कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एमएसआयएल ची मारुती स्विफ्ट चांगली गाडी आहे. पॉप्युलर मॉडेल, बलेनो च्या आधीचं. बलेनो सुद्धा एक पर्याय आहे. बर्‍यापैकी रिफ्रेश्ड आहे.
माझ्या आधीच्या पोस्ट मध्ये जरी मी निगेटिव असेल (ते माझं वैयक्तिक मत आहे) तरी ही बलेनो फार जास्त खपणार आहे. ऑलरेडी २५ हजारांवर बुकिंग मिळालेलं आहे साईट वरच्या माहीती नुसार.

तुमच्या बजेट नुसार बरेच पर्याय आहेत हॅच/ प्रिमिअम हॅच सेगमेंट मध्ये - होंडा जॅझ, मारुती स्विफ्ट, बलेनो, इग्नीस, ह्युंदाई आय १०, २०, टाटा टियागो इ.
बजेट नुसार गिअर बॉक्सचे पर्याय ही आहेत - एएम्टी, सिव्हिटी, ड्युअल क्लच इ.

इले. कार्स मधे टाटा नेक्सॉन त्यातल्या त्यात पॉकेट फ्रेंडली आहे माझ्यामते. तरीही एक मन म्हणतं की १५-१७ लाख देऊन गाडी घ्यायची आणि ती २००-२५० किमि पण जात नाही एका चार्ज वर (रेंज अँग्जाईटी), हे काही पटत नाही, जमत नाही.
पुन्हा चार्जिंग स्टेशन वर गोंधळ असतात सध्या तरी - आपल्या आधीची गाडी चार्ज व्हायची असणे, तिथे वीजच नसणे, तीव्र ऊन असेल आणि गाडी फारवेळ उभी असेल तर बॅटरी अचानक उतरणे (हे टेस्लामध्ये सुद्धा होतं, याबद्द्लचा व्हिडिओ आहे युट्युबवर) इ.
युट्यूब वर बरेच व्हिडिओज आहेत याबद्द्लचे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा. इले. कार पर्यावरणस्नेही आहे असा बोलबाला (अर्थात हेमावैम) आहे.
- बॅटरीज सुद्धा बर्‍यापैकी प्रदुषण करतात.
- ज्या वीजेवर ती गाडी चार्ज होते ती वीजही जर फॉसिल्स पासून आलेली असेल तर मूळ मुद्द्याला काहीही अर्थ राहात नाही.

आता ज्यांनी गाड्या घेतल्या आहेत ते म्हातारे होताना गाडी म्हातारी होईल. बरेच जण नोकरी धंद्यातून रिटायर होत असताना गाडीची १५/२० वर्षे संपतील. १५ वर्षानंतर फारतर एकदाच फिटनेस सर्टिफिकेट मिळेल. त्यासाठी अंडरटेबल रक्कम फिटनेस सेंटरवाल्याला मोजावी लागणार आहे. खासगी उपयोगाच्या कार्स इतक्या खराब होत नाहीत. १५ ते २० लाख रूपये किंवा जास्त किमतीच्या गाड्या आयुष्यभर २१००० रूपयांचा हप्ता मोजून घेतल्यावर हप्ता संपताना त्या भंगार मधे काढाव्या लागतील. त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन शोरूमला नवीन गाडी घ्यावी लागेल. सर्टिफिकेट दाखवून थोडेफार डिस्काउंट मिळेल. आपल्या कार्सचे जुने पार्ट्स नव्या कारमधे वापरले जातील. पण त्याने किंमती कमी करतील ? आजवर असा ट्रेण्ड आलेला नाही.
म्हातारपणात नवीन गाडी घेणे आणि हप्ते फेडणे अशक्य आहे. साठीच्या पुढच्या लोकांना सवलत द्यायला हवी होती. फिटनेसची प्रक्रिया पारदर्शक हवी आणि गाडी जर चालत असेल तर चाळीस वर्षे वापरली तरी काय हरकत आहे ?

कमीत कमी आधीच्या गाडीत असलेलं (४ स्टेप का असेना) सिविटी ठेवायला हवं होतं.
>>
योकू,
पूर्वीच्या बलेनोला सीव्हीटी गिअरबॉक्स होतं (४ स्टेप वालं टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स मारूती १.४ लि. आणि पुढच्या इंजिन्स सोबत देते : अर्टिगा, एक्सएल ६, सिआझ वगैरे)
बलेनो ही एकमेव मारूती होती ज्याला सीव्हीटी यायचं
ब्रेझाला सुद्धा आधी एएमटी मधे टॉर्क कन्व्हर्टर अन आता परत एएमटी देताहेत.

सगळ्यात जास्त गिअरबॉक्स ऑप्शन्स असलेली कार ही ह्युंडे आय २० असावी.
नॅचरली अ‍ॅस्पिरेटेडला मॅन्युअल अन सीव्हीटी, तर टर्बोला क्लचलेस आयएमटी अन डीसीटी असे ४ ऑप्शन्स आहेत

मला डीसीटी पेक्षा सीव्हीटी कधीही आवडतं

बाकी पॅडल शिफ्टर्स हे फार मोठं सेल्स गिमिक आहे (भारतात सनरूफ बाबतही माझं साधारण हेच मत आहे)

मला गाडीचे टायर बदलायचे आहेत. ठाण्यातला कोणी चांगला डिलर माहीती आहे का?>> महेश टायर्स, पाचपाखाडी (सरोवर दर्शन जवळ) आणि मानपाडा ला टायर चे शॉप आहे. वाजवी किंमत आणि उत्तम सर्विस

येस महेश टायर्स .. हेच लिहिणार होतो. आता michilen चे मिळायला लागले का? साधारण 1 वर्षांपूर्वी तुटवडा होता...

अँकी +१
पॅडल शिफ्टर्स मी कधीही वापरले नाहीत अजून तरी... सो आता मी ही त्यावर मार्केट गिमिक शिक्का मारतोय.
सनरूफ बद्दल तर माझं कधीही +ve मत नव्हतं. आपल्या इकडल्या गरमीत गाडीच्या ६ काचांमधूनच येणारा प्रकाश नको वाटतो दिवसा ते सनरूफ च्या प्रकाशाचं कशाला अजून. असो...

माझ्याकडे अमेझ पेट्रोल cvt आहे नवीन आणि माझा पेडल शिफ्टरचा अनुभव छान आहे. घाटात किंवा हमरस्त्यावर दुसऱ्या गाडीला मागे टाकून जाण्यास अतिशय उपयुक्त आहेत.

येस महेश टायर्स .. हेच लिहिणार होतो. आता michilen चे मिळायला लागले का? साधारण 1 वर्षांपूर्वी तुटवडा होता...>>>
अखेर आज टायर्स बदलले महेश मधून योकोहामा टाकले. मिशीलीन नव्हते. महेशची सर्विस उत्तम आहे.

महेशची सर्विस उत्तम आहे. <<< अच्छा, नोटेड.

घाटात किंवा हमरस्त्यावर दुसऱ्या गाडीला मागे टाकून जाण्यास अतिशय उपयुक्त आहेत. <<< वळणाच्या घाटात हे वापरताना गुंत्याचं वाटत नाही का?

१०-१२ लाख बजेट मध्ये कोणती गाडी घ्यावी? रहाणार मुंबई. वापर रोज नाही होणार. बजेट थोडेफार खेचता येईल. होंडा सिटीचा विचार करत आहोत. (पेट्रोल)

होंडा सीटी पण चांगली आहे,
Scoda slavia आहे.
virtus पण येतेय एक दोन महिन्यात.
क्रुपया ciaz चा अजिबात विचार करू नका.
sedan मधे हवी असेल तर मार्केटमधे याच्याशिवाय अजून काही जास्त ऑप्शन्स नाहीऐत.

मारुती espresso चा अनुभव कसा आहे ? कोणी घेतलीये का? >> जर किंमत constraint नसेल तर टाटांची टियागो सर्वच (इंधन, सुरक्षितता) दृष्टीने योग्य गाडी असेल. hatchback पण आहे, CNG आणि ऑटो मध्ये पण उपलब्ध आहे.

होंडा सिटी घ्यायचा विचार करत असाल तर त्याला ciaz हा ऑप्शन नसू शकेल.. ciaz फ्युएल इकॉनॉमिकल गाडी असून होंडा सिटी आणि तत्सम गाड्यांप्रमाणे प्रीमियम कैटेगरीत बसत नाही.

होंडा सिटी घ्यायचा विचार करत असाल तर त्याला ciaz हा ऑप्शन नसू शकेल.. ciaz फ्युएल इकॉनॉमिकल गाडी असून होंडा सिटी आणि तत्सम गाड्यांप्रमाणे प्रीमियम कैटेगरीत बसत नाही.
>>
त्यांनी बजेट १०-१२ लाख दिलं आहे...
थोडं खेचता येईल म्हणल्यानी आपण @ १५ लाख पकडू.

होंडा सिटी बेस मॉडेल (बंगलोरमधे) @ १६.४ लाख जातं.
सिआझ टॉप एंड ऑटो मॉडेल @ १५ लाख पर्यंत मिळेल.
जर बजेट इतकं ताणायचं नसेल तर ऑटो ऐवजी मॅन्युअल घेता येईल, ती १३.५ मधे मिळेल (टॉप एंड)

बाकी स्कोडा स्लाविया : बेस मॉडेल १३.८० - टॉप एंड २० लाख

बजेट सोडून इतर रिक्वायरमेंट्स कळल्या तर बाकी ऑप्शन्स सांगता येतील.

सेमिकंडक्टर शॉर्टेज मुळे सध्या कुठलीही गाडी ३-४ महिन्यांच्या वेटिंगनीच मिळते आहे.
नवीन लाँच्ड गाड्यांना आणखी जास्ती वेटिंग आहे.

नुकतीच i20 Asta Optional DCT turbo with sunroof घेतली. Automatic & sunroof या दोन गोष्टी mandatory होत्या. i20, टाटा नेक्सोन, वेन्यु आणि XUV500 फायनल लिस्ट मध्ये होत्या. किआ वर फक्त नवीन कपनी असल्यामुळे काट मारली होती. सांगताना ४ महिने सान्गितले होते पण गाडी २ आठवड्यातच दारात आली. माझ्या अपेक्षे पेक्षा खूपच चान्गली सर्विस आणि फिचर्स मिळाले. १० इन्च infotainment, Bose music system, wireless charging, air purifier, cool glovebox, 6 airbags असे अनेक फिचर्स आहेत. सिटी मध्ये १२ आणि हाय वे ला ९० च्या स्पीड ला साधारण १७-१८ चा माय्लेज देते. overall, very happy with the car as of now.

अरे वा अभिनंदन. जर तुम्ही बाकीच्या shortlisted गाड्यांचे Test drive घेतले असतील तर त्या अनुभवाबद्दल पण लिहा.

आभारी आहे मंदार. खरं तर प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. पावर हि माझी गरज नव्ह्ती त्यामुळे जितक्या गाड्या मी टेस्ट केल्या त्या सगळ्याच आवडल्या. माझी रिजेक्शन ची कारणं वेगळी होती ती मी सान्गतो.
xuv500 मस्त गाडी आहे पण बूट स्पेस अगदी alto पेक्षा पण कमी आहे.
वेन्यु - Automatic & sunroof एकत्र असलेलं मॉडेल तात्पुरतं discontinued होतं
Honda Jazz - त्यांची infotainment & music system फारच average होती आणि rear seat साठी adjustable headrest नव्ह्ते

शेवटी नेक्सोन आणि i20 उरल्या. दोन्ही नेक टू नेक आहेत. नेक्सोन ५ * सेफ्टी रेटिंग मुळे काकण भर सरस वाटली पण त्यांनी १ रुपयाचा discount दिला नाही. i20 वाल्यांनी माझी counter offer बर्यापैकी मॅच केली आणि मी i20 घेतली.

रच्याकने, नेक्सोन च ऑटोमॅटिक हे AMT प्रकारचे आहे ज्यात खालच्या गिअर मध्ये गिअर चेंज होताना हलकेसे झटके जाणवतात. i20 चे DCT प्रकारचे आहे जे जास्त स्मूद आहे. AMT चा मेन्टेनन्स जवळ्पास manual transmission इतकाच येतो तर DCT चा थोडा महाग आहे.

प्रवीणपा अभिनंदन

सांगताना ४ महिने सान्गितले होते पण गाडी २ आठवड्यातच दारात आली. >> लकी यू
वेन्यु - Automatic & sunroof एकत्र असलेलं मॉडेल तात्पुरतं discontinued होतं >> नवी वेन्यू लाँच होणार असल्यानी जुन्या वेन्यूचं प्रॉडक्शन कंट्रोल केलं होतं
Honda Jazz - त्यांची infotainment & music system फारच average होती >> होंडानी गेल्या ४-५ वर्षांमधे जॅझला काहीही अपग्रेड केलं नाहीये. इंटरनॅशनल मार्केटमधली होंडा फिट (म्हणजेच जॅझ) लांबीत ४ मीटरपेक्षा लांब आहे (फोक्सवॅगन पोलोंच्या इंटरनॅशनल मॉडेलचंही हेच आहे). यामुळे या गाड्यांवर भारतात जास्ती टॅक्स बसणार अन किमती वाढणार. म्हणून या कंपन्यांनी या गाड्या डिसकंटिन्यू करायचा कॉल घेतला आहे.
आय १० निऑसचं मार्केट खाते म्हणून ह्युंडे पण सँट्रोला बाय करतेय.
टोटली वेगळं डिझाईन अन वेल डिफाईन्ड सेगमेंटेशन असल्यानी मारूती मात्र वर्षानुवर्ष एकाच ब्रॅकेटमधे एस-प्रेसो, आल्टो, वॅगन-आर अन सेलेरिओ विकतंय.

माझी इटीओस लिव्हा आता 10 वर्षांची झालीये. 10 वर्ष झाली तरी रनिंग 50-60 हजारच्या वर झाले नाहीये. गेले तीन वर्षे सर्व्हिस सेंटरमध्ये टायर्स बदलायला सांगतायत आणि जुनी टायर्स असल्याने व्हील अलाईनमेंट करत नाही असे सांगतायत.
दिसताना टायर्सची नक्षी व्यवस्थित आहे. पण रबर आहे आणि10 वर्षात उभ्या जागीही टायर्सची झीज होऊ शकते याची कल्पना आहे.
आता प्रश्न असे की
1. टायर सेट कधी बदलावा? आयडियली, कंपनी स्टॅण्डर्ड्स वगैरे नको. सामान्य माणसाचे उत्तर हवेय. Happy
2. टायर सेट बदलला नाही तरीही व्हील अलाईनमेंट करून घेता येते का? टोयोटाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये (मिलेनियम, अंधेरी) नाही करत टायरसेट बदलल्याशिवाय.
3. वसई साठी टोयोटाचे सर्व्हिस सेंटर 'लकोझी टोयोटा' म्हणून आहे. अहमदाबाद हायवेला. त्याचा कुणाला अनुभव आहे का?

मी 50000 कि.मी. नंतर बदलली. दिल्लीहून मुंबईला आल्यावर puncture च प्रमाण खूप वाढले होते. म्हणून बदलले. मुंबईतील रस्ते खूप खराब आहेत. So it is better to change now.

Pages