Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हाईटहॅट ...... तुमची
व्हाईटहॅट ...... तुमची संपूर्ण पोस्ट हहपुवा आहे. प्रचंड हसले.
काही बायकांनी तर केशर मडगावकरसारखं पांढरा टॉप, पांढरी ट्राउजर, पांढरे शूज असा जामानिमा केलेला. >>>>
रच्याकने, केशर मडगावकर कोण?
Whitehat
Whitehat
ये केशर मडगावकर नई जानती! अध्यात्मिक उन्नाती कशी होणार मामी!
#असामीअसामी
मलाही नाही माहीती, पण मला
मलाही नाही माहीती, पण मला एकटीलाच माहीती नसेल, कोणीतरी फेमस व्यक्तीमत्व असं वाटलं म्हणून विचारलं नाही, हाहाहा. गुगलते आता.
ओहह पु ल देशपांडे यांच्या
ओहह पु ल देशपांडे यांच्या असामी असामी पुस्तकातली. वाचायला हवं परत.
तरी बरं त्यांना बोंब मारणे
तरी बरं त्यांना बोंब मारणे वगैरे प्रकार माहीत नाहीत. अन्यथा त्यातही काहीतरी माईंडफुलनेस, chanting वगैरे केलं असतं. >>>
हे जबरी आहे. सगळी पोस्टच.
व्हाईट चा किस्सा भारी आहे
व्हाईट चा किस्सा भारी आहे.मडगावकर बरोबर कोणी अमेरिकन मधू खारकर होता का?
एकदा पंजाबी, राजस्थानी
एकदा पंजाबी, राजस्थानी मध्यमवयीन मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात गप्पा चालल्या असताना मी कशावरून तरी भीमसेन जोशींचा विषय काढला. तेव्हा सगळ्यांचेच चेहरे प्रश्नार्थक झाले होते. हे नाव ते लोक आयुष्यात पहिल्यांदाच ऐकत होते. एकीने 'ये भीम सिंग कौन है?' विचारल्यावर कुणीतरी म्हटलं पण 'अरे कोई तो मराठी होगा'. त्या वेळी त्या अख्ख्या घरात ते नाव माहीत असलेला मी एकटाच होतो. सॉल्लिड शॉक बसला होता.
मला असाच शॉक पु लं देशपांडे
मला असाच शॉक पु लं देशपांडे कोण असं एका मराठी माणसाने (आता 39 चा असेल तो) विचारल्यावर बसला होता.
व्हाईट हॅट भारी पोस्ट एकदम.
व्हाईट हॅट भारी पोस्ट एकदम. दिवाळी साजरी झालेली आमच्या कंपनीत ते आठवल.
मी अनु - नक्कीच इंग्रजी
मी अनु - नक्कीच इंग्रजी मिडीयम असणार...
इतक्यात मागचे तीन चार देसी
इतक्यात मागचे तीन चार देसी अक्षरशः वाघ मागे लागल्यासारखे सुसाट
धाग्याचा रुख हळू हळू देशी घाटी लोकांना शिव्या देण्याकडे वळायला लागला आहे.
इ
इकडून तिकडे गेलेले आणि तिकडच्यांनी त्यांच्यात सामील करून न घेतलेलयांच्या प्रतिसदाचा पूर येईल आता
एक सिनियर म्यानेजमेन्टचा बुवा
एक सिनियर म्यानेजमेन्टचा बुवा पकडून आणलेला त्याने माईकवरून होली कसा inclusive , secular festival of colors, to celebrate spring season आहे असं सांगितलं.>> ऑफिस ऑफिस आठवलं
आमच्या नाशकात पादचारी कर्ण रेषेत, डायैग्नली म्हण्जे इकडचा सिग्नल त्याच्या डायाग्नोली पलिकडील सिग्नल पर्यंत ट्रॅफिक न जुमानता चालत जातात,>> तुम्ही नाशिककर? माझी तर रोजच घराबाहेर पडल्यावर चिडचिड होते. गाडीत.. गाडीवर.. पायी.. कसंही असले तरी..
काही बायकांनी तर केशर मडगावकरसारखं पांढरा टॉप, पांढरी ट्राउजर, पांढरे शूज असा जामानिमा केलेला. >>>> रच्याकने, केशर मडगावकर कोण?>> पू. लं. असा मी असा मी..
मडगावकर बरोबर कोणी अमेरिकन मधू खारकर होता का? >> मधू खारकर बेनसन अँड जॉनसन मधला. अमेरिकन नाही.
एकीने 'ये भीम सिंग कौन है?' विचारल्यावर कुणीतरी म्हटलं पण 'अरे कोई तो मराठी होगा'. त्या वेळी त्या अख्ख्या घरात ते नाव माहीत असलेला मी एकटाच होतो. सॉल्लिड शॉक बसला होता.>> एकीने मला कौंन उषा मंगेशकर? वो गाती भी है? असं विचारलं होतं.
लहान असताना एक कानडी कुटुंब
लहान असताना एक कानडी कुटुंब शेजारी रहायचं. रोजचं एकमेकांकडे जाणे येणे असायचे.
एकदा काकूंच्या शेजारी बसून जेवायचा प्रसंग आला. तर त्या भात वरून तोंडात टाकायच्या आणि हातात वरण / आमटी घेऊन आवाज करून ओढायला लागल्या. मला असह्य झालं. नंतर समजलं की त्यांच्यात भुरके मारून जेवण्याची पद्धत असते. ते काकूंना जमत नाही म्हणून त्या हातात खोलगट खड्डा करून आमटी ओढताना आवाज काढतात.
त्यांच्याच मुलीच्या लग्नात (तिने तमिळ मुलाशी लग्न केले) बघितले. भाताचे मोठे मोठे बॉल करून हातात धरून तोंडात कोंबत होते. काही काही तर तोंडावर उजवीकडून डावीकडे हात फिरवत रस्सम भाताचा घास गट्टम करत होते.
पहिल्यांदा पाहिलं तेव्हां कल्चरल शॉकच होता.
मला एकदा असं जेवायचं आहे
मला एकदा असं खायचं आहे
शुभेच्छा !
शुभेच्छा !
ये केशर मडगावकर नई जानती!
ये केशर मडगावकर नई जानती! अध्यात्मिक उन्नाती कशी होणार मामी!
#असामीअसामी. >>> अरे हो! मराठी साहित्यापासून फारच दूर आलीये की काय मी!
त्यांच्याच मुलीच्या लग्नात
त्यांच्याच मुलीच्या लग्नात (तिने तमिळ मुलाशी लग्न केले) बघितले. भाताचे मोठे मोठे बॉल करून हातात धरून तोंडात कोंबत होते. काही काही तर तोंडावर उजवीकडून डावीकडे हात फिरवत रस्सम भाताचा घास गट्टम करत होते. >>> हे मी पाहिलंय. फारच विचित्र दृष्य असतं ते.
बरेच कल्चरल शॉक जेवणाबद्दल
बरेच कल्चरल शॉक जेवणाबद्दल आहेत म्हणून माझा पण..
मी पण एकदा केरळच्या लोकांच्या मठात जेवायला गेले होते, अगदी सहज ,ग्रुप निघाला म्हणून, पंगत बसली तेव्हा ताक वाढताना जेवणारी लोकं सरळ हाताचा खोलगट खड्डा करून त्यात घेत होते आणि भरका मारत पीत होते, मला एकदम भडभडून आलं,शेवटी ताटावर एक हात आडवा ठेवून(कुणी काही वाढू नये म्हणून) नजरही वर न करता माझं पान संपवलं होत मी,माझ्यासाठी अशा प्रकारे खाणं हा कल्चरल शॉक होता
माझ्या एका श्रीलंकन
माझ्या एका श्रीलंकन मैत्रिणीला हाताने भात खाताना बघून तिच्या अमेरिकन प्राध्यापकाला कल्चरल शॉक बसला होता. तो तिला म्हणाला की हे त्याने लहानपणी जरी असं केलं असतं तरी त्याची आई त्याला ओरडली असती. तर ती मैत्रीण त्याला म्हणाली की तिने लहानपणी चमच्याने भात खाल्ला असता तर तिची आई ओरडली असती. प्राध्यापकाला दुसरा शॉक बसला.
हॉटेल्स मध्ये मला मिसळ मध्ये
हॉटेल्स मध्ये मला मिसळ मध्ये पावाचे तुकडे करून चमच्याने खाताना किंवा डाळ बाटी मधले बाटीचे तुकडे करून चमच्याने खाताना बघून बऱ्याच जणांना कल्चरल शॉक बसतो.(मला हाताला रस्सा भाज्यांचा स्पर्श किंवा वास आलेला आवडत नाही, अर्थात या सर्व मसालेदार गोष्टी खायला खूप आवडतात)
मला चायनीज राईस काटाचमच्याने
मला चायनीज राईस काटाचमच्याने खायला ठिक वाटते. पण डाळ वा कुठलेही कालवण भातासोबत खाताना बोटांना तो फिल झाला तरच मजा येते. मी ऑफिस कॅण्टीनमध्येही भात हातानेच खातो. उगाच लाजून जेवण बोअर करायला आवडत नाही.
साऊथचे लोकं हिच मजा अजून पुढच्या लेव्हलला नेत असावेत असे वाटते. हाताला जास्त स्पर्श. जास्त मजा. तिथे सगळेच तसे खात असल्याने त्यांना काही वाटत नसावे. पण ईथे मुंबईत देखील आजूबाजूच्यांची पर्वा न करत कोणी बिनधास्त तसे खात असेल तर मला कौतुकच वाटते. कारण माझ्या न लाजता हाताने भात खाण्याशी मी ते रिलेट करू शकतो
साऊथमध्ये सर्वच काही तसे खात
साऊथमध्ये सर्वच काही तसे खात नाहीत. काही मोजक्या उदाहरणांवरून सरसकटीकरण नको.
साऊथमध्ये सर्वच काही तसे खात
साऊथमध्ये सर्वच काही तसे खात नाहीत.
>>>
हो अर्थात. आपल्याकडेही चारचौघात हाताने डाळभात खाणाऱ्यांची संख्या घटतेय. लग्नातही पंगत गेल्या आणि बुफे आले. तिथेही बरीच लोकं चमच्याने डाळभात खाताना आढळतात. मला हे चटकन जाणवते कारण बहुतांश वेळा ग्रूपमध्ये मी एकटाच असतो हाताने भात खाणारा. तेच लहानपणीच्या लग्नाच्या पंगतीत एखादाच आढळायचा जो हाताने न खाता काटाचमचा वापरायचा.. मुळात चमचा द्यायचे का ते ही आता आठवावे लागेल
खाण्यापिण्याच्या सवयी आणि
खाण्यापिण्याच्या सवयी आणि तऱ्हा खूप बघितल्यात, त्यात आता कशाचाही शॉक बसत नाही.
पण एका कानडी मित्राची बायको त्याची सख्खी भाची आहे हे समजल्यावर शॉक बसला. आमच्याकडे हे कॉमन आहे असे त्याने सांगितले.
एका प्रथितयश तमिळ फॅमिलीमध्ये भावा-बहिणीच्या मुलामुलींचे साटेलोटे पद्धतीचे लग्न बघून शॉक बसला. काही मुस्लिम परिवारांमध्ये खालाजात भाई से शादी (आतेभावाशी लग्न) होते हे माहिती होते, पण दुहेरी तमिळ सोयरीक शॉकिंग वाटली.
काही मुस्लिम परिवारांमध्ये
काही मुस्लिम परिवारांमध्ये खालाजात भाई से शादी (आतेभावाशी लग्न) होते हे माहिती होते,
>>>>
आपल्याकडेही होते की मामाच्या मुलीशी लग्न. पण तेच काकाच्या मुलीशी होत नाही. दोन्हीत फरक काय समजत नाही आडनाव बाबांचे लागते म्हणून त्यांच्या फॅमिलीत होत नाही. आईच्या फॅमिलीत करू शकतो.
इतक्यात मागचे तीन चार देसी
इतक्यात मागचे तीन चार देसी अक्षरशः वाघ मागे लागल्यासारखे सुसाट
धाग्याचा रुख हळू हळू देशी घाटी लोकांना शिव्या देण्याकडे वळायला लागला आहे>>>>>>
हे असले देशी इथे देशात तर प्रत्येक काउन्टर वर सापडतात… त्याना शिव्या दोन्हीकडे पडतात.. आणि देशी घाटी मधला घाटी शब्द रेसिस्ट आहे.
मामाच्या मुलीशी लग्न पण शॉक
मामाच्या मुलीशी लग्न पण शॉक होता मला... अरे बहीणच आहे ना ती...
मामाच्या मुलीशी लग्न
मामाच्या मुलीशी लग्न उत्तरेतल्या लोकांना प्रचंड शॉकिंग वाटते. चालायचंच. देशभर वेगवेगळ्या प्रथा आहेत, घोळ आहेत.
खुद्द महाभारतात कृष्णाची बहीण सुभद्रा कुंतीपुत्र अर्जुनाशी लग्न करते. अर्जुन तिचा सख्खा मामेभाऊ. अभिमन्यूपुत्र परीक्षित आणि इरावती मामेभाऊ + बहीण लग्न आहेच.
साउथला सख्ख्या भाचीशी लग्न
साउथला सख्ख्या भाचीशी लग्न करतात.
इकडून तिकडे गेलेले आणि
इकडून तिकडे गेलेले आणि तिकडच्यांनी त्यांच्यात सामील करून न घेतलेलयांच्या
>>>>>>>>>>>>> अमेरिकेत ल्या महाराष्ट्र मंडळात तिकडे स्थायिक झालेले व आता नुसते नावालाच मराठी असलेले लोक भारतातून नवीन आलेल्या मराठी माणसाला तूच्छ वगणूक देतात. आणि महाराष्ट्र मंडलात इंग्रजीतून भाषण करतात. त्यांच्या बोलण्या वागण्यात कुठेच मराठी पण जाणवत नाही. कोणत्याच प्रकारचे मराठी साहित्य त्यांनी वचलेले नसते ना कि त्यांच्या बोलयाचे वा भाषणाचे विषय मराठी असतात. सगळ्या गप्पा इग्लिश मधून इंग्लिश पुस्तके आणि विषय. या कृतरीम इंग्रजांचे सगळे वागणे बोलणे बघून अक्षरशहा शिसारी येते. आणि नवीन आलेला हा मराठी माणूस परत कधीच महाराष्ट मंडळात जात नाही.
Pages