Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केळीची भजी असतात
केळीची भजी असतात
खा बिन्धास्त फक्त शरीराने ते
खा बिन्धास्त फक्त शरीराने ते स्वीकारावे.
आज काल सर्व आजार , साथी प्रगत देशात च पहिल्या येत आहेत.
अती शहना त्याचा बैल रिकामा ही म्हण सत्य आहे
ओ.. ते गोडुस बटर चिकन भारताची
ओ.. ते गोडुस बटर चिकन भारताची राष्ट्रीय डिश, ओळख इ.इ. आहे असं आम्रविकेत मानतात.
>>>>
असेलही,
एकदा पौगंडावस्थेत असताना सिमला कुल्लू मनाली वगैरे फिरायला गेलेलो. व्हाया पंजाब चंदीगढ होतो. तिथल्या एका ऊच्चतारांकीत हॉटेलमध्ये बटर चिकन मागवले. वाटलेले तिथे ही डिश अगदी खंग्री मिळत असेल, पण अर्रारा. ईतकी गोडूस होती की खाल्लीच गेली नाही. ते पार्सल करून मग दुसरे काहीतरी मागवले.
आणि सेम असाच शॉक वाटेतल्या एका लस्सीने दिला. त्या धाब्यावरचे जेवण चांगले होते. म्हटले लस्सी सुद्धा भारीच असेल ईथली. ते राजू बन गया जंटममॅनमधील शाहरूखसारखी फिलींग आणली आणि मागवले चौघात चार ग्लास. आजही तो पोपट विसरू शकत नाही. ना ती धड लस्सी होती ना धड ताक होते, ना पुरेशी घट्ट होती ना पातळ होती, ना गोड होती ना आंबट खारट होती. या सर्वांच्या मधलाच काहीतरी प्रकार होता. मी मुद्दाम जाऊन विचारले, भाई लस्सी बोला था. तर हीच लस्सी म्हणून कन्फर्म सुद्धा केले त्यांनी. कदाचित ऊ बनवले असावे.
बर्र आम्ही चौघांनी ती कशीबशी गिळल्यावर आमच्यातलीच अजून एक मुलगी मागाहून आली. तिला आम्ही सांगितले की लस्सीच्या नावावर अमुकतमुक प्रकार दिला. पण ती मात्र, छ्या, पंजाबच्या धाब्यावर लस्सी पितोय ती बंडल असूच कशी शकते, गाढवांना गुळाची चव नाही म्हणत तिनेही हट्टाने लस्सेच मागवली. मग नाक दाबून तिलाही पुर्ण प्यायला लावली.
तेव्हापासून एक सवय लागली. कुठेही नवीन जागी नेहमीचा पदार्थ मागवतानाही आधी एकच नग मागवायचा. ट्राय करायचा. आणि मगच सर्वांसाठी ऑर्डर द्यायची.
कल्चरल शॉक नाही पण.......
कल्चरल शॉक नाही पण.......
साउथ कोरियाला लॅबसेटप साठी १५ दिवस होतो. काऊंटरपार्टला बोललो की मला दुपारच्या जेवणाला टिपीकल " साको" जागी ने. पिज्जा वगैरेत मला इंटरेस्ट नाही. मस्त लाकडी फ्लोर्वर मांडी घालुन समोर लाकडी टेबल त्यावर छोटा गॅस ( आताचे इलेक्ट्र्र्कल असतात तशी साईज नी साधारण रुम फ्रेशनरची असते तेवढी गॅस बॉटल) जोडलेला. वर पातेल्यात आक्खी कोंबडी शिजत होती काही भाज्यांसहित. टेबलावर खुप सार्या साईड डिश(१०/१२), त्यात लहान माश्यांचे ४/५ प्रकार, काही मुरवलेल्या भाज्या, किमचीचे २/३ प्रकार, इवलुश्या वाटीत तिच्या तळाला चिकटेल इतपत लाल मिरचीची पेस्ट आणी प्रत्येकाला एक गरम पाण्याचा भरलेला वाडगा वगैरे वगैरे.
रेस्टॉरंट महिला चालवत होत्या. पैकी एकीने येवुन चिमट्याने चिकन उचलुन कैचीने त्याचे तुकडे करायला सुरुवात केली. आणी दुसरीने जरा मोठ्या वाडग्यात चिकट असा(स्टोन पॉट राईस) आणुन ठेवला याचा अर्थ आता सुरुवात करायला हरकत नाही.
इथे दोन गोष्टी झाल्या, मिळमिळीत दिसणारे ते सुपसदृष्य चिकन त्या भाताबरोबर कसे खायचे? आणी तो भरलेला गरम पाण्याचा वाडगा कशाला?
१. इवलुश्या वाटीतली लाल मिरचीची पेस्ट त्यात ते चिकनचे उकळते पाणी टाकुन मिक्स करुन भातात टाकले, चाखले, म्हटल हे मला अजुन पाहिजे. मग आतुन पुन्हा तितक्याच इवलुश्या वाटीत चिमुटभर पेस्ट आली परत. मग परत ती भातात टाकली पण छे....म्हटलं मला "अ जु न " हवी.
आतुन ३-४ महिला बाहेर...कोण नमुना आलाय... मग माझ्या बरोबरच्या लोकांशी बोलुन खुदु खुदु हसत "इंदु इंदु" नी कपाळावर बोट (टिकली लावतात ना तुमच्यात अश्या अर्थी) म्हटल हो. मग जरा मोठ्या वाटीत भरुन पेस्ट दिली.......हा त्यांना शॉक असावा. ( टिपीकल खान्देशी तिखट खाणारा मी इत्तेसे वाटीसे मय कैसे खायेगा)
२. आधीच त्या चिकनच्या पातेलीत तेल दिसत नव्हते, त्यातुन ते "बाबे" चॉप्स्टिकने चिकनचा तुकडा उचलायचे गरम पाण्यात बुडवुन त्याचं तेल धुवायचे (:ऑ) आणी मग खायचे नी हे प्रत्येक तुकड्याला साग्रसंगीत गरम पाण्यात न्हावु घालुनच खायचे. म्हटलं बाबारे पुर्ण पातेलीत जे तेल असेल नसेल तितक तर भाज्या बनवताना गॅस वर सांडतात आमच्याकडे. (इथे परत खान्देशी तर्री वाल्या भाज्या....त्यांनी पाहिल्या तर फेफरं येईल. पण कदाचित इतकं कमी तेल नी नुसतं सुप सारख जेवण जेवुन त्यांची स्कीन चरबी विरहीत पेपर सारखी पातळ नी चेहरे वगरे तेलकट नसतात. इथं ज्याय्ला घराबाहेर दहा मिनिटात एका पराठ्याला लावण्याइतपत तेल चेहर्यावर चमकायला लागतं)
तीन चार दिवसाच्या बाळाला घेऊन
तीन चार दिवसाच्या बाळाला घेऊन फिरणारे प्रत्यक्ष पाहिले आहेत आणि त्यांच्याशी तेव्हा ओळखही होती.
परदेशात बऱ्याच ठिकाणी बाळ झाल / होणारे म्हणून जे ना म्हणजे आई सासू असं कोणी मदतीला येत नाहीत. सगळं आपलं आपल्यालाच करावं लागतं , अगदी रोजची घराची सफाई , स्वयंपाक हे पण. अशा वेळी घरी अनेक कारणांनी बाहेर जावं लागतं.
(शिवाय काही जण बाळ जन्माला आल्याशिवाय त्याला लागणाऱ्या वस्तुही आणत नाहीत)
बाळासाठी लागणारे सामान, कपडे, डायपर , आईसाठी लागणारे नवीन साईज चे कपडे, इतर फुटकळ वस्तू , खायचे प्यायचे समान हे सर्व शॉपिंग कोण करणार? मग बाळाला घेऊन बाहेर जावे लागते. घरी एकटं किती आणि काय करणार त्यामुळे जेवायलाही बाहेर जावं लागतं. त्यात काही चुकीचे पण नाही. आपल्याकडे आपण उगाच फार बाऊ करतो याचा. बाळ आणि आईला बाहेर नेऊ नाका, कान झाका वगैरे प्रकरण पण फनी वाटतं मला.
मेघालय, आसाम अशा ठिकाणी
मेघालय, आसाम अशा ठिकाणी मातृसत्ताक पद्धती आहे. तिथे नवरा मुलगा मुलीच्या घरी राहायला येतो. पण बहुतेक ठिकाणी मोठ्या मुली घर वेगळं करतात, सगळ्यात लहान मुलगी आणि तिचा नवरा मुलीच्या आई बाबासोबत राहातात आणि त्यांना सांभाळायची जबाबदारी घेतात.
आई बाप म्हातारे होताना , सर्वात लहान मुलगी तरुण असते आणि जास्तीत जास्त वर्ष आई बाबाला सांभाळू शकते असा विचार यामागे आहे.
दुर्दैवाने जुन्या पिढ्यामध्ये पुरुष फारसे काम करायचे नाहीत पण बायका शेती वाडी , सो कॉल्ड पुरुषी काम आणि घर हे सांभाळायचे.
पुष्कळ मुलं व्हायची त्यामुळे मोठी मुलंगी लहान भावंडाना सांभाळायची. आई घराबाहेरची काम करायची आता हे जरा बदलत आहे.
हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं आहे आणि अशा लोकांना भेटले आहे.
आडनावाच मला माहित नाही कारण असला काही प्रश्न मला पडला नाही.
आई बाप म्हातारे होताना ,
आई बाप म्हातारे होताना , सर्वात लहान मुलगी तरुण असते आणि जास्तीत जास्त वर्ष आई बाबाला सांभाळू शकते असा विचार यामागे आहे.
>>>
ईंटरेस्टींग आहे. माहितीबद्दल धन्यवाद.
आपल्याकडे वंशाचा दिवा याचसाठी हवा असतो की तो म्हातारपणात सांभाळेल.
आंबा अंडं पपई सॅलड
आंबा अंडं पपई सॅलड
मँगो सॅलड वगैरेला आपला
मँगो सॅलड वगैरेला आपला पिकलेला हापुस आंबा इमॅजीन न करता कच्चा तोतापुरी आंबा इमॅजीन करा.
लग्नाच वाचून मात्र शॉक बसला. अलिकडची लग्न अशी होत नसावीत. कारण पुण्यातल्या कझिनच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आली आहे. तीन चार दिवस लग्न आहे. लग्न रिझॉर्ट मध्ये आहे. रीसेप्शन ताज विवांता मध्ये. सगळी इतकी फॅन्सी नसतील. पण अगदीच वरती लिहिली आहेत तशी ९०ज सारखी गाद्या वगैरे घालून होत नसावीत. नक्कीच मॉडर्न झाली असावीत.
आणखी एक निरिक्षण ब्राम्हण लोकांच्यात किंवा कोकणात लग्न निम्मा निम्मा खर्च करुन , वधु पक्षाकडून फारशा मागण्या न करता होताना पाहिले आहे. मैत्रिणींची लग्न अशी होताना पाहिली आहेत. पण नॉन ब्राम्हणेतर लग्नांमध्ये हमखास आहेर पाहेर , मानपान वगैरे भरपुर २००० साली पण भरपुर होत होते. आणि आताही काही बदलले असण्याची शक्यता वाटत नाही. (इथे जातीवाचक शब्द फक्त एक समाज म्हणुन चालीरीती साठी वापरला आहे. ब्राम्हण जात अशा अर्थाने नाही. )
बाळंतपणात तीन महिने
बाळंतपणात तीन महिने confinement हे फक्त म व आणि उ व ह्यातच होते किंवा आहे. पाथरवटांच्या बायका लगेचच टाकी लावण्याच्या, दगड फोडण्याच्या कामाला लागतात. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, तोडणीकामगारांच्या बायका लागलीच अवजड कामांना लागतात. लीला गांधींच्या बाबतीतली एक घटना प्रसिद्ध आहे. एका गरोदरपणात शेवटपर्यंत पायांत चाळ बांधून त्या स्टेज वर नाचत होत्या. कळा वाढू लागल्या तशा त्या थोडा वेळ पडद्याआड गेल्या, बाळंतपण उरकले आणि पुन्हा स्टेजवर येऊन लावणी सुरू केली! आपल्याकडे चोचलेच फार. शिवाय सोवळे ओवले, अंधश्रद्धा
लहान मूल सांभाळण्यासाठी कोणीच
लहान मूल सांभाळण्यासाठी कोणीच नाही म्हणून अत्यंत ना इलाज म्हणून ते दोन ते तीन दिवसांचे मुल घेवून त्या बाहेर पडतात
असे वाटते.
तीव्र व्यक्ती स्वतंत्र मुळे आलेला इगो
आणि त्या मुळे आलेलं एकांतपण हे कारण आहे.
पण मुलाचे बाप अशा वेळी कुठे असतात.
हा प्रश्न आहेच
मी आमच्या मुलाला रात्री रडला ,झोपला नाही की त्याला घेवून त्याला झोपवत असे
आई कंटाळून झोपलेली असे.
आता विषय निघालाच आहे तर
आता विषय निघालाच आहे तर माझाही एक अनुभव-
मी दुसऱ्या प्रेग्नंसीच्या वेळेस मेक्सिकोत होते.. नवव्या महिन्यात एका उंचाच्या ठिकाणी असलेल्या कॅसलला चढत गेलेले.. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी होऊन चोवीस तासाच्या आतच हॅास्पिटलमधून बाळाला घेऊन घरी आले.. मग तीन आठवड्यांनी तीथे जवळपास असलेले पिरॅमिड्स बघायला गेले.. आई बाबा खास बाळंतपणासाठी मेक्सिकोला आले होते म्हणून मला त्यांना मेक्सिको फिरवायची फार इच्छा होती.. पिरॅमिड्स बघायला गेल्यावर एक पिरॅमिड बाबांबरोबर जाऊन चढून आले.. जेव्हा हे माझ्या आज्जीला कळालं तेव्हा तीच्याकडून फार शीव्या खाल्लेल्या.. तीन महिने तरी कानाला रूमाल बांधायचा असतो, म्हातारपणी हाडं दुखल्यावर कळेल वगैरे सारखे डोस मिळालेले.. मी तीन आठवड्यांच्या बाळाला घेऊन मेक्सिको फिरत होते हे तीला झेपलं नव्हतं .. तीलाही कल्चरल शॅाक्स बसले असतील
फक्त अगदी रस करण्याइतका
फक्त अगदी रस करण्याइतका पिकलेला आंबा नाही वापरत त्यात, जरा क्रन्च असेल इतपत. >>>
आपला पिकलेला हापुस आंबा इमॅजीन न करता कच्चा तोतापुरी आंबा इमॅजीन करा >>>
एक्झॅक्टली! इन फॅक्ट कैरीच. इथे माशांबरोबरही "मँगो चटनी" नावाने मिळते त्यातही ते कैरीचे तुकडेच असतात. दक्षिण अमेरिकन प्रभाव जेथे आहे तेथे सर्वत्र मिळते.
मँगो पपई सॅलड चिकन इ. बरोबर
मँगो पपई सॅलड चिकन इ. बरोबर फार भारी लागतं. कुठल्याही क्रंच वाल्या सॅलड मध्ये बार्बेक्यू केलेले चिकनचे तुकडे भारी लागतात.
कॅलिफोर्निआ पिझ्झा किचनचं थाय क्रंच सलाड विथ शेंगदाण्याचं कूट, स्पाऊट्स, किसलेली पपई, फिश सॉस, एडमॉमी, अवकाडो आणि चिकन... आत्ताच पाणी सुटलं तोंडाला.
पायनॅपल पिझ्झा म्हटलं की
पायनॅपल पिझ्झा म्हटलं की भारतात लोकांना झेपत नाही.. पण मला इथला डॅामिनोजचा पायनॅपल हॅलापिन्योज फार आवडतो
पिझ्झा मध्ये पायनॅपल टॉपिंग
पिझ्झा मध्ये पायनॅपल टॉपिंग शिवाय हल्ली फार क्वचित खातो.
आर्टिसन पित्झा वगैरे असेल तर थिन क्रस्ट विथ पेस्तो सॉस आणि अरुगुलाची पानं आणि मीट काय हवं असेल ते असा फार आवडतो.
हीरा, बाबांच्या आईकडून पाथरवट
...
हीरा, बाबांच्या आईकडून पाथरवट
हीरा, बाबांच्या आईकडून पाथरवट बायकांचं ऐकल आहे. आजी स्वतच्या शेतात काम करायची मव वर्गातील असून सुद्धा. त्यामुळे त्याचा उलट परिणाम असा की प्रकृतीन नाजूक असलेल्या काकूला प्रेग्नसीनंतर "किती बै नाजूक " वगैरे ऐकून घ्यावे लागले आहे. सगळया बायंकाची प्रकृती एकसारखी नसते. त्यामुळं चोचले वगैरे जनरालझेशन उल्लेख टाळावे असे वाटते..
इथे माशांबरोबरही "मँगो चटनी"
इथे माशांबरोबरही "मँगो चटनी" नावाने मिळते त्यातही ते कैरीचे तुकडेच असतात. दक्षिण अमेरिकन प्रभाव जेथे आहे तेथे सर्वत्र मिळते. >> अरे हो! बरोबर! फिश टाको मध्येही आंबट गोड असं काय काय असतं. आणि क्रंची गाजर, कोबी... का कोणास ठाऊक आणखी काय असतं. तिखट अजिबात काही नसतं, आणि ते फार मस्त लागतं.
चोचले वगैरे जनरालझेशन उल्लेख
चोचले वगैरे जनरालझेशन उल्लेख टाळावे >>+१
कनिष्ठ मध्यमवर्गातल्याही काही सगळ्या बायका बाळंत होऊन दुसऱ्या दिवशी कामाला वगैरे जात नाहीत. गावाकडेही मी पाहिलं आहे. अर्थातच आपल्यासारख्या पांढरपेशा मध्यमवर्गीय बायकांपेक्षा त्या जास्त घट्ट असतात तब्येतीने (इन जनरल), गरोदरपणात कामंही जास्त करतात. पण शेकशेगडी वगैरे असते की त्यांनाही बाळंतपणात.
दुसरं म्हणजे नव्या आईला या सगळ्या बंधनांचा जाचही वाटू शकतो. मला तरी वाटला होता. हे खायचं नाही, ते खायचं नाही, खोलीबाहेर उगाच गप्पा मारत बसायचं नाही वगैरे. कधी एकदा 'बाळंतपण' ही अवस्था संपते असं झालं होतं. विशेषतः सासरी-माहेरी कुणीही ऐकून घेत नाही. स्वतंत्र घरात राहत असलो (आणि जरी आई/सासू मदतीला आल्या असल्या तरी) जरा जास्त कंट्रोल राहतो आपला.
लीला गांधींच्या बाबतीतली एक
लीला गांधींच्या बाबतीतली एक घटना प्रसिद्ध आहे. एका गरोदरपणात शेवटपर्यंत ...... बरं झाले तुम्ही लिहिलेत ते..मी विठाबाई नांदगावकर धरून बसले होते.
आपल्याकडे चोचलेच फार. शिवाय
आपल्याकडे चोचलेच फार. शिवाय सोवळे ओवले, अंधश्रद्धा>>
ज्यांची स्वतः:ची बाळंतपण झाली नाहीत त्यांना कळणे अवघड असू शकते.
माझ्या पहिल्या आणि दुसऱ्या बाळंतपणात इतका फरक होता की कधीकधी ज्यांची झाली आहेत त्यांनाही कळणे अवघड असू शकेल असे वाटतेय.
आमचे डॉकटर म्हणायचे "it's assault on the body".
जर बाळाला काही कमी पडलं तर चक्क ओढून घेत ते आ इ कडून
प्रतेक प्राण्याचे लाइफ सायकल
प्रतेक प्राण्याचे लाइफ सायकल असते.
कुत्र्याची पिल्ल काही दिवस डोळे पण उघडत नाहीत.
माणसाचे बाळ तर खूप नाजूक असते.
सर्व प्राण्यात सर्वात उशिरा चालणारे माणसाचे बाळ आहे..
जन्म झाल्यावर अतिशय नाजूक असते.
त्याची काही महिने काळजी घेणे ही अंध श्रद्धा नक्कीच नाही.
ती गरज आहे.
कौटुंबिक स्थिती बदलली असल्या मुळे ये शक्य होत नसेल .
पण लहान बाळाची काळजी न घेणे हा क्रूर पना आहे ..
त्याचे समर्थन नको.
मुलाला जन्म दिल्या नंतर स्त्री पण नाजूक अवस्थे मधून जाते..
ते समजून घ्या..उगाच कशाचे पण समर्थन करू नका.
हिरा ह्यांनी त्यांच्या कॉमेंट मध्ये मारलेला शेरा खूप चुकीचा आहे..
"आपल्या कडे चोचले च फार "
हा.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Vithabai_Bhau_Mang_Narayangaonkar यांचे पण लीला गांधींच्यासारखेच बाळंतपण झाले होते.
लीला गांधींचे इथे वाचून कळले.
.मी विठाबाई नांदगावकर धरून
.मी विठाबाई नांदगावकर धरून बसले होते
नांदगावकर नाही हो नारायणगांवकर . नाळ ठेचून पुन्हा स्टेजवर येऊन लावणी पूर्ण केली. त्यांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती खालावली होती तेव्हा माधव गडकरींनी त्यांना मदत मिळवून दिली होती .
Oh sorry! धन्यवाद आग्या 1990.
Oh sorry! धन्यवाद आग्या 1990.
लीला गांधींच्या बाबतीतली एक
लीला गांधींच्या बाबतीतली एक घटना प्रसिद्ध आहे. एका गरोदरपणात शेवटपर्यंत पायांत चाळ बांधून त्या स्टेज वर नाचत होत्या. कळा वाढू लागल्या तशा त्या थोडा वेळ पडद्याआड गेल्या, बाळंतपण उरकले आणि पुन्हा स्टेजवर येऊन लावणी सुरू केली!
>>> आवरा
पुरषांना ऑफिसातून घरी आल्यावर
पुरषांना ऑफिसातून घरी आल्यावर चहादेखील हातात हवा. थकतो ना तो बिचारा!! आणि बायकांनी बाळाला जन्म दिल्या दिल्या, लीटरभर रक्त गेल्यावर लगेच दुसर्या दिवशी फटाफट कामाला लागावे ही अपेक्षा. छान आहे!!
माझ्या पहिल्या नातवाला सणसणून
माझ्या पहिल्या नातवाला सणसणून ताप आला होता आणि त्याच्या आदल्या दिवशी माझी मुलगी प्रसूत झाली. ही तिची दुसरी खेप होती. नवरा गावात नव्हता. माझी पत्नी तिच्यासोबत होती. मुलीने गाडी काढली आणि पहिल्या नातवाला बरोबर घेऊन, आई व नव्या बाळासोबत दवाखान्यात गेली. हे पाहून माझ्या पत्नीला धक्काच बसला. ही भारतातील गोष्ट नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
श्री लंकन जेवणात अननस घालून
श्री लंकन जेवणात अननस घालून चिकन ची करी बनवणे फारच कॉमन आहे. चवीलाही छान लागते.
अर्धवट पिकलेला कापा फणस घालूनही चिकन करी बनवतात ते लोक.
Pages