Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिराज आयसीसी एकदिवसीय
सिराज आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या मानांकनात सर्वप्रथम
भारतीय संघ एकदिवसीय मानांकनात सर्वप्रथम..
ट्वेंटी-२० मानांकनात सर्वप्रथम..
टी-२० कप / वर्ल्ड कप / टेस्ट
टी-२० कप / वर्ल्ड कप / टेस्ट चॅम्पियन्शिप जिंकत नाही तोवर आहि अर्थ नाहि रे ह्याला
टी-२० कप / वर्ल्ड कप / टेस्ट
टी-२० कप / वर्ल्ड कप / टेस्ट चॅम्पियन्शिप जिंकत नाही तोवर आहि अर्थ नाहि रे ह्याला
>>>
लाख रुपये की बात...
महाराष्ट्र मुंबई सामन्यात
महाराष्ट्र मुंबई सामन्यात पहिली इनिंग 384 वर टाय झाल्यानी दुसऱ्या इनिंग च्या निकालावर क्वालिफिकेशन ठरणार होतं पण मुंबईला 58 रन अन् महाराष्ट्राला 4 विकेट्स कमी पडल्या
दुसरीकडे आंध्रा नी आपला सामना जिंकल्याने महाराष्ट्र, सौराष्ट्र अन् त्यांचे समान 26 पॉइंट झाले, पण सौराष्ट्रा चे 2 बोनस पॉइंट अन् आंध्रा चे 4 विजय असल्याने ते पुढे गेले
हार्ड लक महाराष्ट्र...
“ हार्ड लक महाराष्ट्र” - छान
“ हार्ड लक महाराष्ट्र” -
छान खेळले महाराष्ट्र. हैद्राबादविरूद्ध चौथ्या इनिंगला २७ चेस करताना, ऋतुराजचं आऊट होणं महागात पडलं.
मुंबईचा सीझन बर्यापैकी संमिश्र गेला. शॉ चं भारतीय संघातलं पुनरागमन ही जमेची बाब.
आसामकडून रियान परागने बॅटिंग आणि बॉलिंगमधे बर्यापैकी कन्सिस्टंटली परफॉर्म केलं.
मुंबईचा सीझन बर्यापैकी
मुंबईचा सीझन बर्यापैकी संमिश्र गेला. शॉ चं भारतीय संघातलं पुनरागमन ही जमेची बाब. >> सर्फराज का नव्हता ह्या सामन्यामधे ? शॉ शेवटच्या इनिंग मधे ह्या वेळी कामाला आला असता. नुसत अबेंच वर बसलाय त्यापेक्षा . जयस्वाल, राहाणे नि अर्मान जाफर नी शेवटच्या मॅचेस मधे पार निराशा केली राव.
आज अर्शदीपच्या एका ओव्हर ने मोमेंटम पार बदलून गेला सामन्याचा
टी-२० कप / वर्ल्ड कप / टेस्ट
टी-२० कप / वर्ल्ड कप / टेस्ट चॅम्पियन्शिप जिंकत नाही तोवर आहि अर्थ नाहि रे ह्याला
>>>
लाख रुपये की बात..
>>>>
बर्र म्हणजे आयसीसी मानांकनात पहिले आलो तर त्याचे कौतुक नाही करायचे का?
या द्विपक्षीय मालिकात कोणी चमकला वा आपण सातत्याने जिंकलो त्याचे कौतुक नाही करायचे का?
तेच हरलो तर मात्र कर्णधाराला झोडपायचे का
आसामकडून रियान परागने बॅटिंग
आसामकडून रियान परागने बॅटिंग आणि बॉलिंगमधे बर्यापैकी कन्सिस्टंटली परफॉर्म केलं.
>>>>
ॲटीट्यूड प्रॉब्लेम आहे त्याचा.
असे खेळाडू मला बिलकुल आवडत नाहीत.
तेच हरलो तर मात्र कर्णधाराला
तेच हरलो तर मात्र कर्णधाराला झोडपायचे का >> मानांकनात पहिले येणे, द्विपक्षीय मालिकात सातत्याने जिंकणे वगैरे कोहली च्या काळापासून होत आले आहे. रोहित खास कप आणण्यासाठी कर्णधार केला गेला होता तेंव्हा मेन निकष मी तरी तोच लावेन. नाहितर कोहली नि रोहित मधे फरक काय उरला कप्पाळ !
असे खेळाडू मला बिलकुल आवडत नाहीत. >> बरं मग ?
मानांकनात पहिले येणे,
मानांकनात पहिले येणे, द्विपक्षीय मालिकात सातत्याने जिंकणे वगैरे कोहली च्या काळापासून होत आले आहे. रोहित खास कप आणण्यासाठी कर्णधार केला गेला होता तेंव्हा मेन निकष मी तरी तोच लावेन. नाहितर कोहली नि रोहित मधे फरक काय उरला कप्पाळ !
>>
बर्र मग
बर्र मग >> सुचले नाही का
बर्र मग >> सुचले नाही का उत्तर ?
पटले कि काय रोहित वर ठपका ठेवणे 
तेंव्हा मेन निकष मी तरी तोच
तेंव्हा मेन निकष मी तरी तोच लावेन.
>>
जोक्स द अपार्ट, या तुमच्या वैयक्तिक अपेक्षा झाल्या. एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्ही वर्ल्डकप टू वर्ल्डकप जगत नाही. जसे हल्ली लोकं रोज मरमर काम करतात आणि संडे टू संडे जगतात.
लहानपणापासून कैक द्विपक्षीय मालिका आणि तिरंगी चौरंगी स्पर्धा एंजॉय केल्या आहेत. त्यांना आता कुठलासा निकष लाऊन महत्व द्यायचे नाही का?
सुचले नाही का उत्तर ?
सुचले नाही का उत्तर ?
>>>
थांबा जरा..
तो जोक मारून घेतला..
उत्तर आले नंतर..
रोहीत वर ठपका हे बोललात ते बरे झाले..
भारत जिंकतोय. मानांकनात पहिला येतोय तरी रोहीत कर्णधार आहे म्हणून कौतुक करायचे नाही असे असेल तर अवघड आहे..
बाकी वर्ल्डकप आणायचा तर
बाकी वर्ल्डकप आणायचा तर पुन्हा द महेंद्रसिंग धोनीलाच शरण जावे लागेल असे वाटते. तिन्ही आयसीसी स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार आहे तो आजही!
त्यामुळे मी फार अपेक्षा ठेवत नाही. कर्णधार कोहलीकडून तर कधीच नव्हत्या.
जोक्स द अपार्ट, या तुमच्या
जोक्स द अपार्ट, या तुमच्या वैयक्तिक अपेक्षा झाल्या. >> माझ्या वैयक्तिक अपेक्षा ? मी नाहि कप्तान केले बाबा त्याला. तुला आहेत तेव्हढ्या पॉवर्स मला नाहित बाबा
रोहित ला कप्तान करताना बीसीसीआय च्या निवड समिती ने हे म्हटले होते. गेला बाजार तू सुद्धा इथे हेच बोंबलत होतास (तुला अॅम्नेशिया असल्यामूळे आठवणार नाही)
वर्ल्डकप येईल तेव्हा जिंकेल ओ
वर्ल्डकप येईल तेव्हा जिंकेल ओ. तो कुठे पळून चाललाय. म्हणून काय बाकीचे सामने बघायचे आणि एंजॉय करायचे कोणी सोडतेय का?
भारत मानांकनात पहिला आला. त्याचा कोणाला आनंद होत असेल तर त्यात खडा टाकून काय मिळणार.
अश्याने उद्या वर्ल्डकप जिंकल्यावर तरी तो शर्माच्या कप्तानीत जिंकले असल्याने खरेच आनंद होईल का?
भारत मानांकनात पहिला आला.
भारत मानांकनात पहिला आला. त्याचा कोणाला आनंद होत असेल तर त्यात खडा टाकून काय मिळणार. >> तूला एंजॉय करायचेय तर कर कि कोणी अडवलेय ? त्याच बरोबर टीका करण्यामधे ही मला काही प्रॉब्लेम दिसत नाही.
भारत पहिल्यांदाच असा पहिला आला आहे का ? उत्तर हो नसेल तर दर मॅच गणिक वर खाली होणार्या ह्या आकडेवारीमधे आनंद मानण्यापेक्षा मापदंड समजला जाणारा कप जिंकल्याचा जास्त आनंद होईल. कोहली नि धोनी कप्तान असतानाही असे बरेचदा पहिले होते - ह्यत नावीन्य काही नाही.
भारत पहिल्यांदाच असा पहिला
भारत पहिल्यांदाच असा पहिला आला आहे का ?
>>>
पहिल्यांदा आला तरच आनंद करायचा का.. मागे पडलेलो ते सातत्याने जिंकून पहिले आलो. आनंद आहे.
वर्ल्डकपचाच मापदंड लावला तर धोनीच्या आसपासही नाही कोणी. म्हणून काय फक्त त्याचीच पूजा करायची असे नाही ना.
आपली पोरं पहिली आली. मला कौतुक वाटले मी शेअर केले.
शेजारचा मुलगा आठवीत शाळेत पहिला आला. त्याचे पेढे घेऊन आला. तर त्याला म्हणायचे की दहावीला बोर्डात ये तरच त्याला अर्थ..
काय अर्थ आहे याला..
तू नेहमीप्रमाणे उगाचच वाद
तू नेहमीप्रमाणे उगाचच वाद घालतो आहेस. तुला आनंद व्यक्त करायला कोणी बंदी घातली आहे ? आणि घातली तरी तू ऐकणारा नग आहेस का ? तेंव्हा नुसताच कांगावा का करतो आहेस ?
शेजारचा मुलगा आठवीत शाळेत पहिला आला. त्याचे पेढे घेऊन आला. तर त्याला म्हणायचे की दहावीला बोर्डात ये तरच त्याला अर्थ.. >> उदाहरण पूर्णपणे गंडले आहे. तू शेजारचा मुलगा रोजच्या अभ्यासामधे पहिला आला म्हणून जगभर पेढे वाटतो आहे. तुला वाटायचे तर खुशाल वाट की पण 'मुलामधे कॅपॅसिटी आहे, दहावी मधे बोर्डात ये' हि अपेक्षा बोलून दाखवणे गैर लागू कशी ?
सिराज आयसीसी एकदिवसीय
सिराज आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या मानांकनात सर्वप्रथम Happy
भारतीय संघ एकदिवसीय मानांकनात सर्वप्रथम..
ट्वेंटी-२० मानांकनात सर्वप्रथम..
>>>
एवढी साधी पोस्ट होती.
एक ईन्फो दिल्याप्रमाणे कुठलाही जल्लोष न करता माहीती दिली होती..
असो
वर्ल्डकप तर आपणच मारू..
फक्त निवडसमितीने काही घाण करायला नको आता..
तरी त्याला अजून फार वेळ आहे. आतापासून त्याच्या चर्चेपेक्षा चालू असलेल्या मालिकांचा आनंद उचलायला मला आवडेल
एक ईन्फो दिल्याप्रमाणे
एक ईन्फो दिल्याप्रमाणे कुठलाही जल्लोष न करता माहीती दिली होती.. >> हो नि त्यावर साधी टिप्पणी होती जी इतरांनाही पटली. तुला का खटकली एव्हढी ? त्यातून ' मला आनंद घेऊ देत नाही' वगैरे फांद्या तुला फुटल्या. "तेच हरलो तर मात्र कर्णधाराला झोडपायचे का" वगैरे फाटे तूच सुरू केलेस कि.
आतापासून त्याच्या चर्चेपेक्षा चालू असलेल्या मालिकांचा आनंद उतरी त्याला अजून फार वेळ आहे. चलायला मला आवडेल >> तरी बर. निवड समिती, बीसीसीआय सकट द्रविड, रोहित सगळे वर्ल्ड कप जिंकण्याच्या द्रुष्टीने प्लॅनिंग ह्या कोनामधून सगळे बघताहेत नि तू आम्हालाच फटकाव.
"सर्फराज का नव्हता ह्या
"सर्फराज का नव्हता ह्या सामन्यामधे ?" - इंज्युरी.
"ॲटीट्यूड प्रॉब्लेम आहे त्याचा." - म्हणजे?
हार्ड लक महाराष्ट्र... >>>
हार्ड लक महाराष्ट्र... >>>
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर काल संध्याकाळी आणि आज पहिल्या दोन सेशन मध्ये मला महाराष्ट्राचा बॅटिंग अप्रोच अनाकलनीय वाटला .
त्यांना माहित होतं कि पुढे जायचं असेल तर मॅच जिंकल्याशिवाय पर्याय नाही.
पण कुठलाही अग्रेसिव्ह इन्टेन्ट दिसलाच नाही कि मॅच जिंकायची आहे.
"ॲटीट्यूड प्रॉब्लेम आहे
"ॲटीट्यूड प्रॉब्लेम आहे त्याचा." - म्हणजे? >>>
शॉ बद्दल असल्यास ते काय हे कोणालाच माहित नाही.
पॉन्टिंग (शॉ चा IPL कोच) आणि मुझुमदार (मुंबई चा कोच) यांनी त्याच्या ऍटिट्यूड बद्दल एक चकार शब्द हि काढल्याचे वाचनात नाही आणि त्याला कधी टीम मधून बाहेर हि काढले नाही.
ह्या ऍटिट्यूड प्रॉब्लेम / ड्रग ऍडिक्शन वगैरे सगळ्या भारतीय मीडिया ने शोधलेल्या थियरी आहेत.
"ॲटीट्यूड प्रॉब्लेम आहे
"ॲटीट्यूड प्रॉब्लेम आहे त्याचा." - म्हणजे? >>> अरे तो रियान परागबद्दल बोलतोय. मागच्या आयपील मधे नाही का त्याने काहीतरी खुणा केल्या होत्या तेंव्हाही हा असाच फुटला होता लाह्यांसारखा इथे तुझ्यावर
“ पण कुठलाही अग्रेसिव्ह
“ पण कुठलाही अग्रेसिव्ह इन्टेन्ट दिसलाच नाही कि मॅच जिंकायची आहे.” - ओह! मला बघता येत नव्हती. त्यामुळे मला स्कोअरकार्ड बघून असं वाटलं की पहिल्या ३५-३७ ओव्हर्समधेच ४-५ विकेट्स गेल्यामुळे ते इनिंग संभाळून खेळले.
“ अरे तो रियान परागबद्दल
“ अरे तो रियान परागबद्दल बोलतोय.” - ते कळलं रे, पण त्याला अॅटीट्यूड प्रॉब्लेम आहे म्हणजे काय, ते कशावरून कळलं ते नाही समजलं.
ईतक्यातच स्वत:ला काहीतरी
ईतक्यातच स्वत:ला काहीतरी स्टार समजणे, ॲटीट्यूड दाखवणे आणि यासाठी कुठली न्यूज वाचावी लागत नाही. आयपीएल मी ऑलमोस्ट सगळी बघतो. दिसण्यात येते ते. एखाद्याचा मैदानावरील वावर, बॉडीलॅंगवेज, वागणे लक्षात येतेच. बाकी काही वैयक्तिक वैर नाही. कि तेवढ्यासाठी तो अपयशी ठरावा अशी ईच्छा नाही.
ईतक्यातच स्वत:ला काहीतरी
ईतक्यातच स्वत:ला काहीतरी स्टार समजणे
>>
डोमेस्टिक खेळतोय तो...
स्टार समजले जाणारे बरेचसे हल्ली डोमेस्टिक वर फुली मारतात ना...
“ यासाठी कुठली न्यूज वाचावी
“ यासाठी कुठली न्यूज वाचावी लागत नाही. आयपीएल मी ऑलमोस्ट सगळी बघतो. दिसण्यात येते ते. एखाद्याचा मैदानावरील वावर, बॉडीलॅंगवेज, वागणे लक्षात येतेच.” - ओह! असंय होय हे. मला वाटलं काहीतरी मिस झालं माझ्याकडून.
पण सर, ते मागे कुणीतरी आयपीएलच्यावेळी अंपायरचा डिसीजन न पटल्यामुळे ग्राऊंडवर आला तेव्हा तुम्हीच तर ‘आयपीएलमधे हा सगळा देखावा असतो‘ असा सूर लावला होता. (तुम अगर भूल भीं ज़ाओ, तों यह हक़ हैं तुमकों।)
Pages