Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाट्य कलाकार हिंदीत पाहून
नाट्य कलाकार हिंदीत पाहून मस्त वाटतं कधीकधी >> +1
+७८६
मराठी अभिनेत्यांना हिंदीत ॲवार्ड घेताना बघूनही बरे वाटते.
मराठी पिक्चर जेव्हा अमराठी लोकांना आकर्षित करतात तेव्हाही छान वाटते.
दोन्ही वेळा तो कलाकार वा चित्रपट आपल्या आवडीचा आहे की नाही हे गौण ठरते.
मराठीतले सुपरस्टार हिंदीत
मराठीतले सुपरस्टार हिंदीत जाऊन, नोकराचा फुटकळ साईडरोल करुन विचित्र आवाज काढुन केविलवाणे बिचारे दिसतात ते अजिबात आवडत नाही.
मराठी चित्रपट/नाटकातले ईतर मोठे कलाकार हिंदीत जाऊन टाईंमपास साईडरोल करतात ते ही आवडत नाही.
सन्माननीय अपवाद आहेतच.
हपा धमाल बघायला हवा खरंच.
हपा
धमाल बघायला हवा खरंच.
विजय पाटकर, पटवर्धन नाही..
विजय पाटकर, पटवर्धन नाही..
अभि नव + 1
अभि नव + 1
हे असे नोकराचे रोल करून मराठी इमेज खराब करतात आणि कौतुक फार असते त्यांना...
वनिता खरात ने कबीर सिंग मध्ये मेड चा एक सिन केलाय तर बळेच कौतुक काय तर म्हणे शाहिद च्या समोर ताकतीने उभी राहिली.. तोडीस तोड अभिनय केला... शाहिद ला खाल्ला ...
अरे कंट्रोल...
विनय आपटे सीनही मस्त.
विनय आपटे सीनही मस्त.
मराठीतले मोठे कलाकार हिंदीत साईडरोल करतात ते आवडत नाही. +१
सदाशिव अमरापूरकरसुद्धा एवढे ताकदीचे कलाकार. पण हिंदीत किती बिनमहत्त्वाचे रोल्स केले आहेत.
तसेच बरीच आडनाव शिंपी, धनगर
तसेच बरीच आडनाव शिंपी, धनगर अशी असतात. जस Stadnik - धनगर , Kravchenko - शिंपी किंवा शिंप्याचे पोर.
इम्रानच्या एक्स सासर्याचे आडनाव गोल्डस्मिथ असे होते. म्हणजे आपल्याकडे सोनार असते तसे.
पण हिंदीत किती बिनमहत्त्वाचे
पण हिंदीत किती बिनमहत्त्वाचे रोल्स केले आहेत. >> इथे विषयांतर होईल पण अमरापूरकरांनी त्या लेट ८० - अर्ली ९० च्या काळात खूप अविस्मरणीय व्हिलन्स साकारले. सडक मधला त्यांचा रोल तर जबरदस्त आहे.
कलाकारांनी साधे रोल्स साकारण्याला थोडे अर्थकारण सुद्धा जवाबदार असेल. त्यांना त्या रोल साठी हिंदीतून जे मानधन मिळत असेल त्यात त्याकाळी पूर्ण मराठी पिक्चर्स बनायचे.
धनि पुर्ण पोस्ट अनुमोदन
धनि पुर्ण पोस्ट अनुमोदन
अमरापूरकर यांचा सडक गाजलेलाच पहिला आठवला. पाठोपाठ ईश्क. आणि असेच लीड व्हिलन साकारले आहेत त्यांनी हिंदीत.
दुसरा अर्थकारणाचा मुद्दा मी मगाशीच लिहिणार होतो. आपल्याला वाईट वाटते बोलायला ठिक आहे. पण पैसे कमी श्रमात जास्त मिळत असतील. आणि त्या कामावरच पुढची कामे मिळत असतील तर का म्हणून ऑफर धुडकवायची.
लक्ष्याने नोकराचे रोल केलेत तसे हिरोच्या मित्राचेही केलेत. अशोकमामांनी व्हरायटी दाखवली आहे. विक्रम गोखलेंनी कित्येक भुमिका अजरामर केल्या आहेत. नाना पाटेकर बद्दल विचारायलाच नको.
श्रेयस तळपदे वा रितेश देशमुख ही मराठीच पोरं आहेत ना जे हिरो झालेत.
महेश मांजरेकर यांनीही आपल्या हिंदी चित्रपटातून बरेच छोट्यामोठ्या मराठी कलाकारांना संधी दिली. रोहीत शेट्टी देत आलाय.
हा व्यवसाय आहे. तसेच ईथे नेपोटीजमही चालते. जर मराठी माणूस, उद्योजक हिंदी चित्रपटांमध्ये गुंतवणूक फार करत नसेल तर हे चित्र असेच राहणार.
बाकी मराठी हिरोईन जर यात जोडल्या तर मात्र त्यांची बरीच मोठी लिस्ट आहे ज्यांनी व्हाया मराठी न जाता हिंदीतच काम केलेय.
हा धागा आणि 'असंबद्ध गप्पा'
हा धागा आणि 'असंबद्ध गप्पा' मध्ये आता कन्फ्युजन व्हायला लागलंय
बाई दवे...
बाई दवे...
त्यांच्याकडे नतालिया खुप कॉमन . म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी जन्मलेली.>>> हे दोन्ही कसं काय शक्य आहे?
युसुफ खान, अमीर खान,सलमान
युसुफ खान, अमीर खान,सलमान खान,इरफान,शाहरुख .
मुस्लिम hero च जास्त आहेत.
Schedule या शब्दाचे शेड्युल,
Schedule या शब्दाचे शेड्युल, स्केडुल, स्केज्युल, शेजुल असे सगळे उच्चार ऐकलेत
"कलाकारांनी साधे रोल्स
"कलाकारांनी साधे रोल्स साकारण्याला थोडे अर्थकारण सुद्धा जवाबदार असेल." - मागे एकदा एका खाजगी समारंभात निळू फुल्यांना 'सपट चहाची जाहिरात कशी केलीत हो तुम्ही?' असं विचारलं होतं. तेव्हा त्यांनी 'पैशासाठी' असं उत्तर दिलं होतं.
त्यांच्याकडे नतालिया खुप कॉमन
त्यांच्याकडे नतालिया खुप कॉमन . म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी जन्मलेली.>>> हे दोन्ही कसं काय शक्य आहे?
>>> का शक्य नाही? नाताल म्हणजे बर्थडे... त्याच्यावरून नटालिआ नाव आहे... मराठीत नाही का नाताळ म्हणतो...
बहुतेक त्यांना म्हणायचं आहे
बहुतेक त्यांना म्हणायचं आहे की ते नाव कॉमन असायला ख्रिसमसच्या दिवशी जन्मणे कॉमन असायला हवे, ते कसे काय.
विजयराज चा लाल बटन वाला सीन
विजयराज चा लाल बटन वाला सीन आणि विनय आपटे >>> हाहाहा, धमाल.
'धमाल ' हा चित्रपट आम्ही ऑफिस
'धमाल ' हा चित्रपट आम्ही ऑफिस गॅंग ने चित्रपट गृहात जाऊन बघितला होता. बघताना प्रचंड धमाल केली होती.
नंतर कधीतरी हा चित्रपट (कथा आणि बरेचसे प्रसंग देखील ) its a mad mad mad mad world ह्या पाश्चात्य चित्रपटावर बेतलेला आहे हे कळल्यावर थोडासा धक्का बसला होता. पण तरीही धमाल मध्ये प्रत्येक कलाकाराने अफलातून अभिनय केलाय. एक एक सीन iconic झालाय. हा टीव्हीवर कधीही लागला की पूर्ण बघत enjoy केला जातोच.
नावे - उच्चार - समज गैरसमज
नावे - उच्चार - समज गैरसमज यात नवीन धाग्याचे potential आहे. काही वर्षे पोलंड-युक्रेनच्या टीम्स सोबत काम केलयं . जीभेला वळ पडणारं काम आहे.
पोलंड च्याबद्दल +1 स्वस्ति
पोलंड च्याबद्दल +1 स्वस्ति
त्यांच्याकडे नतालिया खुप कॉमन
त्यांच्याकडे नतालिया खुप कॉमन . म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी जन्मलेली.>>> हे दोन्ही कसं काय शक्य आहे?
आवं वैनी ही नाताळाला आलीया (जल्माला) त्यावरुन नाताळाला आलीया...नाताळाला आलीया, करत करत अपभ्रंश झाला नतालिया.
+१ पोलंड साठी. Kraków बरोबर
+१ पोलंड साठी. Kraków बरोबर काम करताना प्रॉब्लेम पेक्षा त्यांचे नाव कसे pronounce करायचे याचेच टेन्शन होते.
मातृभाषा सोडली तर जगातील एका
मातृभाषा सोडली तर जगातील एका ही व्यक्ती ला दुसऱ्या कोणत्या ही भाषेचे १०० % ज्ञान नसते.
ज्यांची मराठी ही मातृभाषा आहे ते .
महाराष्ट्र मधील विविध प्रांतात बोलणारी भाषा समजतात..कारण त्यांना मराठी चे पूर्ण ज्ञान असते
पूर्ण para मध्ये किती ही उच्चार खावू ध्या ,चुकीचे उच्चार करू ध्या काही फरक पडत नाही
आपले भारतीय गुलाम जगात फिरतात.तेव्हा इंग्लिश बोलतात त्या इंग्लिश भाषेचे ह्यांना काडी चे ज्ञान नसते .
इंग्लिश बोलणे आणि इंग्लिश लोकांबरोबर राहणे हे ह्या गुलाम लोकांना खूप मोठे पणाचे वाटते..
म्हणून yes चे या ,ok चे okey ही फालतुगिरी पण ह्यांना मॉडर्न वाटते
बाकी चीन,रशिया,जपान, ह्यांना वाटत नाही..
Submitted by जेम्स बॉन्ड on 8
Submitted by जेम्स बॉन्ड on 8 June, 2022 - 01:1>>> तसे नाही हो, पण ते नाव कॉमन असायला खूप मुली ख्रिसमसलाच जन्माला यायला हव्यात ना? समजा रशियन आईबाप काटेकोरपणे प्लॅनिंग करून ख्रिसमसचा मुहूर्त साधत असतील म्हटले तरी त्या दिवशी हॉस्पिटल्स वर किती ताण पडत असेल, असा विचार मनात आला
प्रोनाऊनन्सिएशनला माझा एक
प्रोनाऊनन्सिएशनला माझा एक मित्र प्रोनन्सिएशन म्हटला होता तेव्हा मलाही मोठ्ठाच कल्चरल शॉक बसलेला.
पण करतो काय! दिल्लीश्वरांनी मराठा गड्यावर अन्याय केल्याचे प्राचीन, अर्वाचीन, समकालीन, सर्वकालीन पुरावे असल्याने, त्या दिल्लीकर मित्राचे म्हणणे मला मान्य करावे लागले.
pronunciation प्रोनन्सिएशन
pronunciation प्रोनन्सिएशन बरोबर आहे
मातृभाषा सोडली तर जगातील एका
मातृभाषा सोडली तर जगातील एका ही व्यक्ती ला दुसऱ्या कोणत्या ही भाषेचे १०० % ज्ञान नसते.
ज्यांची मराठी ही मातृभाषा आहे ते .
महाराष्ट्र मधील विविध प्रांतात बोलणारी भाषा समजतात..कारण त्यांना मराठी चे पूर्ण ज्ञान असते
पूर्ण para मध्ये किती ही उच्चार खावू ध्या ,चुकीचे उच्चार करू ध्या काही फरक पडत नाही >>> +१२३
मोरोबा - ख्रिसमस लाच जन्माला
मोरोबा - ख्रिसमस लाच जन्माला यायला पाहिजे असे नाही... त्या नावाचा अर्थ तसा आहे... कधीही जन्मलेले असू शकतात...
आता राम नाव ठेवायला रामनवमीलाच जन्मले पाहिजे का
पण राम ह्या नावाचा अर्थ '
पण राम ह्या नावाचा अर्थ ' रामनवमीला जन्मलेला ' असा नसतो ना? प्रॉब्लेम तिथे आहे.
एक शक्यता आहे ती म्हणजे आपण नाताळ हा एक दिवस पकडुन चाललो आहोत. पूर्ण त्या महिन्यात जो उत्सव चालतो त्यालाच ख्रिसमस/नाताळ म्हणतात बहुतेक. त्या न्यायाने २५डि च्या अलीकडे पलीकडे १५ दिवस पकडले तरी ख्रिसमस
लामध्ये जन्मलेली असू शकते. हे संख्याशास्त्र वापरल्यास दर २४ व्यक्तींमध्ये एकीला नतालीया असण्याचं सामर्थ्य आहे.ख्रिसमस ही एका दिवशी कुठे
ख्रिसमस ही एका दिवशी कुठे असतो. ऑर्थोडॉक्स लोकांचं टिळक पंचांग एक आठवडा मागे असतं. विद्रोह्यांचं साहित्य संमेलन आणखी वेगळी चूल मांडून असतं.
२४ व्यक्तींत ५०% पेक्षा जास्त चांस ना हपा?
पण नाही, तुम्ही १५ दिवस पकडत आहात. सो २४ मध्ये जवळ जवळ १००%च चांस असावा
Pages