तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शहरी घरात माणसे मोजकीच , मग कधी ओले खोबरे हवे तर काय करणार ? घरात झाड नाही , आणि कुठे शेतही नाही.

बाजारात 3 , 5 रु ला मिळते ते आणतात.

गावठी लोकाना हे सांगितले की कल्चरल शॉक बसतो, ते म्हणे शेतात झाडावरचे नारळ उतरवून कोयत्याने फोडून खातात.

Proud

ममो यांच्या पोस्टमुळे हिरा यांनी जे टाळले ते समजले. आधी लक्षात नव्हते आले. क्षमा असावी.
साधना ताईंच्या पोस्टमधे दिलेली कारणे चमत्कारिक वाटतात. ममो यांची पूर्ण पोस्ट अस्वस्थ करणारी आहे. नवरा गेल्याने त्या स्त्री ला जवळजवळ शिक्षा दिल्यासारख्या या प्रथा आहे. चोळी न घालण्यामागे हेच कारण असावे. साधनाताई तत्कालीन समाजाबद्दल खूप सकारात्मक विचार करतात.

ओरिसात गरीबीमुळे चोळी घालत नाहीत पण दागिने घालतात हे विरोधाभासी वाटते. प्रथा, परंपरांचा पगडा असतो पोशाखावर.

मुंबैत दारोदार मासे विकणारा पाहिला तेव्हा धक्काच बसला. >>> औरंगाबाद मध्ये दारावर पाणीपुरीवाला बघून आनंदश्चर्याचा धक्का बसला होता. चव बघून दुःखाचा धक्का बसला Happy

मी आधी लिहिलंही असेल इथे, पण बंगलोरला भेळेत गाजराचा कीस घातलेला बघून मोठा धक्का बसला होता. (आणि त्यानंतर इथे बाहेर भेळ खाणं टाळलं!)
केळी डझनावर नाही, तर वजनावर विकतात.
अनेक घरांसमोर रोज, अगदी रोज न चुकता रांगोळी काढतात.

आमच्या गावाकडे किराणा दुकानात कांदेबटाटे मिळायचे. बहिणीने पुण्यात किराणा दुकानात कांदे मागितल्यावर दुकानदाराला सांस्कृतिक धक्का बसला होता.

काही घरांमध्ये पोळपाट न वापरता थेट ओट्यावर पोळ्या लाटतात. मी पहिल्यांदा हे बघितलं तेव्हा मला धक्का बसला होता.

काही घरांमध्ये पोळपाट न वापरता थेट ओट्यावर पोळ्या लाटतात. >>>> हे भारी आहे, जेवतानाही ताट न घेता फरशीवरच डाळभात कोलसवून सुरू झाल्यासारखे वाटले. पण बहुधा हॉटेलच्या भटारखान्यात असेच ओट्यावरच लाटालाटी करणे कॉमन असेल ना.. घरात असे ई मॅजिन करायची सवय नाही आपल्याला..

चव बघून दुःखाचा धक्का बसला >>> हाहाहा.

बहिणीने पुण्यात किराणा दुकानात कांदे मागितल्यावर दुकानदाराला सांस्कृतिक धक्का बसला होता. >>> पुण्यात किराणा दुकानात मिळत नाहीत हे वाचून धक्का बसला मला, इथे असतात.

मुंबैत दारोदार मासे विकणारा पाहिला तेव्हा धक्काच बसला.
>>>>>>>
हो, आमच्याकडे दारावरच मासे घ्यायचो, नेहमीचे विक्रेते असायचे. माल चांगलाच असायचा. किंचित महाग पण दारात मिळायचे.
तेव्हा फ्रिजमध्ये साठवून खायचेही फॅड नव्हते. त्यामुळे दोन वेळापुरते पुरेल ईतकेच दारावर घेतले जायचे.
तरी जास्त आणायचे झाल्यास धक्का किंवा मुंबई सेंट्रल गाठायचो.

पाववाला, अंडीवाला, दूधवाला, फरसाणवाला, मासे, भाजी, भेल पाणीपुरी, कुल्फी, ते लसूनवाला सारे दारात मिळायचे. ते सुद्धा बिल्डींगचे २५-२५ पायर्‍यांचे चार माळे चढून यायचे सारे.

काहीही काय आमचा पुण्यातला किराणा वाला तर कांदे बटाटे काय
भेंडी गवार कोथिंबीर मिरच्या पण विकतो
आलं, लसूण पासून ते दूधापर्यंत सगळं काही मिळतं
टूथब्रश सुद्धा आणि एलईडी बल्ब सुद्धा विकतो
बॉलपेंन वह्या पण

हे आता कोणी किराणा वाला विकत नसेल तर मला सांस्कृतिक धक्का बसेल Happy

मुळात पूर्वीच्या प्रथा या बाईची कमीतकमी आर्थिक जबाबदारी घेणे, यावरच आधारित होत्या, असं दिसतं. एकदा का नवरा गेला की सासरचे ना माहेरचे त्या बाईची आर्थिक जबाबदारी घ्यायला तयार असायचे, असं वाटतं. मग एका बाईला जगण्यासाठी जे किमान आवश्यकता आहे तेवढ्याच पुरवायच्या, बाकी 'निषिद्ध'! म्हणजे अशी अमानुष वागणूक देणाऱ्या घरातील लोकांना अजिबात गिल्ट यायला नको. उलट आम्ही तर 'धर्माप्रमाणे' वागतो, असं मानता यायचं.
आज घरात आपण काही विशेष पदार्थ बनवला आणि जेवताना जर कामवाली आली तर तिला पण तर देतोच ना. मग आपल्याच मुलीला/बहिणीला चांगलं चुंगलं खायला देताना कसा काय हे लोक हात आखडता घेत, समजत नाही.
सब पैसेका खेल है. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपैय्या.

काही घरांमध्ये पोळपाट न वापरता थेट ओट्यावर पोळ्या लाटतात. मी पहिल्यांदा हे बघितलं तेव्हा मला धक्का बसला होता.>> मलाही धक्का बसला होता, माझ्या बघण्यात मोस्टली नॉर्थ इडीयन फॅमीली होत्या, मग हळुहळू इथले बेकिन्ग शो बघताना धक्का सवयिचा झाला जेव्हा शेफ लोक डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर ब्रेड मळायला घेतात.

विधवा बायकांबद्दल साधना, मनिमोहोर यांच्या पोस्ट्स वाचून आठवलं-
आमच्या एका परिचित बाईंनी त्यांचे मिस्टर वारल्यावर साधारण एक वर्षाने त्यांच्या ओळखीच्या एका समवयस्क गृहस्थांशी लग्न केलं. तेव्हा सर्वांना जरा कल्चरल शॉक बसला. कारण त्या बाईंचा मुलगा तेव्हा लग्नाच्या वयाचा होता. म्हणजे वर्षाच्या आत अशा वेळी मुलाचं/मुलीचं लग्न करून द्यायची रीत आमच्यात आहे. पण त्या काकुनी स्वतःच लग्न केलं!
पण वरील जुन्या काळातील विधवांबद्दल वाचून वाटलं की अवघ्या काहि पिढ्यांत आमच्या समाजाने झपाट्याने बदल घडवले जे चांगलं आहे.
पुढे त्या काकूंनी रीतसर वधूवरसुचक मंडळातून चांगली मुलगी शोधून मुलाचंही लग्न करून दिलं. आता मुलगा-सून स्वतंत्र राहतात पण आई-सावत्र वडील यांच्याशी संबंध चांगले आहेत. सणासुदीला एकत्र असतात. (हाही लोकांना उगाच कल्चरल शॉक वाटतो- त्या मुलाचं सावत्र बापाशी भांडणच असलं पाहिजे असं गृहीत धरतात. पण तसं काही नाही.)

मी लहानपणी किराणामालाच्या दुकानात अंडी आहेत का विचारलं होतं, तिथली जैन मारवाडी लोक फार ऑफेंड झाली Happy
Btw किराणा मालाच्या दुकानात कान्दे सर्रास मिळतात कि पुण्यात !

मुळात नवरा जाणं हे बायकोचं पाप अशी समजूत होती. त्यामुळे त्या पापी बाईला तिरस्कार आणि अवहेलना झेलावी लागे. रं×, रं×की, रां× अशाच नावाने तिला संबोधलं जाई. कारण तिच्यावर सर्वांचा हक्क. तिचं दर्शनही टाळलं जाई. पूजा वगैरे सुरू असताना तिचा आवाजही कानी पडता नये होता. कित्येक विधवा ह्या अवहेलनेने त्रासातून सुटका म्हणून तरी आड जवळ करीत किंवा त्यांच्या असहाय्यतेचा पुरेपूर फायदा उठवून झाल्यानंतरचे परिणाम उघड होऊ नयेत म्हणून आडात ढकलल्या जात. कित्येक विधवांना खा खा सुटे. त्या चोरून खात. मग जाड्या होत. अशावेळी ' तिला रां× मांस आलंय ' असं हिणवलं जाई.
वरती मी माझ्या आत्तेआज्जीविषयी लिहिलं आहे. आमच्याकडे परंपरागतरीत्या सांगितलं जाई की ती अतिशय देखणी होती. तिचा मोठा दीर गांधीजींचा अनुयायी आणि उदार मताचा होता. नवरा टी बी ने गेल्यावर सासरचे लोक तिला विद्रूप करायला निघाले तेव्हा म्हणतात की हा तिच्याशी लग्न करून तिला आजन्म पोसण्यास तयार झाला. तेव्हा तर तिच्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे उडाली नसेल एव्हढी खळबळ घरात आणि गावात माजली. प्रचंड विरोध झाला आणि बळजबरीने व गुपचूप तिचे केशवपन करण्यात आले. पणजोबांना हे कळताच ते तातडीने तिला माघारी घेऊन आले कारण तिथे ती सतत दिराच्या नजरेच्या टप्प्यात राहिली असती. जो माणूस लग्न करू इच्छितोय, तो ह्या देखण्या मुलीचे काहीही करू शकेल आणि बाहेर तोंड दाखवायला जागा रहाणार नाही! आणि विधवेशी लग्न ही अत्यंत बदनामीकारक घटना. दोन्ही बाजूनी पाहाता ती माहेरी सुरक्षित राहील आणि दोन्ही घराण्यांची अपकीर्ती टळेल असे सगळ्यांना वाटले. म्हणजे तिच्या सुखासाठी नव्हे तर घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी तिला माहेरी आणले. पुढे एका प्रसंगी कासाराला घरी बोलावले होते तर ही म्हणे मला हिरवा चुडा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. ऐकेच ना. अर्थात तिला उपाशी कोंडून ठेवले गेले. माहेरीसुद्धा वहिन्या, काक्या,आज्ज्या, सासवा ह्यांचा गोतावळा. बिचाऱ्या एकट्या आईचे काय चालणार!
त्या दिराने मात्र पुढे लग्न केलेच नाही. असो.

>> काहीही काय आमचा पुण्यातला किराणा वाला तर कांदे बटाटे काय
भेंडी गवार कोथिंबीर मिरच्या पण विकतो
आलं, लसूण पासून ते दूधापर्यंत सगळं काही मिळतं
टूथब्रश सुद्धा आणि एलईडी बल्ब सुद्धा विकतो
बॉलपेंन वह्या पण>> आशुचँप, तुमचा किराणावाला नाड्या, पंचे, परकर ठेवतो का? Wink

हिरा, फार माहितीपुर्ण पोस्ट आहेत.

आस्वाद,
म्हणजे अशी अमानुष वागणूक देणाऱ्या घरातील लोकांना अजिबात गिल्ट यायला नको. >>>> हे भारी लॉजिक आहे !

मी लहानपणी किराणामालाच्या दुकानात अंडी आहेत का विचारलं होतं, तिथली जैन मारवाडी लोक फार ऑफेंड झाली Happy >>>> जगात अंडी मास मटण न खाणारे लोक आहेत हे जेव्हा मला लहानपणी समजायचे तेव्हा मलाही बरेच सांस्कृतिक धक्के बसायचे. म्हणजे आठवतेय त्यानुसार शाळेत एकदा (बहुधा चौथीत) एका शाकाहारी मित्राच्या डब्यात माझा मांसाहारी डब्यातला ऊष्ट्याचा हात टाकलेला तेव्हा त्याने आपला डबा खाल्लाच नव्हता. मला हे त्याचे वागणे शून्य झेपले होते आणि लोकं मला तुझ्यामुळे तो ऊपाशी राहिला म्हणून गिल्ट द्यायच्या प्रयत्नात होते Happy

अमेरिकेत असताना शाळेच्या डब्यात पीबीजे (पीनटबटर- जेली) सँडविच नेलेले चालते समजल्यावर पोराला कल्चरल शॉक बसला होता.
तोवर इकडे शाळेत कुणाला पीनट अ‍ॅलर्जी असू शकते म्हणून पीनट कायम वर्जच होतं, आणि त्याला पीबीजे जीव की प्राण आवडायचं तेव्हा.
मग माबोवर कुणी ज्ञानदान केलेलं की अमेरिकेत फर्स्ट अमेंडमेंट (इतरांच्या Wink ) जिवापेक्षा जास्त प्रेमाने जपतात. Wink Proud

नाही हो, अमितव. माझ्या मुलीने आजपर्यंत नाही नेलंय शाळेत PBJ सँडविच. कुठलाही नट्स असलेला पदार्थ अजिबात देता येत नाही शाळेत. पीनट बटरचे बरेच अल्टरनेटिव्हस मिळतात. मी sunflower सीड्स बटर मिळतं, ते देते कधी कधी. ते पण स्कूल नर्सनी approve केल्यावर. मुलं पिकी इटर्स असलेत तर त्यालाच पीनट बटर नावाने देत असतील मुलांना. तिच्या प्री स्कूल मध्ये तर अंडं पण नाही चालायचं. कोणालातरी ऍलर्जी होती.

आमच्याकडे वर्ग ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे. म्हणजे पहिलीचे चार वर्ग असतील तर एक वर्ग पुर्ण नट फ्री असु शकतो. त्या वर्गात जर अ‍ॅलर्जी नसलेली मुल असतील त्यांना नट्स चे काहीही नेता येत नाही. जर नट अलाऊड असतील अशा वर्गात असाल तर पीनट बटर सँडविच न्यायला काहीच इशु नाही. काही वेळा कॅफेटेरिया मध्ये टेबल सेपरेट ठेवतात.
सरसकट सगळ्यांना नेता येत नाही/ नेता येते अस नाही. शाळा/वर्ग या नुसार नियम बदलतात.
माझा मुलगा मागच्या वर्षी नट्स फ्री क्लासरुम मध्ये होता. वर्षभर न्युटेला नेता येल नाही त्याला डब्यात. सगळे स्नॅकस वगैरेही नट्स फ्री द्यावे लागत होते. या वर्षीच्या क्लास मध्ये नट्स चालतात.

मुलं पिकी इटर्स असलेत तर त्यालाच पीनट बटर नावाने देत असतील मुलांना. >> Lol नाही.
आम्ही पी-बटर द्यायचो. पण शाळेचा काही नियम न्हवता. कॅफेटेरिआत एक बेंच असायचा पीनट-अलर्जीवाल्यांचा. किती एपिपेन लागली कोणास ठाऊक :फेसपामः . हे सोन्याच्या राज्यातलं. तुमच्याइकडे नसेल तर चांगलंच आहे.

काळी द्राक्षे असावीत म्हणून एक बॉक्स आणला

तर कसलीतरी तुरट भिकारडी फळे आहेत

शुगर पृन , बहुतेक आलूबुखार असेल असे वाटले
तर तेच निघाले गुगलवर

फक्त काहींमध्ये आतले बदाम बीज चांगले आहे

भिकारडी फळे आहेत

आता चेरी येतील

चेरी , पिच , आलूबुखार हे असले आता येतात जून मध्ये

कल्चरल शॉक

ब्लॅककॅट , पीच, प्लम्स इंडियातले आहेत कि इम्पोर्ट केलेले ?.
इथे पीच, प्लम्स समर मध्ये सगळ्यात चविष्ट असतात. चेरी एप्रिल ते जुलै.

Pages