Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१७८ वि. २८/३!
१७८ वि. २८/३!
छान, आता पांड्या नि यादव काय करतात बघू.
अक्षर पेटलाय आज. मॅच काढतो को
अक्षर पेटलाय आज. मॅच काढतो को ते बघूच.
सॅमसन पहिल्या सामन्यात
सॅमसन पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. >> रोहित असाच टेस्ट मधे यशस्वी ओपन करायच्या आधी काही तरी झब्बू घालत होता. नंतर तो सुटला. तसेच सॅमसन च्या बाबत झाले तर बहार होईल. मला अजूनही ह्या सिरीज मधे गिल च्या ऐवजी गायकवाड ला ओपन करायला द्यायला हवे होते असे वाटते. गिल नॅचरल मिडल ऑर्डर बॅट्स्मन आहे - मारून मुटूकून त्याचा लक्षंअन बनवायचा प्रयत्न सुरू आहे. गुजराथ लायन्स कडून सुद्धा नंतर एक्स्लोप्सिव्ह ओपनर म्हणून त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या - तो मस्त बिल्ड करू श्कतो एक बाजू नि ढकलत ठेवू शकतो.
अक्षर पेटलाय आज. मॅच काढतो को ते बघूच. >> कुलदीप च्या नावाचा गजर ऐकून
हरलो पण लोवर ऑर्डर ने चांगली
हरलो पण लोवर ऑर्डर ने चांगली फाईट दिली.
दिवसा अखेरी सात नोबॉल महागात पडले.
हो तसे म्हणू शकतो. टॉप ऑर्डर
हो तसे म्हणू शकतो. टॉप ऑर्डर अगदीच फेल गेली. संघाला ट्रिकी सिच्युएशन देण्याबद्दल पांड्या एव्हढा सिरीयस असेल असे वाटले नव्हते
अर्षदिप ला ओव्हर स्टेपिंग
अर्षदिप ला ओव्हर स्टेपिंग च्या प्रॉब्लेम वर काम करायची खरोखर गरज आहे.
6 महिन्याच्याच आंतर्राष्ट्रीय करिअर मध्ये तो T20I च्या इतिहासात सर्वात जास्त नो बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये टॉप 5 मध्ये आहे.
येन केन प्रकारेण प्रसिद्धः
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषॉभवेत्प|
पुनः कधी त्याला संधि दिली तर तो आणखी १४ नोबॉल टाकेल. म्हणजे विक्रमी गोलंदाजांत त्याचे नाव अमर होईल.
अर्षदीपचे नो-बॉल्स महागात
अर्षदीपचे नो-बॉल्स महागात पाले. शनाका ला मॉडर्न बासित अली / जिमी अॅडम्स वगैरे बनवायचा विचार दिसतोय. लंकेला १८० च्या जवळपास रोखायला हवं होतं. बॉलर्स बदलले तरी डेथ ओव्हर्सचा प्रॉब्लेम चालूच आहे.
गिलच्या बाबतीत सहमत. ऋतुराज सारख्या नॅचरल ओपनरला बसवून शुभमन ला मारून मुटकून ओपनर बनवायच्या अट्टहासाला काही अर्थ नाही. ऋतुराज ओपनर म्हणून आणि गिल मिडल ऑर्डरमधे त्रिपाठीच्या जागी खेळायला हवे होते असं वाटलं. अक्षर आणि सूर्या मस्त खेळले, पण टॉप ऑर्डरचं आणि डेथ बॉलिंगचं अपयश त्यांच्या प्रयत्नांपुढे मोठं ठरलं. असो. शनिवारी सिरीज जिंकावी.
नवोदित गोलंदाजाच्या हातात नो
नवोदित गोलंदाजाच्या हातात नो बॉलची शिस्त पाळणे नक्कीच असते. एकच गोलंदाज सातत्याने नो बॉल टाकत असेल तर त्यावर आधी काम करायला हवे. आणि मगच संघात प्रवेश मिळावा. एक सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली की झाले काम असे नाही. मग पृथ्वी शॉ होतो!
नो बॉल बद्दल अर्शदीप वर ठपका
नो बॉल बद्दल अर्शदीप वर ठपका ठेवणे योग्य आहे पण पांड्याने उम्रान ला १८ वी ओव्हर का दिली असावी. त्याचा पेस बघता नि हुकुमी यॉर्कर किंवा स्लो बॉल न टाकता येण्याची क्षमता बघता तो बदडला जाणार हे साहजिकच होते. टॉप ऑर्डर च्या पहिल्या पाचांचे पण तेव्हढेच जबाबदार आहे. इथे ड्यू येणार हे उघड असताना पहिल्या तीन विकेट्स पटकन गेल्यानंतर धीर धरायला हवा होता. मावी च्या धावांचा बोनस सोडला तर सूर्या नि अक्षर ने दिडशे धावा काढण्याची अपेक्षाच वेड्यासारखी होती.
असामी, बरोबर आहे. म्हणूनच
असामी, बरोबर आहे. म्हणूनच "टॉप ऑर्डरचं आणि डेथ बॉलिंगचं अपयश त्यांच्या प्रयत्नांपुढे मोठं ठरलं. " असं लिहिलंय मी.
पुन्हा सुकुया शो!!
पुन्हा सुकुया शो!!
२२९ जिंकण्यासाठी लंकेला!!
९१ धावांनी विजय!
९१ धावांनी विजय!
२०-२० मध्ये सुर्या वेगळीच
२०-२० मध्ये सुर्या वेगळीच लेव्हल आहे. जर या फॉर्मेटचाच विचार केला तर तो आजवरचा जगात बेस्ट वाटतो आता..
स्काय एक नंबर खेळला (पुन्हा)!
स्काय एक नंबर खेळला (पुन्हा)!! अक्षर, त्रिपाठी - मस्त खेळले. गिलचा अॅप्रोच नाही आवडला. पहिले ९ बॉल्स जेव्हा तो डॉटस खेळून काढत होता, तेव्हा तो रन्स काढायचा प्रयत्नसुद्धा करत नव्हता. कदाचित टी-२० हा त्याचा ‘चहाचा कप‘ नसेलही. टेस्ट आणि वन-डे मात्र मस्त खेळतो. In T-20, batter’s final strike rate (only) isn’t that important but how s/he played throughout the inning is more important. कदाचित ती जागा ऋतुराज किंवा शॉ ची आहे.
नोबॉल्स वर काम केलेलं दिसलं पण वाईड्स जास्त पडले. असं प्रत्येक मॅचमधे एक-दीड ओव्हर जास्त टाकून चालणार नाही. हा बॉलर्सचा ग्रूप मस्त आहे. बुमराह आणि चहर आल्यावर कसे बॉलर्स रोटेट होतात ते बघणं इंटरेस्टींग असेल.
आणखी एक निरिक्षणः टाइट सेकंड
आणखी एक निरिक्षणः टाइट सेकंड रन काढताना कोहली, जडेजा जेव्हढे अॅश्युअर्ड वाटतात तेव्हढे फारसे कुणी वाटत नाहीत.
माझ्या मते कोहली, जडेजा,
माझ्या मते कोहली, जडेजा, रोहित शर्मा, पुजारा या सर्वांच्या दाढ्या चांगल्या वाढल्या होत्या. त्यामानाने अजकालच्या खेळाडूंच्या दाढ्या अजून मोठ्या झाल्या नाहीत. त्याझालयावर बघा कशी धमाल करतात ते.
क्रिकेटमधे दाढीचे महत्व किती जास्त आहे, हे आजकालचे प्रसिद्ध खेळाडू बघून लक्षात येते. तर आधी दाढी वाढवा.
नव्या निवड समितीची घोषणा झाली
नव्या निवड समितीची घोषणा झाली आहे. बघूया येणारे टीम सिलेक्शन मध्ये काही फरक पडतो का.
चेतन शर्मा ची मुख्य सिलेक्टर म्हणून फेरनिवड झाली आहे आणि बाकीचे चार सिलेक्टर म्हणून शिवसुंदर दास (सेंट्रल झोन), सुब्रता बॅनर्जी (ईस्ट झोन), सलील अंकोला (वेस्ट झोन) आणि श्रीधरन शरथ (साऊथ झोन) यांची वर्णी लागली आहे.
बॅनर्जी, अंकोला आणि शरथ कडून मला थोड्या फार इम्प्रुव्हमेंट च्या अपेक्षा आहेत.
“श्रीधरन शरथ (साऊथ झोन) यांची
“श्रीधरन शरथ (साऊथ झोन) यांची वर्णी लागली आहे.” - ‘सकाळ’ ने बातमी देताना ‘श्रीधरन सैराट‘ असं नाव छापलं होतं
पहिले ९ बॉल्स जेव्हा तो डॉटस
पहिले ९ बॉल्स जेव्हा तो डॉटस खेळून काढत होता, तेव्हा तो रन्स काढायचा प्रयत्नसुद्धा करत नव्हता. कदाचित टी-२० हा त्याचा ‘चहाचा कप‘ नसेलही >> मूळात वर्ल्ड कप नंतर आपण अॅप्रोच - विशेषतः पहिल्या तिघांचा बदलायलाच हवा अशी सुरूवात केली होती. तो संदेश गिल ला द्यायला विसरले बहुधा. बॉल मूव्ह होतोय हे बघून गिल सरळ सरळ टेस्ट मोडमधे खेळला. असेच हवे असेल तर कोहली किंवा राहुल काय वाईट मग असा प्रश्न परत उभा राहतो. गायकवाड पण असाच खेळतो हे माझे लिमिटेद निरीक्षण. ह्या दोघांपैकी एक जण स्लाईड झाली तर असणे समजू शकतो पण ओपनर म्हणून नको. त्याम्चा क्रमांक फ्ल्यूईड हवा. सिच्युएशन प्रमाणे वर खाली फिरवा.
चेतन शर्मा ची मुख्य सिलेक्टर म्हणून फेरनिवड झाली आहे >> वर्ल्ड कप डीबेकल म्हणून बाहेर काड्।अले नि परत घेतले हा प्रकार कळला नाही. अॅट्लिस्ट ह्या बाबती मधे तरी आपण कंसिस्टंट आहोत असे म्हणू शकतो
वन डे ची टीम बघून आपण वर्ल्ड कप काढायचे चान्सेस मला तरी कमी वाटतात. पांड्या दहा ओव्हर टाकेल असे वाटत नाही नि पहिल्या चर मधे कोणीही स्पिन बॉलिंग टाकणारे नाही. हूडा च्या बॉलिं ग ची आपल्याला अॅलर्जी आहे. म्हणजे सात- आठ वर सुंदर-अक्षर/जाडेजा (पाटा पिच असेल तर त्यातल्या एकाच्या जागी व्रिस्ट स्पिनर येणार) . पांड्या पाच वर असेल तर चार नि सहा साठी अय्यर्/राहुल्/सूर्या अशी चुरस असणार.
कोहलीचा शतकांचा रतीब सुरु
कोहलीचा शतकांचा रतीब सुरु झाला असाच राहू दे सुरु!!!
३७४ धावांचे लंकेला आव्हान. एकवेळ ४०० करतील असे वाटलेले पण पंड्या लवकर गारठला.
गेल्या सामन्यात २०० केलेला
गेल्या सामन्यात २०० केलेला स्पेशालिस्ट कीपर किशन बाहेर अन् काहीही विशेष न केलेला पार्ट टाईम कीपर राहुल टीममध्ये...
अवघड आहे...
कोहलीचा शतकांचा रतीब सुरु
कोहलीचा शतकांचा रतीब सुरु झाला असाच राहू दे सुरु!
>> तथास्तु...
KL राहुलने रोहित आणि द्रविड
KL राहुलने रोहित आणि द्रविड वर काय जादू केली आहे काय माहित. त्याच्यापेक्षा जास्त चांगला peformance देऊन सुध्दा किसन बाहेर आहे. आता रोहित आणि द्रविड यांना नारळ देण्याची वेळ आली आहे, म्हणजे कामगिरी नुसार संघात स्थान मिळेल.
कोहली जबरदस्त खेळला. शर्मा
कोहली जबरदस्त खेळला. शर्मा आणि गिलने सॉलिड ओपनिंग दिली. दोघंही सेंच्युरीज मारू शकले असते. अय्यर आणि राहूल चे कॅमिओज पण मस्त होते आणि नंतर सिराज अँड को. ने लंकेला काही संधीच दिली नाही. आता शनाका रन्स काढून घेतोय, पण त्याने फारसा फरक पडेल असं वाटत नाहीये (तरिही त्याला आऊट करावं लवकर).
किशन दुर्दैवी ठरला, पण इट्स अ पार्ट ऑफ द गेम. ओपनिंगला गिलने असं काहीच केलं नव्ह्तं की त्याची जागा जावी. राहूलने सुद्धा वन-डे मधे ४थ्या-५व्या नंबरवर कन्सिस्टंटली रन्स केले आहेत. (तसंही किशन त्या पोझिशनसाठी टीममधे नाहीये). त्याला संधी मिळेल.
इतक्या भयानक कंटाळवाणी १३
इतक्या भयानक कंटाळवाणी १३ षटके कसोटी सामन्यात सुद्धा पाहिली नाहीत. केवळ शनाकाचे षटक व्हावे म्हणून खेळत होते.
ओपनिंगला गिलने असं काहीच केलं
ओपनिंगला गिलने असं काहीच केलं नव्ह्तं की त्याची जागा जावी.
>> तुला किशन म्हणायचं आहे का? कारण गिल बांगलादेश सिरीजाला वन डे टीम मधे खेळला च नाही. किशन नी मिळालेल्या एका संधी मधे २०० केले.
शानका ची इनिंग मस्त होती. नवव्या गड्या साठी १०० ची पार्टनरशिप, त्यात रजिता च्या ९ रन... आणि आपली शेपूट गुंडाळता न येण्याची खोड ...
>> तुला किशन म्हणायचं आहे का?
>> तुला किशन म्हणायचं आहे का? कारण गिल बांगलादेश सिरीजाला वन डे टीम मधे खेळला च नाही. >> नाही तो गिल बद्दल बरोबर बोलतो आहे. त्या सिरीजच्या आधी वर्षभर गिल मस्तच खेळतोय वन डे मधे. मी असे वाचले कि, किवीज सिरीज राहुल खेळणार नाहीये (लग्नामूळे) त्याच्या कागी किशन येईल. (कीपर हवा) अर्थात किशन ओपन करेल म्हणून गिल ला ५-६ वर खेळावे लागेल - पण तो प्रयोग करायचा नसल्यामूळे तिथे सूर्या येईल. सूर्या चा फॉर्म नि स्किल्सेट बघता तो शेवटच्या वीस ओव्हर्स मधे भयंकर उत्पात माजवू शकतो. बरं तो ज्या रेट ने सुटतो ते बघता समोर पांड्या किंवा राहुल ला थोदी उसंत मिळून ते पण धुमाकूळ घालू शकतील. सो एकंदर एक सिरीज एका पेअर ला नि दुसरी दुसर्या पेअर ला असा प्लेन दिसतोय.
पांड्या फास्ट बॉलर आहे म्हणून टिकलाय -बॅट्समन म्हणून त्याने सध्या फार काही एखादी अॅड-हॉक इनिंग वगळता केल्याचे आठवत नाही चटकन.
“ पांड्या फास्ट बॉलर आहे
“ पांड्या फास्ट बॉलर आहे म्हणून टिकलाय -बॅट्समन म्हणून त्याने सध्या फार काही एखादी अॅड-हॉक इनिंग वगळता केल्याचे आठवत नाही चटकन.” - खरंय. पाकिस्तानविरुद्ध टी-२० मधे कोहलीला साथ दिली ती एक इंपॅक्ट इनिंग (त्यातही त्याची फ्लुएन्सी कमीच होती) वगळता त्याने इतक्यात लक्षात घेण्यासारखं बॅटींगमधे खरंच काही केलं नाहीये.
रोहितच्या अपील न करण्याच्या
रोहितच्या अपील न करण्याच्या निर्णयाबाबत काय म्हणाल?
रूल बुक प्रमाणे आऊट होता
त्या सीच्युएशन मधे या निर्णयामुळे काही फरक पडला नाही
पण यामुळेच असं आऊट करणं चुकीचं असल्याची भावना बळावते
जर थेट फेकीवर / अन्य प्रकारे शानका आऊट झाला असता तर असंच अपील मागे घेतलं असतं का?
Pages