तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडता बाण घ्यायची सवय आहे भारतीयांना. ते पाणी काय फक्त भारतात वापरत नाहीत धुवायला. Middle ईस्ट, काही युरोप मध्ये पण वापरतात, पण ट्विटर वर पडीक देसी लोक आहेत, रिप्लाय वर रिप्लाय.

ह्याला कल्चरल शॉक म्हणता येईल का माहित नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी दिल्लीला गेलो होतो तेंव्हाची गोष्ट आहे. दिल्लीचा उन्हाळा भाजून काढणारा असतो. तिकडील हवेत आर्द्रता नसल्याने काया भाजल्यासारखी होते. त्यामुळे काही रेस्टॉरंट्स मध्ये टेबल उघड्या जागेत असतील तर डोक्यावर पाण्याचा पाईप असतो व त्याला अगदी धूसर फवारे उडतील असे स्प्रिंकलर बसवलेले असतात (कदाचित ह्या प्रॉडक्टला काहीतरी नाव असावे पण मला ते माहित नाही). नंतर हे हैदराबादला पाहिले व आजकाल पुण्यात सुद्धा स्टेशन भागात पाहिल्यासारखे वाटते. पण तेंव्हा ते माझ्यासाठी नवीन होते. असे काही असते याचीसुद्धा कल्पना नव्हती.

तर चहा पीत बसलो असता अचानक त्यांनी स्प्रिंकलर सुरु केले. डोक्यावर अचानक भुस्सफिस्स वगैरे आवाज होऊन अंगावर पाण्याचे एकदोन थेंब पडले. त्याबरोबर हातातला चहाचा कप पट्कन खाली ठेऊन मी दचकून जाग्यावरच ताड्कन उभा राहिलो. आजूबाजूचे पब्लिक मात्र शांतपणे बसून होते. एकदोन सेकंदात मला खरा प्रकार लक्षात आल्यावर खजील होऊन जणू आळस द्यायलाच उठलो आहोत असे नाटक केले. हात वर करून आळस दिला आणि पुन्हा खाली बसलो. चोरून आजूबाजूला कटाक्ष टाकला तर बाजूचे एक दोन कपल्स माझ्याकडे बघून पोट धरून हसत होते Biggrin

@अतुल पाटील,

त्याला मिस्टीफायर्स म्हणतात, जगभर वापरले जातात

images (13).jpeg

च्रप्स,

बातमी नीट वाचली असती तर कदाचित तुमची उठसुठ भारतीयांना बडवायची खाज उघडी पडली नसती! , एकतर तुम्हा अमेरिकन लोकांना आपल्या काउंटी बाहेरचं शष्प जग माहिती नसतं, दुसरं म्हणजे माहिती असून वाटेल तशी चेष्टा केली की त्याहून भारी भारी उत्तरे मिळणारच, उडते बाण तुमच्या अमेरिकन बांधवांनी घेतलेत भारतीयांनी नाही.

धन्यवाद.

Atuldpatil कसली भारी सिच्युएशन.... मला दिसलात तुम्ही डोळ्यासमोर... lolzz

त्यामुळे काही रेस्टॉरंट्स मध्ये टेबल उघड्या जागेत असतील तर डोक्यावर पाण्याचा पाईप असतो व त्याला अगदी धूसर फवारे उडतील असे स्प्रिंकलर बसवलेले असतात
>>> तुळशीबागेतली मिसळ च दुकान.नाव विसरलो.

माझीही समजूत होती की वांग्याला भाज्यांचा राजा म्हणतात.
<<

हो ना. वांग्याची भजी कस्ली मस्त लागतात! 21.gif

<<< ट्विटर वर पडीक देसी लोक आहेत, रिप्लाय वर रिप्लाय. >>>

पूर्वी सार्वजनिक संडास मध्ये बसल्याबसल्या भिंती दरवाज्यावर लिहायची विकृत सवय काहींना असे. आजकाल त्याच वृत्तीचे लोक ट्रोल बनून ट्विटरवर कॉमेंट लिहित असावेत.

नॉर्वेत असताना अनुभवलेला कल्चरल शॉक :
जनरली आपल्याकडे पोहायला जाताना कपडे बदलायच्या रुममध्ये पुरूष तसेच फिरत नाहीत. निदान टॉवेल लावतात किंवा शॉर्ट/अंडरपँट तरी घालतात. नॉर्वेमध्ये एकदा ऑफिसमधील तीन सहकार्‍यांबरोबर पोहायला गेलो होतो. तिकडे आधी कपडे बदलायच्या रुममध्ये आत शिरल्यावर आधी शॉवर घेऊ या असे ठरले. मी नेहमी प्रमाणे टॉवेल लाऊन नायलॉन शॉर्ट घातली आणि सहज माझ्या सहकार्‍यांकडे पाहीले तर तिघेही पुर्णपणे नागडे होऊन माझ्याकडे पहात होते. मला एकदम विचित्र वाटले. नंतर शॉवरकडे जात असताना वाटेत मोठा हॉल होता आणि तेथे जवळ जवळ १५-२० पुरूष पुर्णपणे नागडे वावरत होते. मीच एकटा शॉर्ट मध्ये होतो. त्यामुळे एखाद्या नागड्या माणसाकडे आपण जसे विचित्र नजरेने पहातो तसे ते सर्व माझ्याकडे पहात होते. हाईट म्हणजे तिथे एकजण दाढी करत होता. तोही पुर्णपणे नागडा होऊन दाढी करत होता. (निदान दाढी करताना तरी सगळे कपडे काढायची काय गरज?) . नंतर अर्थात पोहायला तलावामध्ये शिरताना मात्र सगळ्यांनी शॉर्ट घातली. (कारण मिक्स बॅच होती). लेडीजरूममध्येही हाच प्रकार असतो असे कळले.

नंतर ऑफिसमध्ये माझ्यासारख्या भारतीय कलिग्जबरोबर हे शेयर केले तेव्हा सगळे खुप हसले. मला चेष्टेत म्हणाले की तू पोहायला नाही पण ऑफिसमधल्या सहकार्‍यांना तश्या अवस्थेतच पहायला गेला होतास. ऑफिसमधल्या जीममध्येही हाच प्रकार असतो हे कळलं (मी कधीच जीमला जायचो नाही त्यामुळे माहीत नव्हते). तेथेच सेटल झालेल्या एका भारतीय पुरूषाविषयी पण आमचे बोलणे झाले. माझ्या भारतीय मित्रांनी सांगितले की तो आपल्याला भारतीय संस्क्रूती, शालिनता वगैरे लेक्चर देत असतो पण स्वतः जसा जीममध्ये शिरल्या शिरल्या नागडा होऊन इकडे तिकडे हिंडत असतो. जणू केव्हा एकदा जीममध्ये जातोय याचीच वाट पहात असतो.

स्थळ : अमेरिका
पहिल्या प्रोजेक्ट ला जॉईन केलं. अमेरिकन बॉस ऑफिसमध्ये सगळ्यांची ओळख करून देत होता. सोबतच ऑफिस पण दाखवत होता. ऑफिसची ब्रेक रूम printers कुठे कुठे आहेत ते सगळे दाखवले आणो तितक्याच सहजतेने दाखवली 'Ladies restsoom '. मी Speechless

@च्रप्स: हो हो. हे अजून एक, इथे तर अतीच स्पष्ट उच्चार आहे...
https://www.youtube.com/watch?v=Ioobh0l06hk

तरीही इतक्या दशकांत बॉलीवूड चित्रपटातील एकाही गाण्यात अजून हा शब्द आला नाही नशीबच. किंवा त्याचा अर्थ वेगळ्या राज्यांत वेगळा होतो म्हणून कदाचित आणला गेला नसेल.

चीन मधे टिपीकल लोकल रेस्टॉरंट्स मधे
जेवताना ते लोकं बोन्स चावून चोखून झाली की खडाखडा टेबलावरच टाकतात.
चीन जपान मधे जिम च्या लेडीज चेंजिंग रूम मधे without clothes स्त्रिया त्यांच्या पोरींसकट आरामात वावरत असतात .
साऊथ अमेरिकेत बहुतेक फॅमिली पोरं बाळं आजी आजोबा बायकां पुरूष एकत्रच टाॅपलेस असे मोठ्ठ्याश्या हाॅट स्प्रिंग च्या नॅचरल डबक्यात comfortably गप्पा मारत बसलेल्या दिसून येतात
त्यांच्या कल्चर मधे हे सगळं नैसर्गिक आहे..
आपणही किती वेळा शाॅक लावून घ्यायचा तो
तो. Happy

@च्रप्स ओके.

खरंतरं मी सुद्धा हा शब्द (पप्पी या अर्थाने) येथेच पहिल्यांदा ऐकला. पुर्वी कधीच ऐकला नाही. परिचित यांनी म्हंटल्याप्रमाणे बॉलिवूड मध्ये पण कधी वापरला गेला नाही. कदाचित बॉलिवूडचे जवळ जवळ ९०% चित्रपट मुंबईत होतात आणि बरेचसे मराठी लोकं वेगवेगळ्या विभागात काम करतात म्हणून या शब्दाचा अर्थ बॉलिवूड्ला माहीत असावा...

{{{ साऊथ अमेरिकेत बहुतेक फॅमिली पोरं बाळं आजी आजोबा बायकां पुरूष एकत्रच टाॅपलेस असे मोठ्ठ्याश्या हाॅट स्प्रिंग च्या नॅचरल डबक्यात comfortably गप्पा मारत बसलेल्या दिसून येतात
त्यांच्या कल्चर मधे हे सगळं नैसर्गिक आहे..
आपणही किती वेळा शाॅक लावून घ्यायचा तो
तो. Happy
नवीन Submitted by वर्षू. on 17 July, 2018 - 13:18 }}}

का घ्यायचा लावून शॉक? आपल्या इथे अनेक तीर्थक्षेत्री / संगमांवर काय वेगळी परिस्थिती आहे? गाणगापूर, पंढरपूर इथे चक्कर मारा. २५००० व्होल्ट्सचे शॉक्स बसतील.

तितक्याच सहजतेने दाखवली 'Ladies restsoom
>>>आत जाऊन नाही दाखवली ना? नक्की काय शॉक बसला तुम्हाला?-

ही २० वर्षांपूर्वीची आठवण आहे. त्या आधी भारतातल्या जॉब्स मध्ये असताना नवीन office मध्ये एखाद्या मुलीकडेही हि चौकशी हळूच केली जायची अश्या वातावरणातून आलेल्या माझ्यासाठी एका MALE बॉस ने रेस्टरूमदाखवणे दाखवणं हा शॉकच होता, तेव्हा आतासारखी western जगाची ओळख भारतात झालेली नव्हती.

ऑफिस जॉईन केले तेव्हा नवीन असताना बॉस ने फर्मान काढले कि डिपार्टमेंट मधील सगळे भारतीय रेस्तरॉं मध्ये जेवायला जाऊ.
माझा भारतीय रेस्तरॉं मध्ये जाण्याचा पहिलाच प्रसंग. ते बफे पद्धतीचे रेस्तराँ होते. अगदी पापड(म), लोणची, रायते, सॅलड पासून सूप, वेगवेगळे व्हेज, नॉन-व्हेज पदार्थ, भाताचे विविध प्रकार, ते दोन प्रकारचे स्वीट्स हे आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले बघितल्यावर दिल खूष हो गया. माझा एक सहकारी मला म्हणाला मी तुझ्या बरोबर रांगेत येतो आणि तू जे घेशील तेच मी घेणार. मी म्हटले बरं. जेवायला सुरवात केल्यावर जाणवले कि अन्नाची चव चांगली आहे परंतु काही तरी मिसिंग आहे. काही कळेना. थोड्यावेळाने अर्धे जेवण संपल्यावर लक्षात आले कि तिखट अजिबातच वापरलेले नाही. तेव्हढ्यात माझ्या शेजारी बसलेला सहकारी मला म्हणाला आय डोण्ट नो व्हाय आय ऍम स्वेटिंग. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळेना. कसेबसे हसू दाबीत मी त्याला म्हटले अरे हे अजिबात तिखट नाहीय्ये.

हा माझ्या साठी एक फूडच् रल शॉकच होता. पुढे त्याची सवय झाली हि गोष्ट वेगळी.

Pages