसऱ्या धाग्यावर "माझा हिंदू धर्म , मी माझ्याच धर्मात सुधारणा करणार ना" असा गळा काढू नये. धर्मांतर/धर्मत्याग करूनही तुम्ही हिंदू धर्मात सुधारणा करण्यात योगदान देऊ शकता.

मुद्दा proximity चा आहे. निधर्मी असलो तरी ९०+% जवळपासचे, मित्र, नातेवाईक हिंदूच आहेत ना.

कर्मकांड वर टीका करणे म्हणजे हिंदू धर्मा विरुद्ध टीका नाही.
मला पण मंदिरात जाण्यास आवडत नाही ज्या मंदिराचे व्यापारीकरण झाले आहे त्या मंदिरात.
पण मंदिरा पर्यंत मी जातो फॅमिली बरोबर.
आस्था आहे .
मी पूर्ण देवाला मानणारा पण आहे.
पूजा, अर्चा तासनतास मला आवडात नाही.
पण मनात मात्र श्रद्धा असते.
सत्यनारायण पूजा किंवा बाकी कर्मकांड मला aawdat नाहीत.
पण त्या ठिकाणी जातो.
श्रध्देने.
हिंदू कर्मकांड वर टीका पण करतो.
लसूण,कांदा राक्षस च्या :::::: नी बनले आहेत ते खाणे वर्ज्य करावे .
हे असले तत्व ज्ञान ऐकले की डोक उठते.
पण मला हिंदू धर्म च प्रिय आहे.
हिंदू वर टीका .
म्हणजे .
प्रतेक प्राचीन ग्रंध वर खालच्या भाषेत टीका करायची.
किंवा भावार्थ लक्षात न घेता त्या मधील कथांवर फालतू कॉमेंट करायची.
प्राचीन मंदिर,त्या वेळेचे वास्तू शास्त्र ह्याचे कौतुक करायचे राहू ध्या .
त्या वर पण टीका करायची.
इत्यादी इत्यादी.
हिंदू धर्माचा द्वेष करणारे पण नाव हिंदू च असणारे लोक खूप आहेत.
त्यांच्या विषयी मात्र तिडीक आहे

निधर्मी /नास्तिक/ हिंदू धर्म न मानणारे /धर्म सोडून दिलेले >> आपल्याला (राजकीय दृष्ट्या) सोयीस्कर हिंदू धर्माची व्याख्या केली नाही की त्याला अशी लेबलं लावून हीनवायचे ही सुद्धा हिंदू धर्माची शिकवण नव्हे हो!

राजकीय फायदा ओरबाडण्यासाठी आणि समाजात 'आम्ही म्हणतो तोच हिंदू धर्म खरा' म्हणत डंका वाजवून मॉब मँटॅलिटी दाखवत धाकदपटशा करण्यापलिकडे हिंदू धर्माशी तुम्हाला काही आस्था असेल असे ईथे तरी कोणाला वाटत नाही.

ह्यांच्या लेखी मुस्लिम/ख्रिश्चन ह्यांच्या विरोधात लिहिलं/बोललं की तुम्ही सच्चे हिंदू.

आपण धर्मातील कर्मकांड ह्या विषयावर बोलत आहे.
कर्मकांड प्रतेक धर्मात आहे.
एक असा धर्म ह्या पृथ्वी च्या पाठीवर नाही की त्या धर्मात कर्मकांड नाहीत.
अगदी नास्तिक लोकांची पण कर्मकांड असतात.
दुसऱ्यांना नाव ठेवणे
आपल्या घरात लक्ष नसते म्हणजे नास्तिक पना वर श्रद्धा नसते पण खिडकीतून दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे ह्या वर फक्त लक्ष असते.
हे त्यांचे कर्मकांड च आहे

"कृपया धर्मातील कर्मकांडे" असा वेगळा धागा काढुन तिथे विविध धर्मातील कर्मकांडांची टीका (टीका = गुणदोषदर्शन) कराल का?
)

हिंदू धर्मात राहायला राम मानावा लागतो हे तुम्हाला कोणी सांगितलं?? तुम्हाला हिंदू धर्माचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे व्हाईटहॅट. तुम्ही कोणत्या धर्माचे आहात कल्पना नाही पण तो हिंदू नक्कीच नाही.

"कृपया धर्मातील कर्मकांडे" असा वेगळा धागा काढुन तिथे विविध धर्मातील कर्मकांडांची टीका (टीका = गुणदोषदर्शन) कराल का?
>>><>>>>>
नक्कीच कोणी तरी काढा .
माझ्याकडे इतर धर्मांचे खूप मटेरीयल आहे .

Pages