Submitted by दीपांजली on 5 October, 2022 - 02:01
मराठी बिगबॉस बीबी वर चर्चा मिक्स होतेय म्हणून हिन्दी बिगबॉस सिझन १६ वर चर्चा करायला हा धागा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आरती मला प्रश्न विचारून काय
आरती मला प्रश्न विचारून काय उपयोग? मी म्हणतेय बीबॉ त्यावेळी पण अनफेअर होता आणि यावेळीही.आणि प्रत्येक contestant डबल स्टँडर्ड आहे. दीपांजली म्हणतेय तसा 100% सज्जन कोणीच नाही. तसं तर शालीन सुंबुललापण स्पेशल कांऊन्सलिंग करता आले असतेच ना. अजून एक बहु बेटाला काही काढणार नाहीत. इथे बीबॉ त्यांच्या विरुद्ध गेले तरी त्यांचे फॅन्स चवताळून व्होटिंग करतील. आणि त्यांच्या बाजूने राहिले तरी colors चेच चेहरे विनर. बीबॉसाठी विन विन आहे.
निम्रत चा डिप्रेशन कुठे पळून
निम्रत चा डिप्रेशन कुठे पळून जातो जेंव्हा बुली गॅंग बुली करत असते तेंव्हा... तेंव्हा मॅडम जोश मध्ये असतात...
तिचा काहीच मुद्दा नाहीय म्हणून कन्फेशन रूम मध्ये बोलवून इमोशनल अँगल...
ट्युलिप तुम्हाला personally
ट्युलिप तुम्हाला personally question करत नाहीये तसे अजिबात ईन्टेंशन नाही. केवळ चर्चा करण्यासाठीच ती कंमेंट होती.
बुली गँग म्हणजे कोण कोण.
बुली गँग म्हणजे कोण कोण. साजिद, स्टॅन, शिव का.
>>> प्लस अब्दू आणि निम्मो >>> अच्छा ओके, थॅंक यु. तो अबदू निरागस वाटतो पण साजिदबरोबर असतो कायम.
बाय द वे ते अंकित प्रियंका कुठल्या कलर्सच्या सिरियलमध्ये कपल म्हणून होते का, ती उडारिया मध्ये होती का. काल तिने नाव घेतले. बघते voot वर जाऊन उडारिया.
मला उलट मराठीत शिव बरेचदा
मला उलट मराठीत शिव बरेचदा नाही आवडायचा, वीणा बरोबर आयसोलेट व्हायचा , जिथे तिथे हार्ट शेप्स बनवणे वगैरे करायचा म्हणून , इथे जास्तं मोकळा वाटतोय उलट !
मला नाही वाटत कि शिव साजिदचा चेला आहे, साजिद सिनियर आहे त्याला सगळेच सर म्हणतात, शिव एका गृपशी लॉयल आहे पहिल्यापासून इतकच, साजिदला त्याच्या खेळातली समज असल्यामुळे फायदा होतो आणि शिवला वाटत असावे कि याला बाहेर सपोर्ट असेल त्याचा आपल्याला फायदा होईल (जे अजिबात नाहीये.)
स्टॅन बद्दल बोलायचं तर तो ज्या वातावरणात वाढला आहे, तो कसा पॉलिश्ड वागेल ?
बुली गँग म्हणा किंवा अजुन काही, समोर जेंव्हा अर्चना आणि प्रियंका सारखे बुलीज असतील तिथे त्यांना निदान त्यांच्या अर्धी दादागिरी करावीच लागते सरव्हावल साठी शिव आणि स्टॅनला !
स्टॅन बद्दल बोलायचं तर तो
स्टॅन बद्दल बोलायचं तर तो ज्या वातावरणात वाढला आहे, तो कसा पॉलिश्ड वागेल ?
बुली गँग म्हणा किंवा अजुन काही, समोर जेंव्हा अर्चना आणि प्रियंका सारखे बुलीज असतील तिथे त्यांना निदान त्यांच्या अर्धी दादागिरी करावीच लागते सरव्हावल साठी शिव आणि स्टॅनला ! >>> पटलं हे.
इथे पण क्लियर दोन ग्रुप आहेत
इथे पण क्लियर दोन ग्रुप आहेत म्हणजे
दीपांजली + 1
दीपांजली + 1
प्रियंका, अर्चनाला बिग बॉस लवकर काढणार नाहीत. फक्त साजिद आणि ग्रुपला ठेवून काय फायदा. बिग बॉसला फॅमिली शो बनवायचा नाहीये त्यांना भांडण पाहिजेत. त्यामुळे प्रियांका, अर्चना विरुद्ध शिव, स्टॅन पाहिजे.
शिव आणि ग्रुप एकमेकांशी लॉयल आहेत. प्रियांका गरजेनुसार वागते. नॉमिनेशनच्या वेळी ती मस्त मेजॉरिटी कडे पळाली. शालीन आणि स्टॅनच्या भांडणात पण ती मध्ये यासाठी पडली असेल की शालिन, टीना, सुंबुलला आपल्या ग्रुप कडे वळवता येईल. बिग बॉस मध्ये सगळा स्वार्थी मला प्रियांकाच वाटते. ती अंकितला पण अजिबात जुमानत नाही. अर्चना आगाऊ आहे पण ती ठाम आहे तिच्या बोलण्यावरती. ती मी फेअर असल्याचा दावा करत नाही प्रियांका सारखा.
आणि हो काल सलमानने विचारले
आणि हो काल सलमानने विचारले आपला मुद्दा नसताना मध्ये कोण घुसत होतं तेव्हा प्रियंकाने स्वतःहून लगेच हात वर केला म्हणजे तिला माहित होतं की ती उगीच मध्ये बोलत होती. कारण जेव्हा भांडण सुरू होते तेव्हा तर ती बोलत होती ना हा माझा पण मुद्दा आहे, मी पण मध्ये बोलू शकते कारण की मला पण भीती आहे, मला याच घरात राहायचं. मग जेव्हा सलमान विचारले तेव्हा तिने उठायचं नव्हते ना आणि तरी सलमानने तिचं नाव घेतलं असतं तेव्हा बोलायचे होते माझा मुद्दा पण होता आणि हे आदल्या दिवशी बोललेले पॉईंट सांगायचे होते ना.
सलमानने काही फार झापले नाही
सलमानने काही फार झापले नाही प्रियांकाला. उलट फिडबॅक म्हणुन खेळ सुधारू शकते ती. एव्हढा डिटेल फिडबॅक कोणालाही मिळत नाही. त्या शालीनला आवराच. त्रिकोणाचा चौकोन करू नये म्हणजे झालं. फार पकवतात लव स्टोर्या.
मला उलट मराठीत शिव बरेचदा नाही आवडायचा, वीणा बरोबर आयसोलेट व्हायचा. >> मला तो मराठीत आला तेव्हा माहीतच नव्हता, उलट त्याच्याबरोबरचे बर्यापैकी माहित असलेले होते (नेहा, वीणा, रुपाली, वैशाली, केळकर, सुरेखा पुणेकर), त्यांच्यासमोर हा काहीच नव्हता. पण टास्क आणि बोलायला भारी होता. म्हणुनच जिंकला. इथे जरा टास्क पाहिजेत, चमकेल इथे पण. ते किचन पोलिटिक्स किती करणार.
अर्चना आगाऊ आहे पण ती ठाम आहे तिच्या बोलण्यावरती. ती मी फेअर असल्याचा दावा करत नाही प्रियांका सारखा.>>+1
इथे पण क्लियर दोन ग्रुप आहेत
इथे पण क्लियर दोन ग्रुप आहेत म्हणजे Happy>>>
हो ना पण त्याशिवाय काय मजा आहे. शिवच्या खेळाविरुद्ध बहुतेक मीच एकटी आहे.
काल राजा साजिदची अर्चनाने परत
काल राजा साजिदची अर्चनाने परत वाट लावली. तो आला होता की मी कपडे भिजवलेत आता ते कसे धुवायचे. पर्वा अर्चना त्याला म्हणाली होती की तुमच्या घरी नोकर काम करत असतील तेव्हा भडकला की मी तर झोपडपट्टी आहे मला नको शिकवू.

आज अर्चनाने ऍक्शन करून दाखवले की कपडे कसे धुवायचे
त्याची अपेक्षा होती की ती त्याचे कपडे धुवायला ऑफर करेल. पण राजा ती गोरी नाहीये, अर्चना आहे. ती तुझे कपडे धूवायला आली नाहीये, मला यासाठी ती खूप आवडते. साजिदच्या नाकी नऊ आणले आहेत तिने . आता बहुतेक बेटा बेटा करून सुमबुल ला धुवायला लावेल. गौरीने कपडे धूवायला नकार दिल्यावर तिला ग्रूप मधून डच्चू मिळाला होता.
मी जे काही थोडंसं पाहिलं
मी जे काही थोडंसं पाहिलं त्यावरून मराठी बिग बॉसमधला शिव आणि आताचा शिव यांत खूप फरक आहे. तिथेही तो इनोसन्स लावून वावरत होता, असं वाटलं. कारण आधी एक रियालिटी शो करून आलाय. असं असेल तर त्याला कुठल्या प्रेक्षकांना काय आवडतं, कुठले हाउसमेट्स कसे वागतील हे बरोबर कळलंय.
शिवच्या खेळाविरुद्ध बहुतेक
शिवच्या खेळाविरुद्ध बहुतेक मीच एकटी आहे. >>> च्रप्स पण लिहीतात की शिवचं त्यांना निगेटीव्ह वाटतं ते. त्यामुळे मला शिवच्या दोन्ही बाजु कळतात, मी बघत नाही. त्याचे पॉझिटीव्ह, निगेटीव्ह लिहीत रहा, मला दोन्ही बाजु समजून घ्यायच्या आहेत.
मी जे काही थोडंसं पाहिलं त्यावरून मराठी बिग बॉसमधला शिव आणि आताचा शिव यांत खूप फरक आहे. >>> अगदी अगदी. हेच मी लिहिलं होतं. मला तिथे भाबडा वाटलेला (मुखवटा असला तरी खरा वाटलेला), हिंदीत तसा राहून चालणार नसेल, बाहेर जाईल लवकर.
तो बाकीच्यांच्या लवस्टोरीबद्द्ल टीका करतोय त्यामुळे मात्र तो ट्रोल होतोय, स्वतः मराठीत कसा वागलेला, ह्याला काय अधिकार आहे, लोकं त्याचे आणि वीणाचे फोटो व्हायरल करतायेत. हिंदीत एकालाही त्याचं प्रकरण, चावणं माहीती नाही, सरप्राईजिंग. शिवविरोधात ही शस्त्र वापरु शकतात, बाहेरची पण नाहीत, मराठी बिग बॉसमधलीच आहेत.
स्टॅन आणि शालिनच्या
स्टॅन आणि शालिनच्या भांडणानंतर प्रियांका हायपर होऊन गुंडे गुंडे ओरडत होती, सुमबुलला पॅनिक अटॅक आला होता, स्वतः शालीन आता पालटला असला तरी तो शिवला पण काढा म्हणत होता ते का हे आता स्पष्ट झाले आहे. अर्थातच बिग बॉस ने अतिशय cleverly सर्व एडिट केले आहे. आणि प्रियंकालाही गप्प बसवले. ती म्हणत होती की हाथापाई ची भीती वाटली .पण वीकेण्डला तिला मेसेज दिला आहे चूर्ण 'बिग बॉस खाणार नाही वगैरे. तू आग में घी दाल राही हैं वगैरे. सुमबुलची पण इज्जत काढली कारण तिनेही बोलू नये.कारण हे काही बाहेर लोकांसमोर येऊ द्यायचे नव्हते. पण म्हणतात ना की सत्य येतेच बाहेर. बिग बॉस कसले खोटारडे निघाले.
गौतमने बाहेर येऊन सहज बोलून गेला की शिव शालिनच्या अंगावर खुर्ची उचलून धावून गेला होता. आणि हे स्टॅन व शालीन चे भांडण संपल्यावर थोड्या वेळाने झाले. साजिदने त्याला अडवले. आता कोणी म्हणेल की गौतमवर का विश्वास ठेवायचा. पण तो ऑलरेडी प्रियांकाविरोधात बोलत आहे. ही क्लिप पण आता ट्विटर वर आली आहे. पण अर्थातच ऍक्शन कंप्लिट न झाल्याने सोडून द्यायचे. अळीमिळी गुप चिळी !
दुसरी गोष्ट म्हणजे स्टॅन च्या fandom ने दोन दिवसांपूर्वी त्याच्या विरोधी लिहिणाऱ्या काहींची अकाउंट्स हॅक केली. त्यात एक मुलगी प्रियांका सपोर्टर होती. तिचे फोटो 'माल तो हैं ' म्हणून त्यावर टाकले. तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचे चॅट टाकले(लव्ह यु वगैरे), आणि तिचा फोन नंबरही टाकला. कसेबसे अकाउंट परत मिळवले तिने पण ती सदम्यात गेली. त्यात बरेच शिव सपोर्टरही हसत होते.
तो बाकीच्यांच्या
तो बाकीच्यांच्या लवस्टोरीबद्द्ल टीका करतोय त्यामुळे मात्र तो ट्रोल होतोय, स्वतः मराठीत कसा वागलेला, ह्याला काय अधिकार आहे, लोकं त्याचे आणि वीणाचे फोटो व्हायरल करतायेत. हिंदीत एकालाही त्याचं प्रकरण, चावणं माहीती नाही, सरप्राईजिंग. शिवविरोधात ही शस्त्र वापरु शकतात, बाहेरची पण नाहीत, मराठी बिग बॉसमधलीच आहेत. >> अंजू शिव याआधी हिंदी बिग बॉसच्या प्रेक्षकांना माहित नव्हता. वीणा तर फार दूरची गोष्ट. इन फॅक्ट घरातील बऱ्याच कॉन्टेस्टण्टनाही माहित नव्हता.
तो चावण्याचा विडिओ अर्चना प्रकरणानंतर आता वायरल काढण्यात आला. कारण मराठीत त्याने सॉरी म्हटल्यावर बिग बॉस ने माफ केले होते. मग अर्चनाला त्याने माफ का केले नाही असा लोकांचा प्रश्न होता. बिग बॉसने पण त्याला हिंट दिली होती की विचार कर. पण तो साजिद व मंडलीचे ऐकून तिला काढा म्हणाला. मग बिगबॉसला त्याचे अर्चनाला ट्रिगर करण्याचे प्लॅन दाखवून तिला परत आणावे लागले. अजूनही घरातल्याना त्याचे चावणे प्रकरण माहित नाही. फक्त बाहेर कळले आहे.
मला अजूनही कळत नाहीय कि
मला अजूनही कळत नाहीय कि निम्रत ला स्पेशल ट्रीटमेंट का आहे.. प्रियांका देखील कलर फेस आहे तर निम्रत वर का हि मेहेरबानी??
निम्रतच शो जास्त हिट होता
निम्रतच शो जास्त हिट होता वाटतं म्हणून तिला बहुतेक विनर करण्याचे ठरले असेल. पण ती निकम्मी प्रत्येक वेळी बिग बॉसला तोंडावर आपटवते.
आणि प्रियांका अंकित कडून लव्ह लपाटा अपेक्षित होता. पण ते कबूलही करत नाहीत व शालीन टीना सारखे फेक रोमान्स करत नाहीत, घडी घडी गळ्यातपण पडत नाही म्हणून ते नावडते झाले.
निम्रत कशात होती अर्चना,
आरती निम्रत कशात होती, सौदर्या पण कोणत्या शो मधे होती का.
शिवने आधी हिंदी रियॅलिटी शो केलाय त्यामुळे माहीती नसेल अगदीच हिंदी लोकांना असं नाही.
मला फक्त एवढंच वाटतं, कोणाची लवस्टोरी असेल किंवा नसेल तर त्याने टीका करु नये, त्याने तेच उद्योग केलेत मराठीत. त्याने आपला इंडीव्हिज्युअल गेम खेळावा, तो पहील्या दोघांत तर नक्की असेल.
शिव ने रोडीज केलाय... रोडीज
शिव ने रोडीज केलाय... रोडीज जास्त कोण बघत नाही.. कोणाला मागच्या तीन वर्षातील रोडी कन्टेस्टंट आठवतायत?
बिग बॉसचे काही सांगता येत
हा रोडीज बरोबर. मी तो किंवा स्प्लिटव्हीला वगैरे हिंदी शोज बघत नाही, रोडीज बघत नसल्याने मी त्याला मराठीतच बघितलं पहिल्यांदा. फक्त पेपरात वाचलेले पहिल्या मराठी bb सीझन वेळी की शिव ठाकरे वाइल्ड कार्ड म्हणून येणार त्याने रोडीज केलाय, पण तेव्हा तो आलाच नाही.
बिग बॉसचे काही सांगता येत नाही कोणाविरोधात कधी कुठलं अस्त्र बाहेर काढतील ते. त्यांना जो जिंकायला हवा असेल तोच जिंकणार हा शो.
नाही... 2020 वर्षी रुबिना ला
नाही... 2020 वर्षी रुबिना ला हरवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.. जस्मिन सलमान ची फेव्ह होती.. पण रुबिना जबर स्ट्रॉंग होती.. ती बोलायला लागली कि समोरचा गप्पच....
प्रियांका जिंकेल या वर्षी... टेक स्क्रिनशॉट...
https://youtube.com/shorts
https://youtube.com/shorts/Mv21NKheQpc?feature=share
Rubina ….
रुबिना महितेय, कलर्सच्या
रुबिना महितेय, कलर्सच्या सिरियल्समध्ये होती, चांगली अॅक्ट्रेस आहे. ती असताना शो मी बघितला नव्हता.
वरचा सीन मस्त आहे.
फारच बायस्ड एपिसोड होता आज...
फारच बायस्ड एपिसोड होता आज... मी आता बिग बॉस न बघण्याचे ठरवले आहे.... गेले उडत....
अरे charps असे करू नका,
अरे charps असे करू नका, बिबॉप्रेमी असं नाही करत
आत्ता बिग बॉस मध्यावर आहे. पुढे पुढे बघा डाव बदलत जाईल. बिबॉ एका पार्टीला फेवर करतात, बायस्ड आहे हे पब्लिकला कळतं त्यामुळे पब्लिक विरुद्ध टीम सोबत उभी राहते. त्यामुळे इथेही गेम चेंज होणारच आहे.
शिव आवडतो मला पण तो साजिदसमोर नंदीबैला सारखा गुबूगुबू करतो ते आवडत नाही.
साजिद ची कसली आलीये
साजिद ची कसली आलीये स्ट्रॅटेजी, त्याला स्वतःला गेमच फारसा कळत नाही. बरेचदा दिसलंय ते. आज पण संचालक म्हणून काहीही टास्क कॅन्सल करत होता. ये टास्क वो कर नही सकता ये कॅन्सल! बावळा कुठला. तोच तर टास्क होता.
बाकी सुंबुल ला बाबाचा फोन हे
बाकी सुंबुल ला बाबाचा फोन हे अशक्य मॅनिप्युलेटिव प्रकरण वाटले. फोन अरेन्ज बिबॉनेच केला. त्यात काय बोलायचे हे त्या बाबाला सांगितलेलेही असू शकते पण वर नंतर बिबॉच म्हणे ये सरासर इनाप्रोप्रिएट था.
सुंबुल ची दया येते आहे मला.
आणि आता शनिवारच्या ड्रामा नंतर कॅमेरा फुल्ल शालीन आणि टीना वर होता.
काय चिरीमिरी टास्क देताहेत.
काय चिरीमिरी टास्क देताहेत. एकाच टीमला बीबॉने सपोर्ट केला तर दुसर्या टीमला आपोआप पब्लिक सिंपथी सपोर्ट मिळणार. शालीन टिनावर किती वेळ तो कॅमेरा ! अजून सौंदर्या आली त्यात. अवघड आहे या सीजनचं.आणि सुंबुलच्या वडिलांचा फोन म्हणजे कहर होता. सरळ सरळ वोट्सबद्दल बोलत होते.
फक्त इथे अपडेट्स वाचत जाईन...
फक्त इथे अपडेट्स वाचत जाईन...
साजिद ची मी टू इमेज सुधारायचे प्रयत्न चालू आहेत... बायस्ड चाललंय खूप...शिव जोपर्यंत साजिद आणि निम्रत ला सोडत नाही अवघड आहे त्याचे....
Pages