मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

माझे जुने लिखाण ( गुलमोहोर मधिल) मला आता जुन्या ठिकाणि सापडत नाही, ते कोठे मिळेल? आणि ते नविन माबो वर कसे आणता येईल?

मदत-समिती, मला माझ्या लिखाणात काही फोटोज टाकायचे आहेत, पण त्यांचा साईझ जास्त असल्याने ते अपलोड होत नाहीत. काय करू?

आऊटडोअर्स, फोटोंचा साईझ कमी करा. तो कसा करायचा ते येथेच लिहीलेले सापडेल. गुगल चे पिकासा वापरुन बघा.

रिमझिम, जुन्या मायबोलीवरचे काही लिखाण आर्काईव्ह झाले असेल. त्यामुळे ते शोधून सापडले नाही तर अ‍ॅडमिन ना मेल करुन विचारा.

हल्ली इथे लिहिताना (अक्षरांचा) पाय मोडता येत नाहिये... पुर्वी यायचा.
वर [?] (Get help on button functionality) मधे पाय मोडण्यासाठी ma.h लिहायला सांगितलय पण तसं लिहिलं तर 'म.ह' असं होतं.

म्
म्
न्
न्

सॅम, वर मी m.h, ma.h, n.h, na.h असं लिहीलं आहे आणि ते चालतं आहे.
पण उद्घाटन मधला द चा पाय मोडता येत नाही

उद् घाटन
उद्घाटन

>> Firefox वापरलं तर पाय मोडता येत नाही
अरे हो...खरंच की... धन्यवाद चिनुक्स!

मदत समिती, मी केलेले लिखाण मी थोड्या वेळापूर्वीच संपादन केलेय, परंतू ते नवीन लेखन या सदरात का दिसत नाही. केलेलं लिखाण हे ललित मध्ये आहे. गुलमोहर सदरात जाऊन ललित मध्ये ते दिसतंय. कृपया लवकर सांगा.

आऊटडोअर्स
तुमचे लेखन नवीन सदरात दिसतेय, त्यावर प्रतिसाद पण आलेत वाचकांचे.
नूतन
बीबी = बुलेटीन बोर्ड. तुम्हाला कुठल्या विषयावर नवीन धागा/चर्चा सुरू करायची आहे? याच पानाच्या डोक्यावर हितगुज असा दुवा आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचे ग्रूप सापडतील . इथे नवीन धागा कसा काढायचा ते बघा.

काल तुमची कथा मला 'नवीन लेखन' मध्ये दिसली होती. पण लिन्क क्लिक केल्यावर पान हरवल्याचे कळले. मग लिन्कही दिसेनाशी झाली. Happy तुम्ही 'अप्रकाशित' ठेवली आहे का?

नमस्कार, http://www.maayboli.com/node/12532#comment-487624 ह्या ठिकाणी मी माझा वृद्धाश्रम हा लेख पुनःप्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पण तो दिसत नाही. हा लेख २००८ च्या मायबोली अंकात प्रकाशित झाला होता, म्हणुन पुनःप्रकाशनाला परवानगी नाही म्हणुन तो दिसत नाही का? नविन लोकांना वाचता यावा आणि माझ्या नव्या आय डी त तो संकलित व्हावा अशी माझी इच्छा होती. कृपया सांगाल का?

पल्ली तुम्ही तुमच्या दिवाळी अंकातील लेखाचा दुवा सगळ्यांना देवु शकता वचण्यासाठी. सगळे दिवाळी अंक याच पानाच्या डोक्यावर असलेल्या मायबोली विशेष या दुव्यावर मिळतील.
-मदत समिती

मुग्धा,
तुम्हाला नक्की काय जाहीर करायचे आहे यावर ते अवलंबून आहे. जर एखाद्या क्लासची जाहिरात, खरेदी विक्री इ. असेल तर मायबोलीचा जाहिरात विभाग आहे तिथे जाहिरात देवू शकता. छोट्या जाहिराती विभागात हे करता येईल.
जर एखाद्या होणार्‍या उत्सव किंवा कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना सांगायचे असेल योग्य त्या ग्रूप मध्ये जा ( उदा पुण्यात एखादा महोत्सव होणार असे तुम्हाला सगळ्यांना सांगायचे असेल तर पुणे ग्रूप मध्ये सांगणे योग्य ठरेल) आणि तिथे कार्यक्रमचा दुवा उघडा. कार्यक्रम असा पर्याय उपलब्ध आहे. हा दुवा कसा उघडायचा याबद्दल मदतपुस्तिकेत इथे लिहीलय आणि काही वैयक्तिक गोष्ट सगळ्यांना सांगायची असेल उदा. घरातल्या एखाद्या कार्यक्रमाचे सगळ्यांना आमंत्रण इ. तर ते तुम्हाला हव्या असलेल्या लोकांशी संपर्क साधून करावे लागेल.
- मदत समिती

गेल्या ३/४ वेळेस मला लॉग ईन करता येत नाहीये. मी नुकतच लॉगईन आयडी मराठीत बदलला. लॉगईन करतांना इंग्लिश मध्ये नाव येत आणि एरर येतीये. मला 'परवलीचा शब्द विसरला' हा ऑप्शन वापरुन लॉगईन कराव लागतय... काय चुकतय नक्की?

माझ्याकडे नऊवारी साड्या (शिवलेल्या) विकायला आहेत. त्यांची जाहिरात खरेदीमध्ये कशी द्यावी? काय खर्च येईल?

रुनी
मला आमच्या घरी (माझ्या माहेरी) झालेल्या एका कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना सांगायचे आहे. ५ डिसेंबरला माझ्या आजीला १००व वर्ष लागल. हा आनंद मला माबोकरांबरोबर शेअर करायचा आहे. ते कुठे आणि कस कराव ते सांगाल का?

मुग्धा, एक ललित लेख लिहून याचं वर्णन करु शकता. त्या करता तुम्हांला नवीन लेखन मध्ये जाऊन नवीन धागा उघडावा लागेल.

सुस्मिता, तुम्ही वर दिलेल्या धाग्यावर (http://jahirati.maayboli.com/) गेलात तर तुम्हांला हवी ती माहिती मिळेल.

धन्स मिलिंदा, पण हे लेख वगैरे प्रकरण जरा माझ्या कुवतीबाहेरच आहे.
आणि माबोवर इतके चांगले लेखक असताना मी आपली पायीची वहाण, पायीच बरी आहे. Proud
तरी पण प्रयत्न करेन नक्की. Happy

आधी फोटो (फाइल साइझ < १५० केबी), "माझे सदस्यत्व >>> खाजगी जागा" इथे लोड करून घ्या. मग लेख लिहायला घेतल्यावर तुम्हाला त्या लेखणाच्या चौकटीखाली "मजकूरात image किंवा link द्या" असे दिसेल. ते वापरून फोटो लोड करा.

deepakul, तुम्ही विरंगुळा विभागाचे सद्स्य झालात की तुम्हांला ते पान दिसू लागेल

मदत्_समिति,
मला काहि प्रकाशचित्रे द्यायचि आहेत. त्यावर मला काहि प्रश्न आहेतः
१) प्रत्येक प्रकाशचित्राचि size चि काहि मर्यादा आहे काय?
२) एका सदरामध्ये जास्तित जास्त किति प्रकाशचित्रे देता येतील?

धन्यवाद,
चन्दन.

Pages