मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

RockOn, मित्राला इथला दुवा द्या (http://www.maayboli.com) आणि सद्स्य व्हायला सांगा. उजव्या हाताला खाली सद्स्य होण्यासाठी दुवा दिला आहे.

साक्षी, आवडीचं वाक्य म्हणजे स्वाक्षरी सारखं वापरलं जाणारं वाक्य म्हणता आहात का ? ते सध्या दिसत नाही, आणि ही समस्या अगोदरच माहिती आहे. त्यावर अ‍ॅडमिन काम करत आहेत.

http://www.maayboli.com/node/4806 या लिंकवरचा 'गोष्टी हेमलकशाच्या - भाग १' चा मी लिहिलेला मूळ मजकूर का बरं दिसत नाहीय? मी संपादन या लिंकवरून गेले तेव्हा माझं मूळ लिखाण मला दिसतं. पण अन्यथा मूळ मजकूर दिसत माही. काय करू?

how can I publish "Prakash Chitra" in Maayboli? I did search it a lot but could not get through.

amdandekar, प्रतिसादाच्या जागेखाली, एक 'मजकूरात image किंवा link द्या' असा दुवा आहे. तेथे जाऊन आपल्याला पाहिजे असलेले प्रकाशचित्र अपलोड करा, आणि त्याचा दुवा तुमच्या पोस्ट मध्ये द्या.

मुग्धा, तुम्ही योग्य तो बीबी / धागा शोधून तेथे विचारू शकता किंवा येथेच विचारले तरी चालेल

मला खालील हितगुज्-ग्रुप (node/1705) मध्ये प्रवेश कसा मिळेल ?
http://www.maayboli.com/node/1705
या ग्रुपचे सदस्यत्व मिळवण्याचे (Registration) पान कुठे आहे ? त्याची कृपया लिंक द्यावी.

आपंण केलेले लेखन type बद्लायचे कसे
मि पाककुती गप्पाचं पान हा type केले आहे मला ते लिखाण पाककुती मध्ये टाकायचे आहे

माझी ३ accounts आहेत. त्यापैकी २ delete करायची आहेत.
काय करू?
>>>>>>सदस्यत्वाचे नाव कसे बदलावे / देवनागरीत कसे तयार करावे?
हे माहित नव्हते.

श्रुती, तुमची सदस्यत्वाचे नाव कसे बदलायचे याची समस्या अजून आहे का ? असेल तर तुमच्या उजव्या हाताला असलेल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जाऊन, 'संपादन' वर क्लिक करा, तेथे तुम्हांला नाव बदलता येईल.

दाद, अजून टॉप टेन मुख्य पानावर आले नाही, अ‍ॅडमिन ने त्याचे कारण असे दिले आहे की ते अजून भार चाचणी करताहेत / करणार आहेत.

हसरी, तुम्ही एक नवीन पाककृती लिहून ती योग्य त्या जागी टाकू शकता. तुमच्या सदस्यत्वात जाऊन आधीचे पान अप्रकाशित करु शकता / उडवू शकता.

जुयी, प्रत्येक पानावर सर्वात खाली, एक टेक्स्ट बॉक्स आहे, त्यात तुम्हांला जे शोधायचे आहे त्यासंबंधी टाईप करा. आणि सर्च चे बटण दाबा. सर्च कोठे करायचे ते पण ठरवा. मायबोली सिलेक्ट केलेत तर मायबोलीवरचे रिझल्ट्स दिसतील.

पल्ली तुम्हाला युजर नंबर बदलता येणार नाही, दुसरे नवीन सदस्य खाते उघडले तरच दुसरा युजर नंबर मिळू शकेल पण मग तुम्हाला सध्याच्या नावाने केलेले लिखाण तुमच्या नवीन खात्यावर ट्रान्सफर करता येणार नाही.

वैशु
"माझे सदस्यत्व" मध्ये गेल्यावर "संपादन" मध्ये जावुन बघीतलेत का, तिथे गेल्यावर "वापरायचे नाव" दिसेल. तिथे बदलता येईल.

मला गेले दोन दिवस मदतपुस्तिका आणि विचारपूस या दोन जागा सोडल्यास इतर कुठेही मराठी टाइप करता येत नाहीये. काय करावे लागेल?

पानाच्या उजव्या बाजुला असलेल्या "माझे सदस्यत्व" या दुव्यावर गेलात तर तुम्हाला तुम्ही सदस्य असलेले सगळे ग्रूप दिसतील.

..

मला एडिंबरातल्या मायबोलीकरांशी हितगुज करायचेय. पण असा ग्रुपच सापडत नाहीय . काय करु?
कॄपया मदत करावी.....

कुलु
तुम्ही यु. के. मधल्या ग्रूपवर http://www.maayboli.com/node/2961 किंवा युरोप मधल्या ग्रूपवर http://www.maayboli.com/node/1643 तुमचा निरोप लिहू शकता किंवा तुम्हाला एडीनबराच्या लोकांना गप्पांसाठी वेगळे पान हवे असेल तर तसे उघडून देता येईल.

हसरी, तुमच्या मशिनवर नवीन कूकी साठवली जात नसावी मायबोलीसाठी , असे वाटते. तुम्ही त्या कूकीज काढून पाहा.

कुलू, UK च्या बीबी वर तुम्हांला एडिंबरामधले मायबोलीकर सापडू शकतील (सापडतीलच असे नाही). इथे एक damit नावाचा सदस्य आहे, तो पूर्वी त्या भागात असे. त्याच्याशी संपर्क करुन पाहा.

प्राची, तुमची समस्या दूर झाली आहे असे समजतो.

Pages