तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा ऑफिस मधल्या लोकांबरोबर बाहेर जेवायला गेलो असताना मी पाण्याचा घोट घेतला आणि ग्लास खाली ठेवला. थोड्या वेळाने बघतो तर माझ्या शेजारचा माणूस त्याच ग्लास मधून पाणी पित होता! आपल्याकडे पाणी डाव्या बाजूला ठेवण्याची प्रथा असते तर पाश्चात्यांमध्ये उजव्या बाजूला, हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. मग मी कोणाच्या लक्षात आले नाहीसे पाहून उजव्या बाजूच्या ग्लास ने पाणी पिऊ लागलो Proud

आते मामे भावंडे, साटे लोटे कर्नाटकमध्ये सर्रास बघितलं आहे. मामा भाची आमच्याइथे तेलुगू राहायचे त्यांच्याकडे सर्रास होतात. मागे आम्ही जुन्या एरियाच्या जवळच्या एरियात गेलेलो तर माझ्या बालमैत्रीणीची मुलगी भेटली, मैत्रीणीचे लग्न तिच्या मामाशीच झालेलं आणि तिच्या मुलीचेही तिच्या मामाशी, तीने अगदी हाक मारली आणि ओळख दाखवली आणि सांगितलं माझं लग्न अमक्याशी झालं, तो मैत्रिणीचा अगदी लहान भाऊ असल्याने त्यालाही ओळखत होतो, तो ही भेटला त्यादिवशी त्यामुळे ती प्रथा त्यांच्याकडे अजूनही सुरू आहे. सर्व तेलुगू मध्ये नसेल कदाचित, इथे आमच्या सोसायटीत राहतात त्यांच्याकडे नसावं बहुतेक. नालासोपारा इथेही शेजारच्या तेलुगू मध्ये नव्हतं असं.

परदेशात पहिल्यांदा पाय ठेवल्यावर तिथल्या घरातल्या संडासात पाण्याचा नळच नाही हे बघून मला सांस्कृतिक शॉक बसला होता. ते लोक पाणी वापरत नाहीत हे ऐकून माहीत होते, पण त्यासाठी सोयही ठेवत नाहीत असा कधी विचार नव्हता केला. दुसऱ्या दिवशी जाऊन जेट आणला आणि बसवला. निदान माझ्या आयटीआयच्या उत्तेजनार्थ पदवीचा उपयोग झाला.

माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेला किस्सा.

ती एका लहान गावातून पुण्यात शिकायला म्हणून अकरावीत असताना गेली. तिथे तिच्या वर्गात गदिमांची नात होती. म्हणजे तिचे आडनाव ऐकून हिने विचारले की गदिमा तुझे कोण? ती म्हणाली की आजोबा... पण पुढे तिने विचारलं की तुला माझे आजोबा कसे काय माहित? तू त्यांना ओळखते का? माझी मैत्रीण तिला म्हणाली मीच नाही अख्ख्या महाराष्ट्राला तुझे आजोबा माहीत आहेत....

पोस्ट आवडल्याचे सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार.
केशर मडगावकरच्या पांढऱ्या ड्रेस कोडची गंमत इथे आहे. (पाच दहा वर्षातून एकदा चुना मारल्यावर आमची चाळ अशीच दिसते.)
लिंक देण्याच्या निमित्ताने परत ऐकलं. शेपटीवाला चंद्रशेखर, प्रोफेसर कुंभकोणम, आप्पा भिंगार्डेची शिंक- Lol
२३ मिनिटंपासून पूढे बघा.
https://youtu.be/WaQTycyx3FU

आपल्या (देशी प्रथां)मुळे इतरांना कल्चरल शॉक बसल्याचे खूप वेळा अनुभवलेय Happy एक सहज पणे न जाणवलेली गोष्ट : आपल्याला कुठल्याही नात्याला काहीतरी नाव द्यायची खोड असते. जसे मित्राच्या बायकोला वहिनी, भाभी, मित्र /मैत्रिणीच्या आई वडिलांना, शेजारी पाजारी इ. ना काका काकू मावशी अंकल वगैरे. हे नॉन देसी लोकांना अज्जिबात झेपतच नाही! एकदा एका झुम कॉल वर इंडिया ऑफिस मधे नविन जॉइन झालेल्या फ्रेशर मुलीने तिथल्या ऑफीस मधल्याच एका सिनियर कलीग ला "दादा" अशा अर्थाचे काहीतरी संबोधन वापरले ( खरं तर तिथेही ऑफिस मधे असले दादा ताई कुणी सहसा म्हणत असेल असे वाटत नाही पण ती तसं म्हटली खरी) तेव्हा इथल्या अमेरिकन कलीग्ज ना काही झेपले नाही. त्यांना त्यातला कल्चरल आस्पेक्ट समजावता समजावता मी मुद्दाम आपली "चांदोमामा" ही कॉन्सेप्ट ऐकवल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर जो लूक होता ना .... केवळ प्राइसलेस!! Lol

मै Lol हो ते अंकल, आँटी वगैरे इथे पब्लिकला अजिबात झेपत नाही.

अमेरिकेतल्या अमेरिकेत सुद्धा माइल्ड शॉक्स बसतात. साउथ मधे लोकांना जितके "सर", "मॅम" म्हणायची सवय आहे तितकी कोस्टल एरियात नाही.

माझी आई माझ्या बाबांची सख्खी मामेबहीण आहे (विदर्भात तरी अशी लग्न होतात). मात्र सख्खी आतेबहीण, मावस (जवळची किंवा दूरचीही), वा चुलतबहीण मुळीच चालत नाही.

माझ्या जर्मन मैत्रीणीला सगळे इण्डियन रोज नान्,चिकन टिक्का,बटर चिकन ,बिर्याणि अस खावुन बारिक कसे राहतो , कोलेस्ट्रॉल कसे मेन्टेन करता वैगरे कुतुहल होत तिला यातल आम्हि काहिही रोज खात नाही किबहुना हे सगळे इण्डीयातही रोज कुणि खात नाही वैगरे एकदम एनलायटन फिलिन्ग होते.
एकदा मग जिर्‍याचि फोडणी दिलेली बटाटा-कॉलॉफ्लॉवर सुकी भाजी, फुलके, काकडी किसुन रायत ,जिरा राइस अस सगळ डब्यात घालून तिला दिल अर्थातच आवडल होत.

अंकल, अंटी वैताग आहे. आमच्या कंपनीत इतके दिवस देसी पब्लिक अगदीच कमी होत. आता दोन वर्षात आले आहेत थोडे देसी. एकजण कॉट्रॅक्टर म्हणुन जॉइन झाला. पहिलाच जॉब होता. प्रचंड उत्साही. आल्या आल्या 'आप मेरी सिस्टर जैसी हो'. Uhoh मग सीमाजी म्हणुन बोलवायला लागला. वैताग मीटींग मध्ये. बर किती सांगितल तरी 'आप मेरे से बडे हो. हम बडोंका सम्मान करते है. ' मग मात्र त्याला सांगितल या पुढ तु सीमाजी वगैरे म्हटलस तर उत्तर मिळणार नाही. ढढोब्बा होता. गेला ५-६ महिन्यात. सुटकेचा निश्वास टाकला मी.

ईंटरेस्टींग पोस्ट येत आहेत.
पण काही लोकांना काही गोष्टी कल्चलर शॉक वाटतात हे मला शॉकिंग वाटतेय. ईथल्या ईथेच सभासद म्हणजे किती वेगळ्या कल्चर मधून आले आहेत Happy

>>सगळे इण्डियन रोज नान्,चिकन टिक्का,बटर चिकन ,बिर्याणि अस खावुन बारिक कसे राहतो , कोलेस्ट्रॉल कसे मेन्टेन करता वैगरे कुतुहल होत >> ही वैश्विक समस्या आहे. आय लव्ह इंडिअन फूड म्हटलं की मला धडकी भरते. कारण पुढचा प्रश्न डू यू कूक धिस एव्हरी डे हा असतो. हो, पण त्यात मँगो लस्सी, बटर चिकन, नान, बिर्याणी हे नसतं. इतकंच सांगतो. पोळी भाजी आमटी भात करतो हे सांगायची माझी हिम्मत नाही! मग हे बटर चिकन इ. अमेरिकन थेरं आहेत करुन गाडी अमेरिकनाईज्डच्या नावाने शिव्या वर न्यायची. की चायनिज, व्हिएतनामी, मेक्सिकन, कोरिअन आणि अमेरिकन पण सगळ्यांना अमेरिकन फूडला नावं ठेवणे हा आवडता विषय मिळतो.
हे जाज्वल्य अभिमान असलेल्या कॅनडात मात्र शक्य नाही. तिकडे पण अमेरिकेलाच नावं ठेवायची. कारण अमेरिकेला नावं ठेवणे आमचा नॅशनल स्पोर्ट्स आहे.

मागे एकदा वर्क फ्रॉम होम चालू होते. समोर एक फिनलँडचा सहकारी होता. नव्याने म्हणजे वर्षभरापूर्वी जॉईन झालेला. पण माझ्यापेक्षा बराच सिनिअर होता. महत्वाचे डिस्कशन चालू होते/ त्यामुळे मी पोराबाळांना बाहेर खेळायला कटवून बाहेर हॉलमध्ये शांततेत काम करत बसलो होतो. मध्येच तो म्हणाला, कसला तरी आवाज येतोय.
मी दचकलो, म्हटले एवढा पिनड्रॉप सायलेंस आहे याला कसला आवाज येतोय?
मग तो म्हटला, लाईनमध्ये काहीतरी डिस्टर्बन्स आहे. मी म्हटले हो असेल.
मग थोड्यावेळाने त्याला पुन्हा काहीतरी सुचले आणि मला विचारले, फॅन चालू आहे?
मी हो म्हणालो .... हॉलमध्ये दोन फॅन आहेत आणि दोन्ही जोरात चालू होते. पण त्यांचा आवाजही जाणवण्याईतका नव्हता. तरी त्याला ते डिस्टर्बन्स वाटले याचे कौतुक वाटले. म्हटले नशीब माझी पोरं घरी नव्हती. नाहीतर त्यांचा गोंधळ, मोबाईल, टीव्ही सारेच आवाज एकत्र असतात. याच्या कानाचे पडदेच फाटले असते.

असो,
मग त्याने मला विचारले, फॅन का चालू आहे? एसी बिघडला आहे का Proud
आई ग्ग, मला अगदी गरीब झाल्यासारखे वाटले.
तरी मी त्याला म्हणालो की एसी बेडरूममध्ये आहे, मी हॉलमध्ये काम करतोय... आणि हे ऐकून त्याला माझ्याबद्दल खूप कळवळा दाटून आला.

त्याच्या गूगल नॉलेजनुसार भारत हा फार गर्मीचा ऊष्ण वातावरणाचा देश होता. आणि अश्या देशात मी एसी नसलेल्या एका रूममध्ये बसून काम करतोय याचे त्याला फार वाईट वाटू लागले.
माझ्यामते प्रत्यक्षात मी मस्तपैकी फॅन लाऊन बाल्कनीच्या खिडक्या दरवाजे उघड्या टाकून फार सुखद वातावरणात सोफ्यावर आडवातिडवा पसरून राजासारखा काम करत होतो.... पण त्याच्या नजरेत मी स्वतःला फकीर झालेले बघत होतो.

तरी मग मी उसने अवसान आणून माझ्या मोडक्या तोडक्या ईंग्रजीत त्याला समजावले की भारतात असे पुर्ण घरभर एसी नसतात. त्याची गरजही नसते. आमचा जन्मच ईथे झालाय. आम्हाला झेपते हे वातावरण एसी शिवाय. तसेच लहान मुलांना आम्ही एसीपासून दूरच ठेवतो अन्यथा त्यांची इम्युनिटी बिघडते.. वगैरे वगैरे
त्याला फारसे पटले असे वाटले नाही. कितीही मरू दे म्हटले तरी आता त्याच्याशी बोलताना आता मला नेहमी गरीब असल्यासारखे वाटते Happy

मी कधी जनरली पब्लिक प्लेस मध्ये नाक शिंकरत नाही. अगदी रुमाल नाकावर धरून ही नाही.
परदेशात गेल्यावर आपल्या शेजारी ट्यूब मध्ये बसलेली व्यक्ती रुमालात बिनधास्त आवाज काढत नाक शिंकरताना बघून मला शॉक बसला होता . वैताग ही आला होता. परदेशी स्वतःला मॅनर्स वाले समजणाऱ्या लोकांकडून मी हे कधीच अपेक्षिलं नव्हतं.

हे जाज्वल्य अभिमान असलेल्या कॅनडात मात्र शक्य नाही.>> थोडक्यात कॅनडा हे पुणे आहे आणी अमेरिका म्हणजे मुबै कोणी एक भिकार म्हटल की आपण सात भिकार म्हणाव.

जाज्वल्य अभिमान असलेल्या कॅनडात मात्र शक्य नाही.>> 
कुठलाच विषय उरला नसला की कनेडियन्स टिम हॉर्टन्स, कॉफी क्रिस्प व गन कंट्रोल ही ठेवणीतली ब्रह्मास्त्रं काढतात. Proud

Lol मी याचीदेही टोरांटो मधल्या देसी माणसाला 'अमेरिकन लोक ड्रायव्हिंग कसं राव्डी करतात' यावर सुस्कारे टाकताना बघितलं आहे.
देसी + टोरांटो हे जणू पुरेसं डेडली कॉम्बो नाहीच आहे!

तरी मग मी उसने अवसान आणून माझ्या मोडक्या तोडक्या ईंग्रजीत त्याला समजावले की भारतात असे पुर्ण घरभर एसी नसतात.
>>
याऐवजी त्याच्या फिनलण्डच्या घरात एसी काय करतोय असे विचारायचे?

विचारले, फॅन चालू आहे?>>>>

फॅनचा ऑन्लाइन मिटिन्गीत असह्य आवाज येतो. कोणाचा फॅन सुरू असेल तर बन्द करा सान्गावे लागते इतका आवाज येतो. ज्याचा सुरू असतो त्याला मात्र अजिबात आवाज येत नाही.

सही आहे हा धागा, आता आधीची पानं ही वाचेन Happy
खाण्या पिण्या पेक्षा मला कल्चरल शॉक २ वेळा लागला:
सिंगापूर ला लोकल पब्लिक ना वाटायचे की गोरे भारतिय श्रिमंत आणि सावळे गरीब असावेत, कन्फम करताना मला विचारायचे Lol
मी शॉक मधे Uhoh

नवरा बायकोत एकमेकांच्या सहमती ने स्विंगींग करतात परदेशात ते ऐकून महा कल्चरल शॉक बसला होता, इर्फान खान चा मुव्ही होता तसा..पार भंजाळले होते Lol

शाळेत असताना श्रावण महिन्यात शनिवारी (शनिवारी शाळा सकाळी ७ ला असे) डब्यात ऑम्लेट घेऊन गेलेलो. त्याआधी ऑम्लेट कधी नेले नव्हते, श्रावणातच नव्हे तर इन जनरल सुद्धा. मला श्रावण चालू आहे वैगेरे काही प्रकार माहीतच नव्हता. घरात कोणी पाळायचेच नाही.
ऑम्लेट आणि ते ही श्रावणात बघून सगळ्या मित्रांना डबल शॉक बसला. 'तुम्ही' नॉनव्हेज खात नाही ना असे प्रश्न आले Happy

फॅनचा ऑन्लाइन मिटिन्गीत असह्य आवाज येतो
>>>
हेडफोनचा माईक तोंडाजवळ असेल तर तोंडातलाच आवाज कॅच करतो. लांबचा नाही. तुमच्याकडे स्पीकरवर टाकतात का?

नवरा बायकोत एकमेकांच्या सहमती ने स्विंगींग करतात >>> मी चुकून "स्विमिंग करतात" वाचले. त्यात काय शॉक असा विचार करत होतो Happy

Pages