सहजपणे टाळता येणारी दुर्घटना - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा

Submitted by उदय on 18 April, 2023 - 00:58

रविवार, १६ एप्रिल २०२३, खारघर (जि रायगड ) येथे महाराष्ट्र भूषण सोहळा दिमाखात पार पडत असतांना एक दुर्घटना घडली आणि त्यामधे १० + लोकांना प्राण गमवावे लागले. Sad

पुरस्कार वितरण समारंभ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, आणण्यात आले होते. सभास्थानी, मोकळ्या मैदानात, उन्ह डोक्यावर घेत, हजारो/ लाखो लोक सकाळपासून ताटकळत बसले होते.
व्यासपीठावर राज्याचे तसेच केंद्रातल्या नेत्यांनी हजेरी लावली होती. एव्हढा मोट्ठा श्रोतागण आपल्याला एकण्यासाठी आले आहेत म्हटल्यावर त्यांच्याही उत्साहाला पारावर उरला नव्हता. हळू हळू तापमान ३८ से. कडे सरकत होते. तापमान, अनेक तास थेट उन्हाशी संपर्क, हवेतील आद्रता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून अनेक उपस्थितांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यामुळे दहा पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले.

एव्हढा मोठा प्रेक्षक वर्ग एकत्र येत असतांना त्यांच्या साठी आवश्यक अशा किमान सोई सुविधांची व्यावस्था करण्याचे सौजन्य आयोजकांनी ठेवायला हवे होते. उन्हापासून रक्षण करण्यासाठी डोक्यावर छत नाही, थंड पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एप्रिल महिन्यात, भर दुपारी, मध्यान्हीची वेळ, अनेक तास चालणार्‍या समारंभासाठी निवडली कुणी? या घटनेस जबाबदार कोण ?

ही मानवनिर्मीत घटना सहजपणे टाळता येण्यासारखी होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की आक्षेप कशाला आहे.
1) इस्रो चे संशोधक हे संशोधक असून पण मंदिरात गेले ह्याला.
२) इस्त्रो चे संशोधक duty वर असताना सरकारी पैसे खर्च करून मंदिरात गेले ह्याला.
३) नवरात्री मध्ये संशोधन बंद असते.ह्याला विरोध आहे की .
हिंदू सणाला संशोधन बंद असते ह्याला.
मंदिरात जाणे ह्याला अंध श्रद्धा म्हणता येणार नाही.
ती श्रद्धा झाली.
ते विज्ञान वादी नाहीत असे म्हणता येणार नाही कारण रॉकेट प्रक्षेपण करण्यात त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही.

आपण धाग्याच्या मुद्द्यावर येऊ का???

आज आप्पा स्वामी यांच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे
त्यात त्यांनी भाजप ने कसे गलिच्छ राजकारण केलं आणि माझ्या सदस्यांनाचा जीव घेतला असे लिहून हा पुरस्कार परत करत असल्याचे म्हणलं आहे

फोटो बनावट असावा अशी शंका आहे कारण बातम्यांत असे काही दिसले नाही

फोटो बनावट असावा अशी शंका आहे कारण बातम्यांत असे काही दिसले नाही>> ते पत्र बनावट असल्याबाबत लोकसत्ता मध्ये बातमी आहे

माझ्या सासरी सासू सासरे नणंद आणि नणंदची फॅमिली सगळे बैठकीला जातात....आणि खरच लोक अति करतात..गुरुचरित्र वाचायला सुद्धा स्वारी ना पत्रक पाठवून त्यांची permission घ्या ..बारस कधी करायचा .ते याना विचार...लग्न करताना इकडे विचार,..असे प्रकार खूप आहेत ...बैठकीला जाणार्रेच फक्त शहाणे..बाकी मूर्ख असा एकंदरीत आव असतो ...हे स्वतः अनुभवले आहे...कुलदैवताला पाय पडणार नाहीत पण अप्पा स्वारीचा सगळं करतील..एकूणच हास्यास्पद प्रकार आहे हा

>>>>>>>>>>

आमच्या गावी राधास्वामी सम्प्रदायी आहेत, आमच्या घरातही एक आहे. त्यांचा हाच प्रकार चाललेला असतो. राधास्वम्म्च यांचे देव, त्यांच्या फोटोना पुजतात, घरच्या देवांना मानत नाही. राधास्वमि सांगतात प्रेम, माया वगैरे सगळ्यांवर करा तर ही झाडुन सगळी मंडळी भांडकुदळ…. सत्संग दर आठड्याला जोर्दार होतो, शिकतात काय देव जाणे.

राधास्वम्म्च यांचे देव, त्यांच्या फोटोना पुजतात, घरच्या देवांना मानत नाही.##असाच एक अडाणेश्वर संप्रदाय आहे

त्यांचेही लाखो फॉलोवर्स आहेत. दर डिसेंबरात मुम्बैत मेगा मेळावा असतो. मला आधी वाटायचे की न सुटणार्‍या काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे किंवा घरातले सततचे आजारपण, त्यामुळे येणारे नैराश्य याने त्रासलेले लोक कंटाळुन बाबा-बापुंच्या नादाला लागुन घरातील त्रासातुन तात्पुरती सुटका करुन घेतात. गावी आल्यावर इथले भक्त बघुन अवाक झाले. चाय से ज्यादा तपेली गरम असा प्रकार आहे. गुरु केलाय तर त्याचा सल्ला आचरणात आणा की.. इथे सगळे उलट. कर्मकांडच महत्वाचे.

इथे स्वामीनारायणवाले (अक्षरधामवाले) काही आहेत, बहुतेक जास्त करून गुजराथी. पूर्वी ते लोक सगळ्यांमध्ये मिसळायचे. पण गेली काही वर्षे ते जणू वेगळाच धर्म असल्यासारखे वागतात. ते आता इतर देवळात किंवा इतर देवळात जाणाऱ्यांच्या धार्मिक कार्यक्रमात अजिबात जात नाहीत. त्यांचे गरबे वेगळे असतात, त्यात इतरांना आमंत्रण नसते आणि ते ही इतर गरब्यांना जात नाहीत.

मध्यंतरी एका गोऱ्या बाईने वेगवेगळ्या धर्मांची माहिती देणारी पोस्टर्स इमारतीत लावली होती, त्यात एक सहज नावाच्या धर्माचं पोस्टर होतं. त्यावर निर्मला देवींचा फोटो आणि त्या धर्माची माहिती. मी चक्रावून गेलो. ज्ञानेश्वरीचे दाखले आपल्या प्रवचनात देणाऱ्या निर्मला देवींनी वेगळा धर्म कधी काढला? सहज पंथ नावाचा पंथ आहे हे ऐकून होतो. सहज योग शिबिरे त्या घ्यायच्या तेही माहीत आहे. पण आता विकीवर त्यांच्या नावाचं पान वाचलं तर तिथेही त्यांना सहज योग नावाच्या धर्माच्या संस्थापिका म्हटलं गेलं आहे. ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ ...!

असो. अजून अवांतर न्यायचाच असेल धागा तर आणखीन काही माहीत असलेली उदाहरणं त्यासाठी राखून ठेवतो.

ह्या मधून एक च बोध घ्यायचा आहे .
गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळा.

१) प्रसिद्ध देवस्थान च्या मंदिरात ( जे देवस्थान लय च प्रसिद्ध असते हा वाक्य प्रयोग योग्य आहे)
जाणे टाळा.
ईश्वर सर्व व्यापी आहे त्याच कोणत्या ही मंदिरात गेले तरी तिचं मनःशांती मिळते.

सिद्धिविनायक मंदिरात जाण्या पेक्षा दुसऱ्या गणेश मंदिरात जावे.
२) कोणत्या ही कार्यक्रमात.
मग ते कीर्तन असू,कोणत्या नेत्या ची सभा असू,कोणता लिव्ह मनोरंजन च कार्यक्रम असू, cricket चे सामने असू ,यात्रा असू, उस्तव असू
पर्यटन स्थळ असू ध्या,पावूस सुरु झाला की धबधबा असणाऱ्या ठिकाणी,डोंगर दर्यात, लोक प्रचंड गर्दी करतात आणि अपघात प्रतेक वर्षी होतात.
त्या मुळे

जिथे गर्दी असते तिथे न जाणे उत्तम. त्या मध्येच शहाणपण आहे

खरं आहे.

बरेचदा मी इथे आमच्या मदतनीस ताईंचा उल्लेख त्या या पंथातल्या असल्याने केलेला, पण यावेळी त्यांनी स्वतः हून उन्हात गर्दीत न जायचा निर्णय घेतला आणि मिस्टरांनाही जाऊ दिलं नाही, 2008 ला गेलेले ते सर्व पण यावेळी टीव्हीवर बघुया, तिथे जाण्यापेक्षा असं ठरवलं. निदान स्वतः चा स्वतः हा विचार तरी केला त्यांनी हे बघून मला बरं वाटलं.

भीती मुळे देवा ची निर्मिती झाली . आणि देवा मुळे धर्माची निर्मिती झाली असे आपण सोप पद्धतीने धर्माची उत्पत्ती सांगतो.
पहिली माणसाला निसर्गात घडणाऱ्या घटनांची भीती वाटायची.
विज्ञान तंत्र ज्ञान त्या नैसर्गिक घटनेनं वर विजय मिळवला .
पण माणसाच्या मनातील भीती घालण्यास विज्ञान, तंत्रज्ञान पण कमी पडत आहे.
जो पर्यंत माणूस सर्व च गोष्टी वर विजय मिळवू शकणार नाही .
तो पर्यंत धर्म राहणार,आणि देव सुद्धा राहणार.
ह्या सर्व गोष्टी ची जनक कोण असेल तर माणसात असलेली भावना (एमोशनास) .
भावना च विविध गोष्टी ला जन्म देते.
राग,द्वेष,स्वार्थ,मदत करण्याची वृत्ती,पाप,पुण्य,कुतूहल ,सर्व काही फक्त मानवी मनात असलेल्या भावणे मुळे च निर्माण होते.
मानवी मेंदू मधील भावना निर्माण करणारे केंद्र शोधून ते नष्ट केले तर ..
देव,धर्म,पाप,पुण्य,कुतूहल,राग,द्वेष,स्वार्थ सर्व नष्ट होईल ..
जो पर्यंत माणसाच्या मनात भावना निर्माण होत आहेत तो पर्यंत ह्या मधील काहीच नष्ट होणार नाही.
जे देव मनात नाहीत ते कोणत्या तरी माणसाला मानतात .
बुद्ध सांगतात देव नाही पण त्यांचे भक्त बुद्ध ना च देव समजून त्यांचे गोडवे गातात .
शेवटी हा देवाचा च नवीन प्रकार च असतो.

नवीन Submitted by साधना on 22 April, 2023 - 22....+१.

अंजू,तुझ्या ताईंचे कौतुक!

माझेही एक नातलग आहे.कुठल्यातरी बाबांची भक्त. सद्गुरु सद्गुरू म्हणून जप असतो.पण बाई,डांबिस म्हणावी तशी पहिल्यापासून आहे.वय वर्षे 70 च्या आसपास!आधी सद्गुरू नव्हते.गेल्या 4-५ वर्षातील ही कमाई असेल. सत्संगाला जायचे असेल तर फ्री सोय असेल तर जायचे हा खाक्या गेल्या वर्षी मी अनुभवला.तिचा नवराही सकाळी 3-४-५ला उठून दोन दोन तीन तीन तास दिवसातून दोनवेळा देवपूजा करतो.व्यसन मग कुठलेही असो,अतिरेकाने शिसारी येतेच.
जी माणसे जास्त देवदेव करतात ती जास्त ढोंगी असतात हा माझा अनुभव आहे.इतर काही धुतले तांदूळ असतात असं नव्हे,पण हे लोक (देवदेव वाले) जास्त ढोंगी असतात.

बरीच आस्तिक माणसेही अनुभवली आहेत.त्यांची वागणूकही अनुभवली आहे.शांत तृप्त असतात.
भारीच अवांतर झाले.

माणूस अशिक्षित असू की शिक्षित,गरीब असू की श्रीमंत .
कोणत्या तरी श्रद्धा म्हणा किंवा अंध श्रद्धा ह्यांच्या आहारी गेलेला असतोच.
कोणत्या तरी देवाच्या,किंवा बाबा बुवांच्या,कोणत्या तरी नेत्यांच्या किंवा कोणत्या तरी महापुरुषाच्या .
आहारी गेलेला असतोच असतो.
Fans, चाहते, भक्त , अनुयायी ह्या मध्ये जास्त फरक नाही.
मानसिक दृष्ट्या ते एकच पातळीवर असतात .
आणि विवेक हरवून बसलेले असतात.
त्या पेक्षा मीच शहणा सर्व संकट वर मीच मार्ग शोधणार आहे.
मला जे पटते ते योग्य च असणारा.
अशी माणसे स्वतंत्र बुध्दी ची असतात.
आणि हा स्वभाव च उत्तम

जी माणसे जास्त देवदेव करतात ती जास्त ढोंगी असतात हा माझा अनुभव आहे.इतर काही धुतले तांदूळ असतात असं नव्हे,पण हे लोक (देवदेव वाले) जास्त ढोंगी असतात.>>>>>>>>
कोट्यवधी वेळा सहमत .
त्यात कपाळावर टिळा लावून फिरणारे टाळकरी ,पुजारी
तर सगळ्यात जास्त धोकेबाज !
स्वतःला इश्र्वरदास भासवून फायदा लाटनारी ही गँग मोठी बेरकी असते , हे माझे प्रामाणिक मत !
मला हा धागा धर्म भेदभाव कडे न्यायचा नाही !
पण इथे बरेचसे जण फक्त हिंदू धर्मातील बुवाबाजी वर सुसाट सुटले आहेत ,याचे कारण काय असावे ?

सामान्य लोकांच्या अंधश्रध्देचा फायदा घेवून त्यांना लुटणे , एखाद्या स्टेज वर धार्मिक कार्यक्रम करून लोकांचे रोग पळवून लावण्याचे नाटक करणे ही नाटके मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात चालत नाही का ?
इतर धर्मात बुवाबाजी नसतेच असे कोणी ठामपणे सांगू शकेल का ?

लोकांचे रोग पळवून लावण्याचे नाटक करणे ही नाटके मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात चालत नाही का ?.......असतीलही नव्हे आहेतच.पण आपल्या पायाला लागलेला चिखल धुण्या आधी दुसऱ्याचे पाय कशाला तपासा?

नक्कीच !!!
पण इथे आपले पाय ऑलरेडी दुसऱ्यांनी धुवायला सुरुवात केली आहे , त्याचे काय ?

गावाला एक विद्वान होते. एकदा त्यांच्या घराला आग लागली. लोक म्हणाले "आग विझवाल का पंडीतजी प्लीज ?".
ते म्हणाले , " त्या मौलवींच्या घराला आग लागली, त्याला आग विझव म्हणून सांगितले का ? पाद्रीच्या घराला लागली तेव्हां त्याला सांगायला गेला होता का ?"
लोक न बोलता निघून गेले. पुढे काय घडलं असेल हे सांगायला सूज्ञांची गरज नाही.

माझ्या महितीतली एक जण बंगलोरला रहातात. त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारे एक डिसुझा म्हणुन आहेत. त्यांची लहान मुले रात्री धाड धाड धावतात काहीतरी आपटतात. यांची झोपमोड होते.

माझ्या मित्राच्या महितीतले एक जण दिल्लीला रहातात. त्यांच्यावरच्या मजल्यावर अली रहातात. त्यांची लहान मुले रात्री धाड धाड धावतात काहीतरी आपटतात. यांची झोपमोड होते.

माझ्या महितीतली अजुन एक जण जयपूरला रहातात. यांच्या वरच्या मजल्यार सिंग रहातात. त्यांची लहान मुले रात्री धाड धाड धावतात काहीतरी आपटतात. यांची झोपमोड होते.

तर सांगायचा मुद्दा असा की आमच्या वरच्या मजल्यावर टि एन रामराव स्वामी रहातात.त्यांची लहान मुले रात्री धाड धाड धावतात काहीतरी आपटतात. माझी झोपमोड होते.

(विविध धर्म तसेच विविध पक्षांची सरकारे असलेली राज्ये यांचे उदाहरण देऊन मग स्वतः चा अनुभव लिहिला असल्याने कुणाच्या भावना दुखावल्या नसतील अशी आशा करतो.)

माणसे जास्त देवदेव करतात ती जास्त ढोंगी असतात हा माझा अनुभव आहे.इतर काही धुतले तांदूळ असतात असं नव्हे,पण हे लोक (देवदेव वाले) जास्त ढोंगी असतात.

बरीच आस्तिक माणसेही अनुभवली आहेत.त्यांची वागणूकही अनुभवली आहे.शांत तृप्त असता

>>>>> +१०००००

माणसे जास्त देवदेव करतात ती जास्त ढोंगी असतात हा माझा अनुभव आहे>>> अगदी, आमच्या ओळखीत एक होते
प्रचंड देवाचं करायचे, अतिशय सुरेल आवाजात भजने वगैरे म्हणायचे
कुठेही गेले की त्यांना आधुनिक ऋषी वगैरे असल्यासारखे ट्रीटमेंट मिळत असे
आणि ते आता कोरोना मध्ये गेले, ते गेल्यावर त्यांच्या बायकोनी सत्यस्थिती उघड केली, प्रचंड धार्मिक असणारा हा माणूस कमालीचा विचित्र होता, घरी प्रचंड डोमीनेशन, पूजेला जरा काही कमी पडला तर बायको मुलांना वेडेवाकडे बोलत असे, संतापाने हातातल्या वस्तू फेकत असे, कुठल्याही प्रकारच्या फॅशन करण्याची बंदी, हॉटेलमध्ये खाणे नाही, कितीही वेळ बाहेर असले तरी घरी जाऊन बायकोने स्वयंपाक करून यांना जेवायला घालयाचे, कुणाला फोन करू नये म्हणून लँडलाइन ला लॉक करून ठेवलेले असे अनेक प्रकार कळले
त्यामुळे धक्काच बसला, इतकी शांत, सोज्वळ प्रतिमा होती या माणसाची समाजात आणि प्रत्यक्षात असा होता

स्वभाव, विचार, वागणुक, प्रामाणिकपणा इ. याचा आस्तिक/नास्तिक असण्याचा संबंध नाही असे म्हणता येईल का?

.आस्तिक तापट असतात.
नास्तिक तापट असतात
आस्तिक शांत असतात
नास्तिक शांत असतात
आस्तिक गर्विष्ठ असतात
नास्तिक गर्विष्ठ असतात
आस्तिक गुन्हेगार असतात
नास्तिक गुन्हेगार असतात
आस्तिक समंजस असतात
नास्तिक समंजस असतात
आस्तिक श्रद्धाळू असतात.
नास्तिक श्रद्धाळू __तात.
आस्तिक दैववादी असतात
नास्तिक दैववादी __तात.
आस्तिकाचा प्रवास विवेकाकडे होऊ शकतो.
नास्तिकाचा प्रवास विवेकाकडे होऊ शकतो
आस्तिक अंधानुयायी असतो
नास्तिक अंधानुयायी _सतो
आस्तिक श्रद्धेपोटी कोणतेही काम करू शकतो
नास्तिक श्रद्धेपोटी कोणतेही काम ????

आचार्य जी .
सहमत आहे.
माणूस हा माणूस च असतो.
प्रत्येकाचा एक विशेष स्वभाव असतो .
चांगले वाईट गुण प्रतेक माणसात असतात.
आस्तिक असला म्हणजे माणसाचे वर्तन चांगले असते.
नास्तिक असला म्हणजे माणसाचे वर्तन चांगले असते .
असे काही नाही.
मुळात आस्तिक किंवा नास्तिक असणे हे माणसाचे चांगुलपणा दाखवणार निर्देशांक नाही

Pages