डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
किमी प्रति तास kmph आणि मीटर
किमी प्रति तास kmph आणि मीटर प्रति सेकंद mps ह्यात मूळ मसूदा लिहिताना बहुदा अजाणतेपणाने गल्लत झाली / केली असावी
अशी लेजर शस्त्र खरेच
अशी लेजर शस्त्र खरेच अस्तित्वात आहेत/त्यावर संशोधन सुरु आहे (आणि लेजरचा वेगही ३ लाख किमी प्रती सेकंद असणार.) भारतसुद्धा हे बनवत आहे.
पण अशी नीट माहिती न देता, प्रचंड वेगाचे शस्त्र भारत गुप्त पणे बनवत आहे, ( इतर देशांना असे काही शस्त्र असते हे ठाउकही नाही), शत्रुला पळुन जायलाही मिळणार नाही (आता बंदुकीची गोळी येताना दिसली की शत्रु काय नि रजनी काय सहज बाजुला होउन तिला टाळु शकतात की नाही?), जणु बंदुकी प्रमाणे हे जमीनीवर समोर उभे असलेल्या फाेेजेवर हल्ला करायला वापरणार, असे शस्त्र आपल्याकडे असले की कोणाची आपल्यापुढे उभे ठाकणयाची हिंमत होणार नाही वगॆेरे रंगत आणल्याने त्या पोस्टला इथे स्थान दिले आहे.
प्रत्यक्ष लाईट तशी प्रदक्षिणा
प्रत्यक्ष लाईट तशी प्रदक्षिणा घालू शकत नाही >> जिथे स्पेस टाईम फॅब्रिक वाकडा होतो तिथे अशी प्रदक्षिणा घालता येईल का? आपला सुकडू सुतार ते फॅब्रिक वाकवणारी हातोडी बनवायला घेईल.
कोणतेही शस्त्र निर्माण झाले
कोणतेही शस्त्र निर्माण झाले की त्या पासून बचाव कसा करायचा ह्याचा पहिला विचार केला जातो.
पण हे तंत्र अतिशय गुप्त असते.
युद्धात च ते उघड होते.
बंदुका,तोफा, हे सर्व outdated झालेले आहे.
मागास तंत्र आहे ते.
दारुगोळा वापरून हानी करणे हा विचारच आता मागास आहे.
जैविक अस्त्र ,रासायनिक अस्त्र, लेझर अस्त्र .
ही खूप प्रभावशाली आहेत.
आणि प्रत्येक देशाकडे ती 100% आहेत.
हपा, तसे फॅब्रिक वाकवले आणि
हपा, तसे फॅब्रिक वाकवले आणि त्या गोळीबाराला प्रदक्षिणा घालायला लावली तर गोळ्या १/८ सेकंदात प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्याच ट्रकवर मागून नाही का आदळणार? आपल्यालाही पळुन जायला संधी मिळणार नाही.
>> त्यावर संशोधन सुरु आहे
>> त्यावर संशोधन सुरु आहे
+१११ ते सुद्धा United States military मध्ये
>>प्रत्यक्ष लाईट तशी प्रदक्षिणा घालू शकत नाही >> जिथे स्पेस टाईम फॅब्रिक वाकडा होतो तिथे अशी प्रदक्षिणा घालता येईल का? आपला सुकडू सुतार ते फॅब्रिक वाकवणारी हातोडी बनवायला घेईल.
लाईट म्हणतो, "मी मोडेन, वाकेन, सडपातळ होईन.... पण फिरणार नाही"
त्यामुळे जास्त गुरुत्वाकर्षण असेल तिथे वाकतो, खूप गती असेल तर पातळ होतो, कृष्णविवर असेल तिथे मोडतो. पण प्रदक्षिणा मात्र कुणाभोवती नाही 
(ता.क. कदाचित कृष्णविवरच्या थोडे बाहेर फिरत असेल पण नक्की माहित नाही त्याविषयी)
वाचण्या मध्ये आलेल्या
वाचण्या मध्ये आलेल्या साहित्यावर विश्वास ठेवून काही ही अंदाज करू नका.
प्रकाशाला गोल गोल फिरवत ठेवणे हे अशक्य आहे हे कोणी सांगितले
सर्व गुप्त तंत्र कोणी उघड करत नाही.
पब्लिक ला झेपेल इतकेच ज्ञान त्यांना पुरवले जाते.
ब्लॅक होल पर्यंत जावू नका.
Black होल खूप कठीण भौतिक स्थिती आहे.
. माणसाला अजून त्या मधील काहीच percent माहीत आहे
वाचण्या मध्ये आलेल्या
.
>> प्रकाशाला गोल गोल फिरवत
>> प्रकाशाला गोल गोल फिरवत ठेवणे हे अशक्य आहे हे कोणी सांगितले
गोल फिरत राहणे म्हणजे Orbital speed. जसे कि पृथ्वी सूर्याभोवती ज्या अंतरावरून फिरते तो तिथला Orbital speed असतो. हा स्पीड सूर्यापासून जसेजसे दूर जाऊ तसतसे कमी होतो (कारण गुरुत्वाकर्षण कमी होते). त्यामुळे सर्वाधिक Orbital speed हा सूर्याजवळ किंवा तत्सम कोणत्याही खगोल (ग्रह/तारा/कृष्णविवर इत्यादी) जवळ असेल. कारण तिथे त्या गोलाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक असते. पण एखाद्या खगोलाचे गुरुत्वाकर्षण कितीही जास्त असले तरी तिथे वस्तूचा Orbital speed हा प्रकाशाच्या वेगाइतका होऊ शकत नाही. त्यासाठी गुरुत्वाकर्षण अमर्याद हवे कि जे कृष्णविवराबाबत आहे.
हे कोणी सांगितले
हे कोणी सांगितले
प्रकाशाची दिशा च मुळात माध्यम ठरवतो.
प्रकाश कोणत्या माध्यमातून प्रवास करत आहे ते महत्वाचे असते.
फक्त निर्वात पोकळीत च प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो.
हे पण भौतिक शास्त्र मध्ये जे सामान्य लोकांसाठी च काही माहिती उपलब्ध करून दिली आहे त्या मध्ये आहे.
खूप मोठ्या प्रमाणात माहिती सर्व देशांनी लपवून ठेवली आहे .
अतिशय किरकोळ माहिती शास्त्र ह्या नावाखाली सामान्य लोकांना दिली जाते
सेकंदात प्रदक्षिणा पूर्ण करून
सेकंदात प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्याच ट्रकवर मागून नाही का आदळणार? >> बरोबर आहे. न्यूटनचा गतीचा चौथा की पाचवा नियम ऐकला होता, जर तुम्ही एका झाडाभोवती प्रकाशापेक्षा जास्त वेगाने धावलात तर तुम्ही स्वतःलाच ... (पुढचे सेन्सॉर्ड आहे).
अणू बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब
अणू बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब,अशी सर्व प्रकारची स्फोटक अस्त्र .
ही पृथ्वी साठी घातक आहे .
ज्या मध्ये जो ही अस्त्र वापरेल तो पण वाचणार नाही आणि ज्या विरुद्ध वापरले जाईल तो पण वाचणार नाही.
कोरोना चे उदाहरण आहे.
पर्यावरण ची बिलकुल हानी न करता शत्रू राष्ट्र पूर्ण पांगळे करण्याची ताकत जैविक अस्त्र मध्ये आहे.
लेझर अस्त्र पण त्याच प्रकारची आहेत.
हीच आधुनिक शस्त्र असतील
>> प्रकाश कोणत्या माध्यमातून
>> प्रकाश कोणत्या माध्यमातून प्रवास करत आहे ते महत्वाचे असते.
+१ होय. यानुसार ऑप्टीकल फायबर मधून प्रकाश (लेझर सुद्धा) गोल गोल फिरत ठेवता येऊ शकतो. पण माझे आधीचे प्रतिसाद अवकाश/निर्वात पोकळीसाठी होते ("पृथ्वीभोवती" असा उल्लेख असल्याने तो संदर्भ आहे)
आधीचे प्रतिसाद अवकाश/निर्वात
आधीचे प्रतिसाद अवकाश/निर्वात पोकळीसाठी होते>>खरं तर व्हॅ.फॉ. मध्ये पूर्ण माहिती नाहीये,actully शास्त्रज्ञ खूप सारे प्रयोग करून निर्वात पोकळीला वात आणणार आहेत ,मग ती निर्वातच राहिली नाही की प्रकाश गोल गोल फिरवणार
किमी प्रति तास kmph आणि मीटर
किमी प्रति तास kmph आणि मीटर प्रति सेकंद mps ह्यात मूळ मसूदा लिहिताना बहुदा अजाणतेपणाने गल्लत झाली / केली असावी
<<
६०० कोटी मतदारांच्या देशात गल्लत 'झाली/केली' असं म्हणताय तुम्ही?
पण हे गुप्त आहे नं की फक्त
सगळेच
पण हे गुप्त आहे नं की फक्त काही लाख लोकांना माहिती असलेलं रहस्य आहे.
सेकंदात प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्याच ट्रकवर मागून नाही का आदळणार? >> हर्पा
टॉम अँड जेरी मधे होते असं.
वाटेत टोलनाक्यासारखे दोन, चार किंवा अजून प्रिझम ठेवले तर प्रकाशाला परावर्तित करून गोलगोल फिरवता येईल का. काय ॲक्यूरसी आहे या वाक्यात प्रकाशाला माहीत.
निर्वातालाही वात यावा असे फॉरवर्ड.
निर्वातालाही वात यावा असे
निर्वातालाही वात यावा असे फॉरवर्ड. >>>
फक्त प्रिझम ठेवून "गोल" फिरवणे म्हणजे पूर्वी फक्त ६४० हजार पिक्सेल्स च्या मॉनिटर्स वर वर्तुळ काढताना त्याच्या "आस्पेक्ट रेशो" प्रमाणे छोट्या छोट्या सरळ रेषा गोलाकार लावून जितपत वर्तुळ दिसेल तितपतच ते निघे, तसे होईल
निर्वातालाही वात यावा असे
निर्वातालाही वात यावा असे फॉरवर्ड >> अस्मिता
खेड्यात भूताच्या पंगतीत
खेड्यात भूताच्या पंगतीत जेवलेली काही असामान्य माणसे असतात. त्या पंगतीत जेवल्याशिवाय आतल्या गोटातल्या बातम्या माहिती होत नाहीत. पण या पंगतीबाबत जगाला सांगितले तर त्या व्यक्तीला धोका उद्भवतो असे म्हणतात. पण धाडस आणि मानवी स्वभाव यामुळे काही जण जोखीम पत्करून त्याबद्दल जगाला सांगतच असतात.
तसंच शास्त्रीय संशोधनाच्या बाबतीत आहे. असे म्हणतात कि या शास्त्रज्ञांच्याही पंगती असतात. त्यात जेवून आलेल्या काही जणांनी जी गावभर बोंब ठोकली त्यातूनच गुरूत्वाकर्षणाचा शोध, पास्कलचा सिद्धांत, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ब्रेट्झ लॉ, न्यूटनचे तीन तीन नियम आले. कदाचित ही मंडळी त्या सीक्रेट पंगत मंडळीची सदस्य देखील असतील आणि एव्हढे ज्ञान लीक करायला हरकत नाही असा ठराव पास झाल्यावर त्या त्या वेळच्या प्रभारी प्रवक्ता या नात्याने त्यांनी ते जगाला सांगितलेले असेल. अर्थात या मंडळींची जेव्हां पंगत बसते तेव्हां काही जण त्या पंगतीला गुपचूप जाणारेही असतात. या पंगतीत ज्या गप्पा चालतात त्यामुळे बर्याच अद्भुत गोष्टी उघड होतात ज्या सर्वसामान्यांसाठी नसतात. जसे वेळ म्हणजे भास इत्यादी. धन्य धन्य धन्य ते पंगतखोर जे मानवी कल्याणासाठी जीव पणाला लावून लाडू खायला जातात.
त्यातलेच काही मायबोलीवर आहेत याचा अभिमानही वाटतो आणि त्यांनी पत्करलेल्या जोखिमीबद्दल चिंताही वाटते.
आपला विनम्र चिंतामणी
रघू आचार्य
काही गुप्त प्रयोगांचे हाती लागलेले फोटोज


(No subject)
निर्वात पोकळीला वात आणणार
निर्वात पोकळीला वात आणणार आहेत ,मग ती निर्वातच राहिली नाही की प्रकाश गोल गोल फिरवणार >>
महत्त्वाची माहिती देशांनी लपवुन ठेवल्याबद्दल त्यांचे शततः आभार. ही माहिती लपवून ठेवायच्या आयडियेची कल्पना मॅक्सवेलला का नाही दिली कोणी. तमाम इलेक्ट्रॉनिक विंजिनिअर आजन्म उपकृत राहिले असते!
(No subject)
रघू आचार्य , मेले हसून हसून
रघू आचार्य , मेले हसून हसून

त्यातलेच काही मायबोलीवर आहेत याचा अभिमानही वाटतो आणि त्यांनी पत्करलेल्या जोखिमीबद्दल चिंताही वाटते.>>>>>
फोरवर्ड आणि एकूणच गप्पा
फोरवर्ड आणि एकूणच गप्पा
https://thewire.in/history
https://thewire.in/history/misinformation-fake-news-fact-check
वरची चित्रे भन्नाट!!
वरची चित्रे भन्नाट!!
एक ल्क्षात येते आहे का तुम्हा सर्वांच्या अतिशय गुप्त स्वरुपाची आहे. किमान ओपन फोरमवर इतकी गोपनिय आणि महत्वाची चर्चा देश हितास बाधा आणो शकते ह्याचे भान ठेवा. कायप्पा आता बरेच संरक्षित आहेत तिचे चालू शकते पण इथे नको.
आणि तुम्ही त्यात अजून वेगवेगळे दृष्टीकोन मांडून जगाला अजून माहिती आणि आयडिया देत आहात.
उद्या एखादा 'शास्त्रज्ञ' नक्कीच इथली चर्चा वाचून असा प्रकाशवेगी 'शस्त्र'ज्ञ'' होईल बघा,
यातली भाषा आणि मजकूर, दोन्ही
यातली भाषा आणि मजकूर, दोन्ही मनोरंजक आहे.
पपई आणि जिभेचा व्यायाम
कृपया ती प्रत्येकाला फॉरवर्ड करा, ही माहिती इतरांसाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे अमर्याद आहेत!
【पपई हा फळांचा राजा आहे】
भविष्यात, घातक ट्यूमरसाठी नवीन उपचार पद्धती यापुढे केमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रिया नाही, तर नवीन रक्तवाहिन्या सुधारण्यासाठी आहार बदलणे!
उत्तम वैद्यकीय ज्ञान! उच्च दर्जाचा आहार म्हणजे दिवसातून तीन वेळा नैसर्गिक केमोथेरपी. खालील माहिती गांभीर्याने घेतली पाहिजे, ती सोपी आणि अंमलात आणण्यास सोपी आहे आणि ती खूप चांगली आहे!
तुम्हाला कदाचित माहित नसेल: पपई, जे आपल्याला सामान्यतः विचित्र आणि मिळवण्यास सोपे वाटते, फळांचा राजा आहे! डॉक्टरांनी ज्या टोमॅटोचे कौतुक केले ते पपईच्या तुलनेत काहीच नव्हते. पपईची WHO (जागतिक आरोग्य संघटना) ने सलग दोन वर्षे सर्वाधिक पौष्टिक मूल्य असलेले फळ म्हणून निवड केली आहे, म्हणजेच फळांचा राजा!
पपईचे पौष्टिक मूल्य आहे:
1. कॅल्शियम: पपई हे सफरचंदाच्या 2 पट आहे.
2. व्हिटॅमिन सी: पपई हे सफरचंदाच्या 13 पट, केळीच्या 7 पट, टरबूजच्या 7 पट, चेरीच्या 8 पट आणि अननसाच्या 1.3 पट आहे.
3. व्हिटॅमिन ए: पपई हे किवीच्या 10 पट, सफरचंदाच्या 18 पट, पेरूच्या 1.5 पट, केळीच्या 15 पट, टरबूजच्या 1.5 पट, चेरीच्या 15 पट आणि अननसाच्या 16 पट आहे.
4. व्हिटॅमिन के: पपई हे केळीच्या 5 पट, टरबूजच्या 2.5 पट आणि अननसाच्या 4 पट आहे.
पुन्हा छान! डोळ्यांच्या संरक्षणाशी संबंधित...
5. कॅरोटीनोइड्स, लाइकोपीन, बी कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन इ.:
पपई किवी पेक्षा 2000 पट मोठी! किवी, सफरचंद, चेरी, अननस, केळी, पेरू, यापैकी काहीही नाही.
छान! वरील डेटा स्रोत युनायटेड स्टेट्स कृषी विभाग (USDA) 2016 आहे.
—————————
रुग्णाची सत्यकथा :-
[टीप] मी 16 वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त आहे. मी केमोथेरपी घेतली आहे. काही डॉक्टरांनी मला पपई जास्त खाण्यास सांगितले. कृतज्ञतेचे हृदय अवर्णनीय आहे, मला आशा आहे की अधिक लोकांना त्याचा फायदा होईल!
भविष्यात भेटायला गेल्यावर भेट म्हणून फळ निवडले तर पपई आणता येईल!
त्यानुसार ए
यूएस मधील डॉक्टर:
वयाच्या पन्नाशीनंतर
एखादा अनुभव घेऊ शकतो
अनेक प्रकारचे आजार.
पण मला सर्वात जास्त काळजी वाटते ती म्हणजे अल्झायमर.
मी फक्त स्वतःची काळजी घेऊ शकणार नाही,
पण त्यामुळे होईल
कुटुंबातील सदस्यांना खूप गैरसोय
एके दिवशी माझा मुलगा सुशील
घरी येऊन मला सांगितले
तो एक डॉक्टर मित्र
त्याला जिभेचा व्यायाम शिकवला आहे.
अल्झायमरचा त्रास कमी करण्यासाठी जिभेचा व्यायाम प्रभावी आहे आणि कमी / सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे
*1* शरीराचे वजन
*२* उच्च रक्तदाब
*3* मेंदूतील रक्ताची गुठळी
*४* दमा
*५* दूरदृष्टी
*6* कान गुंजणे
*७* घशाचा संसर्ग
*8* खांदे/मानेचे संक्रमण
*९* निद्रानाश
या चाली अतिशय सोप्या आणि शिकण्यास सोप्या आहेत
दररोज सकाळी, जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशासमोर धुता तेव्हा खालीलप्रमाणे व्यायाम करा:
तुमची जीभ पसरवा आणि ती उजवीकडे मग डावीकडे 10 वेळा हलवा
मी माझ्या जिभेचा रोज व्यायाम करायला सुरुवात केल्यापासून, माझ्या मेंदूच्या धारणामध्ये सुधारणा झाली.
माझे मन स्वच्छ आणि ताजे होते आणि इतर सुधारणा देखील होत्या...
1 दूरदृष्टी
2 चक्कर येत नाही
3. सुधारित निरोगीपणा
4. चांगले पचन
5. कमी फ्लू / सर्दी
मी मजबूत आणि अधिक चपळ आहे.
जिभेचा व्यायाम अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित करण्यास मदत करतो...
जीभेचा BIG ब्रेनशी संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनात आढळून आले आहे. जेव्हा आपले शरीर म्हातारे आणि अशक्त होते, तेव्हा दिसणारे पहिले लक्षण म्हणजे आपली जीभ ताठ होते आणि अनेकदा आपण स्वतःला चावतो.
वारंवार जीभेचा व्यायाम करणे
मेंदूला चालना देईल,
आपले विचार आकुंचित होण्यापासून कमी करण्यास आणि अशा प्रकारे निरोगी शरीर प्राप्त करण्यास मदत करते.
ज्येष्ठ नागरिक कृपया पुढे पाठवा
मी हे वृत्तपत्र प्राप्त करणार्या प्रत्येक व्यक्तीला ते आणखी दहा लोकांना फॉरवर्ड करण्यास प्रोत्साहित करतो, किमान एक जीव नक्कीच वाचेल. मी माझा भाग पूर्ण केला आहे, मला आशा आहे की तुम्ही तुमची भूमिका पूर्ण करण्यास मदत कराल. धन्यवाद मराठी अनुवाद
कृतज्ञतेचे हृदय अवर्णनीय आहे,
कृतज्ञतेचे हृदय अवर्णनीय आहे, >>>
ही काय भानगड आहे कळले नाही.
बाकी जीभेचा व्यायाम जरूरी आहे. कनिलिंगस फारच जालिम!
ऑनलाईन ट्रान्सलेशन टूल वापरून
ऑनलाईन ट्रान्सलेशन टूल वापरून भाषांतर केले आहे असे वाटते.
यातील जिभेच्या व्यायामाबद्दल आधी सुद्धा असे फॉरवर्ड वाचले आहे. त्यातली भाषा बरोबर होती किंवा ते मी ते इंग्रजीतच वाचले असेल.
A heart of gratitude is
A heart of gratitude is indescribable,
Pages