मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

सभासद खात्यामध्ये प्रकाशचित्रं चढवण्यात (upload) येणारी अडचण आता सोडवली आहे.

मदत समिती,
सन्जय सहस्रबुद्धे ह्यान्ही माझा ह्या सुन्दर साईटशी परिचय घडवून आणला. मला त्यान्चे मनापासून आभार मानायचे आहेत. पण मला ते साईटवर कुटेच भेटले नाहीत. मी त्यान्च्यापर्यन्त कसा बरे पोहोचू शकेन. आपण मदत केल्यास मी आपला ॠणी राहीन,
निवास

पर्याय १ : तुम्ही त्यांनाच त्यांचं सदस्य नाव विचारा
आणि मग येथेच सर्वात वर 'मायबोलीकरांची सूची' असा दुवा आहे, तेथे जाऊन ते नाव टाकून शोधा.

पर्याय २ : येथेच सर्वात वर 'मायबोलीकरांची सूची' असा दुवा आहे, तेथे जाऊन ते नाव टाकून शोधा.

आपले येथे स्वागत आहे.

अ‍ॅडमिन, अजून वाचायचय ह्या दुव्यावर सगळ्या लिन्क्स दोन दोन दिसतायत. (माझे डोळे ठीकच आहेत... एकाच लेखाच्या दोन लिन्क्स आहेत)
http://www.maayboli.com/group

मला कालपण दोन दोन वेळा दिसत नव्हते, आज तर नक्कीच नाही.

पण हे नीट दिसणे 'नवीन लेखन' दुव्यावर होते.
'अजून वाचायचंय' मध्ये दोन दोन वेळा दिसताहेत दुवे, पण ते सगळ्या बीबी चे नाही.

'स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे' असा एक धागा होता; तो सापडत नाहीये. क्रुपया लिंक मिळेल का?

फुलराणी,
तुम्हाला कोणाशी तरी बोलायचय या ग्रूपचे सदस्यत्व घेतल्यावर सोलमेट हा धागा दिसेल.
फक्त नोड क्रमांकावरून कुठलाही धागा कुठल्या ग्रूप मध्ये आहे हे शोधणे सध्या शक्य नाही. आधी त्या धाग्याबरोबर धाग्याचा ग्रूप दाखवला जायचा तो आता मायबोली नुतनीकरणामुळे दिसेनासा झालाय. त्यावर काम चालू आहे.

मला माझ्या प्रतिसादाखाली माझी सही देण्यासाठी काय करावे लागेल?
जुन्या माबोवर ते सहज शक्य होते. आता नवीन माबोवर हे बदल कुठे आणि कसे करायचे?
धन्यवाद.

मला दिवाळी अंक कसा खरेदी करायचा समजत नाही.काय कनसेप्ट आहे?मी दिवाळी विभागात पाहिले पण नीटसे कळले नाही.

वैशु,

http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=283&frontpage

या दुव्यावर जा, तेथे तुम्हांला हवी असलेली माहिती मिळेल. दिवाळी विभाग (आपल्याला 'मायबोली विशेष' विभाग म्हणायचं आहे का ?) हा मायबोलीचा दिवाळी अंक प्रकाशित करण्यासाठी आहे. हा अंक खरेदी करावा लागत नाही.

राहुल, मदतपुस्तिकेतच देवनागरीत कसे लिहावे या धाग्यावर जा किंवा ' प्रतिसाद' मध्ये प्रश्नचिन्हाचा आधार घ्या.

गटग म्हनजे GTG म्हनजे गेट टु गेदर . कुठलेही मायबोलीकर प्रत्यक्ष भेटीत एकत्र आले की त्याला जीटीजी म्हनतात. मायबोलीवर पोस्ट करून आमन्त्रणे दिली जातात. अथवा आपसात फोन, इ मेल वगैरे माध्यमातून 'संकेत मिलनाचा ' ठरवला जातो.बर्‍याचदा ठरवून एखाद्या ठिकाणी जमतात, गप्पा हाणतात, जेवतात, मनोरंजनाचे कार्यक्रम करतात. ते एक स्नेहसम्मेलनच असते. यातील बरेच लोक एकमेकाना ओळखतात . अमेरिकेत बर्‍याच अन्तरावरून लोक एकमेकाना केवल भेटण्यासाठी येतात. पुणे मुम्बई इ ठिकाणि बर्‍याच वेळा अशी गटग होतात. त्याला ए.वे.ए.ठि. (एका वेळी एका ठिकाणी )असे ही म्हनतात. जीटीजी झाल्यावर कोणीतरी रिकामटेकडी व्यक्ती त्याचा वृत्तान्त मायबोलीवर टाकते.
जीटीजी उर्फ गटगसाठी किमान दोन माणसे लागतात. दोन मायबोलीकरानी एखाद्या हॉटेलात कॉफी घेतली तरी त्याला (मिनि )गटग म्हणतात . त्याला अधिकृत गटगचा दर्जा(कसोटी सामन्यासारखा)देण्यात आला आहे. मात्र वृत्तान्त मात्र हवाच हवा . मायबोलीकर नवरा बायको असल्यास त्यांच्या भेटीला जीटीजी मानले जात नाही Proud

जीटीजी तून बरेच विवाहही जमले आहेत Proud

Pages