तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकत्र स्विमिंग Lol
लहान असताना खेडेगावी नवरा बायको किंवा मुलं मुली एकत्र येऊन बोलले तरी बायकांची खुसपुस चालायची. तसला बारीक कुजबुजता आवाज काढून "बया ... बया " करत डिटेलिंग व्हायचं. एकदा एक मोठा दादा आणि एक मोठी ताई कॅनॉलच्या पाण्यात एकत्र स्विमिंग करत होते. दादा आम्हाला स्विमिंग शिकवायचं सोडून तिच्याकडेच जास्त लक्ष देत होता. धुणं धुवायला आलेल्या बाया धुणं बंद करून शिकवणीकडे बारकाईने बघत होत्या.
प्रकरणाचा शेवट म्हणजे दोघांच्या घरच्यांना एकत्र बसवून लग्न करायला लावले.
असले वागणे हे कल्चरल शॉक असायचे.

हे जरा लांबचे उदाहरण झाले. पण १०/१५ वर्षांपूर्वी पुण्याच्या आजूबाजूलाही मुलं मुली संध्याकाळी बाईक लावून एकत्र बसायचे, त्यांना ठोकून काढण्यासाठी आजूबाजूच्या गावात पथकं तयार केली होती. खडकवासला, चांदणी चौक अशा ठिकाणी बेदम मारहाण व्हायची. मुंबईत पण मध्यंतरी अशा मोहीमा निघाल्या होत्या.

मस्त किस्से आहेत एक-एक... Lol

डेन्मार्कमध्ये फिरताना एकदा ट्रेनने निघालो होतो, शेजारी साठीच्या घरातलं एक स्थानिक जोडपं होतं. दोघं हसून, हाय-हॅलो करून बोलायला लागले. आम्ही पार इंडियातून डेन्मार्कमध्ये फिरायला आलोय, हे कळल्यावर त्या काकांना प्रॉपर धक्का बसला होता. Biggrin

हो, आमच्याकडे स्पिकरवरच असतात सगळे. आम्हाला जे टिम्स सोफ्ट्वेअर दिलेय त्यात हेड फोन लावुन बोलले तर समोरच्याला ऐकु येत नाही असे काहीतरी होते. खुप वेळा असे झालेय की समोरच्याचे काहीही ऐकु येत नाही, सगळे कोकलतात मग तो सॉरी सॉरी, हेड्फोन लावले होते म्हणतो आणि मग सगळे ठिक होते. मला तर आता फोनही कानाला
लावला तर अस्वस्थ वाटते, तोही स्पिकरवर घेते Happy

नवरा बायकोत एकमेकांच्या सहमती ने स्विंगींग करतात. >> मला हे वाचल्या वाचल्या आधी 'साधं झोपाळ्यावर बसायला कसली परमिशन घेतात?' असं झालं मग ट्युब पेटली.

परदेशात नवरा बायकोत एकमेकांच्या सहमती ने स्विंगींग करतात. >> परदेशात म्हणजे कुठे हे ?

कल्चरल नाही पण, अमेरिकेतील चिकन लेग्ज्चा साईझ पाहून शॉकच बसला होता. कुठे आपले देशी कोंबड्यांचे (निदान मुंबईत तरी) इवलेसे पाय आणि कुठे या अजस्त्र तंगड्या. खरच शॉकच झालेलो.
------------------
नुकतीच आलेले तेव्हा कॅलिफोर्नियाला होते. कसल्या मोठ्या मोठ्या गाड्या ग बाई. आणि गाड्या वाहून नेणारे. अन्य मालवाहतूकीचे ट्रक्स काय मोठ्ठाले वाटत.

मी तरी अमेरिकेत स्पाऊस स्विंगिंग/स्वॉपिंग ऐकलेले नाही. अर्थात इथे आमच्या ओळखीत कोणीच नाही. फक्त ऑफिसचा क्राऊड हेच मैत्र पण तरीही कुठेना कुठे ऐकू आले असते.
हे म्हणजे भारतात रस्त्यांवर अजगर, वाघ, हत्ती फिरतात्/भटकतात - या तुलनेचे अतिरंजित झाले असे वाटते मला.

कामसूत्र आणि घटकंचुकी चा इतिहास असलेल्या भारतात करत नसतील असं का वाटलं?
आता हा पण धागा पेटवायचा का?

च्रप्स Happy उत्सुकता एवढीच की कुठे असेल बॉ अशी सर्रास स्वापिंग प्रॅक्टिस. अमेरिकेत तरी ऐकलेले /पाहिलेले नाही अशी काही कॉमन प्रॅक्टिस असल्याचे. अर्थात अपवाद असतीलच.

इंटरनेटची सोय नव्हती तेव्हा टाइम्स सारख्या पेपरांतून broad minded couple wants to meet other broad-minded couples अशा कोड लँग्वेज मधल्या छोट्या जाहिराती येत.
Anyhow, अमेरिकेत शॉक लागू नये म्हणून विजेचा दाब 110 volts असतो एवढ्या माहितीवर विसंबून वॉल सॉकेटचं troubleshooting करताना फेस प्लेट काढली आणि दीडशहाणेपणा करून हातानेच वायरी चेक केल्या तेव्हा शब्दशः शॉक बसला होता.

Lol
खरं हा हसण्यावारी नेण्यासारखा किस्सा नाही.

तिकडच्या सकाळी सकाळी काय हा चावटपणा ? या साईटवर माझ्यासारखे बांड युवक पण शिकण्यासाठी येतात म्हटलं.
शारूक सरांनी जर या कमेण्ट्स वाचल्या तर ते मलाच ओरडतील.

अजनबी सिनेमा होता ना. >>> त्यात त्यांना स्वित्झर्लंडहून मॉरिशसला जायला $५०,००० लागतात हे ऐकून मलाही कल्चरल शॉक बसला होता. मॉरिशसला जाणार्‍या फ्लाइट्स व तेथील हॉटेल्स स्विस फ्रँक्स किंवा युरोज घेत नाहीत, हे ऐकूनही. कारण हे लोक डॉलर्स हे स्थानिक चलन असल्यासारखे बोलतात. पन्नास हजार डॉ मधे लोक बिझिनेस क्लास मधून सुद्धा पृथ्वीप्रदक्षिणा करतील आणि वर पेंट हाउस सूट मधे राहतील.

माझा हा डू आयडी असला तरी गोष्ट खरी आहे. ती अशी की: मी एकदा परदेशात गेल्यावर गेल्यावर तिथल्या एक मेडिकलच्या दुकानात जाऊन लिम्लेटच्या गोळ्या मागाव्यात तशा थेट व्हीयाग्राच्या गोळ्या मागितल्या होत्या. सगळी बंधने आपली देशात आहेत व परदेशात सगळे मुक्त असते अशी समजूत होती, माझी. पण ती दुकानात असलेली गोरी बाई आणि तिची सहकारी मुलगी दोघी पण कावर्याबावर्या झाल्या व कसेबसे त्यांनी त्या गोळ्या तिथे नाहीत म्हणून सागितले व नंतर माझ्याकडे बघेनासुद्धा झाल्या. ते बघून मला पण कसेतरीच झाले व मि तिथून काढता पाय घेतलं व पुन्हा त्या दुकानात कधीच गेलो नाही. असे काही मोकळे कल्चर नसते म्हणून शोक्क बसला होता.

जेव्हा नवरा आंध्राहून पहिल्यांदा पुण्यात आला होता, तेव्हा त्याला सगळीकडे स्नैक्स म्हणून वडापाव, भजीभाव,मिसळपाव, पावभाजी, समोसापाव, पावपाव बघून क.शॉक बसला होता ( ऑफिस कैन्टीनमधेपण नाष्ट्याला तळलेले हे पदार्थ+पाव, कोरडे पोहे बघून पण) ..त्यांच्या कडे लहाणपणी आजारी असताना दुध पाव खाल्ला जातो..तसेच नाष्ट्याच्या स्टॉल वर इवढुशा प्लेटमधे एवढेसे पोहे, उप्पीट, खिचडी बघूनपण..

आता कधी भारतात (पुण्याला) गेले की चहाचे कप इतके भातुकलीसारखे वाटतात. अमेरिकेत जायंट व सुपरसाईझ मग्ज पाहून डोळ्यांना तीच सवय झाली आहे.

आमचा एक मित्र टेकसास वरून मुंबईत आला आणि आम्ही कुठे फिरायला निघालो की तो म्हणायचा की आधी गॅस भरून घेऊ. पेट्रोल गाडी मध्ये LPG गॅस का भरायचा असा शुद्ध देशी प्रश्न आम्हाला पडायचा. आणि इतर टीपीकल परदेशातून भारतात आलेल्या लोकांप्रमाणे तो आमचे गोधळलेले चेहरे पाहून हसायचा.
गॅस = पेट्रोल / डिझेल
कोला = पेप्सी / कोक
चेक = बिल

मित्र म्हणजे मूळचा भारतीय असेल तर भारतात पेट्रोल / डिझेल / एला पी जी म्हणतात हे बेसिक्स त्याला का माहिती नव्हते ? Uhoh
भारतात राहणार्‍या माणसाला अमेरिकेत इंधनाला गॅस म्हणतात ही माहिती बाळगायची काय गरज ?

विस्कॉनसिन मध्ये सोड्याला (कोला, पेप्सी व अन्य) पॉप म्हणतात. अर्थात हा कल्चरल शॉक नाही. दामलेंना अधिक माहीती.

हे हसणारे म्हणजे चार दिवस अमेरिकेत रहाय्ल्यावर अर्धा पाव हळकुंडाने पिवळी झालेली येडी जत्रा असते. दुपारी लंचला ह्यांना स्यांडविच लागतो. माझा एक म्यानेजर होता असा येडा पेट्रोल ला ग्यास म्हणनारा.

एक निरीक्षण - परदेशात म्हटले की आपल्याकडे बहुतांश लोकांना सर्वप्रथम अमेरीकाच आठवते Happy
अमेरीकेत राहणाऱ्या भारतीयांनाच नाही तर ईथल्या भारतीयांनादेखील...
सर्वसाधारण निरीक्षण आहे. चुकीचेही असू शकते.

@ वाईफ स्वॅपिंग हे अजनबी चित्रपटातूनच समजले. प्रत्यक्षात कुठे होत असेल असे तेव्हा वाटले नव्हते.

मग एके ठिकाणी वाचलेले की महिनेमहिने सागरात राहणाऱ्या बोटींवर असे होते. अर्थात ते ही रंजक वाटलेले.

आणि मग एके दिवशी आमच्या एका ग्रूपवर खबर आली की आमचा अमुकतमुक मित्र हे करतो. त्याची ख्याती बाईलवेडा म्हणून होती. तरीही हा शॉक होता.

पण आजच्या तारखेला विचार करतो की मियांबिवी राझी तो लेट देम कोझी. आपल्याला काय पडलीय.. Happy

मस्त आहे हा धागा !
वाइफ स्वापिंग या विषयावर एक मिक्सड डबल्स नावाचा रणवीर शौरी कोंकणा सेनचा मूवी पण होता. छान होता. बघितला नसेल तर जरूर पहा.

टाइम्समध्ये ज्या जाहिराती येत त्या मी अंधुकश्या पाहिलेल्या आठवतात. त्यावेळी धक्का बसलेला...

Pages